ठाणे : स्थानिक माजी नगरसेविका सौ रागिणीताई बैरीशेट्टी यांच्यावतीने शिवाई नगर परिसरातील सर्व विभागामधील, वय ६५ वर्षांवरील ज्येष्ठ महिला आणि विधवा महिला यांच्यासाठी छत्रीवाटप कार्यक्रमाचे आयोजन नुकतेच करण्यात आले होते या छत्रीवाटपाचा ९०० महिलांनी लाभ घेतला असल्याची माहिती समाजसेवक भास्कर बैरीशेट्टी यांनी दिली आहे.
पावसाळा सुरू होत आहे. पावसापाण्यात महिलांना संरक्षण मिळावे या हेतुने स्थानिक माजी नगरसेविका सौ रागिणीताई भास्कर बैरीशेट्टी यांच्यावतीने शिवाई नगर परिसरातील सर्व विभागामधील, वय ६५ वर्षांवरील ज्येष्ठ महिला आणि विधवा महिला यांच्यासाठी छत्रीवाटप कार्यक्रमाचे आयोजन नुकतेच जनसंपर्क कार्यालय, उपवन सोसायटी, शिवाई नगर शिवसेना शाखेजवळ, ठाणे (प) येथे करण्यात आले होते. या छत्रीवाटप कार्यक्रमाचा वय ६५ वर्षांवरील ज्येष्ठ महिला आणि विधवा महिला अशा ९०० महिलांनी लाभ घेतला. या कार्यक्रमास ज्येष्ठ व विधवा महिला मोठ्यासंखेने उपस्थित होते,अशी माहिती स्थानिक कार्यसम्राट माजी नगरसेविका सौ. रागिणीताई भास्कर बैरीशेट्टी व सामाजिक बांधिलकी जपणारे सच्चे समाजसेवक श्री भास्कर बैरीशेट्टी यांनी दिली आहे.
00000
