Author: bittambatami.com

इराणवरील हल्ल्यांचा निषेध करा – माकप

इराणवरील हल्ल्यांचा निषेध करा – माकप ठाणे: अमेरिका आणि इस्राइल यांनी इराणवर केलेल्या हल्ल्यांचा तीव्र निषेध करा, हे हल्ले इराणचे राष्ट्रीय सार्वभौमत्व, संयुक्त राष्ट्राची सनद तसेच सर्व आंतरराष्ट्रीय करार यांना निर्लज्जपणे धाब्यावर बसवून करण्यात आले आहेत, असा आरोप मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या पॉलिट ब्युरोने केला आहे. अमेरिका आणि इस्रायलने इराणबरोबर सुरू असलेल्या चर्चांना पूर्णतः डावलून हे हल्ले केले आहेत. या हल्ल्यांमधून तसेच अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या विधानांतून स्पष्ट होते की त्यांचा या चर्चांवर कधीच विश्वास नव्हता. अमेरिका ही एका आक्रमक दबंग शक्तीप्रमाणे वागत असून, सार्वभौम देशांवर मनमानीपणे हल्ले करत आहे. इराणवरील हा हल्ला अलीकडेच व्हेनेझुएलावर केलेल्या हल्ल्यानंतर आणि क्यूबाला दिलेल्या धमक्यांनंतर झाला आहे. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इस्रायलचा दौरा संपवल्यानंतर तात्काळ इराणवरील हा हल्ला करण्यात आला आहे. भारत सरकारने आपला मैत्रीपूर्ण देश असलेल्या इराणवरील या हल्ल्यांचा ठामपणे निषेध करून तात्काळ युद्धखोर कारवाई थांबवण्याची मागणी केली पाहिजे, असे आवाहन माकपने केले आहे.

भावी पोलिसांची रस्त्यावरील परवड थांबवा-  प्रताप सरनाईक

भावी पोलिसांची रस्त्यावरील परवड थांबवा-  प्रताप सरनाईक मिरा-भाईंदर: ‘राज्याच्या सुरक्षेची धुरा भविष्यात ज्यांच्या खांद्यावर असणार आहे, त्या तरुण उमेदवारांना आज मिरा-भाईंदरमध्ये उघड्यावर रात्र काढावी लागणे, ही प्रशासनासाठी अत्यंत लज्जास्पद बाब आहे,” अशा कठोर शब्दांत महाराष्ट्र राज्य परिवहन मंत्री तथा धाराशिव जिल्हा पालकमंत्री आणि स्थानिक आमदार प्रताप सरनाईक यांनी प्रशासकीय ढिसाळ कारभारावर तीव्र संताप व्यक्त केला आहे. मिरा-भाईंदर महानगरपालिका आयुक्तांना पाठविलेल्या पत्रात त्यांनी पोलीस भरतीसाठी आलेल्या हजारो युवक-युवतींच्या निवासाची आणि मूलभूत सुविधांची तत्काळ व्यवस्था करण्याचे निर्देश दिले आहेत. पोलीस आयुक्त आणि महानगरपालिका आयुक्त यांच्यात नियोजनाचा अभाव असल्याने ही गंभीर परिस्थिती निर्माण झाली असल्याचा ठपका पत्रात ठेवण्यात आला आहे. सोबतच मिरा-भाईंदर महानगरपालिकेची सभागृहे, एमएमआरडीए (MMRDA) आणि बीएसयूपी (BSUP) अंतर्गत असलेल्या रिक्त सदनिका पोलीस भारती देण्यासाठी आलेल्या उमेदवारांसाठी तात्काळ खुल्या कराव्यात, अशी सूचना देखील आयुक्तांना करण्यात आली आहे. प्रशासकीय दिरंगाई होत असतानाच, उमेदवारांच्या भोजनाची संपूर्ण जबाबदारी प्रताप सरनाईक स्वतः आणि त्यांच्या शिवसेना संघटनेच्या वतीने स्वीकारली असल्याचे हि या पत्रात नमूद करण्यात आलेले आहे.यासंपूर्ण प्रकरणाबद्दल बोलताना प्रताप सरनाईक म्हणतात कि, “दोन-दोन दिवस उन्हातानात तग धरून हे तरुण आपल्या भविष्याची परीक्षा देत आहेत. जे उद्या कायदा व सुव्यवस्था राखणार आहेत, त्यांनाच सुरक्षित आसरा न मिळणे हे वेदनादायी आहे. प्रशासनाने संवेदनशीलता दाखवून यावर ठोस उपाययोजना कराव्यात, अन्यथा ही अनास्था खपवून घेतली जाणार नाही. तसेच भविष्यातील भरती प्रक्रियेसाठी कायमस्वरूपी ‘समन्वय आराखडा’ तयार करावा” प्रशासनाने या विषयाचे गांभीर्य ओळखून सकारात्मक पावले न उचलल्यास, उमेदवारांच्या हक्कासाठी अधिक आक्रमक भूमिका घेण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला आहे.

