Category: क्रीडा

रोहित हीरो, हार्दिक झिरो

स्टंप व्हीजन स्वाती घोसाळकर मुंबई- वानखेडे स्टेडियमवरील आयपीएलच्या मॅचमध्ये मुंबई इंडियन्सचा रोहीत शर्मा आज हिरो तर कॅप्टन हार्दीक झिरो ठरला. शेवटच्या षटकात बाँलिंग टाकण्याचा अट्टाहास कॅप्टन हार्दीकच्या अंगलटीस आला. चेन्नईने हार्दीकच्या…

इंग्लंड-एशिया इनडोअर क्रिकेट कप स्पर्धेला श्रीलंकेत सुरुवात

भारतीय पुरुष व पुरुष मास्टर्स संघाची घोषणा कोलंबो : जागतिक इनडोअर क्रिकेट महासंघाच्या (WICF) मान्यतेने सिलोन इनडोअर क्रिकेट असोशिएशन यांच्या पुढाकाराने इंग्लंड-एशिया कप इनडोअर क्रिकेट स्पर्धेला सुरुवात झाली आहे. या स्पर्धेवर स्पर्धा संचालक म्हणून हिरान डी मेल यांची निवड झाली आहे. हि स्पर्धा इनडोअर अरीना, ऑस्टेशिया स्पोर्ट्स क्लब, थलावाथुगोडा, कोलंबो, श्रीलंका येथे सुरु झाली आहे. या स्पर्धेत यजमान श्रीलंकेसह, भारत, सिंगापूर असे तीन आशियायी देश व इंग्लंड सहभागी झाले आहेत. हि स्पर्धा १८ एप्रिल रोजी या स्पर्धेतील अंतिम सामने खेळवले जातील. भारतीय पुरुष संघाच्या कर्णधारपदी धनुष भास्करची तर उप कर्णधारपदी दैविक रायची (दोघेही कर्नाटक) वर्णी लागली आहे. या संघाच्या प्रशिक्षकपदी मुंबई, महाराष्ट्राच्या जयेश साळगावकरची निवड झाली आहे. जयेश साळगावकर याआधी सिंगापूरकडून आंतरराष्ट्रीय स्पर्धेत खेळाडू म्हणून चमकदार कामगिरी केली आहे. या संघातील इतर खेळाडू पुढील प्रमाणे आहेत. विजय गौडा, सुरज रेड्डी, अफरोज पाशा, कार्तिक सुब्रमनिअयन, एम. मल्लिकार्जुन, वैभव गुरुदत्त, अमरसिंग वर्मा, आशिक ख्रिस्त्य, जश जोशी व अधिराज जोहरी. हे सर्व खेळाडू या स्पर्धेसाठी झालेल्या वेगवेगळ्या निवड चाचणी स्पर्धांमधून निवड केले आहेत. पुरुष मास्टर्स गटाच्या (४०+) भारतीय संघाच्या कर्णधारपदी प्रसन्ना कुमार (कर्नाटक) तर उप कर्णधारपदी प्रशांत कारीया (महाराष्ट्र) यांची निवड करण्यात आली आहे. मुंबई येथील प्रशांत कारीयाच्या रूपाने महाराष्ट्राला प्रथमच भारताचे उपकर्णधार पद वाट्याला आले आहे. या संघाच्या प्रशिक्षकपदी प्रकाश राठोड यांची निवड केली आहे. या संघातील इतर खेळाडू पुढील प्रमाणे आहेत. नरेश खुराना, प्रो. चिरंथना नंजप्पा, अंशुल शर्मा, अभिषेक वेस्ली, केशव रेड्डी, समीर शाह, राकेश चव्हाण, गौरव कांबळी, झुबीन हकीम, डॉ. सुनील मूर्थी यांची निवड करण्यात आली आहे. या भारतीय संघाची घोषणा इंडियन इनडोअर स्पोर्ट्स फाउंडेश (IISF) चे  अध्यक्ष अजय नाईक व सचिव मिलिंद पुंजा यांनी केली.

दिलीप वेंगसरकर माझे हिरो आणि आदर्श – डॉ. शैलेश श्रीखंडे

मुंबई : दिलीप वेंगसरकर हे माझे हिरो आणि आदर्श आहेत असे प्रतिपादन विख्यात कॅन्सर सर्जन आणि टाटा कॅन्सर हॉस्पिटलचे संचालक शैलेश श्रीखंडे यांनी केले. ड्रीम ११ कप या १६ वर्षाखालील मुलांच्या क्रिकेट स्पर्धेच्या पारितोषिक वितरण समारंभात ते बोलत होते.  ओव्हल मैदानातील ड्रीम ११ वेंगसरकर क्रिकेट अकादमीच्या मैदानावर ड्रीम ११ कप या १६ वर्षाखालील मुलांच्या क्रिकेट स्पर्धेच्या पारितोषिक वितरण समारंभास येऊ शकाल का असा वेंगसरका यांचा मला फोन आला आणि मी तात्काळ त्यांना हो म्हणून सांगितले. मी देखील आय.ई.एस. स्कुल साठी लहान असताना शालेय क्रिकेट स्पर्धेत खेळलो असल्याने आणि दिलीप वेंगसरकर या व्यक्ती बद्दल प्रचंड आदर असल्याने मी येथे आलो. क्रिकेट मधील आपल्या अप्रतिम कारकिर्दी नंतर या व्यक्तीने युवा क्रिकेटपटूनसाठी जे अप्रतिम कार्य केले आहे त्याला खरोखरच तोड नाही. त्यामुळेच दोन  शस्त्रक्रिया मध्ये थोडा वेळ काढून मी आज यथे आलो आहे. क्रिकेट खेळायला मैदानात उतरल्यानंतर खेळपट्टी, वातावरण या साऱ्याना दोष न देता प्रत्येक वेळी आपली सर्वोत्तम खेळी करायला हवी कारण हीच गोष्ट आपल्या उर्वरित आयुष्यात देखील उपयोगी ठरते. आम्ही आज देखील प्रत्येक शस्त्रक्रिया करताना आपले सर्व ज्ञान पणाला लावतो तेव्हांच त्या यशस्वी होतात असे श्रीखंडे यांनी सांगितले.  वेंगसरकर यांनी देखील यावेळी  बोलताना आपल्या फलंदाजीने संघाला विजय मिळवून देणाऱ्या हर्ष गायकर आणि आयुष शिंदे यांनी शेवटपर्यंत नाबाद राहिल्याबद्दल त्यांचे कौतुक केले. जेव्हां एखाद्या फलंदाजांचा जम बसतो त्यावेळी आपली विकेट फेकून परतण्यापेक्षा संघाला विजयी करून परतणे हेच महत्वाचे असते असे त्यांनी सांगितले. या स्पर्धेत ड्रीम ११ वेंगसरकर क्रिकेट अकादमीने क्रिकेट मंत्रा अकादमी संघावर ८ विकेट्सनी मात करून या स्पर्धेचे विजेतेपद पटकावले.  विजेत्यांना डॉ. श्रीखंडे आणि भारताचे माजी कर्णधार दिलीप वेंगसरकर यांच्या हस्ते गौरविण्यात आले. तत्पूर्वी प्रथम फलंदाजी करणाऱ्या क्रिकेट मंत्रा अकादमी संघाने निर्धारित ३५ षटकांत ५ बाद १८३ धावांचे लक्ष्य उभारले. ४ बाद ७१ वरून आयुध मोहंती (नाबाद ४५) आणि वंश चुंबळे (५०) या जोडीने पाचव्या विकेटसाठी ८९ धावांची भागी रचली.  आलेख सिंग याने ४१ धावांत २ बळी मिळविले. या आव्हानाचा पाठलाग करताना ड्रीम ११ वेंगसरकर क्रिकेट अकादमीच्या यश जगताप (२६) आणि अस्मित झा (३७) या सलामीच्या जोडीने ६२ धावांची सलामी दिली. हे दोघे बाद झाल्यानंतर आयुष शिंदे (नाबाद ५१) आणि हर्ष गायकर (नाबाद ६०) या जोडीने जबरदस्त फटकेबाजी करीत केवळ १३ षटकांतच १०७ धावांची अभेद्य भागीदारी करून २८ षटकांतच संघाचा विजय साजरा केला. हर्ष गायकर याने केवळ ३२ चेंडूत ११ चौकारांसह नाबाद ६० तर आयुष शिंदे याने ५५ चेंडूत ५ चौकारांसह नाबाद ५१ धावा केल्या.  अंतिम सामन्यातील सर्वोत्तम खेळाडू म्हणून हर्ष गायकर याची निवड करण्यात आली. संक्षिप्त धावफलक –  क्रिकेट  मंत्रा अकादमी – ३५ षटकांत ५ बाद १८३ (श्रीहन हरिदास २२, समृद्ध भट २०, आयुध मोहंती  नाबाद ४५, वंश  चुंबळे ५०; आलेख सिंग ४१ धावांत  २ बळी ) पराभूत विरुद्ध ड्रीम ११ वेंगसरकर क्रिकेट अकादमी – २८ षटकांत २ बाद १८४ (यश जगताप २६, अस्मित झा ३७, आयुष शिंदे नाबाद ५१, हर्ष गायकर नाबाद ६०).

अखेर ‘सूर्या’ तळपला..

स्वाती घोसाळकर मुंबई : वानखेडेवर कालनिर्णयच्या पंचागाप्रमाणे ६.५५ मिनिटांनी सुर्यास्त झाल्यावर कॅप्टन हार्दिक पांड्या नाणेफेकीसाठी उतरला खरा पण त्यानंतर रात्रीच्या अंधारात मुंबईचा सूर्य अखेर तळपळा. वानखेडेवर झालेल्या मुंबई इंडियन्स आणि आरसीबी विरुद्धच्या…

अखेर विजयाची गुढी उभारली

स्वाती घोसाळकर गुढीपाडव्याच्या दोन दिवस आधी अखेर मुंबई इंडियन्सने विजयाची गुढी उभारली. दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध खेळताना मुंबई इंडियन्सने या मौसमतला आपला पहिला विजय नोंदवला. याचबरोबर कर्णधार हार्दिक पंड्यानेही सुटकेचा निश्वास सोडला.…

ठामपा महिला व पुरुष कबड्डी संघाला विजेतेपद

अखिल भारतीय कबड्डी स्पर्धा   ठाणे : तामिळनाडू, बंगलोर, पाचगणी, वर्धा, मध्यप्रदेश आदी विविध ठिकाणी झालेल्या अखिल भारतीय कबड्डी स्पर्धेत ठाणे महानगरपालिकेच्या महिला व पुरुष कबड्डी संघाने चमकदार कामगिरी करीत विजेतेपद पटकाविले.आयुक्त सौरभ राव यांनी संघाचे अभिनंदन केले. महापालिकेच्या कबड्डी संघांच्या कामगिरीबद्दल महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी महिला व पुरूष कबड्डी संघाचे अभिनंदन करुन त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी अतिरिक्त आयुक्त १ संदीप माळवी, क्रीडाअधिकारी तथा प्र. उपआयुक्त मीनल पालांडे, तसेच महिला कबड्डी संघाच्या व्यवस्थापक नीना गोळे, प्रशिक्षक संतोष शिर्के, पुरूष कबड्डी संघाचे व्यवस्थापक गणेश म्हात्रे, प्रशिक्षक जसपालसिंग राठोड उपस्थित होते.

महाराष्ट्राला दुहेरी मुकुटासह सुवर्णपदक

 ५६ वी राष्ट्रीय पुरुष-महिला अजिंक्यपद खो-खो स्पर्धा दिल्ली (क्रि. प्र.), दिल्ली येथील करमाळी सिंग क्रीडांगण, बसंत लेन, रेल्वे कॉलनी, पहारगंज येथे संपन्न झालेल्या ५६ व्या पुरुष-महिला राष्ट्रीय अजिंक्यपद खो-खो स्पर्धेत महाराष्ट्राने डबल धमाका करताना…

सर्वसाधारण अजिंक्यपदाची महाराष्ट्रीची ‘हॅटट्रीक’

२०वी राष्ट्रीय माऊंटन बाईक सायकलिंग अजिंक्यपद स्पर्धा मनाली रत्नोजी स्पर्धेमधील सर्वोत्कृष्ट महिला खेळाडू मुंबई : पंचकुला, हरयाणा येथे आज संपन्न झालेल्या २०व्या राष्ट्रीय माऊंटन बाईक सायकलिंग अजिंक्यपद स्पर्धेत सलग तिस-या वर्षी महाराष्ट्राने या प्रकारामधील आपले निर्विवाद वर्चस्व सिद्ध करत सर्वसाधारण विजेतेपदाची “हॅटट्रीक” साधली. या स्पर्धेत महाराष्ट्राच्या सायकपट्टूंनी ६ सुवर्ण ४ रौप्य अशी एकूण १० पदके पटकावताना ४८ गुणांसह सर्वसाधारण विजेतेपद पटकावले. १ सुवर्ण ८ रौप्य आणि एक कांस्यपदकासह ३७ गुण मिळवून कर्नाटकास या स्पर्धेमधील उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. या स्पर्धेत नाशिक दुर्गम भागातील योगेश सोनावने याने तीन सुवर्ण पदके आणि पुण्याची मनाली रत्नोजी हिने महिला ज्युनिअर गटात २ सुवर्ण आणि १ रौप्य पदक पटाकावताना महाराष्ट्राच्या विजयात मोवाची कामगिरी केली. मनालीने स्पर्धेमधील सर्वोत्कृष्ट महिला खेळाडूचा मान मिळवला. काल शेवटच्या दिवशी नाशिकच्या ऋतिका गायकवाड हिने वुमेन ईलीट गटात एक्ससीओ (क्रॉस कंट्री ऑलल्पिक) प्रकारात १ ता. ३२ मि ४२.८११ से. वेळ देत सुवर्णपदकावर आपला ठसा उमटवला. कर्नाटकच्या स्टार नारझरी हिना १ ता. ३५ मि. ४४.६४७ से. वेळ नोंदवताना रौप्यपदक तर उत्तराखंडच्या सुनिता श्रेष्ट हिने १ ता. ३८ मि. ४६.१४२ से. वेळ देत कांस्पदक मिळवले. ऑक्टोबर २०२३ मध्ये केरळ येथे झालेल्या आशियाई एमटीबी सायकलिंग अजिंक्यपद स्पर्धेत ऋतिका गायकवाड, मनाली रत्नोजी यांनी भारताचे प्रतिनीधीत्व केले होते. महाराष्ट्राच्या सायकलपट्टूंकडून पदक विजेती कामगिरी करुन घेण्यात सलग पाच वर्षे प्रशिक्षकापदाची जबाबदारी सांभाळणा-या बिरु भोजने यांनी महत्वाची भूमिका पार पाडली. सायकलिंग फेडरेषन ऑफ इंडियाचे उपाध्यक्ष प्रताप जाधव, सायकलिंग असोसिएशन ऑप महाराष्ट्राचे अध्यक्ष अड विक्रम रोठे, उपाध्यक्ष आणि सातारा जिल्हा सायकलिंग असोसिएशनचे अध्यक्ष अविनाश कदम, सचिव प्रा. संजय साठे, आश्रयदाते विजय जाधव, खजिनदार भिकन अंबे यांनी अभिनंदन केले.

प्रशांत मोरे-काजल कुमारी विजयी

रोटरी क्लब राज्य कॅरम स्पर्धा मुंबई : रोटरी क्लब ऑफ मुंबई पार्लेश्वर व छत्रपती शिवाजी महाराज स्मारक समिती जुहू यांच्या सहकार्याने आयोजित उत्कर्ष स्मॉल फायनान्स बँक पुरस्कृत ४ थ्या राज्य मानांकन कॅरम स्पर्धेतील पुरुष एकेरीची अंतिम लढत आजी माजी विश्व विजेत्यांच्या रंगतदार लढतीने गाजली. माजी विश्व् विजेत्या मुंबईच्या प्रशांत मोरेने यामध्ये बाजी मारली. अंतिम सामन्यात त्याने मुंबई उपनगरच्या विद्यमान विश्व् विजेत्या संदीप दिवेचा तीन सेटपर्यंत रंगलेल्या लढतीत पराभव केला. अंतिम फेरीत नाणेफेक जिंकलेल्या संदीपने पहिल्याच बोर्डात व्हाईट स्लॅम करून १२ गुणांची आघाडी घेतली. परंतु तरीही आपल्या आक्रमक खेळाच्या जोरावर सहाव्या बोर्ड अखेरीस प्रशांतने १९-१७ अशी दोन गुणांची आघाडी घेतली होती. मात्र सातव्या बोर्डात संदीपने पुन्हा व्हाईट स्लॅमची किमया करत २५-१९ अशा फरकाने पहिला सेट आपल्या खिशात घातला. त्याचा फॉर्म पाहता तोच या स्पर्धेतील विजेता ठरणार हि प्रेक्षकांची अपेक्षा प्रशांतने फोल ठरवत दुसरा सेटअगदी सहज २३-६ असा जिंकून सामन्यात रंगात निर्माण केली. या अंतिम फेरीच्या तिसऱ्या सेटने प्रेक्षकांच्या डोळ्याचे पारणे फिटले. दोनही खेळाडूंनी आपले सर्वस्व पणाला लावले. सातव्या बोर्ड संपल्यावर प्रशांतकडे १४-१३ अशी केवळ एका गुणांची आघाडी होती. परंतु ब्रेक त्याचा असल्याने प्रशांत हा सामना सहज जिंकेल असे सर्वाना वाटत होते. मात्र संदीपने अगदी शेवटच्या बोर्डापर्यंत झुंज दिली. प्रशांतच्या हाताखालील असलेली आपली शेवटची सोंगटी संदीपने डबल टचचा वापर करून घेण्याचा प्रयत्न केला. परंतु दुर्दैवी संदीपची सोंगटी थोडक्यात चुकली आणि प्रशांतने आपली शेवटची सोंगटी घेत बाजी मारली व रोख रुपये २५ हजारांचे ईनाम आपल्या खिशात घातले. अंतिम फेरीत प्रवेश करणाऱ्या प्रशांत मोरेने उपान्त्य लढतीत मुंबईच्या महम्मद घुफ्रानचे आव्हान १८-१४, १६-११ असे परतवून लावले. तर संदीपने मुंबईच्या पंकज पवारला २५-१२, २२-८ असे सहज पराभूत केले होते. याउलट महिला एकेरीचा अंतिम सामना अगदी एकतर्फी झाला. मुंबईच्या काजल कुमारीने या लढतीत उदयोन्मुख समृद्धी घाडीगावकरचा २५-०, २५-१० असा सहजच पराभव करून रोख रुपये २५ हजारांचे बक्षिस मिळविले. उपांत्य लढतीत काजलने मुंबई उपनगरच्या प्राजक्ता नारायणकरला तीन सेटमध्ये २५-१२, १५-१८, २४-१० असे हरविले होते. तर समृद्धीने पालघरच्या श्रुती सोनावणेचा कडव्या लढतीनंतर २२-८, ९-२३, २१-८ असा पराभव केला. तिसऱ्या क्रमांकासाठी झालेल्या पुरुषांच्या लढतीत महम्मद घुफ्रानने पंकज पवारला २१-११, २५-१५ असे हरवून तिसरा क्रमांक प्राप्त केला. तर महिला एकेरीच्या तिसऱ्या क्रमांकासाठी झालेल्या लढतीत श्रुती सोनावणेने प्राजक्ता नारायणकरवर झुंजीच्या लढतीत २५-१७, १५-२५, २५-११ असा विजय मिळवून तिसऱ्या क्रमांकाचे ईनाम पटकाविले. विजेत्या खेळाडूंना रोटरी डिस्ट्रिक्ट गव्हर्नर अरुण भार्गव, रोटरी क्लब ऑफ मुंबई पार्लेश्वरच्या अध्यक्षा डॉ. मोनिका टंडन, चेअरमन स्पोर्ट्स विवेक पै, उत्कर्ष स्मॉल फायनान्स बँकेचे पदाधिकारी तसेच महाराष्ट्र कॅरम असोसिएशनचे मानद सचिव अरुण केदार यांच्या शुभ हस्ते रोख पारितोषिके व चषक देऊन सत्कार करण्यात आला. रोटरी क्लब तर्फे प्रसाद देवरुखकर यांनी या स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी खूप मेहनत घेतली.

नानावटी सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल 2 धावांनी विजयी

एमसीए प्रेसिडेंट कप ए डिव्हिजन स्पर्धा मुंबई : एमसीए प्रेसिडेंट कप ए डिव्हिजन स्पर्धेत नानावटी सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलने मुंबई पोर्ट ट्रस्ट स्पोर्ट्स क्लबवर 2 धावांनी विजय मिळविला. मुंबई पोर्ट ट्रस्ट…