केरळ : मी वायनाडचा खासदार राहायचे की रायबरेलीचे, या संभ्रमात आहे. पण मला कुठलेही इश्वरी संकेत मिळत नाहीत. पंतप्रधान मोदींना मात्र तसे काहीसे करता येते. देवानेच पंतप्रधान मोदींना देशातील प्रमुख विमानतळे आणि वीज प्रकल्प अदानींकडे सोपवण्याचे निर्देश दिले,” असा टोमणा राहुल गांधींनी मारला. केरळच्या वायनाडमधून दुसऱ्यांदा खासदार म्हणून निवडून आल्यानंतर राहुल गांधी आज पहिल्यांदाच येथे दाखल झाले त्यावेळी ते बोलत होते.
“मी माणूस आहे. माझा देव देशाची गरीब जनता आहे. त्यामुळे माझ्यासाठी हे सोपे आहे. मी फक्त लोकांशी बोलतो, त्यांच्याशी संवाद साधतो आणि ते मला सांगतात की मी काय केले पाहिजे. लोकसभा निवडणुकीचा लढा भारतीय संविधानाच्या रक्षणासाठी होता आणि त्या लढ्यात द्वेषाचा प्रेमाने, अहंकाराचा नम्रतेने पराभव झाल्याचे दिसले. भारतातील जनतेने स्पष्ट संदेश दिल्याने आता तरी पंतप्रधान मोदींना आपला दृष्टिकोन बदलावा. नवे सरकार हे दुसऱ्याच्या आधारावर चालत असलेले ‘पंगू सरकार’ आहे,” अशी टीकाही राहुल गांधींनी केली.