Category: क्रीडा

के श्रीनिवासन विजयी तर अपंग कॅरमपटू जगन्नाथ मैत्राणीला १ लाखाची मदत

महाराष्ट्र ओपन कॅरम स्पर्धा के श्रीनिवासन विजयी तर अपंग कॅरमपटू जगन्नाथ मैत्राणीला १ लाखाची मदत मुंबई : महाराष्ट्र कॅरम असोसिएशन आयोजित श्री हालारी विसा ओसवाल समाज हॉल येथे संपन्न झालेल्या भारतीय आयुर्विमा महामंडळ पुरस्कृत तिसऱ्या महाराष्ट्र ओपन कॅरम चॅलेंजर्स ट्रॉफीच्या विजयाची माळ तेलंगणाच्या के श्रीनिवासच्या गळ्यात पडली. अंतिम फेरीत या विश्व् विजेत्या कॅरमपटूने महाराष्ट्राच्या अभिषेक चव्हाणवर अटीतटीच्या लढतीत ९-२०, २३-०, २५-४ असा विजय मिळवला. उप उपांत्य सामन्यात अभिषेकने आंतर राष्ट्रीय खेळाडू उत्तर प्रदेशच्या महम्मद आरिफवर १३-१०, १५-१७ व २४-० असा अनपेक्षित विजय मिळवल्यामुळे अंतिम फेरीत तो काय करतो याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले होते. या सामन्यात महाराष्ट्राच्या अभिषेकने सुरुवात अतिशय छान केली होती. परंतु त्याला सातत्य राखता आले नाही. दुसरा सेट व तिसऱ्या सेटमध्ये त्याचे सर्व डावपेच निष्प्रभ ठरले. पहिल्यांदाच या स्पर्धेत खेळणाऱ्या के श्रीनिवासन आपल्या आक्रमक खेळाच्या जोरावर अंतिम विजय मिळवून चॅलेंजर्स ट्रॉफीवर आपले नाव कोरले व १ लाख ५० हजारांचे ईनाम पटकावले. तर अभिषेकने १ लाखाची कमाई केली व द्वितीय क्रमांकाचा चषक पटकावला. बँक ऑफ इंडिया, आय डी बी आय बँक, महाराष्ट्र बँक, युनियन बँक, मड जीन्स व बार्बेक्यू नेशन सहपुरस्कृत केलेल्या या स्पर्धेच्या तिसऱ्या क्रमांकासाठी झालेल्या लढतीत उत्तर प्रदेशचा महमंद आरिफ वरचढ ठरला. त्याने महाराष्ट्राच्या चांद युसूफ शेखला १७-८, १६-१२ असे रोखले आणि ७५ हजारांचे बक्षीस व चषक मिळवला. तर चौथ्या क्रमांकावर समाधान मानलेल्या चांदला ५० हजारांचे बक्षीस मिळाले. उपउपांत्य फेरीत पराभूत झालेल्याना प्रत्येकी २५ हजारांनी गौरविण्यात आले. तर स्पर्धेतील एकंदर ३२ खेळाडूंना मिळून ८ लाखांची रोख पारितोषिके देण्यात आली. अंतिम फेरीत प्रवेश करण्यापूर्वी की श्रीनिवासन चांद युसूफ शेखचा १८-१०, २५-६ असा फडशा पडला होता. भाग घेतलेल्या पूर्व कॅरमपटूंनी साहित्य पार्टनर असलेल्या सिस्का कंपनीच्या शुअर स्लॅम कॅरम व बुलेट शॉट सोंगट्यांवर एकंदर २३ व्हाईट स्लॅम व १८ ब्लॅक स्लॅमची नोंद केली. महाराष्ट्र कॅरम असोसिएशनच्या युट्युब चॅनेलवरून स्पर्धेच्या २ दिवसात अंतिम फेरी सहित एकंदर ३१ सामने सामन्यांचे लाईव्ह प्रक्षेपण करण्यात आले. शिवाय मराठी, हिंदी आणि इंग्रजीमधून महत्वाच्या सामन्यांचे धावते समालोचन करण्यात आले. स्पर्धेतील पहिल्या विजेत्यांना भारतीय आयुर्विमा महामंडळ स्थानीय लोकाधिकार समितीचे अध्यक्ष गोपाळ शेलार, भारतीय आयुर्विमा महामंडळाचे दादर पश्चिम शाखेचे प्रमुख वासुदेव मुखर्जी, सिस्का कॅरम कंपनीचे प्रमुख अतुल मेहरा, यु एस कॅरम फेडरेशनचे अध्यक्ष अतुल भावे, मड जीन्सचे अजगर शेख, आंध्र महासभा जिमखान्याचे सचिव वेंकटेश, महाराष्ट्र कॅरम असोसिएशनचे सचिव अरुण केदार यांच्या हस्ते पहिल्या चार खेळाडूंना पारितोषिके देण्यात आली. तर इतर विजेत्यांना महाराष्ट्र कॅरम असोसिएशनचे खजिनदार अजित सावंत, उपाध्यक्ष, धनंजय साठे, यतीन ठाकूर, प्रदीप भाटकर  व सहसचिव केतन चिखले यांनी बक्षिसे दिली. समारंभाचे सूत्रसंचालन प्रसन्ना संत यांनी केले. कॅनडा, श्रीलंका व मालदीवच्या खेळाडूंचा कॅरम चे घड्याळ देऊन सत्कार करण्यात आला. महाराष्ट्राचा अपंग कॅरमपटू जग्गनाथ मेत्राणी गेली ४० वर्षे सातत्याने सर्व स्पर्धांमध्ये भाग घेत असून त्याच्या या चिकाटीला सलाम म्हणून महाराष्ट्र कॅरम असोसिएशनने त्याचा या समारंभात १ लाख रुपयाचा धनादेश देऊन विशेष सन्मान केला. जगन्नाथ मैत्रणीला एक हात नसून दुसऱ्या हाताला फक्त एक करंगळी आहे. या एका करंगळीच्या जोरावर तो गेली अनेक वर्षे कॅरमचा आनंद लुटत असून प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे.

महाराष्ट्राची दणदणीत सलामी!

३५ वी किशोर-किशोरी (सब ज्युनिअर) राष्ट्रीय खो-खो स्पर्धा महाराष्ट्राची दणदणीत सलामी! कुमार–कुमारी गटात विजयाचा जल्लोष कुरुक्षेत्रच्या मैदानावर महाराष्ट्राची विजयी झलक हरियाणा, क्री. प्र. : कुरुक्षेत्र (हरियाणा) येथील थीम पार्क मैदानावर सुरु झालेल्या ३५ व्या किशोर-किशोरी (सब ज्युनिअर) राष्ट्रीय खो-खो स्पर्धेत महाराष्ट्राच्या दोन्ही संघांनी विजयी सलामी देत आपली ताकद ठसठशीतपणे दाखवून दिली. वेग, चपळाई, अचूक डावपेच आणि भक्कम संरक्षणाच्या जोरावर महाराष्ट्राने साखळी सामन्यांत प्रतिस्पर्ध्यांना नामोहरम करत स्पर्धेत आपली विजयाची दावेदारी निर्माण केली. किशोरी गट : महाराष्ट्राची आंध्रप्रदेशवर एकतर्फी मात किशोरी गटातील एका सामन्यात महाराष्ट्राने सुरुवातीपासूनच सामना आपल्या बाजूने झुकवला. महाराष्ट्राने आंध्रप्रदेशवर एक डाव ३४ गुणांनी ४२–८ असा दणदणीत विजय मिळवला. महाराष्ट्राकडून पियुषा पानमाळकर (३.१० मि. संरक्षण), अपर्णा वर्दे (२.५० मि. संरक्षण व २ गुण), ऋतुजा सुरवसे (२.५० मि. संरक्षण व ८ गुण), वेदिका तामखडे (२.३० मि. संरक्षण व २ गुण) यांनी प्रभावी कामगिरी करत विजय साकारला. आंध्रप्रदेश कडून एस. मीना हिने एकाकी प्रतिकार केला. किशोर  गट : पश्चिम बंगालची उत्तर प्रदेशवर काठावरची सरशी दुसऱ्या किशोरी सामन्यात पश्चिम बंगालने उत्तर प्रदेशवर ५ गुण व २ मि. ५ सेकंद राखून ३९–३४ असा थरारक विजय मिळवला. पश्चिम बंगालकडून अमृता दास (१.३५ मि., नाबाद १ मि. संरक्षण व ४ गुण), अनुषा मंडल (२.२० मि. संरक्षण व ४ गुण), कुकु माझी (१ मि. व १.४० मि. संरक्षण) यांनी निर्णायक भूमिका बजावली. उत्तर प्रदेशकडून आरोही कुमारी (१.१० मि. संरक्षण व १० गुण), साक्षी कुमारी (१ मि. संरक्षण व १२ गुण) यांनी झुंज दिली. किशोर गट : महाराष्ट्राचा पॉंडेचेरीवर ठसठशीत विजय किशोर गटातील सामन्यात महाराष्ट्राने पॉंडेचेरीवर २१ गुणांनी ३५–१४ असा स्पष्ट विजय मिळवला. महाराष्ट्राकडून विक्रमसिंग राठोड (नाबाद २.२० मि. संरक्षण व २ गुण), वेदांत गायकवाड (१२ गुण), कर्तव्य गाडेकर (२.१० मि. संरक्षण) यांनी दमदार कामगिरी नोंदवत संघाला विजय मिळवून दिला. पॉंडेचेरी कडून आर. विश्वनाथ (१ मि. संरक्षण), एम. दिबिनेश (१ मि. संरक्षण) यांनी प्रयत्न केले. विजयाचा आत्मविश्वास, पुढील लढतींकडे लक्ष पहिल्याच दिवशी महाराष्ट्राच्या किशोर-किशोरी (सब ज्युनिअर) संघांनी दाखवलेला आक्रमक आणि शिस्तबद्ध खेळ पाहता पुढील साखळी सामन्यांतही महाराष्ट्राकडून अशीच दमदार कामगिरी अपेक्षित आहे. राष्ट्रीय पातळीवर महाराष्ट्राची खो-खो परंपरा अधिक बळकट होत असल्याचे हे सामने ठळकपणे अधोरेखित करतात.

महाराष्ट्र ओपन कॅरम स्पर्धेत तेलंगणाच्या के श्रीनिवासची आगेकूच

महाराष्ट्र ओपन कॅरम स्पर्धेत तेलंगणाच्या के श्रीनिवासची आगेकूच महाराष्ट्र कॅरम असोसिएशन आयोजित भारतीय आयुर्विमा महामंडळ पुरस्कृत ३ री महाराष्ट्र ओपन कॅरम चॅलेंजर्स ट्रॉफी स्पर्धेच्या उपउपांत्य फेरी स्पर्धेच्या सामन्यात तीन सेटपर्यंतच्या…

सी. एन. फाउंडेशनतर्फे शहीद जवानांना मॅरेथॉनद्वारे श्रद्धांजली

सी. एन. फाउंडेशनतर्फे शहीद जवानांना मॅरेथॉनद्वारे श्रद्धांजली कल्याण: प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून सी. एन. पाटील फाउंडेशन व फेडरेशन ऑफ ऑरगन डोनेशन तर्फे शहीद जवान संदीप पांडुरंग गायकर व इतर शहीद…

एमजेएससी ट्रॉफी कॅरम स्पर्धेत शालेय ४० खेळाडूंमध्ये रविवारी चुरस

एमजेएससी ट्रॉफी कॅरम स्पर्धेत शालेय ४० खेळाडूंमध्ये रविवारी चुरस मुंबई : माहीम ज्युवेनाइल स्पोर्ट्स क्लब-एमजेएससी व आयडियल स्पोर्ट्स अकॅडमी आयोजित शालेय मुलामुलींच्या विनाशुल्क कॅरम स्पर्धेत एमजेएससी ट्रॉफीसाठी १ फेब्रुवारी रोजी…

ट्रॅक अँड फिल्ड मास्टर्सची विजेतेपदाची हॅटट्रिक

ट्रॅक अँड फिल्ड मास्टर्सची विजेतेपदाची हॅटट्रिक ठाणे: ठाणे जिल्हा ॲथलेटिक्स संघटना आयोजित सब ज्युनिअर गटाच्या ठाणे जिल्हा अजिंक्यपदाच्या मैदानी स्पर्धेत तीन नवीन जिल्हा विक्रमासह ट्रॅक अँड फिल्ड मास्टर्स संघाने सर्वसाधारण…

महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनच्या वतीने

महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनच्या वतीने ३१ जानेवारीला अजितदादा पवार यांची शोकसभा मुंबई:-महाराष्ट्र राज्य कबड्डी असो. च्या वतीने कबड्डीचे आधारवड संघटनेचे माजी अध्यक्ष स्व. अजितदादा पवार यांची शोकसभा आयोजित करण्यात आली आहे. संघटनेचे मुंबई, दादर, छत्रपती शिवाजी महाराज मैदान(शिवाजी पार्क)…

 महाराष्ट्राच्या महिला उप उपांत्य फेरीत

७२वी वरिष्ठ महिला राष्ट्रीय कबड्डी स्पर्धा – तेलंगणा, २०२६. महाराष्ट्राच्या महिला उप उपांत्य फेरीत मुंबई:- महाराष्ट्राच्या महिला संघाने “७२वी वरिष्ठ महिला राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेत” उप उपांत्य फेरी गाठली. तेलंगणा येथील गच्ची बोवली बंदिस्त क्रीडा संकुल येथे सुरु असलेल्या उपउपांत्यापूर्व सामन्यात महाराष्ट्राने आज गोवा संघाला ४२-३६ असे नमविले. सुरुवातीला थोडी झटपट पहावयास मिळाली. पण पहिला लोण देत महाराष्ट्राने १९-१० अशी आघाडी घेतली. विश्रांतीला महाराष्ट्राकडे २५-१४ अशी आघाडी होती. विश्रांती नंतर आणखी एक लोण देत महाराष्ट्राने आपली आघाडी ३२-१५ अशी वाढविली. या नंतर गोव्याने गतीमान खेळ करीत महाराष्ट्रावर लोण देत ३०-४० अशी आघाडी कमी केली. शेवटी महाराष्ट्राने ६ गुणांनी बाजी मारली. आम्रपाली गलांडे, याशिका पुजारी, निकिता पडवळ याच्या दमदार चढाया त्यांना समृद्धी मोहिते, समरीन बुरोंडकर, ज्यूली मिस्कीटा यांची मिळालेली पकडीची साथ यामुळे महाराष्ट्राने हा विजय मिळविला. महाराष्ट्राचा या स्पर्धेत ई गटात समावेश होता. त्या गटात छत्तीसगड, विदर्भ व केरळ हे अन्य संघ होते. महाराष्ट्राने प्रथम विदर्भला ५७-२० असे, त्या नंतर छत्तीसगडला ४२-१९ असे, तर शेवटी केरळला ५७-११ असे पराभूत करीत या गटात अव्वल स्थान मिळविले होते.

