ठाणे : सुधागड तालुका रहिवासी सेवा संघ ठाणे आणि टाटा कॅपिटल आयोजित सुधागड तालुकास्तरीय शैक्षणिक व क्रीडा स्पर्धेचा पारितोषिक वितरण सोहळा शनिवार ग. बा. वडेर हायस्कूल, पाली, ता. सुधागड येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाला. यावेळी सुधागड तालुका रहिवासी सेवा संघाचे अध्यक्ष विठ्ठल घाडगे व समन्वयक बळीराम निंबाळकर यांच्या कलागुणांचे कौतूक केले. तर सुधागडातील शाळांना आवश्यक ती सर्व प्रकारची मदत सुधागड तालुका रहिवासी सेवा संघ ठाणे यांच्याकडून केली जाईल, शाळांतील मुख्याध्यापक व शिक्षकांनी पुढे येणे आवश्यक आहे. सुधागडातील शाळांतून शिकणारा विद्यार्थी आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धा आणि युपीएससी, एमपीएससीच्या परिक्षांमध्येही चमकला पाहिजे, असा विश्वास घाडगे यांनी व्यक्त केला.
सुधागड तालुका रहिवासी सेवा संघ ठाणे ही संस्था ठाणे शहरात वास्तव्यास असलेल्या सुधागड तालुका रहिवाशांच्या सेवेसाठी कार्य करणारी सेवाभावी संस्था असून गेली 49 वर्षे सुधागड तालुक्यातील विद्यार्थी, तरुणांच्या शैक्षणिक विकासासाठी विविध शैक्षणिक, कला, क्रीहडा विषयक उपक्रम राबवित आहे. टाटा कॅपिटल या संस्थेच्या सीएसआर निधीद्वारे सुधागडातील 14 शाळांना शैक्षणिक, क्रीडा साहित्य पुरविते. एवढेच नव्हे तर विद्यार्थ्यांसाठी विविध शैक्षणिक व क्रीडा स्पर्धाही घेण्यात येतात. मार्च महिन्यात पार पडलेल्या अॅथलेटिक्स स्पर्धा व वक्तृत्व स्पर्धा पार पडल्या. या स्पर्धांचे पारितोषिक वितरण सुधागड पालीतील ग. बा. वडेर हायस्कूलमध्ये शनिवारी संपन्न झाले. यावेळी सुधागड तालुका रहिवासी सेवा संघ ठाणे अध्यक्ष विठ्ठल घाडगे, उपाध्यक्ष वसंत लहाने, सरचिटणीस राजू पातेरे, समव्यक बळीराम निंबाळकर, उपखजिनदार विजय जाधव, प्रसिद्धीप्रमुख अजय जाधव, कार्यकारी सदस्य हरिश्चंद्र मालुसरे, ग. बा. वडेर हायस्कूलचे प्राचार्य भाउसाहेब घोडके, पत्रकार संदेश उतेकर, नरेश शेडगे, सुजीत जगताप, पाटील, पाफाळे, वाघुले, खाडे आदी विविध शाळांचे प्राचार्य, शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते.