मुंबई : कोकण मराठी साहित्य परिषद आणि प्रबोधनकार ठाकरे वाचनालय गोरेगाव यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक काव्यदिना निमित्ताने प्रबोधनकार ठाकरे वाचनालय येथे काव्यसंध्याचे करण्यात आले. प्रमुख पाहुण्या डॉ. मीनाक्षी पाटील आणि कोमसाप केंद्रीय अध्यक्ष नमिता कीर उपस्थित होत्या.
कोकण मराठी साहित्य परिषद मुंबई जिल्हाध्यक्ष लता गुठे व प्रबोधनकार ठाकरे वाचनालयाच्या वतीने ग्रंथपाल सुधा पाटील यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. यावेळी कोमसाप मुंबई जिल्हा अंतर्गत येणाऱ्या सर्व शाखांचे पदाधिकारी उपस्थित होते. जयश्री चौधरी. (वांद्रे शाखा), सुनेत्रा टिल्लू (ठाकरे वाचनालय), निर्मला श्रीनिवास देऊसकर दादर शाखा, पुष्पा कोल्हे देवनार शाखा, रविकिरण पराडकर चेंबूर शाखा, संतोष खाडये, रेणुका पाटील विलेपार्ले शाखा इत्यादींनी दिलेल्या विषयावर आपले विचार मांडले. कार्यक्रमाच्या आयोजनात कोमसाप बांद्रा शाखेच्या अध्यक्ष मधुमंजिरी गटणे यांचा मोलाचा सहभाग होता. सूत्रसंचालनाची महत्वाची जबाबदारी मनीषा घेवडे व अंजना झेंडे यांनी पार पाडली.
०००००