महाराष्ट्र ओपन कॅरम चॅलेंजर्स ट्रॉफी प्रारंभ  

महाराष्ट्र ओपन कॅरम चॅलेंजर्स ट्रॉफी प्रारंभ मुंबई: महाराष्ट्र कॅरम असोसिएशन आयोजित भारतीय आयुर्विमा महामंडळ पुरस्कृत ३ री महाराष्ट्र ओपन कॅरम चॅलेंजर्स ट्रॉफी आज सुरु झाली. महाराष्ट्राचे लाडके क्रीडा प्रेमी उपमुख्यमंत्री व महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनचे अध्यक्ष अजित पवार यांच्या दुःखद निधनामुळे कोणताही गाजावाजा न करता अजित पवार यांना महाराष्ट्र कॅरम असोसिएशन व सर्व खेळाडूंनी भावपूर्ण श्रद्धांजली दिली व स्पर्धा सुरु करण्यात आली. भारतीय आयुर्विमा महामंडळ दादर शाखेचे प्रमुख वासुदेव मुखर्जी व सिस्का कॅरम कंपनीचे अतुल मेहरा यांनी कॅरम बोर्डवर एक डाव खेळून औपचारिक उदघाटन केले. बँक ऑफ इंडिया, आय डी बी आय बँक, युनियन बँक, बँक ऑफ महाराष्ट्र, मड जीन्स व बार्बेक्यू नेशन यांचे सहकार्य लाभलेल्या या स्पर्धेला सकाळी ९ वाजता सुरवात झाली. पहिल्या फेरीतच प्रेक्षकांना चुरस बघायला मिळाली. महाराष्ट्रच्या डॉ अनिल तायशेटेने पहिल्या सत्रात आंतर राष्ट्रीय कॅरमपटू व राष्ट्रीय विजेत्या कर्नाटकच्या झहीर पाशाला पहिला सेट १७-११ असे हरवून खळबळ .माजवली. परंतु आक्रमक खेळाच्या जोरावर झहिरने दुसरा व तिसरा सेट २५-०, २५-५ असा सहज हरवून आपले आव्हान कायम ठेवले. खुली एकेरी पहिल्या फेरीचे इतर निकाल पुढील प्रमाणे ओमकार टिळक ( महाराष्ट्र ) वि वि रघुनाथ वाघपंजे ( महाराष्ट्र ) १३-२७, १७-१३, १५-५ आर अरोक्यराज ( तामिळनाडू ) वि वि इरफान खान ( महाराष्ट्र ) १८-१०, १९-६ रिंकी कुमारी ( महाराष्ट्र ) वि वि जगन्नाथ मैत्रानी ( महाराष्ट्र ) २५-०, २२-० प्राजक्ता नारायणकर ( महाराष्ट्र ) वि वि सूर्यकांत मोरे ( महाराष्ट्र ) २०-४, २३-१० रीतिकेश वाल्मिकी ( महाराष्ट्र ) वि वि अजगर शेख ( महाराष्ट्र ) ४-२२, १६-१४, १७-१५ खातीम खलील ( मालदीव ) वि वि रियाझुद्दिन शेख ( महाराष्ट्र ) २५-१-२५-० के श्रीनिवास ( तेलंगाना ) वि वि जितेंद्र राठोड ( महाराष्ट्र ) २०-५, २५-५ संगीर अहमद ( उत्तर प्रदेश ) वि वि अब्दुल कयूम खान ( महाराष्ट्र ) २५-०, २५-० काजल कुमारी ( महाराष्ट्र ) वि वि सतीश खरात ( महाराष्ट्र ) १४-१०, १८-२ इब्राहिम हुजान अली ( मालदीव ) वि वि उदय घाडीगावकर ( महाराष्ट्र ) २४-९, १६-२ विशाल परमार ( महाराष्ट्र ) वि वि शेख युसूफ ( तेलंगना ) १६-११, १९-० यु नरेश ( तेलंगाना ) वि वि आकाश मुरल ( महाराष्ट्र ) २१-०, २५-० वी आकाश ( ओरिसा ) वि वि हर्ष बारिया ( महाराष्ट्र ) २५-०, २३-९

