Author: bittambatami.com

वसुंधरा दिनानिमित्त सागरी किनाऱ्यावर विशेष स्वच्छता मोहीम

नवी मुंबई : 22 एप्रिल या ‘वसुंधरा दिवस’ (Earth Day) निमित्त नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने महापालिका आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली विविध ठिकाणी पर्यावरण संवर्धक विविध उपक्रम राबविण्यात आले. या अनुषंगाने घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपायुक्त डॉ.राहुल गेठे, परिमंडळ 1 चे उपायुक्त श्री. सोमनाथ पोटरे व बेलापूर विभागाचे सहाय्यक आयुक्त तथा विभाग अधिकारी श्री. शशिकांत तांडेल  यांच्या नियंत्रणाखाली बेलापूर विभाग कार्यक्षेत्रात टी. एस. चाणक्य सागरी किनाऱ्यापाठीमागील भागात नवी मुंबई महानगरपालिका व टी एस चाणक्य युनिव्हर्सिटीचे  विद्यार्थी यांनी संयुक्तपणे स्वच्छता मोहीम हाती घेऊन किनाऱ्याची स्वच्छता केली. या मोहिमेत स्वच्छता अधिकारी, स्वच्छता निरीक्षक, साफसफाई कर्मचारी व टी एस चाणक्याचे विद्यार्थी सहभागी होते. यावेळी उपस्थितांना जागतिक पृथ्वी दिनाच्या निमित्त माझी वसुंधरा अभियान अंतर्गत भूमी, जल, वायू, अग्नी, आकाश या पंचमहाभूतांचे संरक्षण आणि संवर्धन करण्याची माहिती सांगण्यात आली तसेच पर्यावरण संवर्धनाची माझी वसुंधरा शपथ सामुहिकरित्या घेण्यात आली.

