मुंबई : राष्ट्रवादीला विधानसभा निवडणुकीत ८० ते ९० जागा देण्याचा भाजपचा शब्द आहे. अजित दादा लोकसभेसारखी विधानसभेला खटपट होता कामा नये. आपल्या हक्काचा वाटा आपल्याला मिळाला पाहिजे, असे म्हणत मंत्री छगन भुजबळ यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकारी मेळाव्यात टाळ्या मिळवल्या खरे पण उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महायुतीत भाजप हा सर्वात मोठा पक्ष आहे.  त्यामुळे, निश्चितच सर्वात जास्त जागा भाजपला मिळतील असे जाहिर करताच भुजबळांनी मात्र घुमाजव करीत भाजपच बीग ब्रदर असल्याचे म्हटले आहे.

छगन भुजबळ म्हणाले की, राजकीय वाद करणे योग्य नाही. माझ्या पक्षाची बैठक सुरू होती. त्यामध्ये आम्ही काय बोलावं हा आमचा प्रश्न आहे. आम्ही महायुतीमध्ये येणार होतो. त्यावेळी आम्हाला खासदारकी आणि आमदारकीच्या जागा सांगितल्या होत्या. त्यावेळी जी चर्चा झाली त्याची आठवण मी करून दिली आणि त्याची काळजी घ्या असं मी सांगितलं. बाकी काही नाही.

महायुतीला वाईट वाटायचं काही कारण नाही. आता चर्चा करून संपवून टाकलं तर बरं होईल. आता देवेंद्र फडणवीस यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे. भाजप आमचा मोठा भाऊ आहे. त्यामुळं त्यांना जास्त जागा मिळणार आहेत. बाकी दोन पक्षांना चांगल्या जागा मिळतील, असे छगन भुजबळ यांनी म्हटले आहे.

दरम्यान, शालेय अभ्यासक्रमात मनुस्मृतीचा सहभाग करण्यावर सध्या चर्चा सुरु आहे. मात्र छगन भुजबळ यांनी यावर विरोध दर्शवला. यावर भुजबळ म्हणाले की, मनुस्मृती बाबत मी बोललो आहे. यामुळे काही जनसमुदाय दुखावले जातात. 400 पार नारा दिला त्यामुळं एका समजाजला वाटलं हे संविधान बदलणार आहे. सगळ्यांनी मनुस्मृतीला विरोध केला आहे. त्या बाबत मी बोललो. शिव,शाहू, फुले, आंबेडकर ही आमची विचारधारा आहे, असे ते यावेळी म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *