Category: क्रीडा

 मैदान गाजवलं! महाराष्ट्राचा झंझावात प्रतिस्पर्ध्यांची दाणादाण!

५८ वी वरिष्ठ राष्ट्रीय अजिंक्यपद खो-खो स्पर्धा मैदान गाजवलं! महाराष्ट्राचा झंझावात प्रतिस्पर्ध्यांची दाणादाण! काझीपेठच्या रेल्वे ग्राउंडवर थरारक लढती; विजयी संघांची दिमाखात पुढील फेरीत झेप काझीपेठ (तेलंगणा):  येथील रेल्वे ग्राउंडवर सुरू…

 घुफ्रान – आकांक्षा विजयी                   

जॉली जिमखाना कॅरम स्पर्धा घुफ्रान – आकांक्षा विजयी विद्याविहार (पश्चिम) येथील घाटकोपर जॉली जिमखान्याच्या वतीने तसेच महाराष्ट्र कॅरम असोसिएशन व मुंबई उपनगर जिल्हा कॅरम संघटनेच्या मान्यतेने ३ री घाटकोपर जॉली…

 कल्याणच्या हर्षिणी चव्हाणला सुवर्णपदक

अस्मिता खेलो इंडिया युथ वेटलिफ्टिंग अजिंक्य स्पर्धा कल्याणच्या हर्षिणी चव्हाणला सुवर्णपदक कल्याण : अस्मिता खेलो इंडिया राष्ट्रीय युथ वेटलिफ्टिंग अजिंक्यपद स्पर्धेत महाराष्ट्राच्या हर्षिणी प्रशांत चव्हाण हिने दमदार कामगिरी करत सुवर्णपदक…

 ५१व्या कुमार राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेकरिता महाराष्ट्राचा संघ जाहीर.

५१व्या कुमार राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेकरिता महाराष्ट्राचा संघ जाहीर. परभणीच्या अतुल जाधवकडे संघाच्या नेतृत्वाची धुरा. मुंबई:- महाराष्ट्र राज्य कबड्डी असोशीएशनने ५१व्या कुमार गट राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेकरिता आपला संघ घोषित केला. परभणीच्या…

नववर्षातील ठाणे जिल्ह्यातील उभरत्या खेळाडूंसाठी पहिली मोठी जिल्हास्तरीय लढत

योनेक्स सनराईज ठाणे जिल्हा रँकिंग बॅडमिंटन स्पर्धा नववर्षातील ठाणे जिल्ह्यातील उभरत्या खेळाडूंसाठी पहिली मोठी जिल्हास्तरीय लढत ठाणे शहर व जिल्हा बॅडमिंटन असोसिएशन यांच्या वतीने आयोजित यॉनेक्स सनराईज ठाणे जिल्हा रँकिंग…

 जॉली जिमखाना कॅरम – घुफ्रानची विश्वविजेत्या प्रशांतवर मात

जॉली जिमखाना कॅरम – घुफ्रानची विश्वविजेत्या प्रशांतवर मात मुंबई: विद्याविहार ( पश्चिम ) येथील घाटकोपर जॉली जिमखान्याच्या वतीने तसेच महाराष्ट्र कॅरम असोसिएशन व मुंबई उपनगर जिल्हा कॅरम संघटनेच्या मान्यतेने ३…

मैदान पेटलं, श्वास रोखले! महाराष्ट्रासह बलाढ्य संघांची दिमाखदार आगेकूच

५८ वी वरिष्ठ राष्ट्रीय अजिंक्यपद खो-खो स्पर्धा मैदान पेटलं, श्वास रोखले! महाराष्ट्रासह बलाढ्य संघांची दिमाखदार आगेकूच काजीपेठ (तेलंगणा): रेल्वे ग्राउंडवर खेळाडू उतरले आणि मैदानावर अक्षरशः आग ओकली गेली! वेग, चपळाई,…

२ री खेलो इंडिया बीच स्‍पर्धा, दीव २०२६

२ री खेलो इंडिया बीच स्‍पर्धा, दीव २०२६ दीवच्‍या खेलो इंडिया मैदानात परभणीच्‍या अक्षय कोटलवारांचे कौतुक दीव:  खेलो इंडिया बीच स्‍पर्धा सलग दुसऱ्या वर्षी दीवमधील घोघला समुद्र किनाऱ्यावर यशस्‍वी पार पडली. या यशामागे परभणीचा मराठमोळा अक्षय कोटलवारांचे मेहनत दिसून आली. यामुळेच साऱ्या देशभरात कोटलवार यांच्‍या संयोजनाचे कौतुक होत आहे. मूळचे परभणी येथील अक्षय कोटलवार हे सध्या  दीव व दमण शासनामधील युवा क्रीडा अधिकारी आहेत.  वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून खेलो इंडिया बीच स्‍पर्धेची संकल्‍पना त्‍यांच्‍यासमोर येताच भव्‍य आयोजनात ध्येय पाहिले. आणि ते यशस्‍वी करून दाखवलीही.  कोटलवार हे  राष्ट्रीय टेबलटेनिसचे खेळाडू असून दीव येथे आल्‍यानंतर त्‍यांनी बीच स्‍पर्धेसाठी प्रत्‍यक्ष मैदानात उतरून अनोखे आयोजनाचा अध्याय लिहिला आहे. जानेवारी २०२४ मध्ये भारतातील पहिल्या मल्टी-स्पोर्ट्स बीच गेम्ससाठी नोडल अधिकारी म्हणून अक्षय कोटलवार यांनी जबाबदारी यशस्‍वी पेलली. याबाबत बोलताना कोटलवार म्‍हणाले की, पहिल्‍या स्‍पर्धेत काम करण्याचा अनुभव माझ्यासाठी अत्यंत अभिमानास्पद आणि अविस्मरणीय ठरला.  या ऐतिहासिक क्रीडा स्पर्धेचा उल्लेख माननीय पंतप्रधान  नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या मन की बात कार्यक्रमात केल्यामुळे संपूर्ण टीमचा उत्साह द्विगुणित झाला.पहिल्‍सा यशस्वी आयोजनानंतर खेलो इंडिया योजनेअंतर्गत खेलो इंडिया बीच गेम्सच्या दुसऱ्या आवृत्तीचे आयोजन करण्याची जबाबदारी आम्हाला मिळाली. दुसऱ्या पर्वातही आम्‍ही यशस्‍वी ठरलो. स्‍पर्धा संयोजनाच्‍या प्रवासात नैसर्गिक वाळूवरील खेळ, बदलते हवामान, समुद्रकिनारी आवश्यक पायाभूत सुविधा उभारणे, खेळाडूंची सुरक्षितता आणि लॉजिस्टिक्स यांसारखी अनेक आव्हाने समोर आली. मात्र, टीमवर्क, योग्य नियोजन आणि प्रशासनाच्या सहकार्यामुळे आम्ही ही सर्व आव्हाने यशस्वीरीत्या पार केल्‍याचेही सांगून कोटलवार पुढे म्‍हणाले की हा अनुभव केवळ एक प्रशासकीय जबाबदारी नव्हता, तर भारतात बीच स्पोर्ट्सच्या विकासासाठी एक महत्त्वपूर्ण टप्पा ठरला. गतवर्षीच्‍या स्‍पर्धेत समरोपाच्‍या आधीच्‍या रात्री भरतीमुळे साऱ्या  मैदानात पाणी भरून आले होते. बीच सॉकरचा अंतिम लढत होणार की नाही असो सवाल उपस्‍थित झाला होता.  तेव्‍हा रात्री २ ते पहाटे ५ पर्यंत उभे राहून पाणी काढण्यासाठी अक्षय कोटलवार यांच्‍या टीमने शर्थीचे प्रयत्‍न करीत नव्‍याने मैदान तयार केले. सॉकर लढत खेळवून स्‍पर्धा यशस्‍वी करून दाखवली होती. यंदाही स्‍पर्धा काळात  महाराष्ट्रसह संपूर्ण देशातून आलेल्‍या खेळाडूंना अक्षय कोटलवार विशेष पाहुणचार देत होते. खेळाडूंची गैरसोय होऊ नये  स्‍वतः  मैदानात उपस्‍थित होते. खेलो इंडिया बीच स्‍पर्धेच्‍या यशानंतर आशियाई बीच स्‍पर्धा दीवमध्ये घेण्यासाठी कोटलवार यांचे प्रयत्‍नशील आहेत.

२ री खेलो इंडिया बीच स्‍पर्धा, दीव २०२६

२ री खेलो इंडिया बीच स्‍पर्धा, दीव २०२६ खेलो इंडिया बीच स्पर्धेत महाराष्ट्राची पदक अष्टमी, सागरी जलतरणात उपविजेतेपद दीव ः  खेलो इंडिया बीच स्‍पर्धेत महाराष्ट्राने 3 रौप्य,  5 कांस्यपदकांसह 8 पदकांची लयलटू केली आहे. साताऱ्याच्‍या दीक्षा यादव पदकाचा डबल धमाका केला. दीक्षाच्‍या १ रौप्‍य व १ कांस्य पदकामुळे सागरी जलतरणात महाराष्टाने उपविजेतेपद पटकावले. दीवमधील अरबी समुद्रातील  सागरी जलतरणाचा महाराष्ट्राच्‍या मुलींनी पदकाचा करिश्मा घडविला. साताऱ्याच्‍या दीक्षा यादवे ५ किमी शर्यतीत रौप्‍य तर १० किमी शर्यतीत कांस्य पदक पटकावले. सलग दुसऱ्या वर्षी दीक्षाने दोन्‍ही शर्यतीत पदकाचा पराक्रम केला आहे. या यशामुळे सागरी जलतरणातील महिलांचे  उपविजेतपद महाराष्ट्राने संपादन केले. कर्नाटकला विजेतेपदाची तर महाराष्ट्राला उपविजेतेपदाचा करंडक पथकप्रमुख नवनाथ फरताडे  यांच्‍या हस्‍ते देण्यात आला. दीवमधील घोघला समुद्र किनाऱ्यावर  दुसर्‍या खेलो इंडिया बीच स्‍पर्धेचा थरार रंगला.  सागरी जलतरणाच्या जोरावर कर्नाटकाने सर्वसाधारण विजेतेपदाचा मान पटकविला. तामिळनाडूने स्‍पर्धेत दुसरे तर मणिपूरने तिसरे स्थान संपादन केले. या तिन्‍ही संघानी प्रत्‍येकी 3 सुवर्ण, 2 रौप्य पदके जिंकल्‍याने सर्वसाधारण विजेतेपदाचा फैसला कांस्य पदकावर घेण्यात आला. 3 सुवर्ण, 2 रौप्य व 6 कांस्यपदकाची लयलूट करीत कर्नाटकाने  स्‍पर्धेत बाजी मारली. स्‍पर्धेत महाराष्ट्राचे ७७ जणांचे पथक सहभागी झाले होते.  या्मध्ये ३१ पुरूष व २८ महिला खेळाडूंचा समावेश होता. स्‍पर्धेत बीच सॉकर, बीच कबड्डी, बीच पेंचक सिलट, सागरी जलतरण महाराष्ट्राच्‍या खेळाडूंनी चमकदार कामगिरीचे प्रदर्शन घडवले. महाराष्ट्राने 3 रौप्य,  5 कांस्यपदकांसह 8 पदकांची कमाई केली आहे. बीच पेंचक सिलट स्‍पर्धेत २ रौप्‍य व १ कांस्य पदके महाराष्ट्राच्‍या नावापुढे झळकली. बीच कबड्डी दोन्‍ही संघाना तर बीच सॉकरमध्ये पुरूष संघाला कांस्य पदकावर समाधान मानावे लागले. सर्व पदकविजेत्‍यांचे क्रीडा आयुक्‍त शीतल तेली-उगले, सहसंचालक सुधीर मोरे, उपसंचालक उदय जोशी, उपसंचालक संजय सबनीस यांनी अभिनदंन केले आहे. सर्व पदकविजेत्‍यांचे कौतुक करीत सहसंचालक सुधीर मोरे यांनी सांगितले की खेलो इंडिया बीच स्पर्धा ही खेळाडूंसाठी मोठी पर्वणी ठरली. स्‍पर्धेच्‍या दुसऱ्या पर्वातही महाराष्ट्राची चमकदार कामगिरी केली आहे.

जॉली जिमखाना कॅरम – विश्व् विजेत्यांची आगेकूच

जॉली जिमखाना कॅरम – विश्व् विजेत्यांची आगेकूच विद्याविहार ( पश्चिम ) येथील घाटकोपर जॉली जिमखान्याच्या वतीने तसेच महाराष्ट्र कॅरम असोसिएशन व मुंबई उपनगर जिल्हा कॅरम संघटनेच्या मान्यतेने ३ री घाटकोपर जॉली जिमखाना राज्य मानांकन कॅरम स्पर्धेच्या तिसऱ्या फेरीत मुंबई उपनगरच्या विश्व् विजेत्या संदीप दिवेने तीन सेटपर्यंत रंगलेल्या अटीतटीच्या लढती नंतर मुंबई उपनगरच्या जावेद शेखवर पहिला सेट १९-२० असा गमावल्यानंतर दुसरा व तिसरा सेट अनुक्रमे २५-१४ व २५-८ असा जिंकून पाचव्या फेरीत प्रवेश केला. तिसऱ्या सेटमध्ये चौथ्या बोर्डात संदीपने ब्लॅक स्लॅम नोंदवला. दुसरीकडे मुंबईच्या विश्व् विजेत्या प्रशांत मोरेने मुंबईच्या जाधवचा २५-०, २५-० असा धुव्वा उडवत आगेकूच केली. स्पर्धेच्या चौथ्या फेरी अखेरीस २० व्हाईट स्लॅम व २ ब्लॅक स्लॅमची नोंद करण्यात आली आहे. पुरुष एकेरी चौथ्या फेरीचे निकाल  पुढील प्रमाणे. झैदी अहमद फारुकी ( ठाणे ) वि वि अनंत सुर्वे ( मुंबई ) २५-८, २५-६ विकास धारिया ( मुंबई ) वि वि अजगर शेख ( मुंबई उपनगर ) २५-१, २५-१ रवींद्र हांगे ( पुणे ) वि वि मिहीर शेख ( मुंबई ) १९-१३, २५-६ स्वप्नील गोलतकर ( मुंबई ) वि वि जयचंद बेतवंशी ( मुंबई ) २५-१९, २३-१२ संजय मोहिते ( मुंबई ) वि वि  कुणाल राऊत ( मुंबई ) २३-१९, २५-२० महम्मद घुफ्रान ( मुंबई ) वि वि हिदायत अन्सारी ( मुंबई ) २०-३, २५-० योगेश परदेशी ( पुणे ) वि वि नरसींग राव सकारी ( मुंबई उपनगर ) २५-१५, २५-४ प्रफुल मोरे ( मुंबई ) वि वि विश्वजीत भावे ( ठाणे ) २५-१०, २५-४ निलांश चिपळूणकर ( मुंबई ) वि वि मंगेश पंडित ( मुंबई उपनगर ) २५-४, २५-१२ संदीप देवरुखकर ( मुंबई ) वि वि अश्रफ खान ( रायगड ) २२-९, २५-७ दिनेश केदार ( मुंबई ) वि वि सुधीर शिंदे ( ठाणे ) २५-०, २१-१० दीपक गनिका ( ठाणे ) वि वि हेमंत पांचाळ ( मुंबई ) ११-२५, १९-१६, १७-१२