ठाणे : महाराष्ट्र राज्यातील सातारा जिल्ह्यात कोयना धरण झाले, पण ६४ वर्ष उलटून देखील कोयना कोयना प्रकल्पग्रस्त नागरिकांच्या समस्या अद्यापही सुटल्या नाहीत, यामुळे ठाणे जिल्ह्यातील ठाणे तहसीलदार कार्यालय, भिवंडी तहसीलदार कार्यालय, शहापूर तहसीलदार कार्यालय या शासकीय ठिकाणांसह एकाचवेळी राज्यभरातील १५ तालुक्यांच्या ठिकाणी शुक्रवारी लक्षवेधी आंदोलन करण्यात आल्याची माहिती, अखिल कोयना पुनर्वसाहत सेवा संघ महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष विठ्ठल मोरे यांनी दिली. यावेळी माजी सैनिक विश्वास कदम, प्रकाश कदम, विष्णू कदम, दत्ताराम कदम, गंगाराम दूडे, शांताराम कदम, रमेश कदम, आनंद कदम, सुरेश उतेकर, अरुण कदम, प्रकाश साळुंखे, संपत चव्हाण, जयवंत मोरे, तसेच सर्व कोयना प्रकल्पग्रस्त नागरिक उपस्थित होते.
ठाणे तहसील कार्यालय येथे सल्लागार किसन जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली लक्षवेधी आंदोलन करण्यात आले, भिवंडी तहसील कार्यालयासमोर सल्लागार बळीराम शिंदे, उपाध्यक्ष अमोल कदम, तालुकाप्रमुख आनंद निकम यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले तर शहापूर तहसील कार्यालयासमोर तालुकाप्रमुख आनंद शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. कोयना प्रकल्पग्रस्तांच्या प्रमुख मागण्या प्रकल्पग्रस्तांना पर्यायी जमिनी तात्काळ देण्यात याव्या, शिल्लक जमिनीचा मोबदला तात्काळ देण्यात यावा, प्रकल्पग्रस्तांना नोकऱ्या तात्काळ देण्यात याव्या, गावाला महसूल दर्जा देण्यात यावा, नागरी सुविधा तात्काळ देण्यात याव्यात अशा विविध मागण्या संदर्भात शुक्रवारी राज्यभरातील १५ तालुक्या ठिकाणी लक्षवेधी आंदोलन करण्यात आले. आंदोलनाची दखल शासनाने घेतली नाही तर दिनांक २ जुलै २०२४ रोजी कोकण भवन ते विधान भवन असा लॉंग मार्च कोयना प्रकल्पग्रस्त नागरिक यांच्यावतीने काढण्यात येईल, असा इशारा अखिल कोयना पुनर्वसाहत सेवा संघ महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष विठ्ठल मोरे यांनी दिला आहे.
