मालेगाव : मालेगावचे माजी महापौर आणि एमआयएमचे नेते अब्दुल मलिक युनूस इसा यांच्यावर अज्ञात हल्लेखोरांनी काल मध्यरात्री गोळ्या झाडल्या आणि ते पसार झाले. या गोळीबारात इसा हे गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना नाशिकच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचं सांगितलं जात आहे. या घटनेमुळे शहरात तणाव आणि दहशतीचं वातावरण निर्माण झालं आहे.
हल्लेखोरांनी इसा यांच्यावर तीन गोळ्या झाडल्या. या गोळीबारात ते गंभीर जखमी झाले आहेत. कालरात्री 12 ते 1च्या दरम्यान ही घटना घडली. या घटनेनंतर मालेगावत तणाव निर्माण झाला आहे. मालेगावात कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिसांचा मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.