Author: bittambatami.com

आधी आमदारकीचा राजीनामा द्या, मगच भाजपचा प्रचार करा’

महाजनांनी पुन्हा खडसेंना डिवचले नगर : मनाने भाजपात पुन्हा दाखल झालेल्या एकनाथ खडसेंना त्यांचे राजकीय विरोधक भाजपाच्याच गिरीष महाजन यांनी पुन्हा एकदा डिवचले आहे. खडेसे यांनी एन लोकसभा निवडणूकीच्या तोंडावर भाजपमध्ये घरवापसी करण्याचा निर्णय घेतला. मात्र अजून त्यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश झालेला नाही. त्यातच एकनाथ खडसे यांनी त्यांच्या सुनबाई रक्षा खडसे यांचा प्रचार रावेर लोकसभा मतदारसंघात सुरु केला आहे. यावरून मंत्री गिरीश यांनी एकनाथ खडसेंवर निशाणा साधला आहे. गिरीश महाजन म्हणाले की, एकनाथ खडसे हे राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार आहेत. खडसे यांनी अगोदर आमदारकीचा राजीनामा द्यावा. त्यानंतर त्यांनी भाजपचे काम करावे. लोकांमध्ये गैरसमज निर्माण होतोय. कधी म्हणतात मी राष्ट्रवादीचा तर कधी म्हणतात मी भाजपचा आहे. विधानसभेला मुलगी तुतारी घेऊन उभे राहण्याच्या तयारीत आहे. खडसे यांची भूमिका संधीसाधूपणाची आहे. घरात सगळेच पक्ष ठेवायचे, असे त्यांचे सुरु आहे. त्यांनी आमदारकी आणि खासदारकीसाठी सगळ्यांचे काम करायचे. लोकांना असे राजकारण आवडत नाही, त्यामुळे त्यांनी एक भूमिका घेतली पाहिजे, अशी टीका गिरीश महाजन यांनी एकनाथ खडसे यांच्यावर केली आहे. महायुती जागावाटपाबाबत विचाले असता गिरीश महाजन म्हणाले की, महायुतीचे जागा वाटप पूर्ण झाले आहे. काही ठिकाणी उमेदवार जाहीर करण्यासाठी उशीर झाला आहे. मात्र नाशिक, ठाणे या सर्व जागा महायुतीच जिंकणार आहे. मोदींना तिसऱ्यांदा प्रधानमंत्री करायचंय हे लोकांनी ठरवलंय, असे त्यांनी म्हटलंय.

ठाकरे कधीही भाजपासोबत जातील- प्रकाश आंबेडकर

पाचोरा :  भाजपासारकेच महाविकास आघाडीतील नेतेही जातीयवादी आहेत.  ते पक्षाची भूमिका मांडत नाहीत. उद्धव ठाकरे हे कधीही भाजपशी हातमिळवणी करतील म्हणूनच मुस्लिमांनी महाविकास आघाडीच्या भूलथापांना बळी पडू नये, असे वंचित…

उद्धव ठाकरे शत्रू नव्हते मग त्यांचा पक्ष का फोडला ?

जयंत पाटलांची मोदींवर टीका मुंबई : “मोदींनी दहा वर्षात मराठी चॅनेलच्या संपादकांना कधी मुलाखत दिली नाही. आता निवडणुकीत महाराष्ट्र आपल्या हातातून गेला हे लक्षात आल्यावर मुलाखत देण्याची पाळी आली. यातच शरद पवार यांचा…

मुंबईकरांना खुषखबर

निवडणुकीच्या दिवशी मेट्रो तिकिटावर १० टक्के सवलत मुंबई: लोकसभेच्या मतदानाचा टक्का वाढावा म्हणून आता मेट्रोने नवी शक्कल लढविली आहे. मुंबई मेट्रो मार्ग २ अ  आणि ७ च्या सर्व प्रवाशांना येत्या २० मे रोजी मतदानाच्या दिवशी प्रवासी तिकिटावर दहा टक्के सवलत देण्याचा महत्त्वाचा निर्णय महामुंबई मेट्रो संचलन महामंडळाने घेतला आहे. ही सवलत मुंबई मेट्रो १ कार्ड, मोबाईल क्यूआर तिकीट, पेपर तिकीट अशा सर्व माध्यमातून देण्यात येणार आहे. मुंबई मेट्रो मार्ग २  अ आणि ७ च्या माध्यमातून आतापर्यंत सुमारे ९० कोटी नागरिकांनी प्रवास केला आहे. मुंबई मध्ये पाचव्या टप्प्यातील मतदान येत्या २० मे रोजी…

यामिनी जाधव यांचा उमेदवारी अर्ज दाखल

 मुंबई : लोकसभेच्या पाचव्या टप्प्यातील उमेदवारी अर्ज भरण्यासाठी विविध राजकीय पक्षांनी मुंबई शहर व उपनगरात मोठे शक्तिप्रदर्शन केले. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीती यामिनी जाधव यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. मुंबईत…

दिल, दोस्ती, दृष्मनी !

लोकसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्राच्या सर्वच्या सर्व ४८ मतदारसंघांमध्ये आता महायुती आणि महाआघाडीचे उमेदवार घोषित झाले आहेत. त्यामुळे आता लढती कशा असतील ते स्पष्ट दिसते आहे. या सर्वच लढतींमधील सांगली लोकसभा क्षेत्रातील…

पालघर लोकसभेसाठी शेवटच्या दिवसापर्यंत १७ उमेदवारांचे २६ नामनिर्दशनपत्र दाखल – गोविंद बोडके

पालघर : २२- पालघर  लोकसभा मतदार संघासाठी नामनिर्देशनपत्र दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी एकूण ९ उमेदवारांनी १३ नामनिर्देशन पत्र दाखल केले असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी गोविंद बोडके यांनी दिली.* ३ मे २०२४ रोजी बळीराम सुकर जाधव (बहुजन विकास आघाडी),यांनी १ अर्ज, परेश सुकर घाटाळ (बहुजन महापार्टी आणि अपक्ष ), यांनी २ अर्ज, हेमंत विष्णू सवरा (भारतीय जनता पक्ष) यांनी ३ अर्ज, कल्पेश बाळू भावर (अपक्ष), यांनी १ अर्ज, राजेश रघुनाथ पाटील (बहुजन विकास आघाडी), यांनी २ अर्ज, राजेश दत्तू उमतोल (अपक्ष), यांनी १ अर्ज,भरत सामजी वनगा(बहुजन समाज पार्टी), यांनी १ अर्ज,अमर किसन कवळे, (अपक्ष) १ अर्ज, भावना किसन पवार (अपक्ष) १ अर्ज उमेदवारांनी आज नामनिर्देशन पत्र दाखल केले. अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवसा पर्यंत एकूण १७ उमेदवारांनी २६ नामनिर्दशनपत्र दाखल केले.अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी गोविंद बोडके यांनी दिली.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, मोदी को हराना मुश्कीलही नही…