तीव्र उन्हाळ्याचा सामना करण्यासाठी महापालिकेची उपाययोजना

पाणपोई सुरू, शीत रूम, औषधे यांची सज्जता ठाणे : दिवसेंदिवस वाढत असलेल्या तीव्र उन्हाळ्याचा सामना करण्यासाठी ठाणे महापालिकेने आखलेल्या कृती आराखड्यानुसार कार्यवाहीस सुरूवात झाली आहे. सामाजिक आणि स्वयंसेवी संस्थांच्या सहकार्याने महापालिका क्षेत्रात विविध ठिकाणी पाणपोई सुरू करण्यात येत आहेत. तसेच, महापालिकेची सर्व आरोग्य केंद्र, पालिका रुग्णालय यांनी शीत रुम आणि औषधे यांची सज्जता ठेवण्याचे निर्देश महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी दिले आहेत. तीव्र उष्णतेमुळे होणाऱ्या आजाराच्या प्रतिबंधासाठी ठाणे महानगरपालिकेने कार्यवाही सुरू केली आहे. नागरीकरणामुळे शहरात वाढत जाणाऱ्या उष्णतेच्या धोक्याला नियंत्रण करण्यासाठी सर्वंकष उष्णता उपाययोजना आराखडा, महाराष्ट्र शासन, ठाणे महानगरपालिका व काऊन्सील ऑफ ऍनर्जी एनव्हायरोमेंट अॅण्ड वॉटर या संस्थेने एकत्रितपणे तयार केलेला आहे. उष्णतेच्या लाटेच्या सामना करण्यासाठी ठाणे महानगरपालिका सजग असून परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन आयुक्त सौरभ राव यांच्या आदेशानुसार महापालिका क्षेत्रात मोठ्या प्रमाणात जनजागृतीही करण्यात येत आहे. ठामपा क्षेत्रातील ३३ आरोग्य केंद्रे, ५ प्रसूतीगृहे, छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय येथे उष्माघात, त्याची लक्षणे, घ्यायची काळजी याची माहिती देणारी पत्रके लावण्यात आली आहेत. तसेच, उष्णतेमुळे होणाऱ्या आजारांवर उपचार करण्यासाठी औषधे, शीत रूम तयार ठेवलेली आहे. आरोग्य केंद्रांनी त्यांच्या परिसरातील रहिवासी संकुलामध्ये जनजागृती पत्रके लावली आहेत. त्याचबरोबर, खाजगी रुग्णालयांनाही उष्णतेच्या आजाराला सामना करण्यासाठी सर्व यंत्रणा सज्ज ठेवण्याचे निर्देश महापालिकेच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने दिले आहेत. शाळा, महाविद्यालये येथेही जागृती करण्यात येत आहे. संस्थांची बैठक या उष्णतेच्या लाटेचा सामना करण्यासाठी काय करावे, काय करू नये, उष्णतेच्या आजाराची लक्षणे कोणती, पाणपोईची व्यवस्था आदींबाबत चर्चा करण्यासाठी शनिवार, सायंकाळी महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त (१) संदीप माळवी यांच्या अध्यक्षतेखाली एका ऑनलाईन बैठक सत्राचेही आयोजन महापालिकेच्या पर्यावरण विभागाने केले होते. त्यात, रिक्षा संघटना, टॅक्सी संघटना, कामगार उपआयुक्त यांचे प्रतिनिधी, उपआयुक्त (शिक्षण), एमसीएचआय-क्रेडाई, हॉटेल असोसिएशन, उद्योग संघटना, टीसा, मेट्रो, एमएसआरडीसी, रेल्वे, एसटी महामंडळ, आरटीओ यांचे प्रतिनिधी, सामाजिक आणि स्वयंसेवी संस्था यांचे प्रतिनिधी सहभागी झाले होते. तीन ठिकाणी पाणपोई सुरू आयुक्त सौरभ राव यांनी दिलेल्या निर्देशानुसार, महापालिका क्षेत्रात निरनिराळ्या ठिकाणी उष्माघात, लक्षणे, घ्यायची काळजी यांची माहिती देणारे फलक, डिजिटल बोर्ड लावण्यात आले आहेत. पोस्टर्सच्या माध्यमातून सर्व गृहसंकुलांपर्यंत ही माहिती पोहोचवली जात आहे. तसेच, ठाणे महापालिकेच्या आवाहनानुसार, सीएसआरच्या माध्यमातून पाणपोई सुविधाही उपलब्ध केली जात आहे. सध्या ठाणे रेल्वे स्टेशन, नौपाडा-आईस फॅक्टरी, तीन हात नाका – सिग्नल शाळेसमोर या तीन ठिकाणी समर्थ भारत व्यासपीठामार्फत पाणपोई सुरू करण्यात आली आहे. त्यात दररोज पिण्याचे शुद्ध पाणी भरण्याची व्यवस्था संस्था करणार आहे, अशी माहिती मुख्य पर्यावरण अधिकारी मनिषा प्रधान यांनी दिली.

