माथेरान : माथेरानमधील श्री राम मंदिर समोर निसर्ग पॉइंट स्टॉल वेल्फेअर असोसिएशनच्या माध्यमातून येथील शार्लोट लेकच्या स्वच्छतेसाठी बेमुदत उपोषण सुरू केले असून, गेले १० वर्ष पेक्षा अधिक काळ होऊन ही माथेरान मधील पिण्याचा पाण्याचा लेक साफ केला गेला नसून त्यामुळे येथे पावसाळ्यातील दिवसांमध्ये रोगराई वाढत आहे तर अशुद्ध पाण्याचा पुरवठा ही होत असल्याच्या निषेधार्थ हे उपोषण सुरू आहे.
निसर्ग पॉइंट स्टॉल वेल्फेअर असोसिएन ने माथेरान नगरपालिकेला अगोदर निवेदन देऊन हा तलाव पावसाळ्यामध्ये स्वछ करावा अशी मागणी केली होती व जून 25 पर्यंत स्वच्छ न झाल्यास आमरण उपोषण केले जाईल असा इशारा दिला होता परंतु ह्या कालावधी मध्ये काम सुरू न झाल्याने आजपासून संघटनेचे अध्यक्ष श्री.संतोष कदम हे आमरण उपोषणास बसले आहेत.
शार्लेट हा माथेरान नगरपालिकेच्या मालकीचा असून अमृत 2 या कार्यक्रमांतर्गत माथेरान नगर परिषदेकडून माथेरान शार्लेट तलाव सुशोभी करण्याकरता 4:99.82 लक्ष इतके अंदाजपत्रक सादर करण्यात आले होते,अधीक्षक अभियंता महाराष्ट्र जीवन प्राधिकरण मंडळ पनवेल कार्यालयाकडून त्यास 6/2/2023 रोजी तांत्रिक मान्यता देण्यात आली होती सदर अंदाज पत्रक तलावातील गाळ काढण्याचे व वाहतूक करून टाकने तसेच सदर तलावातील गेट व ब्रिज बाजूची दुरुस्तीकरितांची तरतूद होती त्यास प्रशासकीय मंजुरी मिळाली होती.
त्याचप्रमाणे माथेरान नगर परिषदेस राज्य शासनाने राज्यसरोवर संवर्धन योजनेअंतर्गत माथेरान येथील शार्लेट तलावास पर्यावरण दृष्ट्या संवर्धन व संरक्षण करण्यासाठी 7/ 3/ 2007 रोजीच्या शासन निर्णय नुसार362:65लक्ष इतक्या मंजूर निधीतील राज्य हिशापोटी रुपये 326:38लक्ष इतक्या रकमेस प्रशासकीय मान्यता देण्यात आली होती मंजूर रकमेपैकी 200 लक्ष इतका निधी आतापर्यंत वितरीत केला असून माथेरान नगर परिषदेच्या 2/3/ 2023 रोजीच्या पत्रानुसार उर्वरित कामे करण्यासाठी 100 लक्ष इतका निधी नगर परिषदेस उपलब्ध करून दिला असल्याने 27/03/2023 रोजीच्या शासन निर्णयानुसार दिसून येत आले आहे.परंतु ह्या निधीचा वापर लेक च्या स्वच्छते व सुशोभीकरणासाठी न होता इतरत्र वापरला गेला का की ह्यामध्ये काहीतरी मोठा घोटाळा झाला आहे असे उपोषण ठिकाणी चर्चा सुरू होती.
निसर्ग पॉइंट स्टॉल वेल्फेअर असोसिएन ने वारंवार तलाव स्वच्छतेकडे दुर्लक्ष करणाऱ्या शासनविरोधात दंड थोपटले असून ,माथेरान येणाऱ्या पर्यटकांना व स्थानिकांना गडूळ अस्वच्छ पाणी पुरवठा होत असल्याने हा तलाव तातडीने स्वच्छ व्हावा ह्याकरता उपोषणाचे हत्यार उपसले असून त्यास माथेरान मधील सर्वच स्तरातून पाठिंबा मिळत आहे. यावेळी संघटनेचे योगेश शिंदे,अविनाश गोरे,सीमा कदम,जगदीश कदम,विजय सावंत व अन्य सदस्य उपस्थित होते.
000000

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *