Author: bittambatami.com

३ सप्टेंबरपासून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते सावंतवाडी रोड दरम्यान धावणार नियमित एक्सप्रेस ट्रेन 

  छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे आज मुख्यमंत्री दाखवणार हिरवा झेंडा नवी दिल्ली -खासदार डॉ. श्रीकांत शिंदे आणि खासदार नरेश म्हस्के आणि कोकणातील इतर खासदारांच्या पाठपुराव्यानंतर केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी…

घनकचरा विभागाने ठामपाची जागा दिली दगडचोरांना आंदण

 कोट्यवधी रूपयांची राॅयल्टी बुडविली -मनोज प्रधान अनिल ठाणेकर ठाणे -क्षेपण भूमी अर्थात डम्पिंग ग्राऊंड तयार करण्यासाठी ठाणे महानगर पालिकेला भिवंडी तालुक्यातील आतकोली गावात ८3 एकरचा भूखंड देण्यात आला आहे. मात्र, या…

गुजरात आणि उत्तर प्रदेशात एमडी ड्रग्ज कारखान्याचा पर्दाफाश

 ६९ किलो एमडी जप्त; २१ जणांना अटक मिरा -भाईंदर : गुन्हे प्रकटीकरण शाखा कक्ष-४ च्या पथकाला मिळालेल्या गुप्त माहितीवरून सापळा रचून दोन इसमांना ताब्यात घेतले. याबाबत तुळींज पोलीस ठाणे गुन्हा नोंदवण्यात आला होता. यातुनच पुढे तपासातून आंतरराज्य रॅकेट उघड झाले. या गुन्ह्याचा सखोल तपास वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा कक्ष-४ ने सुरू केला असता धक्कादायक माहिती समोर आली. तपासात निष्पन्न झाले की जुमा ठाकूर यांच्या मालकीचे गाव – सांधाण, गुजरात येथील शेतजमिनीत M.D. तयार करण्याची अवैध फॅक्टरी सुरू होती.  ही फॅक्टरी निष्फळ करून अयान सय्यद (जालीम गँग सदस्य) याने M.D. तयार करण्यासाठी लागणारे लॅब साहित्य व केमिकल नेरळ, जि. रायगड येथे साठवून ठेवले होते. पोलिस कारवाईची कुणकुण लागताच जाहीद शेख ऊर्फ जावेद भाई याने सदर मुद्देमाल कल्याण येथे आणून नष्ट करण्याचा प्रयत्न केला होता, परंतु पोलीस तपासात तो मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. तसेच, मोईनुद्दीन शेख याच्या मदतीने M.D. आणि अमली पदार्थाची विक्री जळगाव येथे केली जात असल्याचे निष्पन्न झाले. रहीम ताहेर भजियारी आणि सय्यद मुशाहिद अली यांना जळगाव, महाराष्ट्र येथून ताब्यात घेऊन त्यांच्या ताब्यातून ४ किलो ९११ ग्रॅम M.D. हस्तगत करण्यात आला. रजनीश रामचंद्र मिश्रा आणि शिवम शंभूनाथ मिश्रा यांच्या ताब्यातून मिळालेल्या माहितीवरून प्रयागराज, उत्तर प्रदेश येथे मुख्य M.D. ड्रग बनवण्याचा कारखाना असल्याचे निष्पन्न झाले. गुन्हे शाखा कक्ष-४ च्या पथकाने प्रयागराज येथील एका शेतजमिनीच्या भाड्याच्या खोलीत तयार करण्यात आलेल्या कारखान्यावर छापा टाकून ५२ किलो ९३२ ग्रॅम M.D., M.D. तयार करण्यासाठी लागणारे २६० लिटर केमिकल (MMA, Acetone, Hydrochloric acid, Chloroform) व २५० आणि १५० लिटर क्षमतेचे प्लास्टिक ड्रम, हिटिंग मेंटल, ड्रॉपिंग फनेल, थर्मामीटर इत्यादी लॅब साहित्य जप्त केले. या संपूर्ण कारवाईत आतापर्यंत एकूण ६९ किलो ७५९ ग्रॅम M.D., रोख रक्कम, M.D. तयार करण्यासाठी लागणारे २६० लिटर केमिकल व लॅब साहित्य असा एकूण सुमारे १३९ कोटी रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. सदर गुन्ह्यात M.D. तयार करणारे, केमिकल व लॅब साहित्य पुरवणारे, पेडलर, आर्थिक व्यवहार करणारे असे एकूण २१ आरोपींना नालासोपारा, मुंबई (कुलाबा, आग्रीपाडा, मानखुर्द, कुर्ला), कल्याण, नेरळ-कर्जत, जळगाव, गुजरात आणि उत्तर प्रदेश येथून अटक करण्यात आली आहे.या रॅकेटचे आंतरराष्ट्रीय धागेदोरे तपासण्याचे काम सुरू आहे.

– लोककल्याण ग्राहक संरक्षण संस्थेच्या वतीने

शालेय विद्यार्थ्यांना मोफत शालोपयोगी वस्तूंचे वाटप मुंबई -ग्राहकांच्या न्याय हक्कांसाठी लढणाऱ्या लोककल्याण ग्राहक संरक्षण संस्थेच्या वतीने साहित्यरत्न, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या १०६व्या जयंतीनिमित्त संस्थेचे मुंबई महानगर उपाध्यक्ष रमेश साहेबराव गुडेकर…

 मुंबई सहकारी बोर्डाच्या संचालक मंडळाची पंचवार्षिक निवडणूक बिनविरोध

सहकार पॅनेलच्या सर्व उमेदवारांची बिनविरोध निवड राजेंद्र साळसकर मुंबई-मुंबई सहकारी बोर्डाच्या संचालक मंडळाच्या सन २०२६ ते २०३१ या पंचवार्षिक कालावधीसाठी झालेल्या निवडणुकीत ‘सहकार पॅनेल’ च्या सर्व उमेदवारांची बिनविरोध निवड झाली आहे.…

सिंधुदुर्गातील प्रारूप मतदार यादीत ६ लाख ५ हजार ४९९ मतदारांची नोंद…!

अचूक मतदार यादीसाठी नागरिकांनी सहकार्य करावे – जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे सिंधुदुर्ग : विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रमांतर्गत (एसआय आर -२०२६) प्रारुप मतदार यादी आज प्रसिद्ध करण्यात आली आहे.  जिल्ह्यातील प्रारुप मतदार यादीमध्ये एकूण ६ लाख ५ हजार ४९९ मतदारांची नोंद करण्यात आली आहे. यामध्ये ३ लाख ५ हजार ७५६ पुरुष मतदार आणि २ लाख ९९ हजार ७४३ महिला मतदारांचा समावेश आहे. जिल्ह्यात एकूण ९२१ मतदान केंद्रे आहेत. ही माहिती सिंधुदुर्गच्या जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी पत्रकार परिषद दिली. यावेळी उपजिल्हाधिकारी निवडणूक बालाजी शेवाळे उपस्थित होते जिल्ह्यातील विधानसभा मतदारसंघनिहाय प्रारुप मतदारांची संख्या पुढीलप्रमाणे आहे. २६८-कणकवली विधानसभा मतदारसंघात ३३२ मतदान केंद्रे असून २ लाख ९ हजार २४२ मतदार, २६९-कुडाळ विधानसभा मतदारसंघात २७९ मतदान केंद्रे असून १ लाख ९१ हजार ८४६ मतदार, तर २७०-सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात ३१० मतदान केंद्रे असून २ लाख ४ हजार ४११ मतदार आहेत. अशी माहिती त्यांनी यावेळी दिली मतदार यादी अधिक अचूक, अद्ययावत आणि सर्वसमावेशक करण्यासाठी नागरिकांनी प्रारुप मतदार यादी तपासून आवश्यक असल्यास विहित मुदतीत दावे व हरकती सादर कराव्यात, असे आवाहन धोडमिसे यांनी यावेळी बोलतांना केले.  प्रारुप मतदार यादीतील आपले नाव निवडणूक आयोगाच्या संकेतस्थळावर, जिल्हा प्रशासनाच्या संकेतस्थळावर तसेच आपल्या मतदान केंद्रावर जाऊन मतदारांना पडताळता येईल असे त्यांनी सांगितले. विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रमांतर्गत मतदार यादीची प्रत्यक्ष पडताळणी करण्यात आली. या प्रक्रियेमध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पूर्वीच्या ६ लाख ८८ हजार १४ मतदारांपैकी ८२ हजार ५१७ नोंदी वगळण्यात आल्या असून, प्रारुप मतदार यादीतील मतदारांची संख्या आता ६ लाख ५ हजार ४९९ इतकी झाली आहे. वगळण्यात आलेल्या नोंदींमध्ये ३६ हजार ६०९ मृत मतदार, ३३ हजार ७६६ कायमस्वरूपी स्थलांतरित मतदार, ७ हजार ६६७ दुबार नोंदी तसेच ४ हजार ४८३ इतर कारणांमुळे अपात्र अथवा शोधूनही न सापडलेल्या मतदारांच्या नोंदींचा समावेश आहे. त्यामुळे मतदार यादी अधिक अचूक, अद्ययावत आणि वास्तवस्थितीशी सुसंगत करण्याच्या उद्देशाने ही प्रक्रिया राबविण्यात आली आहे असे जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी स्पष्ट केले. बऱ्याच नागरिकांना मतदार यादीतील आपल्या नावाबाबत किंवा नोंदींबाबत शंका असू शकतात. मतदारांनी प्रारुप मतदार यादीमध्ये आपले नाव, पत्ता तसेच इतर तपशील तपासून घ्यावेत. नावाचा समावेश करणे, चुकीची नोंद दुरुस्त करणे अथवा मतदार यादीतील इतर नोंदींबाबत हरकत असल्यास ३० सप्टेंबर २०२६ पर्यंत दावे व हरकती सादर करता येतील असे त्यांनी सांगितले. प्राप्त दावे व हरकतींवर नियमानुसार सुनावणी घेऊन त्यांचा निपटारा करण्याची प्रक्रिया २९ ऑक्टोबर २०२६ पर्यंत पूर्ण करण्यात येणार आहे. त्यानंतर सर्व आवश्यक कार्यवाही पूर्ण करून अंतिम मतदार यादी ४ नोव्हेंबर २०२६ रोजी प्रसिद्ध करण्यात येणार आहे.

