मुंबई : महायुतीच्या लोकसभा जागा वाटपाची बोलणी एक – दोन दिवसात पूर्ण होईल. ४८ जागांचे वाटप सन्मानपूर्वक शुक्रवार किंवा शनिवारी या दोन दिवसात पुर्ण होईल अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेस (अप) गटाचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे यांनी आज पत्रकार परीषदेत माध्यमांशी संवाद साधताना दिली.राज्याच्या दृष्टीकोनातून संबंध चर्चा करणे व ४५ +उद्दीष्ट असल्याने आम्ही सर्वच गोष्टींचा आढावा घेत आहोत. त्यामुळेच एक विलंब होत आहे पण तो फार नाही असेही तटकरे म्हणाले.
आयुष्यभर बाष्कळपणे सतत खोटे बोलणारे आव्हाड आहेत. एकतर ती याचिका काय होती तर आम्हाला चिन्ह मिळू नये ते रद्द करावे. मूळ याचिकेचा गाभा असा होता की, निवडणूक आयोगाने आम्हाला मान्यता दिलेले घड्याळ हे चिन्ह वापरण्यासाठी मान्यता ती रद्द करावी, स्थगिती द्यावी त्यासाठी हा अट्टाहास केला गेला होता. त्यांना मात्र चपराक बसली आहे. असा टोला सुनिल तटकरे यांनी लगावला. आम्हाला मिळालेले चिन्ह थांबवावे हा त्यामागचा अट्टाहास होता. मात्र तो सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावला आहे. त्यामुळे या निर्णयाने आम्ही समाधानी आहोत असेही सुनिल तटकरे म्हणाले.
विजय शिवतारे आणि अजित पवार यांचे व्यक्तीगत काही नाही. २०१९ मध्ये मित्रपक्ष सासवड विधानसभा मतदारसंघातील संजय जगताप यांची कॉंग्रेसची जागा होती. कॉंग्रेसला विजयी करण्यासाठी आणि शरद पवारांबद्दल विजय शिवतारे यांनी जे उद्गार काढले ते पटले नाही. म्हणून अजित पवार बोलले मात्र आता बालवाडीतील लोक काहीही बोलत असतील त्यांना अजूनही शरद पवार कळायचे आहेत. परंतु त्यांची फारशी दखल आम्ही घेत नाही अशी मिश्किल टिप्पणी त्यांनी केली.हर्षवर्धन पाटलांच्या बाबतीत काय घडले. २०१४ मध्ये कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पृथ्वीराज चव्हाण आणि कॉंग्रेसमुळे आम्ही स्वतंत्र लढलो. त्यामुळे दत्तामामा भरणे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या चिन्हावर अधिकृत निवडून आले.
२०१९ मध्ये तीच परिस्थिती निर्माण झाली असा दावा तटकरे यांनी केला.विजय शिवतारे जे बोलत आहेत त्यांचा तो राग आहे. मात्र काही लोकांना बरं वाटतंय.त्याचा शोध आम्ही घेवू असेही तटकरे म्हणाले.