ठाणे : शतकोत्तर रौप्य महोत्सवी वर्षाकडे वाटचाल करणाऱ्या श्री आनंद भारती समाजाच्या वतीने यंदाही संस्थेच्या सभागृहात गणेशोत्सव साजरा करण्यात येणार असल्याची माहिती सचिव संदिप कोळी यांनी दिली. संदीप कोळी म्हणाले संस्थेच्या गणेशोत्सवाचे यंदा ११६ वे वर्ष आहे. अनंत चतुर्दशीपर्यंत साजऱ्या होणाऱ्या या गणेशोत्सवात विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. त्यात ७५वा नाखवा पारितोषिक वितरण समारंभाचा समावेश आहे. या शैक्षणिक कार्यक्रमासाठी सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश ॲड अभय श्रीनिवास ओक प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. समाजाध्यक्ष हरेश्वर मोरेकर हे या कार्यक्रमाचे समारंभाध्यक्ष असतील. याशिवाय प्रश्नमंजुषा, निबंध,चित्रकला, स्मरणशक्ती, वत्कृत्व, महिलांसाठी पाककला स्पर्धा, सांस्कृतिक कार्यक्रम होईल. संस्थेचे जेष्ठ रंगावलीकार सुभाष शाक्यवार  हे नशा – व्यसनमुक्तीवर आधारित सजावट साकारणार आहेत.
0000000
0000000

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *