Category: Blog

Your blog category

मुख्यमंत्री शिंदेनी शब्द पाळला; मुंबईतील पाचही टोल माफ

स्वाती घोसाळकर मुंबई: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबई आणि ठाणेकरांना दिलेला शब्द पाळलाय. मुंबईतील एण्ट्री फ्री करतानाच मुंबईतील पाचही टोलनाके हलक्या वाहनांना माफ करण्यात आले आहे. शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा मोठा…

सिद्दीकींना मारणाऱ्यांकडे २८ काडतूस सापडली

मरीन लाईन्स येथील बडा कब्रस्तान येथे बाबा सिद्दीकी यांच्या पार्थिवावर  शासकीय इतमामात दफनविधी करण्यात आले. यावेळी बाबा सिद्दीकी यांचे पुत्र झिशान सिद्दीकींचे सांत्वन करण्यासाठी राष्ट्रवादीचे अध्यक्ष अजित पवार, सलमान खान आणि अनेक…

ई रिक्षाच्या संख्येत वाढ करावी

स्थानिकांची मागणी माथेरान :माथेरान मध्ये ई रिक्षा सुरू झाल्यापासून या सेवेचा लाभ समस्त माथेरान कर घेत असून यापूर्वी सुरुवातीला ज्यांनी ज्यांनी ह्या सेवेला प्रचंड प्रमाणात विरोध दर्शवला होता त्याच मंडळींनी…

लाडक्या बहिणींना दिवाळी ‘बोनस’ !

ठाणे : यंदाच्या दिवाळी आधीच राज्यातील २ कोटी ३० महिलांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिवाळी बोनस दिलाय. लाडक्या बहिणींच्या खात्यात ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचा ३००० रुपयांचा हप्ता जमा अॅडव्हान्स जमा झाल्याची माहिती मुख्यमंत्री…

फाऊंटन ते गायमुख रस्ता ६० मीटर रुंद होणार -प्रताप सरनाईक

अनिल ठाणेकर /अरविंद जोशी मिरा-भाईंदर महानगरपालिकेच्या मंजूर व प्रारुप विकास योजनेतील फाऊंटन ते गायमुख हा प्रस्तावित ३०.०० मी, रुंद रस्ता ६०.०० मी. रुंद करणेबाबत महाराष्ट्र राज्य सरकारच्या नगरविकास विभागाने काल…

कळव्यात विद्यार्थ्यांना अन्नातून विषबाधा

 ४० जणांवर रुग्णालयात उपचार सुरु   ठाणे : कळवामधील मनिषा नगर भागातील सहकार विद्या प्रसारक मंडळ शाळेतील इयत्ता पाचवी आणि सहावीत शिक्षण घेत असलेल्या तब्बल ४० विद्यार्थ्यांना अन्नातून विषबाधा झाल्याची…

पीएम विश्वकर्मा योजनेचा साडेसहा लाख कुटुंबांना फायदा

पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या हस्ते पीएम विश्वकर्मा योजनेतील लाभांचे वितरण करण्यात आले. यावेळी मा. राज्यपाल सीपी राधाकृष्णनजी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेजी, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, केंद्रीय मंत्री जितनराम मांझी, केंद्रीय राज्यमंत्री चौधरी जयंत सिंह, राज्य सरकारचे मंत्री, आमदार व खासदार उपस्थित…

ठाण्यातील केबीपी महाविद्यालयात कौशल्य विकासाचे धडे!

भाजपाचे आमदार निरंजन डावखरे यांच्या हस्ते उद्घाटन   ठाणे : गरजू विद्यार्थ्यांना कौशल्य विकासाचे पारंपरिक पद्धतीबरोबरच आधुनिक पद्धतीचे शिक्षण मिळण्यासाठी महत्वाचे आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्र ठाण्यातील कर्मवीर भाऊराव पाटील…

ठामपाच्या ५७२ कोटी रुपयांच्या नवीन इमारतीच्या आवारात नागरीहीताच्या आंदोलनांसाठी जागा द्या –  नितीन देशपांडे

अनिल ठाणेकर   ठाणे : महापालिकेच्या ५७२ कोटी रुपयांची नवीन प्रस्तावित इमारतीच्या आवारात, नागरीहीताच्या आंदोलनांसाठी जागा उपलब्ध करुन द्या. अशी मागणी धर्मराज्य पक्षाचे उपाध्यक्ष नितीन देशपांडे यांनी महापालिका आयुक्त सौरभ राव यांच्याकडे केली आहे. ठाणे महापालिकेची नवीन प्रस्तावित इमारत, रेमण्ड कंपनीच्या राखीव भूखंडावर उभारण्यास महाराष्ट्र शासनाने मंजुरी दिलेली आहे. वर्ष-१९८२ मध्ये ठाणे महानगरपालिकेची स्थापना झाल्यानंतर, वर्ष-१९८९ मध्ये, पाचपाखाडी येथील सध्याची इमारत कार्यान्वित झाली. मात्र, नंतरच्या काळात ठाणे शहराची लोकसंख्या प्रचंड वाढल्याने, विद्यमान इमारतीमधून प्रशासकीय कारभार चालविणे गैरसोयीचे ठरु लागले. तसेच, विभागनिहाय कामकाज करण्यासाठी, इमारत अपुरी पडू लागली. याच पार्श्वभूमीवर, ठाणे महापालिकेच्या ताब्यात असलेल्या ८ एकरच्या भूखंडावर, तब्बल ३२ मजली भव्य इमारत उभारण्यास महाराष्ट्र शासनाने मान्यता दिलेली आहे. सुमारे ५७२ कोटी रुपयांची निविदा याकामी काढण्यात येऊन, शासनाकडून २५० कोटी रुपये मंजूरही करण्यात आलेले आहेत. आजमितीस ठाणे शहराची लोकसंख्या ही, २० लाखांहून अधिक असून, नगरसेवकांची संख्या १३१ एवढी झालेली आहे. एकंदरीतच ठाणे महापालिका प्रशासनाचा कारभार हा, पूर्वीपेक्षा अधिक विस्तारित झालेला असल्याकारणाने, ठाणे शहराचे कामकाज चालविण्यासाठी प्रशस्त इमारतीची आवश्यकता होतीच, ती आता नवीन प्रस्तावित प्रशासकीय इमारतीच्या माध्यमातून साध्य होईल. याच अनुषंगाने, ‘धर्मराज्य पक्षा’च्या वतीने ठाणे महानगरपालिकेचे आयुक्त सौरव राव यांना पत्र पाठविण्यात आले असून, पक्षाचे उपाध्यक्ष नितीन देशपांडे यांनी, आपल्या पत्रात आयुक्तांना सूचित केले आहे की, ठाणे महापालिकेची प्रस्तावित इमारत जरी भव्यदिव्य स्वरुपात उभारण्यात येत असली तरी, प्रशासनाचा वादग्रस्त कारभार, विकासकामांचा खोळंबा, नागरी सोयी-सुविधांचा अभाव, भ्रष्टाचार आणि इतर मुलभूत प्रलंबित प्रश्न उपस्थित राहणारच आहेत. परिणामी, करदाते-कष्टकरी ठाणेकर नागरिक व सामाजिक/राजकीय संस्था-संघटनांना, प्रशासनाच्या गैरकारभाराविरोधात आवाज उठविण्याचा, प्रसंगी प्रशासनाविरोधात आंदोलन करण्याचा घटनादत्त अधिकार आहे. तसा अधिकारच भारतीय लोकशाहीने सर्वसामान्य नागरिकांना दिलेला आहे. तोच अधिकार अबाधित राखण्यासाठी आणि जनतेचा आवाज, सत्ताधारी व प्रशासकीय व्यवस्थेपर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने, आंदोलनकर्त्यांसाठी प्रस्तावित इमारतीच्या आवारात अधिकृतपणे जागा उपलब्ध करुन देण्यात यावी. सदर जागा ही, ‘जनतेचे व्यासपीठ’ किंवा ‘जनता मंच’ म्हणून ओळखली जाईल. अशाप्रकारचा प्रयोग महापालिका प्रशासनाने राबविल्यास, ठाणे शहर हे, एक आदर्श शहर म्हणून नव्याने नावारुपाला तर येईलच, त्याचबरोबर सर्वसामान्य नागरिकांना, लोकशाहीमार्गाने आंदोलनाचा, निषेध व्यक्त करण्याचा व सनदशीरपणे मोर्चा काढण्याचा अधिकार बहाल करणारी पहिलीवहिली स्वायत्त संस्था म्हणून, ठाणे महानगरपालिका ओळखली जाईल, याबाबत आमच्या मनात कोणताही संदेह नाही. काहीवेळेस प्रशासन आणि लोकप्रतिनिधी यांची हातमिळवणी होऊन, घटनाविरोधी ठराव संमत होतात. अशावेळी कर्तव्यदक्ष नागरिकांनी आवाज उठविणे हे, क्रमप्राप्त ठरते. (संदर्भ : ठामपा/शाविवि/वियोग, अंक-९६०/३००० दि. २०/१०/२०१४) यासंदर्भात, मुंब्रा तलाव बुझवून, ट्रांझिस्ट कॅम्प बांधण्याचा ठराव पारित झाला होता. अर्थात, महासभेत घटनाविरोधी ठराव येतो, हे प्रशासन व लोकप्रतिनिधींच्या हातमिळवणीचे उत्तम उदाहरण असून, आदर्श लोकशाहीस धक्का देणारे आहे, याकडे नितीन देशपांडे यांनी, आयुक्तांचे लक्ष वेधले आहे. दरम्यान, ठाणे महानगरपालिका प्रशासनाच्या माध्यमातून जे काही प्रकल्प राबविण्यात येतात किंवा प्रस्तावित असतात, अशा प्रकल्पांच्या प्रतिकृतींचे सुसज्ज असे दालनदेखील, ठाणे महानगरपालिकेच्या प्रस्तावित नवीन प्रशासकीय इमारतीतउभारण्यात यावे, यानिमित्ताने एक चांगला आदर्शवत असा पायंडा पाडला जाईल, याचीही प्रकर्षाने नोंद घ्यावी, अशी सुचनावजा मागणी, देशपांडे यांनी आपल्या पत्राद्वारे आयुक्तांकडे केली आहे. याप्रकरणी आयुक्तांनी प्राधान्याने विचार करुन, ठाणे महापालिकेच्या नवीन प्रस्तावित इमारतीच्या आवारात, नागरीहीताच्या आंदोलनांसाठी जागा उपलब्ध करुन देण्यासंदर्भात सकारात्मक पाऊले उचलावीत, अशी विनंती ‘धर्मराज्य पक्षा’चे उपाध्यक्ष नितीन देशपांडे यांनी, ठाणे महापालिकेचे आयुक्त सौरव राव यांच्याकडे केली आहे.

