शैलेश तवटे
पुणे : मराठवाड्यात प्रभाव असलेल्या शिवसंग्राम या पक्षाच्या नेत्या ज्योती मेटे यांना भाजपाच्या पंकजा मुंडेच्या विरोधात उभे करण्यासाठी शरद पवार यांच्या राष्ट्रवादीकडून एकीकडे जोरदार प्रयत्न केले जात असतानच ज्योती मेटे यांच्या उमेदवारीवरुन शिवसंग्राम पक्षातच दोन गट पडल्याचे चित्र पहायला मिळत आहे.
शिवसंग्राम पक्षाच्या कार्यकर्त्यांची पुणे महानगरपालिका भागात असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयात महत्त्वाची बैठक पार पाडली. या बैठकीत शिवसंग्रामाच्या नेत्यांत महाविकास आघाडीत सामील होण्यावर चर्चा झाली आहे. या बैठकीत शिवसंग्रामच्या कार्यकर्त्यांनी वेगवेगळी मतं मांडली आहेत. थेट राष्ट्रवादीत प्रवेश करू नये अशीही भावना कार्यकर्त्यांनी बोलून दाखविली आहे. शिवसंग्रामचे कार्यकर्ते आपण महाविकास आघाडीचा भाग म्हणून सहभागी झाले पाहिजे असा आग्रह धरत आहेत.
ज्योती मेटे यांनी थेट राष्ट्रवादीत प्रवेश न करता महाविकास आघाडीचा मित्रपक्ष म्हणून काम करावे, असे शिवसंग्रामच्या कार्यकर्त्यांची भावना आहे. परंतु तुतारी चिन्हावर ज्योती मेटे यांनी लढावे असा शरद पवार गटाचा आग्रह आहे.