Author: bittambatami.com

पराभव दिसू लागल्याने ठाकरेंचं रडगाणं – फडणवीस

मुंबई : मुंबईत संथ गतीने मतदान होत असल्याची तक्रार सर्वप्रथम आम्हीच आयोगाकडे केली. आता मात्र, नेहमीप्रमाणे उद्धव ठाकरे यांनी त्यांचे रडगाणे सुरु केले आहे. पराभव समोर स्पष्ट दिसत असताना त्यांनी सवयीप्रमाणे मोदीजींवर आरोप करणे प्रारंभ…

मतदान संथ करण्याचा कट रचला गेला- ठाकरे

मुंबई: शिवसेनेच्या ठाकरे गटाला ज्या ठिकाणी मतदान जास्त होतंय नेमकं त्याच ठिकाणी केंद्रावर जाणूनबूजून विलंब केला गेला. मतदारांना मुद्दामून ताटकळत ठेवले गेले. ज्यामुळे बरेच लोक मतदान न करता निघून गेले. असा…

आज लागणार बारावीचा निकाल

मुंबई: महाराष्ट्र राज्य उच्च माध्यमिक मंडळाकडून फेब्रुवारी-मार्च 2024 मध्ये आयोजित करण्यात आलेल्या बारावीच्या परीक्षेचा निकाल मंगळवारी २१ मार्च २०२४ रोजी जाहीर होणार आहे. मंगळवारी दुपारी एक वाजता मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळासह विविध ठिकाणी विद्यार्थ्यांना हा निकाल पाहता येईल. विद्यार्थ्यांना उद्या…

शिवसेना कुणाची ….?

लोकसभा निवडणूकीच्या महाराष्ट्रातील पाचव्या आणि अंतिम टप्प्यातील निवडणूकीत माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सहकुटुंब वांद्रे येथे मतदान केले. आणि ज्यांच्यामुळे ठाकरे माजी मुख्यमंत्री बनले त्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही सहकुटुंब…

मतदानाचा खेळखंडोबा

मतदानासाठी भर उन्हात चार चार तासाचा खोळंबा मुंबईत मतदानाचा टक्का वाढता वाढता राहीला विशेष प्रतिनिधी मुंबई : लोकशाहीचा उत्सव म्हणून गाजावाजा केलेल्या महाराष्ट्रातील लोकसभेच्या पाचव्या टप्प्याच्या मतदानाचा अक्षरशा खेळखंडोबा झाला. मुंबईतील सहा…

पत्रकार अशोक गायकवाड यांनी केले फुले,शाहू,आंबेडकरी विचारांचे प्रबोधन

जेतवन बुध्दविहार १८ वा वर्धापन दिन व महापुरुषांची-महामातांची संयुक्त जयंती महोत्सव कळमशेत येथे संपन्न रायगड : फुले शाहू आंबेडकरी विचारांचे प्रबोधन करताना, प्रमुख वक्ते, पत्रकार अशोक रघुनाथ गायकवाड (कर्जत) यांनी विश्ववंदनीय भगवान अर्हत सम्यक सम्बुद्ध, राष्ट्रपिता जोतिबा फुले, राजर्षी शाहूजी महाराज, माता सावित्रीमाई फुले, त्यागमूर्ती माता रमाई यांचा जीवन संघर्ष उभा केला. जेतवन बुध्दविहार १८ वा वर्धापन दिन व महापुरुषांची-महामातांची संयुक्त जयंती महोत्सव बुधवार,(दि.१५ मे) रोजी कळमशेत येथे संपन्न झाला. यानिमित्ताने पत्रकार अशोक गायकवाड प्रबोधन करत होते. यावेळी सामाजिक कार्यकर्ते विजय जाधव, वसंत गायकवाड गुरुजी, पाठारे गुरुजी, युवराज नाक्ते, जानुजी भा. नाक्ते, नरेश लक्ष्मण नाक्ते, देविदास नाक्ते, अनुसया नाक्ते, प्रकाश ग. नाक्ते, काशीनाथ लक्ष्मण नाक्ते आदी मान्यवर विचारमंचावर उपस्थित होते. जेतवन बुद्ध विहार वर्धापन दिन आणि विश्ववंदनीय भगवान अर्हत सम्यक सम्बुद्ध, देवनांप्रिय प्रियदर्शिनी राजा चक्रवर्ती सम्राट अशोक, राष्ट्रसंत जगतगुरू तुकाराम महाराज, राजमाता जिजाऊ, कुळवाडी भुषण बहुजन प्रतिपालक छत्रपती शिवाजी महाराज, सत्यशोधक समाज संस्थापक खरे राष्ट्रपिता महात्मा ज्योतिबा फुले, स्त्री शिक्षणाच्या प्रणेत्या सावित्रीमाई फुले, आरक्षणाचे जनक राजर्षी शाहूजी महाराज, विश्वरत्न बोधिसत्व प.पू. महामानव बाबासाहेब डॉ. भीमराव रामजी आंबेडकर आणि त्यागमूर्ती माता रमाई या महामानवांची व महामातांचा संयुक्त जयंती महोत्सव माता रमाई उत्कर्ष महिला मंडळ, बौध्द हितवर्धक मंडळ स्थानिक आणि नवतरुण बौध्द सेवा संघ कळमशेत, मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने साजरा करण्यात आला. बुधवारी, १५ मे २०२४ रोजी नवतरूण बौध्द सेवा संघ, कळमशेत-मुंबईचे अध्यक्ष देवीदास नाक्ते यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आला होता. सुत्रसंचालन जगदीश हि. कासे, मंगेश मो. नाक्ते, आ. यशवंत म. नाक्ते यांनी केले. सकाळी ८.०० वाजता, धम्म ध्वजारोहण करण्यात आले.सकाळी ८.३० वाजता, बुध्द पूजापाठ आणि महामानवांच्या प्रतिमांचे पुष्पपूजन ॲड. प्रकाश देवजी गायकवाड, बौध्दाचार्य भारतीय बौध्द महासभा तालुका शाखा तळा यांच्या हस्ते करण्यात आले. सकाळी ९.०० वाजता, अल्पोपहार भोजन दाते प्रभाकर पि. नाक्ते यांच्याकडून देण्यात आला. सकाळी ९.३० वाजता, फुले शाहू आंबेडकरी विचारांचे प्रबोधन प्रमुख वक्ते, पत्रकार अशोक रघुनाथ गायकवाड (कर्जत) यांनी विश्ववंदनीय भगवान अर्हत सम्यक सम्बुद्ध , राष्ट्रपिता जोतिबा फुले, राजर्षी शाहूजी महाराज, माता सावित्रीमाई फुले, त्यागमूर्ती माता रमाई यांचा जीवन संघर्ष यावर प्रबोधन केले. दुपारी १२.०० वाजता, महिलांच्या वक्तृत्व स्पर्धा घेण्यात आल्या.दुपारी १.०० वाजता, सर्वांसाठी कौन बनेगा धम्मग्यांनी प्रश्न मंजुषा आयोजित करण्यात आली होती. दुपारचे स्नेह भोजन, भोजन दाते- जर्नादन जा. नाक्ते यांनी दिले तर रात्रीचे स्नेह भोजन कृष्णा द. नाक्ते यांनी दिले. दुपारी ३.०० वाजता, महिलांसाठी विशेष मनोरंजनात्मक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. सायं ४.३० वाजता, भव्य मिरवणूक काढण्यात आली. सायं ७.०० वाजता, उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे आणि मान्यवरांचे सत्कार करण्यात आले. रात्री १०.०० वाजता, सांस्कृतिक कार्यक्रम सादर करण्यात आला. व्यवस्थापक आणि कार्यकारिणी, माता रमाई उत्कर्ष महिला मंडळ, कळमशेत अध्यक्षा अनुसया ज. नाक्ते, उपाध्यक्षा निशा नि. नाक्ते, सचिव वैशाली र. नाक्ते, उपसचिव निलम नरेश नाक्ते, खजिनदार जयश्री भि. नाक्ते, उपखजिनदार सारिका सं. नाक्ते बौध्द हितवर्धक मंडळ स्थानिक, कळमशेत अध्यक्ष नरेश लक्ष्मण नाक्ते, उपाध्यक्ष जर्नादन जा. नाक्ते, उपाध्यक्ष भिमराव पि. नाक्ते, सचिव नितीन बा. नाक्ते, उपसचिव राकेश दौ. नाक्ते, खजिनदार लक्ष्मण पि.नाक्ते, उपखजिनदार अशोक दा. शिर्के नवतरूण बौध्द सेवा संघ, कळमशेत-मुंबई अध्यक्ष देविदास वि. नाक्ते, उपाध्यक्ष सुधाकर यशवंत नाक्ते, सचिव प्रभाकर पि. नाक्ते, उपसचिव मोहन म. नाक्ते, खजिनदार मनोहर भा. नाक्ते, उपखजिनदार मनोज लक्ष्मण नाक्ते, लेखा परीक्षक महेश चं. नाक्ते, उपलेखा परीक्षक संदेश मो. नाक्ते आदी मान्यवर व ग्रामस्थ बंधु- भगनी यांनी उपस्थित राहून व सक्रिय मदत करुन जेतवन बुध्दविहार १८ वा वर्धापन दिन व महापुरुषांची-महामातांची संयुक्त जयंती महोत्सव संपन्न करण्यासाठी सहकार्य दिले.

आरटीई २५ टक्के प्रवेश प्रक्रीयेसाठी पुन्हा ऑनलाईन अर्ज करणे आवश्यक- पुनिता गुरव

अशोक गायकवाड रायगड : आरटीई २५ टक्के प्रवेश प्रक्रीयेसाठी बालकाच्या पालकांनी पुन्हा नव्याने ऑनलाईन अर्ज सादर करणे आवश्यक असल्याचे आवाहन मतशिक्षणाधिकारी (प्राथमिक) जि.प.रायगड पुनिता गुरव यांनी केले आहे. सन-२०२४-२५ या वर्षाकरिता आरटीई २५ टक्के प्रवेश प्रक्रीयेसाठी बालकांच्या पालकांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले होते. तथापि मा.उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार ही प्रक्रीया स्थगित करण्यात आली होती. आता सन-२०२४-२५ या शैक्षणिक वर्षासाठी आरटीई अंतर्गत यापूर्वी ऑनलाईन अर्ज सादर केलेल्या बालकाच्या पालकांनी पुन्हा नव्याने ऑनलाईन अर्ज सादर करणे आवश्यक आहे. यापूर्वी ऑनालाईन पध्दतीने केलेल्या अर्जाचा सन-२०२४-२५ या वर्षाच्या आरटीई २५ टक्के प्रवेश प्रक्रीये साठी विचार केला जाणार नाही याची कृपया पालकांनी नोंद घ्यावी असे आवाहन शिक्षणाधिकारी (प्राथमिक) जि.प.रायगड पुनिता गुरव यांनी केले आहे.

इतिहासात पहिल्यादांच ठाकरेंनी दिले ‘पंजा’ला मत

मुंबई : यंदाची लोकसभा निवडणूक अतिशय खास आहे. या लोकसभा निवडणुकीमध्ये मोठ्या प्रमाणावर राजकीय बदल आपण पाहू शकत आहोत. दोन राष्ट्रवादी, दोन शिवसेना अशा प्रकारचं राजकारण पहिल्यांदाच महाराष्ट्र अनुभवत आहे. यातच यंदा इतिहासात पहिल्यांदाच ठाकरे कुटुंबातील कोणीतरी जाहीरपणे काँग्रेसला मतदान केल्या असल्याची चर्चा आहे. महाराष्ट्रामध्ये आज पाचव्या टप्प्यातील लोकसभेचे मतदान होत असून मुंबईतील सहा मतदारसंघांमध्ये मतदान होत आहे. यामध्ये मुंबई दक्षिण, मुंबई उत्तर, मुंबई उत्तर मध्य, मुंबई दक्षिण मध्य, मुंबई ईशान्य आणि मुंबई उत्तर पश्चिम या मतदार संघाचा समावेश आहे. मातोश्री, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे निवासस्थान म्हणून ओळखले जाते. हे मुंबई उत्तर मध्य लोकसभा मतदारसंघांमध्ये येते. या ठिकाणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट किंवा शिवसेना एकनाथ शिंदे गट या दोघांचाही उमेदवार नाही. या ठिकाणी काँग्रेसकडून वर्षा गायकवाड यांना उमेदवारी देण्यात आली असून भारतीय जनता पक्षाने उज्जवल निकम यांना संधी दिली आहे. अशावेळी जनता कोणाला साथ देते हे पाहणं अतिशय उत्सुकतेच असणार आहे. तर उद्धव ठाकरे हे महाविकास आघाडीचे प्रमुख नेते असून ते यंदा काँग्रेसला मतदान करतील असे त्यांनी पत्रकार परिषदेत सांगितले होते. यामुळे इतिहासात पहिल्यांदा काँग्रेसच्या हाताला ठाकरेंच मत मिळाल अस चित्र आहे. असं जरी असलं तरी दुसरीकडे दक्षिण मध्य मतदारसंघांमध्ये राज ठाकरे यांनी महायुतीला पाठिंबा दिल्याने राज ठाकरेंनी धनुष्यबाणाला म्हणजेच राहुल शेवाळेंना मतं दिले असल्याची चर्चा आहे. अशावेळी एका ठाकरेंनी धनुष्यबाणाला तर दुसऱ्या ठाकरेंनी हाताला मत दिलं असल्याचं म्हटले जात आहे. या गोष्टीची चर्चा दिवसभर मुंबई सह राज्यामध्ये पाहिला मिळाली.

एमबीए सीईटीचा निकाल जाहीर

मुंबई : सीईटी सेलने एमबीए अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी घेण्यात आलेल्या एमबीए-एमएमएस सीईटी परीक्षेचा निकाल जाहीर केला आहे. सीईटी कक्षामार्फत ९ ते ११ मार्च राज्य व राज्याबाहेरील परीक्षा केंद्रावर घेण्यात आली होती. या परीक्षेसाठी एक लाख ५२ हजार ९९९ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी १७८ परीक्षा केंद्रावर एक लाख ३८ हजार ६८३ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. सीईटी सेलच्या वतीने यावर्षी परीक्षेसंदर्भात आक्षेप नोंदणी सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली होती. यामध्ये ४१५ विद्यार्थ्यांनी आक्षेप नोंदवले होते. त्यापैकी (युनिक) आक्षेप ९९ होते. सर्व आक्षेपांचे निराकरण करण्यात आल्यानंतर विद्यार्थ्यांच्या लॉगइनमध्ये गुणपत्रिका उपलब्ध करून देण्यात आली होती. दरम्यान, सीईटी सेलच्या वतीने १३ परीक्षा आतापर्यंत झाल्या आहेत. यापैकी १० अभ्यासक्रमांचा निकाल जाहीर केला आहे. यामध्ये बीएड, एमएड, बीपीएड, एमपीएड, लॉ पाच वर्षे आदी अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी घेण्यात आलेल्या सीईटी परीक्षांचा निकाल जाहीर झालेला आहे.

एक लाख ८४ हजार विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तके

महाड : पहिली ते आठवीमध्ये शिकणारे मुले शिक्षणापासून वंचित राहू नये, पाठ्यपुस्तकांअभावी त्‍यांच्या शिक्षणात अडथळा येऊ नये, याचबरोबर पटसंख्या वाढावी यासाठी, समग्र शिक्षा अभियानांतर्गत सरकारने मोफत पाठ्यपुस्तक योजना सुरू केली आहे. त्‍यानुसार सरकारी शाळा, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळा, खासगी अनुदानित व अंशतः अनुदानित शाळांमध्ये शिकणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तके पुरवण्यात येतात. विद्यार्थ्यांना शैक्षणिक वर्षाच्या पहिल्याच दिवशी पाठ्यपुस्‍तके उपलब्ध करून दिली जाणार आहेत. ग्रामीण भागातील मुले व खास करून मुलींमध्ये शाळा गळतीचे प्रमाण अधिक असते. पुस्तके नसल्याने अनेक मुले शाळेपासून दूर राहतात. शाळेतील पटसंख्या तसेच उपस्‍थिती वाढावी, याकरिता विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तके पुरवण्यात येणार आहेत. रायगड जिल्ह्यातील पहिली ते आठवीत शिकवणाऱ्या एक लाख ८४ हजार १६२ विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तके (एकात्मिक पुस्तक संच) सरकारमार्फत मोफत पुरवण्यात येणार आहेत. त्यानुसार सर्व पाठ्यपुस्तके तालुकास्तरावर व तालुकास्तरावरून शाळास्तरापर्यंत पोहोचती करण्यात येणार आहे. ही पुस्तके शाळेच्या पहिल्या दिवशी शाळा व्यवस्थापन समिती सदस्य, गावातील पदाधिकारी, अधिकारी, पालक व प्रतिष्ठित नागरिक यांच्या उपस्थितीत सन्मानपूर्वक विद्यार्थ्यांना वितरित करण्यात येणार आहेत. शैक्षणिक वर्षाच्या सुरुवातीला पाठ्यपुस्तक वितरणापूर्वी शाळानिहाय, वर्गनिहाय, माध्यमनिहाय, पंचायत समितीनिहाय पात्र विद्यार्थ्यांची यादी तयार ठेवावी आणि शाळा सुरू होताच पहिल्याच दिवशी समारंभपूर्वक विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तकांचे वितरण करण्यात यावे. पाठ्यपुस्तके वितरणाचा दिवस पुस्तक दिन म्हणून साजरा करणेबाबत संबंधितांना सूचित करण्यात यावे. संपूर्ण जिल्ह्यात एकाच दिवशी पाठ्यपुस्तकांचे वितरण होईल, याबाबत नियोजन करण्यात यावे. आपल्या कार्यक्षेत्रातील सर्व निकष पात्र शाळांना अशा प्रकारच्या सूचना शिक्षण विभागाने दिल्या आहेत. कोट जिल्हा परिषद, नगरपालिका व महापालिका शाळा आणि खासगी अनुदानित व अंशतः अनुदानित शाळांमध्ये ज्या पालकांची मुले शिकत आहेत, त्यांनी आपल्या पाल्यांची पुस्तके बाजारातून खरेदी करू नयेत. ही पाठ्यपुस्तके सर्व पात्र शाळांमध्ये विद्यार्थ्यांना शैक्षणिक वर्षाच्या पहिल्या दिवशी उपलब्ध करून दिली जातील. – पुनिता गुरव, प्राथमिक विभाग, रायगड