Author: bittambatami.com

महाआघाडीची व्यर्थ कोल्हेकुई…

कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात कोल्हापूरच्या छत्रपतींच्या गादीवर सध्या वारस असलेले छत्रपती शाहू महाराज हे महाआघाडी तर्फे लोकसभा निवडणूक लढवत आहेत. त्यांच्या विरोधात महायुतीतर्फे विद्यमान शिंदे शिवसेनेचे खासदार धनंजय महाडिक हे निवडणूक…

जिंदगी लंबी हो रही हैं…

खास बात स्वाती पेशवे अलिकडेच जाहीर झालेला ‘द लॅन्सेट’ चा अहवाल लक्षवेधी आहे. १९९० ते २०२१ या काळात भारतातील आयुर्मान आठ वर्षांनी वाढल्याचे तो सांगतो. अभ्यासात अशी बरीच सकारात्मक माहिती…

उन्हाने मुंबईकरांचा घामटा काढला

मुंबई : अजून मे महिना दुर असला तरी एप्रिल महिन्यात उन्हाने मुंबईकरांचा घामटा काढला आहे. मुंबईमध्ये उन्हाचा तडाखा वाढला असून दुपारनंतर बाहेर फिरताना नागरिकांना घामाच्या धारा लागत आहेत. वाढता उकाडा नागरिकांसाठी त्रासदायक ठरत…

मोदींना देश तोडायचा आहे – ॲड. प्रकाश आंबेडकर

रमेश औताडे  मुंबई : राजकीय पक्ष हे भारताच्या एकतेचे प्रतीक आहेत, असे मी मानतो. ही प्रतिके नरेंद्र मोदी संपवायला निघाले आहेत. मोदींना देश तोडायचा असल्याचा आरोप वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय…

मविआने भाजपसोबत वीस जागा फिक्स केल्या- आंबेडकर  

चंद्रपूर : महाविकास आघाडीने भाजपसोबत लोकसभेच्या २० जागा फिक्स केल्याचा गंभीर आरोप वंचितचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकरांनी केला आहे. कल्याण, बीड, बुलढाणा अशा काही मतदारसंघातील जागांची नावे घेत या जागा फिक्स केल्याचेही प्रकाश आंबेडकर म्हणाले. चंद्रपूर येथे आयोजित पत्रकार परिषदेत प्रकाश आंबेडकर…

असली नकलीचा फैसला आता जनताच करेल – जयंत पाटील

नागपूर : महाराष्ट्र मध्ये दोन पक्ष फोडले तरी देखील प्रतिसाद मिळत नाही. म्हणून नकली आणि असलीचा लोकांमध्ये संभ्रम तयार करण्याचे काम सुरू आहे. महाराष्ट्रातील जनता हुशार आहे. ज्यांनी पक्ष फोडला त्यांच्या विरोधातच यंदाचा निकाल असेल, मायबाप…

बोगस डिग्री ते नकली शिवसेना

उद्धव ठाकरेंकडून मोदींचा हिशेब चुकता पालघर :  शिवसेनाला नकली म्हणता ती काय तुमची बोगस डिग्री आहे का? माझ्या मर्दमराठा मावळ्यांच्या घामातून उभी राहीलेली शंभरनंबरी असली शिवसेना आहे. नकलीचा सोस तुम्हाला , तुमची डीग्री…

ईडीच्या अतिरेकावरून महायुतीत धुसफूस

स्वाती घोसाळकर ‘ ४०० पार कशाला हवेतर संसदेचा ताबा घ्या पण विरोधकांना सन्मान द्या, जनतेचा मोदींना पाठींबा असताना ईडीचा उपद्रव टाळला पाहिजे’ – गजानन कीर्तिकर ‘किर्तिकरांचे शरीर एकनाथ शिंदेसोबत तर आत्मा ठाकरेंसोबत…

सांडपाणी वाहिन्या फुटल्याने सगळीकडे दुर्गंधी

आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर डोंबिवली : एमआयडीसी निवासी मधील सांडपाणी वाहिन्या आणि त्यावरील चेंबर्स जागोजागी फुटल्याने त्यातील लाखो लिटर सांडपाणी रोज उघड्या नाल्यात आणि पावसाळी गटारात जात असल्याने आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. अस्वच्छता, रोगराई, डासांचे वाढते प्रमाण हे या सांडपाणी उघड्यावर वाहण्याचे दुष्परिणाम होत असून एमआयडीसी आणि केडीएमसी यातून काहीच बोध घेतला नसल्याची टीका रहिवासी करत आहेत. एमआयडीसी निवासी मधील या सांडपाणी वाहिन्या चाळीस वर्षांपेक्षा अधिक जुन्या झाल्याने त्या बदलण्याचे काम एमआयडीसी कडून आता काँक्रिट रस्ते झाल्यावर उशिरा सुरू झाले आहे. परंतु हेही काम अत्यंत कूर्मगतीने सुरू असल्याचे दिसत आहे. सदर या जुन्या वाहिन्या फुटल्यावर सद्या एमआयडीसी कडून कोणतीही दुरुस्ती केली जात नाही. कारण सांगितले जात आहे की आता नवीन सांडपाणी वाहिन्यांचे काम चालू असल्याने त्या जुन्या वाहिन्या काही दिवसातच बाद होणार आहेत. पण हे काम पूर्ण होण्यास कमीतकमी अजून एक वर्षाचा कालावधी लागणार असल्याने तोपर्यंत येथील नागरिकांनी या उघड्यावर बाहेर पडणाऱ्या सांडपाणी वाहिन्यांचे दुष्परिणाम भोगायचे का ? असा सवाल दक्ष नागरिक, रहिवासी संघटनेचे सचिव राजू नलावडे यांनी केला. ते पुढे म्हणाले की, मनपाकडून कीटकनाशक फवारणी आणि धूरिकरण हेही कित्येक दिवसात केले गेले नाही. निवासी मधील सोमेश्वर पार्क सोसायटी जवळ ( आरएक्स १/१), कावेरी चौक परिसर आणि मिलापनगर तलाव रोडवर इत्यादी अनेक ठिकाणी सांडपाणी वाहिन्या फुटून ते सांडपाणी उघड्या गटारात वाहत असल्याच्या तक्रारी एमआयडीसी कडे करूनही त्याची दखल घेतली जात नाही आहे. त्यात सर्व राजकीय पक्षांचे पदाधिकारी, आजी माजी लोकप्रतिनिधी हे सद्या लोकसभा निवडणुकीत प्रचारात मश्गूल असल्याने त्यांना हा महत्त्वाचा प्रश्न दिसत नाही आहे असे वाटते. मतदार जनताही चुपचाप हे सहन करीत आहे. येथील जनतेकडून करोडो रुपयांचा मालमत्ता कर घेणाऱ्या केडीएमसीने तरी यात लक्ष घालून ह्या गंभीर प्रश्नाची दखल घ्यावी अशी मागणी नलावडे यांनी केली.

ताबा सुटून ट्रक झाडाला धडकून उलटला

मुंबईकडे जाणारी वाहतूक तासभर विस्कळीत ठाणे- औषधे घेऊन मुंबईला निघालेल्या ट्रकवरील चालकाचा ताबा सुटून ट्रक झाडाला धडकला आणि त्या अपघातात तो ट्रक उलटल्याची घटना शुक्रवारी सकाळी साडेसहा वाजण्याच्या दरम्यान मुंबई नाशिक महामार्गावरील मर्फी कंपनी बस स्टॉपसमोर घडली. औषधे घेऊन मुंबईला निघालेल्या ट्रकवरील चालकाचा ताबा सुटून ट्रक झाडाला धडकला आणि त्या अपघातात तो ट्रक उलटल्याची घटना शुक्रवारी सकाळी साडेसहा वाजण्याच्या दरम्यान मुंबई नाशिक महामार्गावरील मर्फी कंपनी बस स्टॉपसमोर घडली. याचदरम्यान पाठी मागून येणारी कार त्या ट्रक धडकली. सुदैवाने यामध्ये कोणालाही दुखापत झाली नसली तरी, मुंबईकडे जाणाऱ्या वाहिनीवर चांगला परिणाम झाल्याचे पाहण्यास मिळाले. या मार्गावर सुमारे एक तास वाहतुक धीम्या गतीने सुरू होती. तसेच ही धडक इतकी जोरात होती की त्यामध्ये ते झाड पडले. या अपघातानंतर चालकाने ट्रक सोडून तेथून पलायन केल्याची माहिती ठाणे महापालिका आपत्ती व्यवस्थापन कक्षाने दिली. नागपूर येथून मुंबई घाटकोपर येथे दहा टन औषध घेऊन ट्रक चालक जगदीश गौतम (40) हा निघाला होता. सकाळी साडेसहाच्या दरम्यान मुंबई नाशिक महामार्गावरील मर्फी कंपनी बस स्टॉप समोर आल्यावर ट्रक चालकाचा ट्रक वरील ताबा सुटला. आणि तो ट्रक रस्त्याच्या बाजूला असलेल्या झाडावरती जाऊन जोरात आदळला. तसेच तो तेथील रस्त्यावरती उलटला. या धडकेत ते झाड ही पडले होते. तसेच त्या अपघातग्रस्त ट्रकच्या मागून येणारे कार ट्रकच्या मागील बाजूस जाऊन धडकली. सुदैवाने या अपघातात कारमधील चालकासह 5 जणांना कोणतीही दुखापत झाली नाही. या घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी शहर वाहतूक पोलीस, नौपाडा पोलीस हे ०१-हायड्रा मशीनसह, आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे कर्मचारी तसेच अग्निशमन दलाचे जवान यांनी धाव घेतली. या अपघातामुळे मुंबईकडे जाणाऱ्या रस्त्यावरील वाहतूक सुमारे ०१-तासापर्यंत रस्त्याच्या एका बाजूने धीम्या गतीने सुरू होती. तर अपघातामुळे रस्त्यावरती पडलेले झाड आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे कर्मचारी व अग्निशमन दलाच्या जवानांनी कापून बाजूला केले. तसेच अपघात ग्रस्त दोन्ही वाहने पोलीस कर्मचाऱ्यांनी ०१-हायड्रो मशीनच्या सहाय्याने रस्त्याच्या एका बाजूला करून तो रस्ता वाहतुकीसाठी मोकळा करून देण्यात यश आल्याची माहिती ठामपा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी यासिन तडवी यांनी दिली.