Author: bittambatami.com

लाडक्या बहिणींना काँग्रेस दोन हजार रुपये देणार !

सांगलीत काँग्रेस अध्यक्ष खर्गेंची घोषणा सांगली : महाराष्ट्रातील बहीणींवर सगळ्याच राजकीय पक्षांना प्रेमाचे भरते आले आहे. राज्यात सध्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेला चांगला प्रतिसाद मिळतोय. यामुळेच आज थेट काँग्रेसचे राष्ट्राय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे  यांनी महाराष्ट्र दौऱ्यात सांगलीतून भाषण करताना राज्यातील मुख्यमंत्री…

खुशखबर ! नवी मुंबई मेट्रोचा प्रवास स्वस्त

मुंबई : नवी मुंबई मेट्रोचा प्रवास करणाऱ्या प्रवाशांना खुशखबर आहे. सिडकोने बेलापूर ते पेंधर या नवी मुंबई मेट्रो मार्गावरील मेट्रोच्या तिकीटांमध्ये ३३% पर्यंत लक्षणीय कपात करण्यात आली असून ७ सप्टेंबर २०२४ पासून नवी मुंबई…

फडणवीस, महाजनांनी माझा ‘गेम’ केला

पक्षप्रवेशावरून खडसेंची जाहीर टिका जळगाव : “भाजपमध्ये जे पी नड्डा यांच्या हस्ते माझा प्रवेश झाला होता,तो त्यांनी जाहीर करायला पाहिजे होता. मात्र मंत्री गिरीश महाजन आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांनी विरोध केल्याने तो…

शिल्पकार आपटेच्या मुसक्या आवळल्या

कल्याणमधिल घरून अटक पाच दिवसांची पोलिस कोठडी राजन चव्हाण मुंबई : छत्रपती शिवाजी महाराजांचा मालवणमधिल राजकोट येथे उभारण्यात आलेला पुतळा अवघ्या ९ महिन्यात कोसळला होता. याप्रकरणी फरार असलेला वादग्रस्त शिल्पकार जयदीप आपटेच्या…

कॅबिनेटमध्ये ‘एकच वादा’वरून लाडक्या बहीणींचे ‘भाऊ’ भिडले

स्वाती घोसाळकर मुंबई : लाडकी बहीण कुणाची यावरून सध्या महायुतीत जोरदार श्रेयवादाची लढाई सुरु आहे. उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार यांच्या पक्षाने मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेतून मुख्यमंत्री हा शब्द वगळून ‘माझी…

राज्यातील काजू उत्पादक शेतकऱ्यांना काजू बीसाठी शासनाकडून वित्तीय सहाय्य उपलब्ध

ठाणे : राज्यातील काजू उत्पादक शेतकऱ्यांना काजू बी साठी शासनाकडून वित्तीय सहाय्य उपलब्ध करुन दिल्यास, काजू उत्पादक शेतकऱ्यांना योग्य भाव मिळण्यास मदत होईल, ही बाब विचारात घेवून सन २०२४च्या काजू…

ठाणे महानगरपालिका मुख्यालयातील कै. नरेंद्र बल्लाळ सभागृहात, भगवान सर्वज्ञ श्रीचक्रधर स्वामी यांच्या अवतार दिनाच्या निमित्ताने त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले.  या कार्यक्रमास, अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे, उपायुक्त (मुख्यालय)…

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचे लोहगाव विमानतळावर पुणे जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांनी केले स्वागत

अशोक गायकवाड पुणे :राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचे मंगळवारी सायंकाळी भारतीय वायुदलाच्या विशेष विमानाने लोहगाव विमानतळावर आगमन झाले. पुणे जिल्हाधिकारी डॉ.सुहास दिवसे यांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत केले. याप्रसंगी केंद्रीय सहकार व नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील, एअर कमोडोर आणि एअर ऑफिसर कमांडिंग शेखर यादव, लष्कराच्या दक्षिण कमांडचे प्रमुख लेफ्टनंट जनरल धिरज सेठ, पोलिस आयुक्त अमितेश कुमार यावेळी उपस्थित होते. 0000

प्रांत प्रकाश संकपाळ यांच्या अध्यक्षतेखाली शांतता कमिटी व मोहल्ला कमिटीची सभा संपन्न

कर्जतः कर्जत उपविभागीय (प्रांत) अधिकारी प्रकाश संकपाळ यांच्या अध्यक्षतेखाली कर्जतमध्ये शांतता कमिटी सदस्य व मोहल्ला कमिटीची सभा संपन्न झाली. कर्जत पोलीस ठाणे हद्दीत मंगळवारी सकाळी अकरा वाजता कर्जत उपविभागीय (प्रांत) अधिकारी प्रकाश संकपाळ यांच्या अध्यक्षतेखाली कर्जतचे तहसीलदार धनंजय जाधव, कर्जत उपविभागीय पोलीस अधिकारी डी.डी. टेळे , कर्जत अपर तहसीलदार दुर्गा देवरे, कर्जत नगर परिषद मुख्याधिकारी वैभव गारवे, कर्जत पोलीस ठाणे पोलीस निरीक्षक सुरेंद्र गरड यांच्या उपस्थितीत कर्जत येथील प्रशासकीय भवनात कर्जत पोलीस ठाणे यांच्या वतीने पोलीस हद्दतील शांतता कमिटी सदस्य व मोहल्ला कमिटी सदस्य यांची बैठक आयोजित करण्यात आली होती. सदर बैठकीमध्ये गणेशोत्सव व ईद ए मिलाद सण शांततेत पार पडण्याच्या अनुषंगाने योग्य ते मार्गदर्शन करण्यात आले. तसेच गणेशोत्सव सणाच्या अनुषंगाने नागरिकांच्या रस्ते, वीज, वाहतुकीची समस्या याबाबत असणाऱ्या समस्या जाणून घेऊन त्यावर सकारात्मक चर्चा करण्यात आली आहे. सदर बैठकीत करिता उपविभागीय पोलीस अधिकारी डी डी टेळे, तहसीलदार कर्जत धनंजय जाधव, अपर तहसीलदार दुर्गा देवरे, कर्जत नगरपरिषदेचे मुख्याधिकारी वैभव गारवे, पोलीस निरीक्षक सुरेंद्र गरड, कर्जत पोलीस ठाणे, गोपनीय विभागाचे पोलीस नाईक संतोष साळुंखे व सर्व प्रशासकीय विभागाचे प्रमुख अधिकारी यांच्या सह ४५ ते ५० शांतता व मोहल्ला कमिटी सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते. ००००

शिंदे सरकारच्या कार्यकर्त्याचा आमदार किसन कथोरे यांच्या उपस्थित भाजपात प्रवेश

मुरबाड प्रतिनिधी (राजीव चंदने ) मुरबाड विधानसभेचे बिगूल वाजताच काही दिवस शिल्लक असल्याने राजकीय पक्षात कार्यकर्त्यांची  इनकमिंग, आणि आऊट गोईंग  सुरु झाली असून . मुरबाड विधानसभा क्षेत्राचे कार्यसम्राट आमदार किसन कथोरे यांच्या विकास कामांवर प्रभावित होऊन मागच्या आठवड्यातच टोकावडे व परिसरातील एक मोठा गट कथोरेंच्या उपस्थितीत भाजपात दाखल झाला आहे. त्यानंतर आज कथोरे यांच्या मुरबाड येथील निवास स्थानी तालुक्यातील मौजै मानिवली (गों) व मुरबाड शेजारील देवलार वाडी येथिल  ग्रामस्थांनी आमदार किसन कथोरेंच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश केला आहे. यावेळी प्रवेश घेतलेल्या कार्यकर्तांचे आमदार कथोरे यांनी स्वागत करुन त्यांना शुभेच्छा दिल्या. देवलार वाडीच्या कार्यकर्ताना आणण्यासाठी सुरज कोळेकर , मनोज कोळेकर यांनी मेहनत घेतली तर मानिवली येथिल संतोष पवार यांचे याकामी योगदान लाभले.