 समाजातील वाईट प्रवृत्तींचे दहन

 समाजातील वाईट प्रवृत्तींचे दहन  पिसवलीतील जीआरसी हिंदी शाळेत उत्साहात होळी साजरी कल्याण : समाजातील वाईट, खोटेपणा आणि अहंकार यांचे प्रतीकात्मक दहन करून होळी साजरी करण्याचा संदेश देत कल्याण पूर्वेतील पिसवली येथे…

वालधुनी नदी स्वच्छ व सुंदर करण्यासाठी काँग्रेस जिल्हाध्यक्षांचा पाहणी दौरा

वालधुनी नदी स्वच्छ व सुंदर करण्यासाठी काँग्रेस जिल्हाध्यक्षांचा पाहणी दौरा कल्याण: काँग्रेस पक्षाचे कल्याण जिल्हाध्यक्ष डॉ. राजकुमार पातकर यांनी वालधुनी नदी परिसराचा पाहणी दौरा करून प्रत्यक्ष परिस्थितीची पाहणी केली. वालधुनी नदी स्वच्छता सेवाभावी संस्था यांनी नदीतील वाढते प्रदूषण, गाळ साचणे व पूरस्थिती याबाबत माहिती दिल्यानंतर त्यांनी तात्काळ संबंधित विभागाकडे निवेदन सादर केले. संस्थेचे अध्यक्ष सुनील उतेकर यांनी उपस्थित राहून नदीची सद्यस्थिती, पूरकाळातील अडचणी व नागरिकांच्या समस्या यांची सविस्तर माहिती दिली. भवानीनगर, अनुपम नगर, घोलप नगर, योगिता, त्रिमूर्ती कॉलनी, गुरु आत्मा स्मार्ट सिटी शाळा, बंदर पाडा, मोना रोड, वालधुनी विभाग, छत्रपती शिवाजी महाराज नगर, मिलिंद नगर आदी भाग नदी पात्रालगत आहेत. जुलै महिन्यात पूर आल्यावर या परिसरातील नागरिकांना स्थलांतर करावे लागते. पाच ते सात फूट पाणी दुकाने व घरांमध्ये शिरते. पूर ओसरल्यानंतर दोन दिवस सरकारी यंत्रणेकडून साफसफाईसाठी प्रतीक्षा करावी लागते. स्थानिक नागरिकांचे स्पष्ट मत आहे की,‘आम्हाला तात्पुरती मदत नको; पण नदी कायमस्वरूपी स्वच्छ व प्रदूषणमुक्त करा. वालधुनी नदीचे सुशोभीकरण करून पर्यटन स्थळ म्हणून विकसित करा’. यावेळी डॉ. राजाकुमार पातकर यांनी संस्थेला पूर्ण सहकार्य देण्याचे आश्वासन दिले. ‘वालधुनी नदी संदर्भात कोणताही विषय असेल, आम्ही तुमच्या सोबत आहोत.’ असे त्यांनी स्पष्ट केले. वालधुनी नदीचे पुनरुज्जीवन, गाळ काढणे, रुंदी व खोली वाढवणे, प्रदूषणमुक्ती आणि सुशोभीकरण या कामांसाठी प्रशासनाने तातडीने निधी उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी यावेळी करण्यात आली.

आखाती तणावाच्या काळात दुबईतील ‘मुंबई एक्सप्रेस’चा मदतीचा हात

आखाती तणावाच्या काळात दुबईतील ‘मुंबई एक्सप्रेस’चा मदतीचा हात  अडकलेल्या भारतीयांसाठी दिवसभर मोफत जेवण मुंबई : आखाती प्रदेशातील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर दुबईतील मुंबईमूळ असलेल्या उपाहारगृहाने अडकलेल्या भारतीय नागरिक आणि पर्यटकांसाठी दिलासा…

सॅमसनचा विंडीजवर हातोडा भारताची सेमी फायनलमध्ये धडक

कोलकाता – संजू सॅमसनच्या झंझावती हातोडा खेळीपुढे वेस्टइंडिजची टी२० वर्ल्डकपच्या सुपर ८ मध्ये अक्षरशा धुळधाण उडाली. संजू सॅमसनच्या आक्रमक ९७ धावांच्या खेळीच्या जोरावर भारताने वेस्ट इंडिजवर पाच गडी राखून महत्त्वपूर्ण विजय मिळवत…

ऐका हो ऐका…मुंबई-गोवा हायवे ३ महिन्यात होणार

मुंबई : कित्येक वर्षे रखडलेल्या मुंबई- गोवा मार्ग आता पुढील ३ महिन्यात पुर्ण करणार असल्याचे चॅलेंज सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी स्विकारले आहे.  माणगाव व इंदापूर बायपासचा अपवाद वगळता उर्वरित कामे मे २०२६…

प्रसिद्ध मानसशास्त्रज्ञ डॉ. श्यामला वनारेसेंचे निधन

पुणे : ‘स्वभावाला औषध असते’च्या लेखिका आणि प्रसिद्ध मानसशास्त्रज्ञ आणि बालकारणी डॉ. श्यामला वनारसे यांचे पुण्यात अल्प आजाराने निधन झाले. त्या ८७ वर्षांच्या होत्या. त्यांच्या निधनाने साहित्य, सांस्कृतिक आणि मानसशास्त्र क्षेत्रात शोककळा पसरली आहे. डॉ.…

नागपूरमध्ये दारूगोळा कंपनीतील स्फोटात १७ कामगारांच्या मृत्यू

नागपूर: नागपरूमधील राऊळगाव जवळील ‘एवनीरा’ परिसरातल्या एस.बी.एल. एनर्जी लिमिटेड या दारुगोळा बनवणऱ्या डिटोनेटर कंपनीत रविवारी सकाळी भीषण साखळी स्फोट झाले. यात १७ कामगारांचा मृत्यू झाला असून मृतांमध्ये १४ महिलांसह ३ पुरुष कामगारांचा समावेश…