Author: bittambatami.com

मुंबई क्रिकेटवर शोककळा

मुंबई क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष अमोल काळे यांचे निधन मुंबई क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष अमोल काळे यांचे हृदयविकरच्या झटक्याने काल न्यूयॉर्क, अमेरिका येथे निधन झालं. रविवारी रात्री एमसीएच्या पदाधीकाऱ्यांसाह न्यूयॉर्कमध्ये भारत आणि पाकिस्तान…

शिंदेंच्या शिवसेनेत मंत्रीपदावरून नाराजीनाट्य

“1 खासदार असलेल्या मांझींना कॅबिनेट, 7 खासदारअसलेल्या शिवसेनेला एकही का नाही?” – श्रीरंग बारणें मुंबईः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे ७ खासदार जिंकून आले  असतानाही कॅबिनेट मंत्रिपद न देता केवळ एका राज्यमंत्रीपदावर बोळवण केल्यामुळे शिंदेंच्या शिवसेनेत  नाराजीनाट्य उद्भवले आहे. मावळचे खासदार श्रीरंगबारणे यांनी आज यावरून भजपावर जाहीर टीका केलीय. चिराग पासवान यांचे पाच खासदार असताना कॅबिनेटमंत्रिपद मिळाले, एक खासदार असणाऱ्या मांझी यांनाहीकॅबिनेटमंत्रिपद मिळाले, कुमारस्वामी यांना दोन खासदारअसताना कॅबिनेट मंत्रिपद मिळाले, आम्हालाही कॅबिनेटमंत्रिपद मिळायला हवं होतं, असे मावळचे खासदार श्रीरंगबारणे यांनी सांगितले. ते एबीपी माझाशी बोलत होते. यावेळीत्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे 7 खासदारआले असतानाही कॅबिनेट मंत्रिपद न दिल्यामुळे दुजाभावझाल्याचं सांगितलं. नरेंद्र मोदी यांनी तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेतली. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे सात खासदार आहेत. भाजप, जेदयु, टीडीपी यांच्यानंतर एनडीएमधील शिवसेनेलासर्वाधिक खासदार आहेत. पण तरीही कॅबिनेट मंत्रिपदमिळाले नाही. त्यामुळे शिवसेनेत नाराजी असल्याचं समोरआलेय. खासदार श्रीरंग बारणे यांनी याबाबत उघडपणे भाष्यकेलेय. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाला केंद्रीय राज्यमंत्रिपद देऊन, दुजाभाव करण्यात आला. आमच्या शिवसेनेचा स्ट्राईक रेटपाहता, आम्हाला कॅबिनेट मंत्रिपद द्यायला हवं होतं, असंम्हणत शिंदे गटाचे खासदार श्रीरंग बारणेंनी उघडपणे नाराजीव्यक्त केली आहे. एनडीएमधील इतर घटक पक्षांचे एक-एकखासदार निवडून आलेत, मात्र त्यांना कॅबिनेट मंत्री पद दिलंगेलं. मग शिंदे गटाबाबत भाजपने हा दुजाभाव का केला? असंहोतं तर मग कुटुंबाविरोधात जाऊन महायुतीत आलेल्याअजित पवारांनाही एक मंत्री पद द्यायला हवं होतं. तसेचभाजपने साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसलेंनाही मंत्रिपदद्यायला हवं होतं. असं म्हणत बारणेंनी खदखद बोलूनदाखवली. शिवसेनेला एक कॅबिनेट आणि एक राज्यमंत्रिपद मिळायला हवं होतं – देशामध्ये पंतप्रधान सन्माननीय नरेंद्र मोदी यांचं मंत्रिमंडळस्थापित झाले आहे. या निवडणुकीचा जर विचार करताशिवसेना पक्ष जुना साथी आहे. एनडीएचा जुना साथी म्हणूनशिवसेना पक्षाला कॅबिनेट मंत्री मिळावे ही माफक आपेक्षाहोती.  चंद्राबाबू नायडू यांचे सोळा खासदार निवडून आले, त्याचबरोबर नितेश कुमार यांचे 12 खासदार निवडून आले. त्या खालोखाल शिवसेना पक्षाचे सात खासदार निवडूनआले. चिराग पासवान यांचे पाच खासदार निवडून आले, त्यांना कॅबिनेट मंत्रिपद दिलं. कुमारस्वामी यांचे दोन खासदारकर्नाटकातून निवडून आले, त्यांना एक कॅबिनेट मंत्रिपद दिले. त्याचबरोबर बिहार मधून जितन मांझी एकटे निवडून आले, त्यांना कॅबिनेट मंत्रिपद दिले. तर शिवसेना पक्षाला एककॅबिनेट मंत्री आणि एक राज्यमंत्री मिळावे, अशी आमचीअपेक्षा होती. कॅनिबेनट मंत्रिपदाची शपथ आमच्याखासदाराने घेतली असती तर आम्हाला समाधान मिळालेअसते, असे श्रीरंग बारणे म्हणाले.

महायुतीत भुजबळांनी ठिणगी टाकली

विधानसभेत शिंदें इतक्याच जागा राष्ट्रवादीला हव्यात मुंबई : लोकसभा निवडणूकीत पराभवाचा दणका बसल्यानंतर आता भाजपाप्रणीत महायुतीत पुन्हा धुसफूस सुरू झाली आहे. अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते आणि मंत्रीछगन भुजबळ यांनी पुन्हा एकदा ठिणगी टाकली आहे. “आम्ही मागच्या वेळेस म्हटलं की ८० जागा आम्हाला कमीत कमी मिळाल्या पाहिजेत. तर हे ताबोडतोब माझ्या विरोधात बोलू लागले. मी म्हटलं बर बबा नाही बोलत. जागा वाटपाचे गुऱ्हाळ शेवटपर्यंत चालवून तुमचा फायदा होणार नाही. याचा लवकर निपटारा करायला पाहिजे. उमेदवार काय करायचे नंतर ठरवा. भाजप मोठा पक्ष आहे, मोठा भाऊ आहे, मान्य आहे. पण आम्ही सुद्धा सांगितलं की, आमचे जेवढे आमदार आहेत, तेवढेच शिंदेंचे आहेत. त्यामुळेत्यांना जेवढ्या जागा मिळतील तेवढ्याच आम्हाला मिळायलाहव्यात” असे छगन भुजबळ म्हणाले. मुंबईत अजित पवारांच्याराष्ट्रवादीचा वर्धापनदिन साजरा करण्यात आला. यावेळीछगन भुजबळ बोलत होते. आता विधानसभेची निवडणूक आहे, म्हणजे संविधानाचा प्रश्न नाही छगन भुजबळ म्हणाले, आता विधानसभेची निवडणूक आहे, म्हणजे संविधानाचा प्रश्न नाही. संविधान बदलाचे कामहोणार नाही. तो लोकसभेचा मुद्दा होता, आता विधानसभेलाचालणार नाही. आपले मतदार दलित, ओबीसी, मराठा हेआपले मतदार आपल्याला परत मिळवावे लागतील. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणून या गोष्टी आपल्याला कराव्याचलागतील. त्यांना विश्वास द्यावा लागेल. युपीमध्येहीसंविधानाबाबत प्रचार झाला, त्यामुळे महायुतीच्या जागाकमी आल्या. महायुतीला ठेच लागली आहे, हे नाकारुनचालणार नाही. लोकभा निवडणूकीत महायुतीला ठेच लागलीहे नाकारुन चालत नाही. दगडधोंडे बाजूला करावे लागतील. मुंबईत प्रत्येक ठिकाणी विकासकामे सुरू आहेत. ⁠विकासविकास आणि विकास मात्र मुंबईत किती निवडून आलेआहेत. लाखो कोटी खर्च केले, मात्र आपले उमेदवार निवडूनआले नाहीत, असंही भुजबळ यांनी सांगितलं. मुस्लीम समाज, दलित समाज आपल्याला सोडून बाजूला झाले पुढे बोलताना छगन भुजबळ म्हणाले, मुस्लीम समाज, दलितसमाज आपल्याला सोडून बाजूला झाले. 400 पार म्हणालो, त्याचा प्रचार असा झाला की, संविधान बदललं जाणार आहे. मोदींनी खुलासा केला, पण तोपर्यंत लोकांना वाटलं 400 पारम्हणजे आपला बेडा पार झाला. दलित, मुस्लीम समाजआपल्यापासून गेला तर आपलं काय? संविधान बदलणारम्हणजे आपलं आरक्षण जाणार असंही लोकांच्या डोक्यातआलं. आपलं नुकसान करण्यासाठी विरोधी पक्ष प्रचारकरणार आहे. आपण त्यामध्ये सुधारणा करु शकलो नाही, हेसत्य आहे.

खातेवाटप जाहीर

अमित शाह पुन्हा गृहमंत्री, गडकरींकडे रस्ते  विकास नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्रीमंडळाचे आज खातेवाटप जाहीर करण्यात आलं आहे. अमित शाहयांच्याकडे पुन्हा एकदागृहमंत्रीपद  सोपवण्यात आले आहे. नितीन गडकरींकडे रस्ते  विकास कायम ठेवण्यात आले आहे. राजनाथ सिंह यांच्याकडे संरक्षण मंत्रालयाचीजबाबदारी देण्यात आली आहे. परराष्ट्र मंत्रालय एस. जयशंकर यांच्याकडे देण्यात आलं आहे. नरेंद्र मोदी यांनीरविवारी तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेतली. त्यांच्यासह72 मंत्र्यांनी पद आणि गोपिनीयतेची शपथ घेतली होती. त्यानंतर आता खातेवाटप जाहीर करण्यात आलं आहे. मोदी कॅबिनेटचं खातेवाटप जाहीर! पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह 72 जणांनी रविवारी 9 जूनला  कॅबिनेट आणि राज्यमंत्रीपदाची शपथ घेतलीहोती. महाराष्ट्रातील 6 जणांचा यामध्ये समावेश होता. शपथघेतल्यानंतर या मंत्र्यांना कोणकोणती खाती मिळणार याकडेसर्वांचं लक्ष होतं. अखेर आज हे खातेवाटप जाहीर करण्यातआलं. त्यानुसार नितीन गडकरी यांना पुन्हा त्यांचं रस्ते आणिपरिवहन वाहतूक मंत्रालय, अमित शाह यांना गृह, एसजयशंकर यांना परराष्ट्र, राजनाथ सिंह यांना संरक्षण आणिअश्विनी वैष्णव यांना रेल्वे मंत्रालय मिळालं आहे. बिहारने केली होती रेल्वे मंत्रालयाची मागणी बिहारमधील घटकपक्ष असलेल्या नितीश कुमार यांनी रेल्वेमंत्रालयाची मागणी केली असल्याची माहिती होती. पण हेखातं भाजपच्या अश्विनी वैष्णव यांच्याकडेच राहणारअसल्याचं आता स्पष्ट झालं आहे. मोदींच्या मंत्रिमंडळात कुणाला कोणतं मंत्रालय? अमित शाह- गृहमंत्रालय राजनाथ सिंह- संरक्षण मंत्रालय एस जयशंकर – परराष्ट्र नितीन गडकरी- रस्ते आणि वाहतूक निर्मला सीतारमन – अर्थमंत्रालय शिवराज सिंह चौहान- कृषी मंत्रालय…

खोटे नॅरेटिव खोडून काढण्यात आले अपयश….

भारतीय जनता पक्षाच्या पिछेहाटीची कारणमिमांसा (भाग ४) नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्ष प्रणित महायुतीचे अक्षरशः पानदान वाजले. या संदर्भात विचार करण्यासाठी भाजप आमदारांच्या बैठकीत बोलताना आमच्या विरोधकांनी चुकीचे…

उल्हासनगर महानगरपालिकेच्या 751 कर्मचाऱ्यांना पर्मनंट रिटायरमेंट अकाउंट नंबरचे वितरण

उल्हासनगर : दिनांक 1 नोव्हेंबर 2005 नंतर उल्हासनगर महानगरपालिकेत कामावर रुजू झालेल्या 900 पैकी 751 कर्मचाऱ्यांना आयुक्त अजीज शेख यांनी गिफ्ट दिली असून त्यांना पर्मनंट रिटायरमेंट अकाउंट नंबर(प्राण)किटचे वितरण करण्यात आले आहे. शासनाने कर्मचाऱ्यांसाठी अंशदायी निवृत्ती वेतन योजना लागू केली होती.शासनाच्या धर्तीवर उल्हासनगर महानगर पालिकेच्या कर्मचाऱ्यांना राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजना लागू करुन अशा कर्मचाऱ्यांसाठी शेअर बाजाराशी संबंधित शासन मान्यताप्राप्त एनएसडीएल प्रोटीन या कंपनी सोबत करार करण्यात आला.आणि कंपनीकडून पर्मनंट रिटायरमेंट अकाउंट नंबर(प्राण)किट प्राप्त करून घेण्यात आले.त्यासाठी आयुक्त अजीज शेख यांच्या निर्देशानुसार मुख्यलेखाअधिकारी किरण भिलारे,मुख्यलेखा परिक्षक शरद देशमुख,लेखा अधिकारी विजय खेडकर यांनी परिश्रम घेतले. आता या कर्मचाऱ्यांचे मासिक वेतनातून कपात होणाऱ्या कर्मचारी अंशदान व मनपा अंशदानाच्या रक्कमा थेट शेअर बाजारामध्ये गुंतवल्या जाणार आहेत.यातून कर्मचाऱ्यांना मिळणाऱ्या व्याजाचा परतावा हा भविष्य निर्वाह निधीपेक्षा जास्त असणार आहे.कर्मचाऱ्यांना याचा फायदा हा लॉंग टर्मसाठी होणार आहे.जे पैसे कपात होतात ते ऍपद्वारे कर्मचारी बघू शकणार असल्याचे आयुक्त अजिज शेख यांनी सांगितले.751 कर्मचाऱ्यांना पर्मनंट रिटायरमेंट अकाउंट नंबर(प्राण)किटचे वितरण करण्यात आले आहे.उर्वरित 149 कर्मचाऱ्यांचे काम प्रगती पथावर असल्याची माहिती मुख्यलेखाअधिकारी किरण भिलारे यांनी दिली. कर्मचाऱ्यांना पर्मनंट रिटायरमेंट अकाउंट नंबर(प्राण किटचे)वितरण करतेवेळी आयुक्त अजीज शेख,सहायक संचालक नगररचना ललित खोब्रागडे,उपायुक्त डॉ.सुभाष जाधव,मुख्यलेखाअधिकारी किरण भिलारे,मुख्यलेखा परिक्षक शरद देशमुख,जनसंपर्क अधिकारी छाया डांगळे उपस्थित होते.

मलंग गडावरील सुलतान बाबा दर्ग्याजवळ घरावर कोसळला महाकाय दगड

एकाचा दुर्दैवी मृत्यू कल्याण : मौजेवाडी येथील मलंगड गडावर  सुलतान बाबा दर्ग्या जवळ आज एक भीषण दुर्घटना घडली. यात एका इसमाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.  सकाळी 6 वाजताच्या  सुमारास सुलतान बाबा दर्ग्या जवळ वस्तव्यास असणाऱ्या गुलाम बादशाह  सय्यद यांच्या राहत्या घरावर महाकाय दगड कोसळला. यात गुलाम बादशाह सय्यद वय 35 व त्यांची पत्नी समीरा  गुलाम सय्यद वय 30 या गंभीर जखमी झाले. पुढे त्यांना सेंट्रल हॉस्पिटल उल्हासनगर येथे त्यांना उपचारासाठी नेण्यात आले. मात्र दहा वाजता सेंट्रल हॉस्पिटल उल्हासनगर येथील डॉक्टरांनी गुलाम बादशाह सय्यद यांना मयत घोषित केले.यामुळे परिसरात शोककाळा पसरली आहे.

पश्चिम रेल्वे पावसाळ्यात सुपरफास्ट !

मान्सूनपूर्व बहुतांशी कामे पूर्ण, प्रशासनाचा दावा मुंबई : ऐन पावसाळ्यात रेल्वे रुळांवर पाणी साचून किंवा तांत्रिक बिघाडामुळे लोकल सेवा बंद पडू नये, यासाठी बहुतांशी मान्सूनपूर्व कामे पूर्ण झाली आहेत, असा दावा पश्चिम रेल्वेने केला आहे. विशेषत: रुळांच्या स्थितीवर लक्ष ठेवण्यासाठी गस्त घालण्यात येणार असून, हवामानाशी संबंधित माहिती मिळविण्यासाठी हवामान विभागासह मुंबई महापालिकेच्या यंत्रणांशी समन्वय राखला जाईल, असे पश्चिम रेल्वेकडून सांगण्यात आले. ड्रोनद्वारे सर्वेक्षण कल्व्हर्ट आणि नाल्यांमधील चोक पॉइंट्सचे निरीक्षण, स्वच्छता आणि ओळखण्यासाठी ड्रोन सर्वेक्षण केले जात आहे. बोरीवली, विरार विभागातील नाल्यांच्या सफाईसाठी ड्रोन सर्वेक्षण आणि देखरेखीचे काम सुरू असून, ते लवकरच पूर्ण होईल. कल्व्हर्ट, नाल्यांची साफसफाई आणि गाळ काढणे, रुळांच्या बाजूने घाण काढणे, कचरा साफ करणे, अतिरिक्त जलमार्ग बांधणे, उच्च क्षमतेच्या पंपांची तरतूद करणे, झाडांची छाटणी करणे इत्यादी कामे मिशन मोडवर पूर्ण होत आहेत. नालेसफाई वेगात १) १.५० लाख घनमीटर राडारोडा हटवण्याचे काम पूर्ण झाले आहे. हे काम विशेष अशा डेब्रिज स्पेशल गाड्या, बीआरएन, जेसीबी, पोकलेनच्या मदतीने करण्यात आले. २) कल्व्हर्ट आणि नाल्यांच्या साफसफाईचे काम वेगाने पूर्ण होत आहे. यार्डातील पाण्याच्या प्रवाहाच्या पद्धतीचा अभ्यास करून पाण्याचा सुरळीत निचरा होण्यासाठी नवीन नाले बांधण्यात येत आहेत. ३) वांद्रे आणि बोरीवली येथील कल्व्हर्टची स्वच्छता करण्यासाठी डी-स्लडिंग मशीनचा वापर करण्यात आला. ४) प्रभादेवी-दादर सेक्शन, दादर-माटुंगा रोड सेक्शन, वांद्रे टर्मिनस यार्ड, गोरेगाव-मालाड सेक्शन, बोरीवलीत पावसाच्या पाण्याचा निचरा करण्यासाठी १२०० किंवा १८०० मिमी व्यासाचे १५ पाइप बसवण्यात आले. ५) पाण्याचा सुरळीत निचरा होण्यासाठी ११ ठिकाणी नाले बांधले जात आहेत.

वसई व पालघरमध्ये महावितरणचा वर्धापन दिन उत्साहात साजरा

वसई/पालघर : महावितरणच्या वसई आणि पालघर मंडल कार्यालयांतर्गत आयोजित स्वतंत्र कार्यक्रमांमध्ये महावितरणचा १९ वा वर्धापन दिन नुकताच मोठ्या उत्साहात साजरा झाला. या दोन्ही कार्यक्रमांना कल्याण परिमंडलाचे मुख्य अभियंता धनंजय औंढेकर…

महाराष्ट्र शिक्षण क्रांती संघटनेचा

आमदार निरंजन डावखरे यांना पाठिंबा ठाणे : महाराष्ट्र राज्य शिक्षण क्रांती संघटनेच्या कोकण विभाग कार्यकारिणीच्या झालेल्या बैठकीत कोकण विभाग पदवीधर मतदारसंघाचे आमदार व संघटनेचे सल्लागार निरंजन डावखरे यांना पाठिंबा देण्याचा ठराव सर्वानुमते मंजूर करण्यात आला, अशी माहिती संघटनेचे कोकण विभाग अध्यक्ष रमेश निवृत्ती जाधव यांनी दिली. शिक्षण क्रांती संघटनेचे राज्य अध्यक्ष सुधीर देवराम घागस, कोषाध्यक्ष देविदास नरवाडे, विभाग सचिव ज्ञानेश्वर गोसावी, राज्य कार्यकारिणी सदस्य एस. जी पाटील, विभागाचे पदाधिकारी, सर्व जिल्हाध्यक्ष आणि सचिव सभेवेळी उपस्थित होते. गेल्या १२ वर्षांपासून आमदार निरंजन डावखरे हे १२ वर्षांपासून पदवीधर आमदार असून शिक्षण क्रांती संघटनेचे सल्लागार आहेत. संघटनेच्या शासकीय दप्तरी कामांकरिता त्यांचे सातत्याने सहकार्य लाभत असून, त्यांना विभागातील समस्यांची संपूर्णपणे जाण आहे, असे नमूद करीत शिक्षण क्रांती संघटना पूर्ण ताकदीनिशी डावखरेंसोबत राहणार असल्याचे राज्याध्यक्ष सुधीर घागस यांनी सांगितले. इंग्रजी माध्यमांच्या विनाअनुदानित शाळांमधील शिक्षकांच्या वेतनाचा प्रश्न सोडवणे. तसेच सर्वांना जुनी पेन्शन लागू करण्यासाठी महालढा उभारणे आदींकडे संघटना अधिक लक्ष देणार असल्याचे सभेत ठरविण्यात आले, असे श्री. घागस यांनी सांगितले. या वेळी उत्तम कांबळे, महेंद्र जाधव, डॉ. शहाजहान मौलना, राजेंद्र गवळी, सुरेश साळवे, संदेश पाटील, योगेश वल्लाळ, थॉमस शिनगारे, प्रशांत घागस, किशोर राठोड, अनिल मुरादे, प्रा. रमेश बुटेरे, सुरेंद्रनाथ दुसाने आदी पदाधिकारी उपस्थित होते.