Author: bittambatami.com

ठाणे प्रीमियर लीग टी-२० क्रिकेट स्पर्धा

अंबरनाथ रायझिंग ठरले सरस ठाणे : नियमित डावानंतर सुपर ओव्हरमध्येही बरोबरी झाल्याने सर्वाधिक चौकरांमुळे अंबरनाथ रायझिंग क्रिकेट क्लबने फटीएल एकादश संघावर सरशी मिळवत महाराष्ट्र माझा सेवा संस्था आयोजित ठाणे प्रीमियर लीग टी २० क्रिकेट स्पर्धेच्या उपांत्य फेरीत स्थान मिळवले. नियमित डावात उभय संघ १५१ धावांवर बरोबरीत राहिले. त्यानंतर ही बरोबरी सुपर ओव्हरमध्ये १० धावांवर कायम राहिल्याने दोन्ही डावात मिळून एकूण २२ चौकार मारणाऱ्या अंबरनाथ रायझिंग क्रिकेट क्लबला विजयी घोषित करण्यात आले. कमनशिबी ठरलेल्या एफटीएल एकादश नावावर १८ चौकार जमा होते. प्रथम फलंदाजी करणाऱ्या एफटीएल एकादश संघाला सुर्यांश शेडगे(७७), यतीन मढवी(३२) आणि अर्जुन थापाने २० धावा करत एफटीएल एकादश संघाला आव्हानात्मक धावसंख्या उभारून दिली. या डावात सौद अंसारीने सहा, परिक्षित वळसंगकरने दोन आणि प्रथमेश महालेने एक बळी मिळवला. त्यानंतर अनिल रोनंकी ने ३३ आणि परिक्षित वळसंगकरने ६१ धावांच्या धडाकेबाज खेळीने अंबरनाथ रायझिंग क्रिकेट क्लबला बरोबरी साधून दिली. या डावात सुर्यांश शेडगेने दोन बळी मिळवले. सुपर ओव्हरमध्ये अर्जुन थापाच्या सात धावांमुळे एफटीएल एकादश संघाला १० धावा जमवता आल्या. परिक्षितने ९ धावा करत संघाला विजयाच्या समीप नेले.शेवटच्या चेंडूवर विजयासाठी दोन धावांची आवशयकता असताना फलंदाज धावचित झाल्याने सामन्यात पुन्हा बरोबरी झाली. संक्षिप्त धावफलक : एटीपीएल एकादश : २० षटकात सर्वबाद १५१ ( सुर्यांश शेडगे ७७, यतीन मढवी ३२, अर्जुन थापा २०, सौद मंसूरी ४-२६-६, परिक्षित वळसंगकर ४-२४-२, प्रथमेश महाले ३-२७-१) बरोबरीत अंबरनाथ रायझिंग क्रिकेट क्लब :  २० षटकात ८ बाद १५१ ( परिक्षित वळसंगकर ६१, अनिल रोनंकी ३३, सुर्यांश शेडगे ४-३७-२, नविन शर्मा ४-३०-१, अजय पाटील ४-३७-१, विकास पाटील ४-२५-१, अक्ष शर्मा ४-२०-१), सुपर ओव्हर : अंबरनाथ रायझिंग क्रिकेट क्लब : एक षटकात २ बाद १० ( परिक्षित वळसंगकर ९, विकास पांडे १-१०-१) बरोबरीत एफटीएल एकादश : एका षटकात २ बाद १० ( अर्जुन थापा  ७, परिक्षित वळसंगकर १-१०-१).

भाजपाच्या पोटातील पुन्हा ओठावर

सत्तेत आले की संविधानातील ‘धर्मनिरपेक्ष’ शब्द वगळणार: –प्रा. वर्षा गायकवाड वर्षा गायकवाड यांच्या कलीना येथील मध्यवर्ती निवडणूक कार्यालयाचे उद्घाटन मुंबई : लोकसभा निवडणूक ही केवळ भाजपा विरुद्ध काँग्रेस अशी नसून यावेळची लढाई संविधानासाठी, लोकशाहीसाठी देशाची एकता, अखंडता जपण्यासाठी आहे. महाराष्ट्राच्या स्वाभिमानासाठी गद्दारांना गाडण्याचे आणि देशाला वाचवण्याचे काम लोकसभा निवडणुकीच्या माध्यमातून करायचे आहे. इंडिया आघाडी देशभरात भक्कम असून १० वर्षांच्या तानाशाही सरकारचे शेवटचे ३० दिवस राहिले आहेत. लोकसभा निवडणुकीत इंडिया आघाडीचाच विजय होणार असा विश्वास उत्तर मध्य मुंबईच्या उमेदवार व मुंबई काँग्रेसच्या अध्यक्ष प्रा. वर्षा गायकवाड यांनी व्यक्त केला आहे. प्रा. वर्षा गायकवाड पुढे म्हणाल्या की, भाजपाचा ‘अब की बार ४०० पार’चा नारा हा भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे संविधान बदलण्यासाठी आहे हे विरोधी पक्ष सातत्याने सांगत असताना काँग्रेसच संविधान बदलणार असा उलटा आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदींसह भाजपा नेते करत आहेत. पण भाजपाच्या जे पोटात आहे ते पुन्हा एकदा ओठावर आले आहे. भाजपाचे सरचिटणीस दुष्यंत गौतम यांनीच संविधानाच्या प्रस्तावनेतील धर्मनिरपेक्ष शब्द काढणार असल्याचे सांगून भाजपाचा कुटील डाव उघड केला. नरेंद्र मोदी व अमित शाह यांनी आतातरी खोटे आरोप करणे बंद करावे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाला हात घालण्याचा भाजपाचा मनसुबा जनताच हाणून पाडणार आहे असेही गायकवाड म्हणाल्या. प्रा. वर्षा गायकवाड यांनी प्रचारात आघाडी घेतली असून घरोघरी जाऊन लोकांशी संपर्क साधण्यावर त्यांनी भर दिला आहे. इंडिया आघाडीच्या कार्यकर्त्यांशी संवाद साधत प्रचाराने वेग घेतला आहे. आज कुर्ला विधानसभा मतदार संघातील शिवाजी मैदान नेहरुनगर येथे मार्निंग वॉक व स्थानिकांशी चर्चा केली. संध्याकाळी कुर्ला पूर्व भागातील श्रमजीवी नगर ते जागृती नगर पदयात्रा काढली. या पत्रयात्रेला जनतेचा चांगला प्रतिसाद मिळाला. कलिना विधानसभा मतदार संघातील विद्यानगरी सांताक्रुज पूर्व येथे महिला व सामाजिक संस्था यांच्या बरोबर बैठक घेतली. या बैठकीला अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या प्रवक्त्या सुप्रीया श्रीनेत यांची प्रमुख उपस्थिती होती. चांदिवली विधानसभा मतदारसंघातील शिवसेना शाखांनाही भेटी दिल्या. कलीना येथे इंडिया- महाविकास आघाडीचे मुंबई उत्तर मध्य लोकसभा मतदार संघाच्या मध्यवर्ती निवडणूक कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले यावेळी माजी मंत्री अस्लम शेख, राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार मिलिंद कांबळे, शिवसेना विभाग प्रमुख महेश पेडणेकर आदी नेते उपस्थित होते.

श्री मावळी मंडळच्या ७१ व्या राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेला सूरुवात

मुंबई : श्री मावळी मंडळ संस्थेच्या वतीने ९९ व्या शिवजयंती उत्सवानिमित्त ७१ व्या राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धा राज्यस्तरीय पुरुष व महिला कबड्डी वैयक्तिक संघाची स्पर्धा रविवार दिनांक ०५/०५/२०२४ ते गुरुवार दिनांक ०९/०५/२०२४ या कालावधीमध्ये आयोजित करण्यात आल्या आहेत.  या स्पर्धा यशस्वी करण्याकरिता  संस्थेचे सर्व सभासद व खेळाडू अतोनात मेहनत घेत आहेत. स्पर्धेचे  उदघाटन रविवार दिनांक ०५/०५/२०२४ रोजी सायंकाळी ७:३० वाजता मा. श्री. विनयकुमार राठोड (पोलीस उपायुक्त ठाणे वाहतूक विभाग) यांच्या शुभहस्ते होणार आहे. तसेच, स्पर्धेचा बक्षीस समारंभ व समारोप गुरुवार दिनांक ०९/०५/२०२४ रोजी रात्रौ ९:०० वाजता मा. श्री. संजय काटकर  (आयुक्त मीरा-भाईंदर महानगरपालिका)  यांच्या शुभहस्ते होणार आहे. या स्पर्धेत  पुरुष गटात ६२ संघानी व महिला गटात  ३०  संघानी अशा एकूण ९२ संघानी भाग घेतला आहे. ह्यामध्ये पुरुष गटात  गुडमॉर्निंग स्पोर्ट्स क्लब (मुंबई शहर), बंड्या मारुती सेवा मंडळ (मुंबई शहर), स्वस्तिक क्रीडा मंडळ (मुंबई उपनगर), ईच्छाशक्ती क्रीडा मंडळ (पालघर), श्री साई स्पोर्ट्स (नाशिक), शिव शंकर क्रीडा मंडळ (ठाणे) ,  मिडलाईन कर्जत (ठाणे), जय बजरंग क्रीडा मंडळ वाशिंद (ठाणे), जय बजरंग रोहा (रायगड)    ह्या नामवंत संघांचा समावेश आहे. तर, महिला गटात शिवशक्ती स्पोर्ट्स क्लब (धुळे), श्री राम कबड्डी संघ (पालघर), स्वराज्य स्पोर्ट्स अकॅडमी (चिपळूण), अमर हिंद मंडळ (मुंबई शहर) , शिवतेज क्रीडा मंडळ (ठाणे),प्रकाश तात्या बालवडकर स्पोर्ट्स फाउंडेशन (पुणे) ह्या नामवंत संघांचा समावेश आहे. या स्पर्धेत एकूण  २,५०,०००/- ची पारितोषिके ठेवण्यात आली आहेत. विजेता, उपविजेत्याउपविजेत्या आणि उप उपांत्य फेरीत मजल मारणाऱ्या संघाना रोख रकमेची पारितोषिके, चषक देऊन गौरवण्यात येईल. तसेच विजेत्या संघाला  ४४,४४४/-, उपविजेता :  ३३,३३३/- आणि उप उपांत्य फेरीत पराभूत झालेल्या संघांना  ११,१११/- रोख रकमेची पारितोषिके देण्यात येईल. स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडू  ५,०००/- चा मानकरी ठरेल. तसेच सर्वोत्तम चढाईपटू आणि पक्कडपटू यांना प्रत्येकी  ३,०००/- चे पारितोषिक मिळेल. स्पर्धेतील प्रत्येक दिवसाच्या उत्कृष्ट चढाईपटू व पक्कडपटूला  १,०००/- प्रत्येकी बक्षिस रक्कम रोख मिळेल.

‘आंबेघोसाळे तलाव परिसरातील कामे जलद पूर्ण होतील’

महापालिका आयुक्त सौरभ राव यांची ग्वाही उथळसर प्रभागात सर्वंकष स्वच्छता मोहिमेचे आयोजन ठाणे : आंबे घोसाळे तलाव परिसरातील सर्व कामे जलद गतीने पूर्ण होतील. तसेच, ज्येष्ठ नागरिकांनी मांडलेल्या सूचनांचा विचार करुन प्रशासन आवश्यक कार्यवाही करेल, अशी ग्वाही ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी दिली. शनिवारी सकाळी ७.०० वाजता उथळसर प्रभाग समिती क्षेत्रात सर्वंकष स्वच्छता मोहिमेस आरंभ झाला. आंबेघोसाळे तलाव, मीनाताई ठाकरे चौक परिसर, के व्हीला, राबोडी, ऋतू पार्क आदी भागात या मोहिमेत स्वच्छता अभियान राबविण्यात आले. त्यात, रोटरी क्लब, शिवशांती प्रतिष्ठान, स्थानिक नागरिक, महापालिका अधिकारी आणि कर्मचारी सहभागी झाले. या मोहिमे दरम्यान आयुक्त राव यांनी आंबे घोसाळे तलाव परिसराची पाहणी केली. त्यावेळी, स्थानिक नागरिक, ज्येष्ठ नागरिक संघाचे प्रतिनिधी यांच्याशी आयुक्तांनी संवाद साधला. शौचालयातील पाण्याची समस्या, स्वच्छता, परिसरात टाकला जाणारा कचरा याविषयी नागरिकांनी माहिती दिली. तसेच, सौंदर्यीकरण कामाबाबत सूचनाही केल्या. या तळ्याला लागून असलेल्या पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या पुतळ्याच्या परिसर, मीनाताई ठाकरे चौक परिसर यांचीही आयुक्तांनी पाहणी केली. ज्येष्ठ नागरिकांनी केलेल्या सूचनांचा पूर्ण विचार करून त्यानुसार कार्यवाही केली जाईल. या परिसरात नागरिकांना अधिकाधिक स्वच्छ आणि सुंदर वातावरण कसे मिळेल या दृष्टीने महापालिका प्रयत्न करेल, असेही आयुक्त राव यांनी स्पष्ट केले. या वेळी, अतिरिक्त आयुक्त (१) संदीप माळवी, अतिरीक्त आयुक्त (२) प्रशांत रोडे, उपायुक्त तुषार पवार, मनीष जोशी, जी. जी. गोदेपुरे, दिनेश तायडे, अनघा कदम, सचिन पवार, सहायक आयुक्त महेश आहेर, वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. राणी शिंदे, मुख्य पर्यावरण अधिकारी मनीषा प्रधान, उप नगर अभियंता विकास ढोले, शुभांगी केसवानी, गुणवंत झांब्रे, कार्यकारी अभियंता संजय कदम, मोहन कलाल, वृक्ष अधिकारी केदार पाटील आदी उपस्थित होते. नालेसफाईचा आढावा उथळसर मधील मुख्य नाल्याच्या सफाईचा आढावा यावेळी आयुक्त राव यांनी घेतला. नाले सफाई वेळेत पूर्ण करण्यावर विभागाने लक्ष ठेवावे, असे निर्देश आयुक्तांनी पाहणी नंतर दिले.

नागरिकांनी मतदानाचे प्रमाण वाढविण्यासाठी पुढाकार घ्यावा

महापालिका आयुक्त सौरभ राव यांचे आवाहन ठाणे : लोकसभा निवडणुकीत मतदानाचे प्रमाण वाढावे यासाठी नागरिकांनीही सक्रिय पुढाकार घ्यावा, असे आवाहन ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी केले आहे. तसेच, ज्येष्ठ नागरिकांनी यात मोलाची भूमिका बजावावी असेही आवाहन आयुक्तांनी केले आहे. उथळसर प्रभाग समिती क्षेत्रात शनिवारी राबविलेल्या सर्वंकष स्वच्छता अभियानात, आंबेघोसाळे तलाव येथे मतदानाची जनजागृती करणारे फलक लावून नागरिकांना मतदानाचे आवाहन करण्यात आले. अतिरिक्त आयुक्त (१) संदीप माळवी, अतिरीक्त आयुक्त (२) प्रशांत रोडे, उपायुक्त तुषार पवार, मनीष जोशी, जी. जी. गोदेपुरे, दिनेश तायडे, अनघा कदम, सचिन पवार, सहायक आयुक्त महेश आहेर आदी उपस्थित होते. रोटरी क्लब, शिवशांती प्रतिष्ठान, ज्येष्ठ नागरिक संघ यांचे प्रतिनिधी यावेळी उपस्थित होते. मतदान हे आपले राष्ट्रीय कर्तव्य असून येत्या २० मे २०२४ ही तारीख लक्षात ठेवून सर्व नागरिकांनी मतदानाचा हक्क बजावावा. जोडून आलेल्या सुटीच्या मोहात न पडता मतदानाच्या कर्तव्याला प्राथमिकता द्यावी, असेही आवाहन आयुक्त राव यांनी केले. जिल्हा निवडणूक कार्यालयाकडून आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदान प्रक्रियेत मतदारांचा सहभागी वाढविण्यासाठी स्वीप अंतर्गत मतदार जागृतीकरिता विविध उपक्रम राबविले जात आहेत. या पार्श्वभूमीवर ठाणे महापालिकेनेही जाहिराती, बॅनर्स, सोशल मिडिया, आशा सेविका तसेच महापालिकेच्या विविध उपक्रमातंर्गत मतदान जनजागृती करण्यात येत आहे. महापालिकेने मतदान यंत्रांची प्रतिकृती असलेला मॅस्कॉटही तयार केलेला आहे.

