Author: bittambatami.com

जीवनदीप महाविद्यालयात स्पंदन महोत्सव संपन्न

जीवनदीप महाविद्यालयात स्पंदन महोत्सव संपन्न कल्याण: विद्यार्थ्यांच्या कला कौशल्यांना तसेच त्यांच्यातील व्यवस्थापन कौशल्याला चालना देण्यासाठी जीवनदीप महाविद्यालयाच्या व्यवस्थापन शाखेच्या विद्यार्थ्यांनी भारतीय परंपरा जपण्याच्या हेतूने स्पंदन महोत्सवाचे आयोजन केले होते. या महोत्सवाचे पूर्णपणे नियोजन व्यवस्थापन शाखेच्या विद्यार्थ्यांनीच केले होते. महाविद्यालयात नृत्य, गायन, मेहंदी, एकपात्री, रांगोळी, फॅशन शो, फोटोग्राफी इत्यादी स्पर्धांचे आयोजन केले होते. या महोत्सवाची सुरुवात ही गणरायाच्या चरणी दीपप्रज्वलन करून करण्यात आली. विद्यार्थ्यांनी सर्व स्पर्धांमध्ये आवडीने सहभाग घेतला. जीवनदीप शैक्षणिक संस्थेचे अध्यक्ष. रविंद्र घोडविंदे यांनी विद्यार्थ्यांना उत्तम रीतीने मार्गदर्शन केले व या कार्यक्रमाकरिता विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. कार्यक्रम प्रसंगी डॉ. प्रा. शिवाजी वाघमारे मुंबई विद्यापीठ लोककला अकादमी यांनी लोककलेचा नजराणा सर्वांसमोर सादर केला. यामध्ये माझी मैना गावाकडे राहिली, संत जनाबाईंचे प्रबोधनपर गीत, भारुड इत्यादी गोष्टी त्यांनी सादरीकरण केल्या व विद्यार्थ्यांना उत्तम रीतीने मार्गदर्शन केले. प्रा. महेश थोरात या  कार्यक्रम प्रसंगी उपस्थित होते त्यांनी देखील विद्यार्थ्यांना योग्य रीतीने मार्गदर्शन केले. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अशोक वाघ, संचालक .प्रशांत घोडविंदे उपप्राचार्य. हरेंद्र सोष्टे, व्यवस्थापन शाखाप्रमुख. उल्हास गायकर,प्रा. निकिता घोडविंदे, प्रा. सचिन कांबळे, प्रा. शैलेजा मिश्रा यांचे मोलाचे सहकार्य लाभले. महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी यांचे एकत्रित सहभागाने हा कार्यक्रम यशस्वीरित्या संपन्न झाला.

प्रजासत्ताक दिनी विभागीय आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांच्या हस्ते ध्वजारोहण संपन्न पोलीस दलातील उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या अधिकाऱ्यांचा गौरव

प्रजासत्ताक दिनी विभागीय आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांच्या हस्ते ध्वजारोहण संपन्न पोलीस दलातील उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या अधिकाऱ्यांचा गौरव नवी मुंबई : (अशोक गायकवाड )–भारतीय प्रजासत्ताक दिनानिमित्त ७७ वा वर्धापन दिनाचा कोकण विभाग स्तरावरील ध्वजारोहण समारंभ आज कोकण विभागीय आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांच्या हस्ते संपन्न झाला. नवी मुंबई पोलीस मुख्यालय मैदान, सेक्टर-१७, कळंबोली येथे हा कार्यक्रम साजरा करण्यात आला. यावेळी उपस्थित स्वातंत्र्य सैनिक, मान्यवर, नागरीक आणि शालेय विद्यार्थी आदींना विभागीय आयुक्तांनी प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या. या समारंभास नवी मुंबई पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे, नवी मुंबई महानगरपालिका आयुक्त कैलास शिंदे, विशेष पोलीस महानिरीक्षक कोकण परिक्षेत्र संजय दराडे आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी परेड कमांडर श्रीमती प्रेरणा कट्टे, सहा.पोलीस आयुक्त (गुन्हे शाखा) यांच्या नेतृत्वाने राखीव पोलीस मुख्यालय नवी मुंबई, एस.आर.पी.एफ,ग्रुप नं.११ प्लाटून, क्यु .आर.टी.पथक, नवी मुंबई, आर.सी.पी.पथक, नवी मुंबई, नवी मुंबई पोलीस पथक, नवी मुंबई महिला पोलीस पथक, नवी मुंबई वाहतूक पोलीस पथक, डॉग स्कॉड बॉम्ब शोधक/नाशक पथक, बँड पथक, वरुन वाहन, वज्रवाहन, निर्भया पथक इरटिगा, फायर बुलेट, निर्भया पथक ॲक्टीव्हा, अग्निशामक रेस्क्यु व्हॅन सिडको आदीनी विभागीय आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांच्या उपस्थितीत राष्ट्रध्वजाला मानवंदना दिली. यावेळी पोलीस दलातील उल्लेखनीय कामगिरी बद्दल राष्ट्रपती पदक जाहीर झालेले पोलीस निरीक्षक सुनिल शिंदे, गुन्हे शाखा, नवी मुंबई यांना विभागीय आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांच्या हस्ते गौरविण्यात आले. या कार्यक्रम प्रसंगी नवी मुंबई महानगरपालिका शिक्षण विभागतर्फे नवी मुंबई महानगरपालिका शाळा क्र.३६ कोपरखैरणे, नवी मुंबई महानगरपालिका शाळा क्र.११२ करावे गांव, नवी मुंबई महानगरपालिका शाळा क्र.१५ शिरवणे, नवी मुंबई महानगरपालिका शाळा क्र.९३ सीवुड, नवी मुंबई महानगरपालिका शाळा क्र.१०२ नेरुळ, नवी मुंबई महानगरपालिका शाळा क्र.१०१ शिरवणे या सहा शाळांनी विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले. उपस्थितांनी टाळ्यांच्या कडकडाटाने त्यांना प्रोत्साहन दिले. या कार्यक्रमास अतिरिक्त विभागीय आयुक्त कोकण विभाग सिध्दाराम सालीमठ, सहआयुक्त (नियोजन) प्रमोद केंभावी, उपर आयुक्त (विकास) डॉ.माणिक दिवे, सहआयुक्त (पुर्नवसन) रवि पाटील, सहआयुक्त (करमणूक व शुल्क) रविंद्र पवार तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर व्यक्ती, वरिष्ठ पोलीस अधिकारी, शासकीय अधिकारी, कर्मचारी व नागरीक मोठया संख्येने उपस्थित होते. यावेळी कार्यक्रमाचे उत्कृष्ठ सूत्रसंचलन केल्याबद्दल शुभांगी पाटील आणि निंबाजी गीते यांना विभागीय आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांच्या हस्ते गौरविण्यात आले.

महाविकास आघाडीच्या उमेदवाराला पळविण्याचा अजब प्रकार

महाविकास आघाडीच्या उमेदवाराला पळविण्याचा अजब प्रकार अर्ज मागे घेण्याची ऑफर आणि तहसील कार्यालयाबाहेर तणावग्रस्त परीस्थिती राज भंडारी पनवेल : राज्यात जिल्हा परिषद तसेच पंचायत समितीच्या निवडणुका चांगल्याच रंगात आल्या असताना आज मंगळवारी उमेदवारी अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख असतानाच पनवेलमध्ये एक वेगळाच प्रकार समोर आला. तालुक्यातील आदई पंचायत समिती गणातून भाजपचे भूपेंद्र पाटील यांच्याविरोधात महाविकास आघाडीचे शेकापचे उमेदवार विलास फडके आणि शिवसेना उबाठाच्या उमेदवार अनिता डांगरकर हे दोन उमेदवार मैत्रीपूर्ण लढत असतानाच शिवसेनेच्या उमेदवार अनिता डांगरकर यांना विरोधकांकडून १५ लाख रुपयांचे अमिष देऊन उमेदवारी अर्ज मागे घेण्याबाबत सांगण्यात आल्याचे कारण देत तहसील कार्यालयाबाहेर शिवसेनेच्या कट्टर कार्यकर्त्यांनी एकच गोंधळ घातला. यावेळी पोलिसांशी देखील हुज्जत घालण्याचा प्रकार करण्यात आला. याबाबत पनवेल शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक नितीन ठाकरे हे माहिती मिळताच क्षणी घटनास्थळी दाखल झाले. परिस्थिती हाताबाहेर जाऊ न देता त्यांनी सर्व पदाधिकाऱ्यांना पोलीस ठाण्यात आणले. काही क्षणातच महाविकास आघाडीचे सर्व नेते देखील याठिकाणी हजर झाले. नितीन ठाकरे यांनी नेत्यांशी चर्चा करून यावर तोडगा काढण्याबाबत मध्यस्थी केली. यावेळी महाविकास आघाडीच्या नेत्यांनी मैत्रीपूर्ण लढत न लढण्याचा निर्णय घेत शिवसेना उबाठाच्या अनिता डांगरकर यांचा अर्ज महाविकास आघाडीच्यावातीने मागे घेण्याचा निर्णय घेतल्याने आता महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांमध्ये कोणताही संभ्रम उद्भवणार नसल्याचे देखील सांगण्यात आले. त्यामुळे आदई पंचायत समिती गणातून आता थेट लढत ही शेकापचे अधिकृत उमेदवार विलास फडके आणि भाजपचे भूपेंद्र पाटील यांच्यात होणार असल्याचे चित्र पहायला मिळत आहे.

धागडाचा ऐतिहासिक ‘पूर्व बुरुज’ पर्यटकांसाठी खुला

धागडाचा ऐतिहासिक ‘पूर्व बुरुज’ पर्यटकांसाठी खुला ट्रेक क्षितिज संस्थेची श्रमदान मोहीम यशस्वी कल्याण : ऐतिहासिक वारसा जतन व संवर्धनाच्या उद्देशाने ‘ट्रेक क्षितिज संस्था, डोंबिवली’च्या शिलेदारांनी सुधागड दुर्गावरील दुर्लक्षित असलेल्या ‘पूर्व बुरुज’ परिसरात श्रमदानाची विशेष मोहीम यशस्वीरीत्या राबवली. २४ व २५ जानेवारी रोजी झालेल्या या मोहिमेमुळे वर्षानुवर्षे झाडीने बुजलेला मार्ग मोकळा झाला असून, आता गडप्रेमी व पर्यटकांना या ऐतिहासिक बुरुजापर्यंत सहज व सुरक्षितपणे पोहोचता येणार आहे. डिसेंबर २०२४ मध्ये केलेल्या पाहणीत पूर्व बुरुजाकडे जाणारी वाट दाट गवत, काटेरी झुडपे आणि दगडधोंड्यांमुळे पूर्णपणे बंद असल्याचे निदर्शनास आले होते. त्यावेळी केवळ स्थानिक गाईडच्या मदतीनेच हा मार्ग पार करता येत होता. हा अडथळा दूर करण्यासाठी ट्रेक क्षितिजच्या सदस्यांनी २४ जानेवारी रोजी सकाळी ११ वाजल्यापासून श्रमदानास सुरुवात केली. सलग मेहनतीने दुपारी ३ वाजेपर्यंत सुमारे एक किलोमीटरचा मार्ग स्वच्छ करण्यात आला. मूळ वाट काही ठिकाणी अत्यंत धोकादायक व उघडी (एक्स्पोज्ड) असल्याने, संस्थेच्या सदस्यांनी श्रमदानातून एक सुरक्षित पर्यायी मार्गही तयार केला. तसेच बुरुजावर उतरणाऱ्या पायऱ्यांवर साचलेले दगड, माती, गवत व काटेरी झुडपे हटवून संपूर्ण परिसर स्वच्छ करण्यात आला. दुपारचे जेवण लांबणीवर टाकून सलग दोन तास कष्टाचे काम करत हा ऐतिहासिक वारसा पुन्हा पर्यटकांसाठी खुला करण्यात आला. सुधागडच्या संरक्षण व्यवस्थेत पूर्व बुरुजाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. भोरप्याची नाळ व घोडजीन वाटेने येणाऱ्या शत्रूला रोखण्यासाठी या बुरुजाची रचना मोक्याची ठरली होती. हा बुरुज जिंकला गेला असता तर शत्रूस थेट महादरवाजापर्यंत पोहोचणे सोपे झाले असते. त्यामुळे या बुरुजाचे संवर्धन ऐतिहासिक दृष्टीने अत्यंत मोलाचे आहे. या संदर्भात मोहीम प्रमुख शुभम सावंत यांनी सांगितले, “मांडवीकोटावरील सलग पाच मोहिमांनंतर आम्ही सुधागडचा पूर्व बुरुज मोकळा करण्याचा संकल्प केला होता. संघातील सर्व सदस्यांच्या चिकाटीमुळे आज हा ऐतिहासिक ठेवा पुन्हा सर्वांसमोर आला आहे. दुर्गसंवर्धनाचे हे कार्य भविष्यातही असेच सुरू ठेवण्याचा आमचा मानस आहे.” या मोहिमेत प्रशांत राबांडे, महेंद्र गोवेकर, राहुल मेश्राम, प्रिया कराडकर, संदेश मुठे, कपिल कुलकर्णी, शैलजा धनगर, प्रणाली नारकर, सुजल राबांडे, अथर्व गावकर, तृप्ती मांजरेकर, प्राची कोकाटे, सागर रासम, प्रशांत साठे, स्नेहल झोपे, सोनाली मांजरेकर व निकिता पवार यांनी सक्रिय सहभाग नोंदवला.

