Author: bittambatami.com

ठाणे महानगर पालिकेच्यावतीने गुरूवारी महर्षी वाल्मिकी जयंतीच्या निमित्ताने महापालिका मुख्यालयातील  कै. नरेंद्र बल्लाळ सभागृह येथे महर्षी वाल्मिकी यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. यावेळी अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे,…

अवैध मार्गाने होणाऱ्या दारू वाहतुकीवर जिल्हा प्रशासनाची करडी नजर

अशोक गायकवाड रायगड : विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुका मुक्त, निपक्ष, शांततापूर्ण आणि प्रलोभनमुक्त वातावरणात पार पडण्यासाठी जिल्ह्याच्या रस्ते आणि सागरी सीमांवर विशेष लक्ष ठेवण्यात येणार आहे. तसेच अवैध मार्गाने होणाऱ्या दारू वाहतुकीवर…

विधानसभा लढवणार अन् सत्ता आणणार : राज ठाकरे

मुंबई: विधानसभा निवडणुका लढवणार आणि जोरात लढवणार आहे. माझ्या सभेत सहज म्हणून किंवा कार्यकर्त्यांचा, सहकाऱ्यांचा उत्साह वाढावा म्हणून काही बोललो नाही. विधानसभा निवडणुका आम्ही जिंकू आणि सत्ता आणू. माझी भूमिका मी मांडली आहे, असे राज ठाकरे…

प्रियांका गांधीं अखेर वायनाडमधून लढणार

नवी दिल्ली : काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय सरचिटणीस प्रियांका गांधी अखेर केरळच्या वायनाड लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढणार आहेत. राहुल गांधीनी लोकभेत दोन मतदार संघातून विजय मिळवल्यानंतर वायनाडच्या खासदारीकीचा राजीनामा दिला होता.…

महाराष्ट्रासह देशातून पावसाचा परतीचा प्रवास

मुंबई : महाराष्ट्रासह देशातून परतीच्या पावसानं निरोप घेतला आहे. परतीचा पाऊस महाराष्ट्राच्या प्रवेशद्वाराजवळच म्हणजे नंदुरबार जिल्ह्यात दिनांक १४ ऑक्टोबरपर्यंत १० दिवस मुक्काम ठोकून होता. मंगळवार दिनांक १५ ऑक्टोबरला मात्र, परतीच्या पावसाने, महाराष्ट्राबरोबर सीमावर्ती मध्यप्रदेश, दक्षिण छत्तीसगड, पूर्व ओरिसा, तेलंगणा, उत्तर कर्नाटक राज्यातून…

जानकरांचा महायुतीला धक्का; स्वबळावर सर्वजागा लढणार

मुंबई : राष्ट्रीय समाज पक्षाचे नेते महादेव जानकर यांनी महायुतीला धक्का देत महायुतीतून बाहेर पडण्याची घोषणा केली आहे. महादेव जानकर यांचा पक्ष आता राज्यात स्वबळावर निवडणूक लढवणार आहे. महायुतीतील जागावाटपावरून जानकर नाराज असल्याची चर्चा होती.…

बंडोबांना थंड करण्यासाठी महामंडळावर घाऊक भरती

 मुंबई – आगामी विधानसभा निवडणूकीत दगाफटका होऊ नये म्हणून बंडोबांना थंड करण्यासाठी तब्बल २७ महामंडळांवर सत्ताधारी पक्षातील कार्यकर्त्यांची घाऊक भरती करण्यात आली आहे. राज्य सरकारने काही दिवसांपूर्वीच स्थापन केलेल्या परशुराम आर्थिक विकास…

आचारसंहिता धाब्यावर बसवून शासनाकडून अनेक निर्णय जाहीर

  निवडणूक आयोगाचा कारवाईचा बडगा   मुंबई :  विधानसभेसाठी राज्यात आचारसंहिता लागू असतनाही ती धाब्यावर बसवून शासनाव्दारे अनेक निर्णय जाहिर करण्यता आल्याची गंभीर दखल घेत निवडणूक आयोगाने कारवाईचा बडगा उचलला. निवडणूक आयोगाने…

आश्चर्य ! सिंधूदुर्गातील एकही मतदान केंद्र संवेदनशील नाही

राजन चव्हाण सिंधुदुर्ग : सिंधुदुर्गात पराकोटीची राजकीय तेढ असतानाही आश्चर्यकारक रित्या येथील एकही मतदान केंद्र हे संवेदनशील नसल्याचे आज जाहिर करण्यात आले आहे. राजकीय पक्ष जास्त सुसंस्कृत झालेत की पोलिसांचा दरारा वाढलाय…