रायगड जिल्ह्यात खरिप हंगामात
अलिबागः रायगड जिल्ह्यात येत्या खरिप हंगामात 98 हजार 487 हेक्टरवर भात लागवडीचे नियोजन करण्यात आले आहे. 3 हजार 23 हेक्टरवर नाचणीची लागवड होणार आहे. यंदाच्या खरिप हंगामात एकूण 1 लाख 1 हजार 510 हेक्टर क्षेत्रावर पिकांची लागवड करण्यात येणार आहे. मागील वर्षापेक्षा यंदा 400 हेक्टर जास्त भात लागवडीचे नियोजन नयोजन जिल्ह्याच्या कृषी विभागाने केले आहे.
रायगड जिल्हा भाताचे कोठार म्हणून रायगड जिल्ह्याची ओळख आहे. मात्र वाढत्या औद्योगिकीकरणामुळे आणि नागरीकरणामुळे शेतीक्षेत्र दिवसेंदिवस कमी होत आहे. याशिवाय नैसर्गिक आपत्तीमुळे देखील शेतजमीन नापिक होत आहे. शेती परवडत नाही म्हणून शेतकरी शेती करत नाहीत. त्यामुळे दिवसेंदिवस भाप लागवडीचे क्षेत्र कमी होत आहे. त्यामुळे शेतकर्यांना शेतकरण्यासाठी प्रात्साहन देण्या करिता कृषिविभाग प्रयत्न करत असतो. यंदा देखील कृषिविभागाने भात लागवडीचे क्षेत्र वाढविण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहे. मागील वर्षापेक्षा यंदा 400 हेक्टर जास्त क्षेत्रावर भात लागवड करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. मागील वर्षी 89 हजार 463 हेक्टरवर भातपिकाची लागवड झाली होती. यावर्षी सुमारे 400 हेक्टरने भाताचे क्षेत्र वाढविण्यात येणार आहे.
अलिबाग तालुक्यात 13 हजार हेक्टर, मुरुड 3 हजार 234 हेक्टर, पेण तालुक्यात 11 हजार 553 हेक्टर, खालापूर तालुक्यात 2 हजार 852 हेक्टर, पनवेल 8 हजार 705 हेक्टर, कर्जत तालुक्यात 9 हजार 110 हेक्टर, उरण तालुक्यात 2 हजार 436 हेक्टर, माणगाव तालुक्यात 11 हजार 526 हेक्टर, तळा तालुक्यात 2 हजार 120 हेक्टर, रोहा तालुक्यात 10 हजार 645 हेक्टर, सुधागड-पाली तालुक्यात 5 हजार 420 हेक्टर, महाड तालुक्यात 10 हजार 588 हेक्टर, पोलादपूर 3 हजार 235 हेक्टर, म्हसळा तालुक्यात 2 हजार 460 हेक्टर, श्रीवर्धन तालुक्यात 1 हजार 603 हेक्टर असे 98 हजार 487 हेक्टवर भात पिकाचे नियोजन आहे.
रायगड जिल्ह्यातील यंदा खरिप हंगामात 3 हजार 23 हेक्टरवर नाचणीची लागवड करण्यचे नियोजन करण्यात आले आहे.मागील वर्षी 2 हजार 761 हेक्टरवर नाचणी पिकाची लागवड झाली होती. यंदा अलिबाग तालुक्यात 85 हेक्टर, पेण तालुक्यात 175 हेक्टर, खालापूर तालुक्यात 45 हेक्टर, पनवेल 40 हेक्टर, कर्जत तालुक्यात 125 हेक्टर, माणगाव तालुक्यात 868 हेक्टर, रोहा तालुक्यात 315 हेक्टर, तळा तालुक्यात 200 हेक्टर, सुधागड-पाली तालुक्यात 250 हेक्टर, महाड तालुक्यात 210 हेक्टर, पोलादपूर 270 हेक्टर, म्हसळा तालुक्यात 348 हेक्टर, श्रीवर्धन तालुक्यात 92 हेक्टर असे 3 हजार 23 हेक्टरवर नाचणी पिकाचे नियोजन आहे.