‘एमआयटी-एडीटी’ विद्यापीठाने राखले विजेतेपद

विश्वनाथ स्पोर्ट मीट – २०२६ ‘एमआयटी-एडीटी’ विद्यापीठाने राखले विजेतेपद बी.के. बिर्ला रात्र महाविद्यालय दुसरे, तर एम.ई.एस. गरवारे महाविद्यालय तिसऱ्या क्रमांकावर पुणे: आठव्या विश्वनाथ स्पोर्ट मीट (व्हीएसएम–२०२६) या वर्षातील सर्वांत मोठ्या राष्ट्रीय आंतरमहाविद्यालयीन/आंतरविद्यापीठीय क्रीडा स्पर्धेत यजमान एमआयटी आर्ट, डिझाईन व टेक्नॉलॉजी विद्यापीठ (एमआयटी-एडीटी), विश्वराजबाग, पुणेच्या खेळाडूंनी जबरदस्त कामगिरी करत तब्बल १० सुवर्ण व २४ रौप्यपदकांसह पदकतालिकेत वर्चस्व राखत स्पर्धेचे विजेतेपद कायम ठेवले. एमआयटी-एडीटी विद्यापीठानंतर मुंबईतील बी.के. बिर्ला रात्र महाविद्यालयाच्या संघाने एकूण ५ सुवर्ण व ४ रौप्य पदकांसह दुसरा क्रमांक पटकाविला, तर पुण्यातील एम.ई.एस. गरवारे महाविद्यालयाने ५ सुवर्ण व ३ रौप्य पदकांसह तिसरा क्रमांक मिळविला. एमआयटी-एडीटी विद्यापीठाने गतवर्षीही विजेतेपद पटकाविले होते. भारत सरकारच्या फिट इंडिया चळवळीच्या प्रचारासाठी क्रीडा भारती व बँक ऑफ इंडिया यांच्या प्रमुख सहयोगाने ही स्पर्धा यशस्वीरित्या पार पडली. तब्बल १५ क्रीडा प्रकारांत, १५०हून अधिक शिक्षण संस्थांमधील ६,००० पेक्षा अधिक विद्यार्थ्यांच्या सहभागाने झालेल्या या स्पर्धेचे बक्षीस वितरण पद्मश्री व अर्जुन पुरस्कारप्राप्त तसेच रोईंगमधील आशियाई सुवर्णपदक विजेते कॅप्टन बजरंग लाल ताखर (व्हीएसएम), ऑलिम्पियन व अर्जुन पुरस्कार विजेते जलतरणपटू विरधवल खाडे, तसेच मेजर ध्यानचंद पुरस्कारप्राप्त रोवर स्मिता शिरोळे-यादव, विद्यापीठाचे कार्याध्यक्ष तथा प्र-कुलगुरू प्रा. डॉ. मंगेश कराड, कुलगुरू प्रा. डॉ. राजेश एस., प्र-कुलगुरू डॉ. रामचंद्र पुजेरी, डॉ. मोहित दुबे, कुलसचिव डॉ. महेश चोपडे, विद्यार्थी कल्याण विभागाचे संचालक डॉ. सुराज भोयार, क्रीडा संचालक प्रा. पद्माकर फड आदी मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडले. यावेळी विद्यार्थ्यांना १० लाख रुपयांपर्यंत रोख पारितोषिके, पदके व करंडक प्रदान करण्यात आले. बॅडमिंटन पुरुष गटाच्या अंतिम सामन्यात डी.वाय. पाटील आंतरराष्ट्रीय विद्यापीठाने यजमान एमआयटी-एडीटी विद्यापीठाचा ३–२ असा पराभव करून सुवर्णपदक पटकाविले. महिला गटात विश्वकर्मा इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीने एमआयटी-एडीटी विद्यापीठाचा २–१ अशा फरकाने पराभव करत सुवर्णपदक जिंकले. बुद्धिबळ पुरुष गटात पार्थ बढेकरच्या कामगिरीच्या जोरावर एमआयटी विश्वशांती विद्यापीठाने यजमान एमआयटी-एडीटी विद्यापीठाचा, तर महिलांतही एमआयटी विश्वशांती विद्यापीठाने यजमान संघाचा पराभव करून सुवर्णपदक पटकाविले. बास्केटबॉल पुरुषांच्या अंतिम सामन्यात एमआयटी-एडीटी विद्यापीठाच्या संघाने एमआयटी विश्वशांती विद्यापीठाचा, तर महिलांत एमआयटी विश्वशांती विद्यापीठाच्या संघाने एमआयटी-एडीटी संघाचा पराभव करत सुवर्ण कामगिरीची नोंद केली. फुटबॉल स्पर्धेच्या पुरुष गटाच्या अंतिम सामन्यात स्पायसर विद्यापीठाने नेस वाडिया महाविद्यालय, पुणे यांचा ३–२ असा पराभव केला. महिलांत एमआयटी-एडीटी विद्यापीठाने एमआयटी विश्वशांती विद्यापीठाचा ३–१ असा पराभव केला. यामध्ये अंजली कामठे हिला सर्वोत्तम खेळाडू घोषित करण्यात आले. कबड्डी पुरुष गटात भारती विद्यापीठाने एमआयटी-एडीटी विद्यापीठाचा, तर महिलांत सरहद महाविद्यालयाने एमआयटी-एडीटी संघाचा पराभव करत सुवर्ण कामगिरी केली. विश्वजीत सरवले व ज्ञानेश्वर खळदकर हे स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडू ठरले. अत्यंत रोमांचक ठरलेल्या महिला खो-खो अंतिम सामन्यात एम.ई.एस. गरवारे महाविद्यालयाने डी.वाय. पाटील विद्यापीठ, अंबी यांचा, तर पुरुष गटात एमआयटी-एडीटी विद्यापीठाने प्रा. रामकृष्ण मोरे महाविद्यालय, निगडी यांचा पराभव केला. श्वेता नवले व निखिल परांदे हे सर्वोत्तम खेळाडू ठरले. टेनिसच्या दोन्ही गटांत एनडीए, खडकवासला व एमआयटी-एडीटी विद्यापीठाने विजेतेपद पटकाविले, तर व्हॉलीबॉलमध्ये भारती विद्यापीठ, पुणे आणि एमआयटी विश्वशांती विद्यापीठाने सुवर्ण कामगिरीची नोंद केली. वॉटर पोलो प्रकारात पुरुष गटात मुंबई विद्यापीठ, तर महिलांत एमआयटी-एडीटी विद्यापीठाचे वर्चस्व राहिले.…