ठाणे : एकीकडे देशाला वाचवायला, लोकशाहीला पुढे नेण्यासाठी आणि विकास करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आहेत. तर, दुसरीकडे देश बुडवायला निघालेली इंडीया आघाडी आहे. देशभक्त त्यांना थारा देणार नाहीत. त्यामुळेच मोदी को हराना मुश्कीलही नही, नामुमकीन है, असे विधान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाण्यात केले. तसेच पप्पु आधीच फेल झाला असून त्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा फेल करतील, असे सांगत त्यांनी राहुल गांधी यांच्यावर टीका केली. ठाणे लोकसभा मतदारसंघातील शिवसेनेचे उमदेवार नरेश म्हस्के यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी काढलेल्या मिरवणुकीनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उपस्थितांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी उद्धव ठाकरे, राहुल गांधी आणि इंडीया आघाडीवर टीका केली. २०१४ पूर्वी देशात भ्रष्टाचार, दंगली आणि बाॅम्बस्फोट घडत होते. पण, त्यानंतर एकदाही बाॅम्बस्फोट करण्याची कुणाची हिमंत झाली नाही. कारण, भारताकडे डोळे वटारून पाहिले तर घरात घुसून मारु असा इशारा मोदींनी दिला. त्यामुळे पुन्हा एकदा मोदी पंतप्रधान होणार आहेत, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. घरात बसून किंवा फेसबुक लाईव्ह करून काम करता येत नाही. त्यासाठी जमिनीवर उतरुन काम करावे लागते. गेल्या दोन वर्षांपासून मी जमिनीवर उतरुन काम करतोय. याआधीही मीच काम करत होतो पण, त्याचे श्रेय दुसरे घेत होते, असे सांगत त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टिका केली. बाबासाहेबांचे संविधान बदलणार असे विरोधकांकडून बोलले जात असून ते चुकीचे आहे. संविधान बदललेले जाणार नाही. देशात संविधान दिवस साजरा करण्याचे काम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. तर, बाबासाहेब आंबेडकर यांना निवडणुकीत पाडण्याचे काम काँग्रेसने केले, असेही ते म्हणाले. तुम्ही मागच्या उमेदवाराला मताधिक्य देण्याचे काम काम केले. त्याच्यासाठी मेहनत घेतली. खरे तर त्या उमेदवाराचे काम करायला कार्यकर्ते तयार नव्हते. त्यामुळे मीच उमेदवार असे समजून मतदान करा, असे मला सर्वांना सांगावे लागले, असा टोला लगावत या निवडणुकीत मागचे सर्व विक्रम मोडीत काढण्याचे आवाहन मुख्यमंत्री शिंदे यांनी सर्व कार्यकर्त्यांना केले. तसेच आपण उमेदवार या भावनेने काम करून विरोधकांच्या चारही मुंड्या चित करा परत, विरोधी पक्षाने ठाण्याचे नाव घेत कामा नये, असेही ते म्हणाले.

राष्ट्रीय कबड्डी खेळाडू शिवाजी भांदीग्रे यांचे आकस्मित निधन

मुंबई : स्टेट बँकेचे कबड्डी खेळाडू, प्रशिक्षक व मार्गदर्शक शिवाजी भांदीग्रे यांचे १ मे रोजी सायं. ७-०० च्या सुमारास परेल रुग्णालयात आकस्मित निधन झाले. परेलच्या बी. रघुवीर संघातून खेळणाऱ्या दादांनी महाराष्ट्र हायस्कूल नं. २ शाळेतून कबड्डी खेळण्यास सुरुवात केली. निधना समयी ते ८२ वर्षाचे होते. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले व सूना असा परिवार आहे. ते दादा या नावाने कबड्डी वर्तुळात परिचित होते. उजवा कोपरा रक्षक असलेले दादा पायात झेप घेऊन पकड करण्यात माहीर होते. दादा चढाई देखील उत्तम करीत असत. खेळाडूच्या डोक्यावरून उडी मारण्यात ते तरबेज होते. पण खेळाडू पेक्षा ते अधिक रमले प्रशिक्षकाच्या भूमिकेत. विरोधी संघातील खेळाडूंच्या खेळाचा अभ्यास करून त्याचा उपयोग आपल्या सहकारी खेळाडू कडून संघाच्या विजया करीता करून घेण्यात त्यांना अधिक रस होता. साऊथ कॅनरा स्पोर्टस् क्लब या संघाला पुनर्जीवित करून नावलौकिक मिळवून देण्यात शेखर शेट्टी यांच्या बरोबरीने दादांचा सिंहाचा वाटा होता. कित्येक कबड्डी खेळाडूंना त्यांनी स्टेट बँकेत कबड्डी खेळाडू म्हणून भरती केले. कबड्डी खेळाबद्दल ते खूप आत्मीयतेने बोलत. सद्या ते ओम् कबड्डी प्रबोधिनी या संघटनेच्या माध्यमातून तरुण खेळाडूंना मार्गदर्शन करण्याचे काम करीत होते. आजच रात्री १-३०च्या सुमारास त्यांच्या पार्थिवावर भोईवाडा स्मशान भूमीत करण्यात आले.

यामिनी जाधव आणि रविंद्र वायकर यांच्याकडून अर्ज दाखल

मुंबई दक्षिण लोकसभा मतदार संघातून महायुतीच्या उमेदवार यामिनी जाधव यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत उमेदवारी अर्ज दाखल केला. मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा मतदार संघातून महायुतीचे उमेदवार रविंद्र वायकर यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला.