खेड : समाजातील अंधश्रध्दा दूर करायच्या असतील तर, आपल्या लोकांन मध्ये जावे लागेल. लोकांना चमत्कार मागे विज्ञान असते किंवा त्या व्यक्तींची हात चलाखी असते. हे लोकांना पटवून द्यावे लागेल.
कोकणात शिमगा उत्सव खूप मोठा सण असून या सणानिमित्ताने मुंबई, पुणे या ठिकाणची सर्व लोक आपल्या मूळ गावी येतात.या सणाचे औचित्ये साधून रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यातील देवसडे गावामध्ये मुंबई मंडळ व ग्रामस्थ मंडळांची सालाबादाप्रमाणे होळीच्या ठिकाणी सत्यनारायणाच्या पुजेचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे बुवाबाजी संघर्ष प्रमुख संदीप गोवळकर यांनी देवसडे गावची होळी पाण्याने पेटवून त्या मागचे विज्ञान सांगितले.जगातील सर्व आगी या पाण्याने विझवल्या जातात. पाण्याने होळी पेटणार असल्याने हा चमत्कार पाण्यासाठी ग्रामस्थांनी गर्दी केली होती.
अंनिसचे जिल्हा कार्याध्यक्ष सचिन गोवळकर यांनी भोंदूबाबा, भगत, मांत्रिक अशाच विज्ञानाचा वापर करून आज पर्यंत आपल्या फसवत आले आहेत. आपण चिकित्सा करायला पाहिजे. आपण विज्ञानाची साधने वापरायला शिकलो, पण वैज्ञानिक दृष्टिकोन वापरायला शिकलो नाही. आपल्या आजूबाजूला, घडणारे चमत्कार हे वैज्ञानिक कसोटीवर तपासले पाहिजे असे ही यावेळी सांगितले.
अंनिस खेड शाखेचे कार्याध्यक्ष सचिन शिर्के यांनी प्रबोधनात्मक गित गाऊन व्यसनमुक्ती बाबतलोकांचे प्रबोधन केले. यावेळी कुणबी समाजोन्नती संघ मुंबई शाखा खेड ग्रामीणचे खजिनदार व देवसडे गावचे ग्रामीण अध्यक्ष मा. सुधीर वैराग सर, ग्रामीण सचिव संतोष कदम , मुंबई मंडळाचे अध्यक्ष सुनील कदम,सचिव रवींद्र शिगवण, ग्रामपंचायत सदस्य स्वाती वैराग, सल्लागार संजय कदम, मुंबई महिला मंडळ अध्यक्ष वैशाली कदम, ग्रामीण महिला अध्यक्ष निर्मला कदम यांचे मोलाचे योगदान लाभले.