लातूर : शेतातील बांधावरुन झालेल्या भांडणात गुन्हा दाखल न करण्यासाठी चक्क पोलीस उपनिरीक्षकाने लाच मागितली होती. मात्र, लाल लुचपत अधिकाऱ्यांनी या पीएसआयला रंगेहाथ अटक केली आहे. या घटनेननंतर जिल्ह्यातील पोलीस प्रशासनात खळबळ उडाली आहे.
शेतीतील सामायिक बंधाऱ्यावरील झाड तोडण्याच्या कारणावरुन भांडण झालेल्या गुन्ह्यात अटक न करण्यासाठी पोलिसाने तक्रारदाराकडून 25,000 रूपये लाचेची मागणी केली होती. तडजोडीअंती 20,000 लाच स्वीकारताना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने पोलीस हवालदारास तहसील कार्यालयाच्या प्रागंणातून रंगेहाथ पकडले. तर, याप्रकरणी पोलीस उप निरीक्षकाला ठाण्यातून अटक करण्यात आली आहे.
20 हजार रुपयांची लाच स्वीकारताना लाललुचपत प्रतिबंधक विभागाने पांडुरंग दिगंबर दाडगे, (वय 43वर्षे), पद पोलीस हवालदार बं न.1545, वर्ग-3, नेमणूक पोलीस स्टेशन चाकूर आणि दिलीप रघुत्तमराव मोरे, (वय 33 वर्ष), पद- पोलीस उपनिरीक्षक, वर्ग 2, (अराजपत्रित), नेमणूक- पोलीस स्टेशन चाकूर अशी रंगेहाथ पकडण्यात आलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांची नावे आहेत.
