नागपूर : नागपूर जिल्ह्यात सलग तिसऱ्या दिवशी भूकंपाच्या धक्क्याची नोंद झाली आहे. महिन्याभरात चौथ्यांदा भुकंपाचे धक्के जाणवले आहेत. नागपूर जिल्ह्यातील उमरेड भागात आज दुपारच्या सुमारास ही घटना घडलीय. यात 2.7 रेक्टर स्केल भूकंपाच्या धक्क्याची नोंद झाली आहे. काल, 4 एप्रिलला दुपारच्या सुमारास भूकंपाचे सौम्य धक्के बसले होते. शनिवारच्या दुपारी 2 वाजून 24 मिनिटांनी 2.4 रिक्टर स्केलच्या भूकंपाचा सौम्य धक्का बसला, याचे केंद्र कुही होते. तर शुक्रवारी दुपारी 3 वाजून 11 मिनिटांनी 2.5 रिक्टर स्केलचा भूकंप आला होता. त्यावेळी त्याचे केंद्र पारशिवनी होते. भूकंपाच्या स्थितीतून अतिशय सुरक्षित मानल्या जाणाऱ्या आणि या पूर्वी क्वचितच अनुभवायला मिळालेल्या नागपूर शहरात सलग तिसऱ्या दिवशी भूकंपाच्या धक्क्याची नोंद झालीय. तर महिनाभराच्या काळात हा चौथा धक्का असल्याने उलटसुलट चर्चा आणि नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण बघायला मिळत आहे.

भूकंपाचे हे धक्के अतिशय सौम्य असून, त्याची जाणीवही नागरिकांना झाली नाही. धक्कादायक बाब म्हणजे महिनाभराच्या अंतरात हा चौथा धक्का होय. यापूर्वी 27 मार्चला अशाचप्रकारे दुपारी नागपूरजवळ हिंगणा आणि पारशिवनी भागातच दोनदा भूकंपाचे सौम्य धक्के बसल्याची नोंद भूकंप विज्ञान विभागाने केली होती. तर काल दुपारी पुन्हा अशाच प्रकारे भूकंपाचा धक्का बसल्याने नागरिकांमध्ये चिंता पाहायला मिळत आहे.

नागपूर जिल्ह्यात सलग तिसऱ्या दिवशी भूकंपाची नोंद

भूकंप हे नाव जरी उच्चारले तरी अंगाचा थरकाप उडवतोक्षणात होत्याच नव्हतं करणारे अनेक भूकंपाच्या घटना जगभरात घडत असतातत्याची विदारक चित्र बघितले की निसर्गापुढे मनुष्य किती खुजा आहेहे क्षणात लक्षात येतंमात्र हाच भूकंप कधी आपल्या आजूबाजूला झाला तरकल्पना देखील करवत नाहीमात्रअसे असले तरी उपराजधानी नागपुरात आज पुन्हा दुपारच्या सुमारास भूकंपाचे सौम्य धक्के बसले आहेतमहिनाभराच्या अंतरात नागपुरात बसलेला हा चौथा भूकंपाचा धक्का असल्याचे बोललं जातंयमात्रभूकंपाची 2.7 रिश्टर स्केल श्रेणी भीतीदायक नसून अशा प्रकारचे भूकंप अधून मधून होत असल्याचे मत अभ्यासकांनी व्यक्त केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *