पंतप्रधान मोदींचा ठाकरेंवर पुन्हा हल्लाबोल
नंदुरबार : उद्धव ठाकरे हे बाळासाहेबांचे नकली पुत्र असल्याची टीका केल्यामुळे महाराष्ट्रात रान उठलेले असतानाच पंतप्रधान मोदींनी नंदुरबार येथे पुन्हा ठाकरेंच्या शिवसेनेवर टीका केली. ठाकरेंची ही नकली शिवसेना मला जिवंत गाडण्याची भाषा बोलत आहेत, असं विधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. या देशातील माता भगिनी माझं रक्षण करतील, याची या मंडळींना कल्पना नाही आहे. असे वक्तव्य मोदीं यांनी केले.
नकली शिवसेनेवाले बॉम्बस्फोटातील आरोपींना प्रचारात घेऊन फिरत आहेत. ते माझी कबर खोदणार असं म्हणत आहेत. मला जमिनीत गाडण्याचे स्वप्न त्यांना दिसत आहे. लांगुलचालनासाठी ते अशी भाषा बोलत आहेत. यांच्या पायाखालील वाळू सरकली आहे,असे मोदी म्हणाले
महाविकास आघाडीतील नेते आरक्षणाच्या महा भक्षणासाठी अभियान चालवत आहेत. तर एससी-एसटी आणि ओबीसी आरक्षण वाचवण्यासाठी मोदी महायज्ञ करत आहे. मी काँग्रेसच्या शाही परिवाराप्रमाणे मोठ्या घराण्यातून आलेलो नाही. मी गरिबीमध्येच लहानाचा मोठा झालोय. तुम्ही किती कष्ट घेतले आहेत. तुमच्या जीवनात किती अडचणी होत्या, याची मला जाणीव आहे. अनेक आदिवासी कुटुंबांकडे पक्कं घर नव्हतं. तसेच स्वातंत्र्याला ६० वर्षे उलटल्यानंतरही गावात वीज पोहोललेली नव्हती, अशी टीका नरेंद्र मोदी यांनी केली.
