कोल्हापुर : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे कोल्हापुरात ठाण मांडून बसले आहेत. कोल्हापूर हा शाहू महाराजांचा जिल्हा आहे. मुख्यमंत्र्यांनी कितीही जोर लावला तीर जिंकणार आम्हीच असा विश्वास स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे उमेदवार राजू शेट्टी यांनी व्यक्त केला. हजारो कार्यकर्त्यांसोबत जोरदार शक्ती प्रदर्शन करत राजू शेट्टी यांनी आज इचलकरंजीमध्ये पदयात्रा केली. या पदयात्रेदरम्यान छत्रपती शाहू महाराजांच्या पुतळ्याला हार अर्पण केल्यानंतर ते बोलत होते.
शाहू चौकावर आज स्वाभिमानी शेतकरी संघटनेची आणि महाविकास आघाडीची रॅली समोरासमोर आली होती. खरं पाहिलं तर आम्हाला, आमच्या कार्यकर्त्यांना चिथावणी देण्याचा प्रयत्न केला जात आहे. मात्र, मी आमच्या कार्यकर्त्यांना शांत राहण्याचा आवाहन केलं आहे. आम्ही निवडणूक जिंकली आहे असं राजू शेट्टी म्हणाले.