वेदमूर्ती गजानन नामजोशी यांचे निधन

 वेदविद्या, पौरोहित्य आणि संस्कृत परंपरेच्या जतनासाठी आयुष्यभर कार्य योगेश चांदेकर पालघर : वेदविद्या, पौरोहित्य आणि संस्कृत परंपरेच्या जतनासाठी आयुष्यभर कार्य करणारे पालघर जिल्ह्यातील नामवंत वेदमूर्ती गजानन यशवंत नामजोशी यांचे अल्पशा आजाराने निधन…

पुनर्वसन जमिनींबाबत गैरकृत्ये करणाऱ्यांवर कारवाईचे महसुलमंत्र्यांचे आदेश

रमेश औताडे मुंबई : पुणे जिल्ह्यात पुनर्वसन जमीनीची खोटी संपादन शीटे बनवून त्यावर भुमी-अभिलेख कार्यालयाचे शिक्के घेऊन  प्रमाणित भासवून काही व्यक्ती शासन व प्रकल्पग्रस्त यांची करीत असलेली फसवणूक याबाबत सामाजिक कार्यकर्ते अशोकराव टाव्हरे यांच्या निवेदनानुसार महसुलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी पुण्याचे अप्पर जिल्हाधिकारी यांना कारवाईचे लेखी आदेश दिले आहेत. पुणे जिल्ह्यातील चासकमान, गुंजवणी व इतर काही प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन शासनाने शिरूर तालुक्यातील शिक्रापूर, जातेगाव भागात केलेले आहे. एकाच जमिनीची दोन संपादनशीटे दाखवून अनेक ठिकाणी प्रकल्पग्रस्त यांना जमिनी ताब्यात दिलेल्या नाहीत,त्यामुळे अनेक प्रकल्पग्रस्त त्रस्त होऊन जमिनी विकत आहेत ही बाब गंभीर असल्याचे टाव्हरे यांनी निवेदनात म्हटले आहे. या प्रकरणी काही व्यक्ती गेली काही वर्षे दोन संपादनशीटे आहेत,मुळ मालकांवर अन्याय झाला आहे असे सांगून शासन व महसुलमंत्री यांच्याकडे पाठपुराव्यासाठी सहकार्य करण्यास सांगितले होते,त्यानुसार अनेक प्रकरणी शासन व मंत्रीमहोदयांनी चौकशीचे निर्देश दिले होते.काही बाबतीत मुळ मालकांवर अन्याय होत आहे,तिथे न्याय मिळणे आवश्यक आहे,परंतु शिक्रापूर परिसरातील एका शेतकऱ्याची ३ एकर पुनर्वसनासाठी संपादित झाली होती. संबधित गट ३ एकर २९ गुंठे क्षेत्राचा होता.प्रकल्पग्रस्त व्यक्तीने इतरांना सदर जमीन विक्री केली होती,ताबा यापुर्वी शासनाने दिला होता; परंतु दोन संपादनशीटे असल्याचे दाखवून मोजणी करण्यास विरोध केला जातो व त्यातून महसुल मंत्री यांच्या निर्देशानुसार अप्पर जिल्हाधिकारी यांनी चौकशी अहवाल  दोन महिन्यापुर्वी स्थगिती दिली होती. या प्रकरणाचा पाठपुरावा करीत असलेल्या एका वकीलाला टाव्हरे यांनी दोन संपादनशीटे कशी तयार होतात अशी महिन्यापुर्वी विचारणा केल्यानंतर त्याने तो स्वतः बनवून उपअधिक्षक भुमी-अभिलेख शिरूर कार्यालयातून त्यावर शिक्के घेऊन प्रमाणित भासवतो असे सांगितले व अनेक प्रकरणी त्याच पद्धतीने केल्याचे सांगितल्यानंतर टाव्हरे यांनी याबाबत सखोल चौकशी होऊन कारवाईची मागणी शासनाकडे केल्यानंतर महसुलमंत्र्यांनी चौकशीचे आदेश दिले असून प्रसंगी आझाद मैदान येथे आंदोलन करणार असल्याचे टाव्हरे यांनी सांगितले. 0000