दिवंगत आर.आर.पाटील यांच्या सूचनेकडे गृहविभागाचे अद्यापही दुर्लक्ष

रमेश औताडे मुंबई : दक्षिण मुंबईतील शॉपिंग सेंटरच्या महिला प्रसाधनगृहात घुसून एका वकील महिलेचा विनयभंग करणारा सरकारकडे अद्यावत माहिती नसलेला परप्रांतीय सुरक्षा रक्षक संदीप पांडे याला पोलिसांनी अटक केली. याअगोदर अशा घटना घडल्या आहेत. त्यातील 99 टक्के सुरक्षा रक्षक परप्रांतीय आहेत. परराज्यातून  तडीपार केलेले हे गुंड महाराष्ट्रात नोकरी करतातच कसे ? या  तक्रारीवरून दिवंगत गृहमंत्री आर आर पाटील यांनी राज्यातील सर्व सुरक्षा रक्षकांची एकत्रित माहिती गोळा करून त्याचा एकत्रित डाटा एका क्लिकवर मिळावा यासाठी प्रयत्न केले होते. मात्र पुढे त्यावर सरकारने व गृहविभागाने अद्यापही गांभिर्याने काहीच केले नसल्याने परप्रांतीय सुरक्षा रक्षकाकडून महिलांच्या विनयभंगाच्या घटना सुरूच आहेत व त्या सुरूच राहतील अशी भीती महिला संघटना करत आहेत. तीन दिवसांपूर्वी झालेल्या ताज्या घटनेतील महिला वकील असून ती खासगी लॉ फर्ममध्ये कामाला आहे. ती एका शॉपिंग सेंटरच्या वॉशरूममध्ये गेली होती. त्यावेळी आरोपी सुरक्षा रक्षक संदीप पांडे हा महिलांच्या वॉशरूममध्ये तिला दिसला. महिला प्रसाधनगृहात तुझे काम काय ? असे तिने त्याला विचारले. त्यानंतर पांडे हा घाबरला व तो बाहेर पळाला. त्यानंतर पीडितेने प्रसाधनगृहाच्या आतून कडी लावली. तेव्हा पांडे तिला पुन्हा आत दिसला. पीडितेने मदतीसाठी धावा सुरू केला. तेव्हा पांडे याने तिचा विनयभंग करण्याचा प्रयत्न केला. तिने त्याला बुक्का मारून लाथ मारली. त्यानंतर पांडे हा प्रसाधनगृहातून बाहेर पडला. या प्रकरणानंतर संबंधित आरोपीविरोधात पीडितेने आझाद मैदान पोलिसात तक्रार नोंदवली गेली. आता तपास सुरू होईल व त्याला शिक्षा होईल व पुन्हा ये रे माझ्या मागल्या अशी स्थिती होईल. मात्र यावर कायम स्वरुपी तोडगा निघणार आहे की नाही ? असा सवाल महिला करत आहेत. खाजगी सुरक्षा रक्षक एजन्सी चे मालक मंत्रालयात बिनधास्तपणे फिरत असतात.  त्यांना कोणाचा आशीर्वाद असतो ? १९८१ साली सरकारने सुरक्षा रक्षक कायदा केला. सरकारचा हा कायदा असा आहे की , अनेक कंपन्या , मॉल , बँका , आस्थापना , कारखाने , महामंडळे इतर सरकारी कार्यालयात महाराष्ट्र सुरक्षा रक्षक मंडळाचे सुरक्षा रक्षक नियुक्त केले पाहिजेत. किंव्हा त्या त्या कंपन्यांचे सुरक्षा रक्षक त्यांनी नियुक्त केले पाहिजेत. जर सुरक्षा मंडळाकडे सुरक्षा रक्षक नसतील तर तसे हमी पत्र घेऊन खाजगी सुरक्षा रक्षक कंपनीने सूट प्राप्त अर्ज करून त्या ठिकाणी आपली सुरक्षा यंत्रणा कार्यरत करावी.असे आदेश आहेत.कायदा आहे. मात्र मंत्रालयात  सर्वत्र आलबेल आनंदी आनंद असल्याने खाजगी सुरक्षा रक्षक कंपनीचे मालक बिन्धास्त मोकाट मंत्रालयात फिरत आहेत. सरकारी सुरक्षा रक्षक मंडळातील कोरोना काळात ऑन ड्युटी मृत सुरक्षा रक्षकांच्या विधवा पत्नी मंत्रालयाच्या पायऱ्या झिजवत असताना व दिवंगत आर आर पाटील यांच्या सूचनेला दाखवलेली केराची टोपली सामान्य जनतेला आच्छे दीन कधी आणणार असा सवाल महिला वर्ग करत आहेत.

