Author: bittambatami.com

आता गणपतीसाठी बोरवलीतून रेल्वेने कोकण गाठता येणार !

मुंबई– चाकरमन्यांसाठी खुशखबर आहे. आता गणपतीसाठी बोरवलीतून थेट रेल्वेने कोकण गाठता येणार आहे. केंद्रीय अर्थसंकल्पात महाराष्ट्रातील विविध रेल्वे प्रकल्पांसाठी सुमारे १५९०० कोटींची आर्थिक तरतूद करण्यात आली आहे.येत्या आठ महिन्यात त्याचा फायदा राज्याला व…

लवकरच ठरवणार – जरांगे

जालना – येणाऱ्या विधानसभा निवडणूकीत लढायचं की पाडायचं याचा निर्णय लवकरच घेणार असल्याचे मराठा आंदोलकांचे नेते मनोज जरांगे यांनी आज स्पष्ट केले.जर सरकार आपल्यावर अन्याय करणार असेल, चारही बाजूने मराठ्यांना घेरण्याचा प्रयत्न करत…

नरेंद्र मोदींचा ‘मानस’ स्लग- १४० कोटी भारतीयांना होणार फायदा! 

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज  ‘मन की बात‘ या रेडिओ कार्यक्रमाच्या 112 व्या भागाता आपाल नवा मानस जाहीर केला. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीतील विजयानंतरचा हा दुसरा भाग होता. या कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संपूर्ण देशासाठी मानस या विशेष मोहिमेचा…

विधानसभेसाठी भाजपची २८८ मतदारसंघात तयारी

कोल्हापूर : ‘आगामी विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने २८८ मतदारसंघांत तयारी केली आहे. जास्तीची तयारी सरकार येण्यासाठी उपयुक्त ठरते,’ असे मत उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केले. ते म्हणाले, ‘भाजपने सर्व २८८ मतदारसंघांत निरीक्षक नियुक्त केले…

सायनमध्ये १ ऑगस्टपासून ट्रॅफीक जाम !

 शीव उड्डाणपूल वहातुकीसाठी बंद मुंबई : येत्या एक ऑगस्टपासून आपण मुंबईच्या दिशेने येणार असाल तर सायनला टाळा. कारण एक ऑगस्टपासून येथे ट्रॅफीक जाम होणार आहे. शीव उड्डाणपूल १ ऑगस्टपासून पूर्णतः बंद केला जाणार आहे. या…

पर्यावरणपूरक गणेशमूर्ती कागदावरच

भाईंदर : पर्यावरणाचे रक्षण करण्यासाठी चार फुटांपर्यंतच्या गणेशमूर्ती मातीच्या अथवा पर्यावरणपूरक साहित्यापासून बनवलेल्या असाव्यात, असे आदेश राज्य सरकारने दिले आहेत. मिरा-भाईंदर महापालिकेनेही या आदेशांची अंमलबजावणी करत मूर्तिकार व गणेशमूर्ती विक्री…

ठाणे स्थानकांवरून शटल सेवा सुरु करण्याची मागणी

ठाणे –  ठाणे ते कर्जत, कसारा, बदलापूरला जाण्यासाठी पुरेशा लोकल फेऱ्या नसल्याने ट्रान्सहार्बरवरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना सीएसएमटीकडून येणाऱ्या लोकलवर अवलंबून राहावे लागते. यामुळे प्रवाशांची मोठी गैरसोय होते. यामुळे ठाणे स्थानकावरून अतिरिक्त…

मेट्रोचे गर्डर वाहून नेणाऱ्या वाहनाचा अपघात

मध्यरात्रीपासून घोडबंदर मार्गावर मोठी कोंडी     ठाणे : घोडबंदर येथील जुना टोलनाका भागात मेट्रो मार्गिकेचे गर्डर वाहून नेणाऱ्या अतिअवजड वाहनाचा अपघात झाल्याने घोडबंदर मार्गावर मोठी वाहतूक कोंडी झाली आहे. या मार्गावर गायमुख घाट ते वाघबीळपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या आहेत. त्यामुळे ठाण्याहून बोरीवली, वसई, गुजरातच्या दिशेने वाहतूक करणाऱ्या चालकांचे आणि प्रवाशांचे हाल झाले आहेत. अवघ्या १५ ते २० मिनिटांच्या अंतरासाठी पाऊण तास लागत आहे. मध्यरात्रीपासून ही वाहतूक कोंडी सुरू आहे. घोडबंदर भागात मेट्रो मार्गिकेच्या निर्माणाचे काम सुरू आहे. रविवारी मध्यरात्री २.४५ वाजताच्या सुमारास ठाण्याहून घोडबंदरच्या दिशेने गर्डर वाहून नेणाऱ्या ‘पूलर’ या वाहनाला जुना टोलनाका येथे अपघात झाला. वाहन अतिअवजड असल्याने दोन्ही मार्गिकेवरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती. घटनेची माहिती ठाणे वाहतूक पोलिसांना मिळाल्यानंतर पोलिसांनी दुसऱ्या एका पुलर वाहनाच्या मदतीने अपघातग्रस्त वाहन बाजूला काढण्याचे कार्य सुरू केले. सुमारे तीन तासानंतर हे वाहन रस्त्यावरून बाजूला करण्यात आले. या मार्गावरून मध्यरात्री गुजरातच्या दिशेने वाहतूक करणाऱ्या ‌अवजड वाहनांची वाहतूक होत असते. त्यामुळे वाहनांच्या लांब रांगा लागल्या होत्या. सकाळी या मार्गावरील वाहतूक सुरू झाली. परंतु सकाळी १० नंतरही येथील वाहतूक कोंडी सुरळीत झाली नव्हती. येथील गायमुख घाट ते वाघबीळ येथील विजयनगरीपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या आहेत. या वाहतूक कोंडीमुळे बोरीवली, वसई, विरार, मिरा भाईंदर आणि गुजरातच्या दिशेने वाहतूक करणाऱ्यांचे हाल होत आहेत. 000

 सामाजिक न्याय विभागाच्या निधीचे विकेंद्रीकरण होऊ देणार नाही

रिपाइं एकतावादीने दिला आंदोलनाचा इशारा     ठाणे :  राज्य सरकारने सामाजिक न्याय विभागाचा निधी तीर्थयात्रा योजनेसाठी वापरण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच, मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या परदेशी शिष्यवृत्तीमध्ये कपात करण्यात आली आहे. त्याविरोधात रिपाइं एकतावादीने रणशिंग फुंकले आहे. या निधीमध्ये कपात करण्याचा निर्णय मागे न घेतल्यास राज्यभर आंदोलन छेडण्याचा इशारा रिपाइं एकतावादीने दिला आहे. रविवारी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया – एकतावादी या पक्षाचा राज्यस्तरीय मेळावा नानासाहेब इंदिसे यांच्या नेतृत्वाखाली शास्री नगर येथे आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्यात सामाजिक न्याय विभागाच्या निधी कपातीस विरोध करण्याचा ठराव एकमताने पारीत करण्यात आला. या मेळाव्यात  आगामी काळात येऊ घातलेल्या विधानसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आदींवर चर्चा करण्यात आली.  राज्यात अनेक ठिकाणी बौद्ध, मातंग , चर्मकार समाजावर अन्याय – अत्याचाराचे प्रमाण वाढीस लागले आहेत.  त्याविरोधातही या बैठकीत  जनआंदोलनाची दिशा ठरविण्यात आली. यावेळी नानासाहेब इंदिसे यांनी, परदेशी शिक्षण घेणाऱ्या दलित विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीमध्ये ५० टक्क्याने कपात करण्यात आली आहे. तसेच, अटीदेखील जाचक करण्यात आल्या आहेत. सामाजिक न्याय विभागाचा निधी दलित विकासावर खर्च करण्याऐवजी इतरत्र वळविण्यात येत आहे. ही बाब अत्यंत चुकीची आहे. मुख्यमंत्री संवेदनशील आहेत, मात्र, त्यांच्याकडून जर असे होणार असेल तर मागासवर्गीय समाजावर हा मोठा अन्याय आहे. यासंदर्भात आपण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेणार आहोत. जर, त्यानंतरही जर निधी वर्ग करणे थांबविले नाही तर आम्ही राज्यभर आंदोलन छेडू, असा इशारा दिला. या मेळाव्यास प्रदेशाध्यक्ष विकास निकम,  कार्याध्यक्ष जितेंद्रकुमार इंदिसे, राष्ट्रीय युवाध्यक्ष भय्यासाहेब इंदिसे , राष्ट्रीय सरचिटणीस प्रल्हाद सोनावणे यांच्यासह विविध जिल्ह्यांचे अध्यक्ष,  कार्यकारिणी सदस्य आदी उपस्थित होते. 00000

 स्वच्छता कार्याचे पुणे पूरग्रस्तांकडून प्रशंसात्मक आभार

 नवी मुंबई महानगरपालिकेच्या मदतकार्य पथकाने केलेल्या     नवी मुंबई : पुणे शहर व परिसरात अतिवृष्टीतील पूर परिस्थितीमुळे ओढवलेल्या अडचणीच्या स्थितीत पूर ओसरल्यानंतर तेथील पूरग्रस्त नागरिकांच्या मदतीकरिता महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री ना.श्री.एकनाथ शिंदे यांच्या निर्देशानुसार महापालिका आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली नवी मुंबई महानगरपालिकेचे मदतकार्य पथक धावून गेले आहे. नेहमीच इतरांच्या मदतीसाठी सज्ज असणा-या नवी मुंबई महानगरपालिकेच्या पथकाने सिंहगड रोड एकतानगरी परिसरात केलेल्या स्वच्छता कार्याचे तेथील लोकप्रतिनिधींसह नागरिकांनी मनापासून कौतुक करीत आभार मानले आहेत. पुणे येथे ओढवलेल्या पूर परिस्थितीमुळे तेथील अनेक भागातील रस्त्यांवर तसेच घरातही गाळ आणि कचरा मोठ्या प्रमाणात जमा झाला होता. त्याचा परिणाम नागरिकांच्या आरोग्यावर होणार असल्याचे लक्षात घेत जलद स्वच्छता करणे महत्वाचे होते. या अनुषंगाने मुख्यमंत्री महोदयांच्या निर्देशानुसार, आयुक्तांच्या मार्गदर्शनाखाली, घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपआयुक्त डॉ. अजय गडदे यांनी लगेच महानगरपालिकेचे 115 जणांचे पथक तयार केले व त्यांना 2 जेटींग मशीन व आवश्यक स्वच्छता साधनांसह शनिवारी सकाळी एनएमएमटीच्या 2 बसेसने पुण्याकडे रवाना केले. त्याठिकाणी पुणे महानगरपालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागामार्फत नमुंमपा मदतकार्य पथकास सिंहगड रोड परिसरातील एकतानगरी हा पूरग्रस्त भागात साफसफाई करण्याचे सूचित करण्यात आले. त्या अनुषंगाने उपमुख्य स्वच्छता अधिकारी श्री. राजेंद्र इंगळे व स्वच्छता अधिकारी श्री. विजय पडघन यांनी तेथील परिस्थितीचा आढावा घेत आपले सहकारी स्वच्छता निरीक्षक सर्वश्री विजय नाईक, नितीन महाले, नवनाथ ठोंबरे व विजय काळे यांच्यासह साफसफाई कामाचे नियोजन केले व सोबतच्या 2 स्वच्छता पर्यवेक्षक आणि 100 हून अधिक स्वच्छताकर्मींसह तेथील परिसरात व घरांतील स्वच्छतेत महत्वपूर्ण योगदान दिले. त्या परिसरात रोगराई पसरू नये म्हणून सोबत नेलेल्या जंतुनाशक पावडरही त्याठिकाणी फवारण्यात आली. या पथकाने ज्या आत्मियतेने स्वयंस्फुर्तीने काम केले त्याची प्रशंसा तेथील माजी नगरसेविका श्रीम. मंजुषा नागपुरे तसेच त्या परिसरातील नागरिकांनी केलेली असून नवी मुंबई महानगरपालिकेचे आभार व्यक्त केलेले आहेत. नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्राची स्वच्छता राखतानाच इतर शहरांच्या अडचणीच्या काळात नवी मुंबई महानगरपालिका नेहमीच धावून गेली असून पुणे येथील पूरग्रस्तांना केलेल्या मदतीची तेथील नागरिकांप्रमाणेच पुणे महानगरपालिकेकडूनही आभार व्यक्त करीत दखल घेण्यात आलेली आहे. 00000