हे असंस्कृत वर्तन कोण सहन करेल ?

हे असंस्कृत वर्तन कोण सहन करेल ? अमृता फडणवीस यांच्या विरोधातील चिथावणीचा शत:दा निषेध !  दिवाकर शेजवळ बेताल गायिका अंजली भारती हीची द्वेषपूर्ण गीते, बीभत्स अभिनय, चिथावणीखोर वक्तव्ये ही प्रबुद्ध आंबेडकरी समाजाची अभिरुची, संस्कृती, भूमिका कदापिही असू…

ठाण्याला ३ फेब्रुवारीला महापौर मिळणार

ठाण्याला ३ फेब्रुवारीला महापौर मिळणार सिद्धेश शिगवण ठाणे : ठाण्याला येत्या ३ फेब्रुवारीला महापौर मिळणार आहे. ठाणए महापौर पदासाठी येत्य ३० जानेवारीला अर्ज दाखल केले जाणार आहेत. तर, ३ फेब्रुवारी रोजी महापौर पदासाठी निवडणूक…

मुंबईत एकत्रित गटनोंदणीवरून भाजप, शिंदेसेनेचा गोंधळ सुरूच

मुंबईत एकत्रित गटनोंदणीवरून भाजप, शिंदेसेनेचा गोंधळ सुरूच स्वाती घोसाळकर मुंबई: मुंबई महापालिका निवडणुकीत भाजप आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या युतीने काठावरचे बहुमत मिळवले. बहुमताचा हाँ आकडा अधिक भक्कम करण्याच्या दृष्टीनं पक्षाने स्वतंत्र…

मीरा भाईँदरमध्ये फोर टू का वन; चार पदरी पुलाचे दोन पदर गायब

मीरा भाईँदरमध्ये फोर टू का वन; चार पदरी पुलाचे दोन पदर गायब अरविंद जोशी मिरा-भाईंदर : मिरा-भाईंदर शहरात वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी बांधण्यात आलेल्या ब्रिजमध्ये फोर टू का वन करण्यात…

भारत-युरोपियन युनियनमध्ये मुक्त व्यापार कराराची घोषणा

भारत-युरोपियन युनियनमध्ये मुक्त व्यापार कराराची घोषणा नवी दिल्ली : भारत आणि युरोपियन युनियनमध्ये मुक्त व्यापार कराराची अधिकृत घोषणा आज  करण्यात आली आहे. भारत आणि युरोपियन युनियन यांच्यातील बहुचर्चित ‘मदर ऑफ ऑल डील’वर स्वाक्षरी करण्यात आली…

महामंडलेश्वर पद ममताने त्यागले  

महामंडलेश्वर पद ममताने त्यागले मुंबई :  सिनेस्टार ममता कुलकर्णीने किन्नर आखाड्यातील महामंडलेश्वर पद त्यागले आहे. महाकुंभ मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर ममता यांनी राजीनामा दिल्याने महामंडलेश्वर आखाड्यात आणि सिनेसृष्टीतही याची चर्चा रंगली आहे. गतवर्षी महाकुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर किन्नर…