कृत्रिम बुद्धिमत्ता अवकाश व्यापतेय…

खास बात मेधा इनामदार एव्हाना जगभरात एआयची वाटचाल खर्‍या अर्थाने सुरु झाली आहे. लवकरच एआय आपल्या आयुष्याचा अविभाज्य भाग होणार आहे. भविष्यात रोबोट्स आपल्यासोबत आपले सहकारी म्हणून काम करतील, अशीही…

चौथ्या टप्प्यातला कॅन्सर असतानाही…

जगात अशा अनेक कंपन्या आहेत, ज्या आपल्या कर्मचार्‍यांना चांगल्या पगारासह इतर अनेक सुविधा देतात; पण अशा अनेक कंपन्या आहेत जिथे बॉस प्रकृती अस्वास्थ्य असतानाही रजा देत नाहीत. कर्मचार्‍यांनाही कार्यालयात यावे…

ठाण्यात मुख्यमंत्र्यांचे शक्तीप्रदर्शन

नरेश म्हस्केंनी भरला उमेदवारी अर्ज भरला अनिल ठाणेकर ठाणे : ठाण्यासहीत शिवसेना कुणाची याचा फैसला करणाऱ्या ठाणे लोकसभा मतदार संघात आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदेयांच्या उपस्थितीत जोरदार शक्तिप्रदर्शन करीत महायुतीचे शिवसेना पक्षाचे उमेदवार…

केजरीवालांना निवडणूकीसाठी अंतरिम जामीन मिळणार ?

आता ७ मेला सर्वोच्च सुनावणी नवी दिल्ली : अरविंद केजरीवाल यांच्या जामीन अर्जावरील सुनावणी अशीच सुरु राहीली तर सध्या सुरु असलेल्या लोकसभेच्या पार्श्वभुमीवर त्यांना अंतरीम जामीन मंजुर करता येऊ शकतो असे सुचक…

मोदींकडून शेतकऱ्यांचे हाल होतायेत-शरद पवार

नीरा : शेतमाल पिकवणारा शेतकरी टिकला पाहिजे, त्याच्या मालाला योग्य तो भाव मिळायला हवा; मात्र सध्याचे मोदी सरकार शेतमाल पिकवणाऱ्याला महत्त्व देत नाही, तर फक्त खाणाऱ्यांना महत्त्व देते. त्यामुळे शेतकऱ्यांचे हाल होत आहेत. त्यासाठी शेतकऱ्याला महत्त्व देऊन त्याच्या मालाला चांगला भाव देणाऱ्या लोकांना निवडून द्या, असे आवाहन माजी कृषिमंत्री खा. शरद पवार यांनी केले आहे. पुरंदर तालुक्यातील नीरा येथे गुरुवारी  सुप्रिया सुळे यांच्या निवडणूक प्रचारासाठी झालेल्या सभेमध्ये पवार यांनी मोदी सरकारवर आणि त्यांनी राबविलेल्या धोरणांवर सडकून टीका केली. जे काम करतात त्यांना प्रोत्साहन देणे ही जबाबदारी आपली आहे. ते काम तुम्ही करा. त्यांना पुन्हा संसदेत पाठवणे हे आपले कर्तव्य आहे, असे म्हणत सुप्रिया सुळे यांना मत देण्याचे आवाहन पवारांनी केले. सुप्रिया सुळे यांनीदेखील सरकारच्या धोरणांवर टीका केली.  इथेनॉलबाबत जे धोरण राबवले त्यामुळे शेतकऱ्यांच्या उसाला ३०० रुपयांनी कमी भाव मिळाल्याचे म्हणत त्यांनी मोदी सरकारवर टीका केली, तर यापुढे सर्व निवडणुका सर्व ताकदीनिशी लढवल्या जातील. ग्रामपंचायतीपासून विधानसभा त्याचबरोबर सहकारातील साखर कारखाने व जिल्हा बँकेची निवडणूकदेखील आपण लढवणार असल्याचे म्हणत त्यांनी अजित पवार यांना आव्हान दिले. लोकांनी कोणाच्या धमक्यांना घाबरू नये. जे धमक्या देतात त्यांना सांगा, विधानसभा लांब नाही. तिथे दाखवून देऊ, असे म्हणत त्यांनी अजित पवार यांना टोला लगावला.