मुंबई : महाराष्ट्र दिन व कामगार दिनाचे औचित्य साधून गाव चिखले, जि. पालघर येथे मिरा भाईंदर महानगर पालिकेच्या सौजन्याने आयोजित करण्यात आलेल्या कुस्ती मैदानात , मिरा भाईंदर कुस्तीगीर संघ संचालित श्री गणेश आखाड्यातील पैलवानांनी भरघोस बक्षिसांची लयलूट केली.
मनीषा शेलार हिने महिला गटातील फायनलची गदे वरील कुस्ती जिंकली. कोमल पटेल, मनस्वी राऊत, कविता राजभरने आपल्या लढती सहज जिंकून चषक पटकावले. सूरज माने, सूर्यकांत देसाई, आदर्श शिंदे, अभिषेक इंगळे यांनी देखील प्रतिस्पर्ध्यांना लिलया आस्मान दाखवून रोख रकमेची पारितोषिके आणि पदके मिळवली. या सर्व कुस्तीपटूंना वस्ताद वसंतराव पाटील यांचे मोलाचे मार्गदर्शन मिळाले.