पिंपरी – चिंचवडचा सोपान पुणेकरकडे संघाचे नेतृत्व
मुंबई :- मोतिहारी, बिहार येथे १६ ते १९ मार्च या कालावधीत होणाऱ्या “३३व्या किशोर गट राष्ट्रीय” कबड्डी स्पर्धेकरीता महाराष्ट्राने आपला संघ जाहीर केला. पिंपरी – चिंचवडच्या सोपान पुणेकर याच्या खांद्यावर संघाच्या नेतृत्वाची धुरा सोपविण्यात आली. पुणे येथे झालेल्या जिल्हा अजिंक्यपद निवड चाचणी कबड्डी स्पर्धेतून हा संघ निवडण्यात आला. या निवडण्यात आलेल्या संघात पिंपरी – चिंचवड, बीड व नंदुरबार यांचे प्रत्येकी २-२ खेळाडू असून मुंबई उपनगर(पूर्व), परभणी, पुणे(ग्रामीण), हिंगोली, पालघर, छत्रपती संभाजी नगर यांच्या प्रत्येकी एका खेळाडूची निवड करण्यात आली आहे. निवडण्यात आलेला हा संघ बिहारला रवाना झाला असून १५ मार्चला तो स्पर्धेच्या ठिकाणी दाखल होईल. संघाचे प्रशिक्षक म्हणून जालन्याचे राष्ट्रीय खेळाडू रवींद्र ढगे यांची तर व्यवस्थापक म्हणून पुण्याचे दिनेश चाकणकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. निवड समितीने निवडण्यात आलेला हा संघ राज्य संघटनेचे सरचिटणीस बाबुराव चांदेरे यांच्या परवानगीने जाहीर करण्यात आला. तो खालील प्रमाणे आहे.
किशोर गटाचा संघ :- १)सोपान पुणेकर – संघनायक (पिंपरी – चिंचवड), २)सूरज झगडे(बीड), ३)दीपक शिंदे(मुंबई उपनगर – पूर्व, ४)प्रदीप जाधव(परभणी), ५) अथर्व सोनावणे(पुणे ग्रामीण), ६)समीर शेख(हिंगोली), ७) परवेज शेख(बीड), ८)रवींद्र माने(नंदुरबार), ९)धीरज सरोज(पालघर), १०)विशाल गाढवे(पिंपरी – चिंचवड), ११)शुभम गवळी(छत्रपती संभाजी नगर), १२)ऋतिक जाधव(नंदुरबार).
प्रशिक्षक :- रवींद्र ढगे. व्यवस्थापक :- दिनेश चाकणकर.