“1 खासदार असलेल्या मांझींना कॅबिनेट, 7 खासदारअसलेल्या शिवसेनेला एकही का नाही?” – श्रीरंग बारणें
मुंबईः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे ७ खासदार जिंकून आले असतानाही कॅबिनेट मंत्रिपद न देता केवळ एका राज्यमंत्रीपदावर बोळवण केल्यामुळे शिंदेंच्या शिवसेनेत नाराजीनाट्य उद्भवले आहे. मावळचे खासदार श्रीरंगबारणे यांनी आज यावरून भजपावर जाहीर टीका केलीय.
चिराग पासवान यांचे पाच खासदार असताना कॅबिनेटमंत्रिपद मिळाले, एक खासदार असणाऱ्या मांझी यांनाहीकॅबिनेटमंत्रिपद मिळाले, कुमारस्वामी यांना दोन खासदारअसताना कॅबिनेट मंत्रिपद मिळाले, आम्हालाही कॅबिनेटमंत्रिपद मिळायला हवं होतं, असे मावळचे खासदार श्रीरंगबारणे यांनी सांगितले. ते एबीपी माझाशी बोलत होते. यावेळीत्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे 7 खासदारआले असतानाही कॅबिनेट मंत्रिपद न दिल्यामुळे दुजाभावझाल्याचं सांगितलं.
नरेंद्र मोदी यांनी तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेतली. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे सात खासदार आहेत. भाजप, जेदयु, टीडीपी यांच्यानंतर एनडीएमधील शिवसेनेलासर्वाधिक खासदार आहेत. पण तरीही कॅबिनेट मंत्रिपदमिळाले नाही. त्यामुळे शिवसेनेत नाराजी असल्याचं समोरआलेय. खासदार श्रीरंग बारणे यांनी याबाबत उघडपणे भाष्यकेलेय.
मुख्यमंत्री एकनाथशिंदे गटाला केंद्रीय राज्यमंत्रिपद देऊन, दुजाभाव करण्यात आला. आमच्या शिवसेनेचा स्ट्राईक रेटपाहता, आम्हाला कॅबिनेट मंत्रिपद द्यायला हवं होतं, असंम्हणत शिंदे गटाचे खासदार श्रीरंग बारणेंनी उघडपणे नाराजीव्यक्त केली आहे. एनडीएमधील इतर घटक पक्षांचे एक-एकखासदार निवडून आलेत, मात्र त्यांना कॅबिनेट मंत्री पद दिलंगेलं. मग शिंदे गटाबाबत भाजपने हा दुजाभाव का केला? असंहोतं तर मग कुटुंबाविरोधात जाऊन महायुतीत आलेल्याअजित पवारांनाही एक मंत्री पद द्यायला हवं होतं. तसेचभाजपने साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसलेंनाही मंत्रिपदद्यायला हवं होतं. असं म्हणत बारणेंनी खदखद बोलूनदाखवली.
शिवसेनेला एक कॅबिनेट आणि एक राज्यमंत्रिपद मिळायला हवं होतं –
देशामध्ये पंतप्रधान सन्माननीय नरेंद्र मोदी यांचं मंत्रिमंडळस्थापित झाले आहे. या निवडणुकीचा जर विचार करताशिवसेना पक्ष जुना साथी आहे. एनडीएचा जुना साथी म्हणूनशिवसेना पक्षाला कॅबिनेट मंत्री मिळावे ही माफक आपेक्षाहोती. चंद्राबाबू नायडू यांचे सोळा खासदार निवडून आले, त्याचबरोबर नितेश कुमार यांचे 12 खासदार निवडून आले. त्या खालोखाल शिवसेना पक्षाचे सात खासदार निवडूनआले. चिराग पासवान यांचे पाच खासदार निवडून आले, त्यांना कॅबिनेट मंत्रिपद दिलं. कुमारस्वामी यांचे दोन खासदारकर्नाटकातून निवडून आले, त्यांना एक कॅबिनेट मंत्रिपद दिले. त्याचबरोबर बिहार मधून जितन मांझी एकटे निवडून आले, त्यांना कॅबिनेट मंत्रिपद दिले. तर शिवसेना पक्षाला एककॅबिनेट मंत्री आणि एक राज्यमंत्री मिळावे, अशी आमचीअपेक्षा होती. कॅनिबेनट मंत्रिपदाची शपथ आमच्याखासदाराने घेतली असती तर आम्हाला समाधान मिळालेअसते, असे श्रीरंग बारणे म्हणाले.