माथेरानची मिनीट्रेन आज धावणार
माथेरान : सर्वानाच प्रतीक्षा असणारी नेरळ माथेरान दरम्यान धावणारी माथेरानची महाराणी अर्थातच मिनिट्रेन ५ नोव्हेंबर पासून रुळावर येणार असल्याचे माथेरान रेल्वे स्टेशन मधून सांगण्यात आले आहे. त्यामुळे पर्यटकांना प्रतीक्षा असणारी ही सेवा उशिरा का होईना पण उपलब्ध होणार असल्याने पर्यटकांसह स्थानिकांमध्ये आनंदाचे वातावरण दिसत आहे. दरवर्षी पावसाळ्यात चार महिने घाटरस्त्यात अतिवृष्टीमुळे दरडी कोसळण्याची भीती असते याच कारणास्तव ही सेवा बंद करण्यात येते त्यानंतर १५ ऑक्टोबर रोजी ही सेवा नेहमीच पूर्वपदावर येते परंतु यावेळी बोग्यांची आसनव्यवस्था लक्षात घेऊन ५ नोव्हेंबर पासून ही गाडी रुळावर येणार असल्याचे रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. सद्यस्थितीत चार महिने घाटातील काही तांत्रिक बाबी तसेच रुळांची दुरुस्तीची कामे युद्धपातळीवर करण्यात येत असून या चार महिन्यात अनेकदा मालवाहू ट्रेन नियमितपणे नेरळ वरून माथेरान स्टेशन पर्यंत ये जा करत होती. मिनिट्रेन ही खऱ्या अर्थाने माथेरान करांची जीवनवाहिनी आहे.यामुळेच इथे पर्यटक येत असतात. परंतु रेल्वे प्रशासनाच्या भोंगळ कारभारामुळे या नेरळ माथेरान मिनिट्रेनला विलंब लागला आहे.त्यामुळे संताप व्यक्त होत आहे. १ तारखेला मिनिट्रेन सुरू होणार असे समजले होते यासाठी आम्ही सहकुटुंब इथे आलो आहोत पण इथे अद्याप ही ट्रेन सुरू झालेली नाही.त्यामुळे मुलांच्या आनंदावर विरजण पडले…