निवडणूक निरीक्षक राहूल यादव व सुधांशु मिश्रा यांनी घेतला निवडणूक कामकाजाचा आढावा

अशोक गायकवाड रत्नागिरी : निवडणूक निरीक्षक (सर्वसाधारण) राहूल यादव आणि निवडणूक निरीक्षक (कायदा व सुव्यवस्था) सुधांशु मिश्रा यांनी निवडणूक कामकाजाबाबत रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नोडल अधिकारी व समन्वयक अधिकाऱ्यांकडून येथील अल्पबचत सभागृहात आढावा घेतला. निवडणूक निर्णय अधिकारी एम देवेंदर सिंह, सिंधुदुर्गचे जिल्हाधिकारी किशोर तावडे, पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी, सिंधुदुर्गचे पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल, मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्ती किरण पुजार, सिंधुदुर्गचे मुख्य कार्यकारी अधिकारी मकरंद देशमुख, अपर जिल्हाधिकारी शंकर बर्गे, सिंधुदुर्गचे अपर जिल्हाधिकारी रवी पाटील, अपर पोलीस अधीक्षक जयश्री गायकवाड, परिविक्षाधीन आयएएस डॉ. जस्मिन, विशाल खत्री आदी उपस्थित होते. निवडणूक निर्णय अधिकारी सिंह यांनीही यावेळी मार्गदर्शन केले. ते म्हणाले, सर्वांनी चांगले प्रशिक्षण घ्या. होम वोटींगच्यावेळी गोपनीयता राखणे अत्यंत महत्वाचे आहे. व्हिव्हीपॅट कसे हाताळावे, याबाबतही एक व्हीडीओ सर्वांना देण्यात येईल. उपजिल्हा निवडणूक अधिकारी राहूल गायकवाड यांनी संगणकीय सादरीकरण केले. यामध्ये एकूण उमेदवार, त्यांचे आलेले अर्ज, दिव्यांग तसेच ८५ वर्षापुढील मतदारांसाठी करण्यात आलेली तयारी, प्रशिक्षण, ईव्हीएमची सरमिसळ, केंद्रस्तरीय परिवेक्षक, मतदान केंद्र, आदर्श मतदान केंद्र, भरारी पथक, स्थिर निगरानी पथक आदींबाबत माहितीचा समावेश होता. अतिरिक्त पोलीस अधीक्षक श्रीमती गायकवाड यांनीही सादरीकरण करुन, सीमा तपासणी नाके, प्रतिबंधात्मक आदेश, केलेली कार्यवाही, शस्त्रास्त्र, परवाने, स्ट्राँगरुम बंदोबस्त अशी एकूणच कायदा व सुव्यस्थेच्या अनुषंगाने सविस्तर माहिती दिली.

मॉर्डन क्रिकेट क्लब सलग दुसऱ्यांदा अजिंक्य

ठाणे : आकाश सावला आणि निशांत मानेने पाचव्या गड्यासाठी केलेल्या नाबाद १०८ धावांच्या भागीदारीच्या जोरावर गतविजेत्या मॉर्डन क्रिकेट क्लबने माझगाव क्रिकेट क्लबचा ६ गडी राखून पराभव करत स्पोर्टींग क्रिकेट क्लब…

नवतरुण सुधागड तालुका रहिवासी सेवा संघ डोंबिवली कल्याण यांच्यावतीने डोंबिवलीमध्ये भव्य कबड्डी स्पर्धेचा थरार

ठाणे- नवतरुण सुधागड तालुका रहिवासी सेवा संघ (डोंबिवली – कल्याण) यांच्या विद्यमाने सुधागड तालुका स्तरीय भव्य कबड्डी स्पर्धेचे आयोजन रविवार दि. 21 एप्रिल 2024 रोजी लोढा हेरिटेज मैदान, भोपर रोड,…

भारतीय पुरुषांचा अंतिम फेरीत ८५ धावांनी दारूण पराभव

कोलंबो : जागतिक इनडोअर क्रिकेट महासंघाच्या मान्यतेने सिलोन इनडोअर क्रिकेट असोशिएशन यांच्या पुढाकाराने इंग्लंड-एशिया कप इनडोअर क्रिकेट स्पर्धेतील आज झालेल्या अंतिम सामन्यात श्रीलंकेने भारताचा दारूण पराभव करत इंग्लंड-एशिया कपावर नाव…

माणकोली उड्डाण पुलांवरील वाहनांमुळे रेतीबंदर फाटकात दररोज वाहन कोंडी

वाहतूक पोलीस नसल्याने स्थानिकांकडून नियोजन डोंबिवली : मोठागाव माणकोली उड्डाण पुलावरून मुंबई, ठाणे किंंवा नाशिककडे जाण्यासाठी विना अडथळा, सुसाट वेगाने जाता येत असल्याने प्रवासी माणकोली पुलावरून जाण्यास पसंती देत आहेत.…

बहाई धर्मीय समाज रिझवान महोत्सव

मुंबई : मुंबईसह जगभरातील बहाई धर्मीय समुदाय आणि त्यांचे अनुयायी एप्रिल महिन्याच्या शेवटी आणि मे महिन्याच्या सुरूवातीला येणारे दिवस मिळून 12 दिवस त्यांचा रिझवान महोत्सव उत्सव साजरा करतील अशी माहिती…