 मीरा भाईंदरमध्ये २ ऑक्टोबरपासून ‘स्वच्छ शहर मोहीम’ राबविणार-प्रताप सरनाईक

आमदार सरनाईक यांच्या प्रयत्नाने मीरा भाईंदर स्वच्छ शहर मोहिमेसाठी राज्य सरकारकडून १५० कोटींचा निधी अनिल ठाणेकर/अरविंद जोशी   भाईंदर : जनतेच्या सहभागामुळे स्वच्छ भारत – स्वच्छ महाराष्ट्र अभियानाचे रुपांतर एका राष्ट्रीय चळवळीत झाले आहे. या अभियानामुळे लोकांमध्ये जबाबदारीची भावना निर्माण झाली आहे. त्याचाच अधिक विस्तार करून ओवळा माजिवडा विधानसभा मतदारसंघात ‘स्वच्छ ठाणे – मीरा भाईंदर’ ही स्वच्छ शहर मोहीम २ ऑक्टोबर गांधी जयंती पासून सुरु करीत आहोत , असे आज आमदार प्रताप सरनाईक यांनी जाहीर केले. मीरा भाईंदर शहरात नवीन आधुनिक टोगो वाहने , खत निर्मिती प्रकल्प तसेच प्रत्येक सोसायटीला ओला – सुका कचरा ठेवण्यासाठी डबे वाटप केले जाणार आहेत. यासाठी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्य सरकारकडून १५० कोटींचा निधी दिला आहे , अशी माहितीही आमदार सरनाईक यांनी दिली. आमदार सरनाईक यांच्या मतदारसंघातील प्रत्येक सोसायटी , इमारती , बैठ्या चाळींना चांगल्या दर्जाचे डस्टबिन्स वाटप सुरु केले जाणार आहे. मीरा भाईंदर शहरात ‘शून्य कचरा मोहीम’ राबवून शहर स्वच्छ – सुंदर करण्यासाठी पूर्ण प्रयत्न केले जाणार आहेत.  लोकांच्या सक्रीय सहभागामुळेच ‘स्वच्छ सुंदर ठाणे – मीरा भाईंदर’चे हे स्वप्नही प्रत्यक्षात उतरेल याची मला ही मोहीम सुरु करताना खात्री आहे असेही आमदार प्रताप सरनाईक म्हणाले. ‘स्वच्छ सुंदर…आपले ठाणे – मीरा भाईंदर’ ही स्वच्छ शहर मोहीम २०२४ सुरु करण्याबाबत आज आमदार प्रताप सरनाईक यांनी माध्यमांशी संवाद साधला. ‘स्वच्छ शहर मीरा भाईंदर’ मोहिमेची अंमलबजावणी होत असताना माझ्या मतदारसंघातील ठाणे आणि मीरा भाईंदर शहर स्वच्छ , सुंदर रहावे येथील हवामानाचा दर्जा चांगला रहावा व प्रदूषणमुक्त चांगले वातावरण सदैव रहावे यासाठी जे – जे प्रयत्न करता येतील ते मी प्रशासनाच्या मदतीने वेळोवेळी केले आहेत. पर्यावरणाच्या दृष्टीने सुरक्षित कायमस्वरुपी स्वच्छतेसाठी स्वस्त आणि योग्य आधुनिक तंत्रज्ञानाला प्रोत्साहन देणे हेही सध्याच्या दिवसात आवश्यक बनले आहे. यासाठी आपल्या शहरात काही नवीन योजना व उपक्रम हाती घ्यायचे मी ठरवले आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या स्वच्छ शहर मोहिमेसाठी ठाणे शहरास १५० कोटी व मीरा भाईंदर शहरास १५० कोटी असा एकूण ३०० कोटींचा निधी दिला आहे अशी माहिती आमदार सरनाईक यांनी दिली. ते पुढे म्हणाले की , या शासकीय निधीतून  शहरातील प्रत्येक हौसिंग सोसायटीला आपण ओला व सुका कचरा ठेवण्यासाठी चांगल्या दर्जाचे २ डबे (डस्टबिन्स) वाटप सुरु करणार आहोत. जेणेकरून हौसिंग सोसायट्या ओला व सुका कचऱ्याचे योग्य पद्धतीने वर्गीकरण करू शकतील आणि वर्गीकरण केलेला कचरा नंतर संकलित होईल. आमदार म्हणून मी शहरातील माझ्या मतदारसंघातील प्रत्येक हौसिंग सोसायट्यांना हे डबे देण्याचे नियोजन केले आहे. त्यामुळे हौसिंग सोसायट्यांची वार्षिक आर्थिक बचतही होईल. सोसायट्याना कचऱ्याचे डबे देण्यासोबतच ओल्या कचऱ्याची समस्या पूर्णपणे कमी व्हावी यासाठी आधुनिक टोगो हे यंत्र वाहन खरेदी करण्यात आले आहे. ओला कचरा गोळा करून अत्याधुनिक टोगो वाहन शहरात फिरत असतानाच त्यात ओल्या कचऱ्यापासून खत बनविण्याचे काम करत राहील , अशी माहितीही आमदार सरनाईक यांनी दिली व टोगो वाहनाचे प्रात्यक्षिक ही यावेळी दाखवले. कचरा व्यवस्थापनाअभावी उद्भवणारे दुष्परिणाम रोखण्यासाठी आता व्यापक प्रमाणावर सातत्याने प्रयत्न होणे आवश्यक आहे. यातील ओल्या कचऱ्याची समस्या पूर्णतः सुटावी या दृष्टीने ओल्या कचऱ्याचे रूपांतर खतात करणारे एक आधुनिक टोगो यंत्र वाहन तयार करून ते आपल्या शहरात आणण्यात आले आहे. ठाण्यासाठी २० व  मीरा भाईंदर शहरासाठी २० टोगो व्हॅनची खरेदी करण्याची प्रक्रिया सुरु आहे. या टोगो व्हॅनचा मोठा फायदा होत आहे. ठाण्यात गेले ६ महिने यशस्वीपणे सुरु असलेली टोगो व्हॅनची अंमलबजावणी आता मीरा भाईंदरमध्ये सुरु होणार आहे , अशी माहितीही आमदार सरनाईक यांनी दिली.आमदार सरनाईक यांनी माहिती दिली की , चालता – फिरता कचऱ्यापासून खत निर्मिती करणारे टोगो हे जगातील या प्रकारचे पहिलेच यंत्र वाहन आहे. टोगो (towgo) अर्थात ट्रीटमेंट ऑफ द वेस्ट ऑन द गो.. अशी ही संकल्पना असून कचरा व्यवस्थापनासाठी आवश्यक असणारी जागा, त्याचप्रमाणे कचऱ्यातून पसरणारी दुर्गंधी यासारख्या समस्यांवर हा एक सरळ व सोपा असा उपाय आहे. टोगो वाहन नैसर्गिक इंधनावर (CNG वर) चालत असल्याने आणि प्रक्रियेसाठी सौर ऊर्जेचा वापर करत असल्याने टोगो ही प्रदूषण विरहित आहे आणि निसर्गासाठी फारच सकारात्मक ठरत आहे. शहराच्या विविध भागात जाऊन टोगो कचरा गोळा करणार असल्याने कचऱ्याच्या ने – आण दरम्यान सांडणाऱ्या कचऱ्यातून पसरणारी घाण व दुर्गंधी यांचाही प्रश्न सुटणार आहे. टोगो ही ठिकठिकाणी जाऊन ओला कचरा गोळा करते. वाहन धावत असतानाच या टोगो मध्ये अवघ्या सात दिवसात या कचऱ्याचे रूपांतर खतात होते. ओल्या म्हणजे घनकचऱ्याचे खतात रूपांतर होण्यासाठी जरी सात दिवस लागत असले, तरीदेखील आपण या टोगो व्हॅन मध्ये दररोज कचरा टाकू शकतो आणि निर्माण होणारे कंपोस्ट खतही आपल्याला रोजच्या रोज मिळू शकते. यामुळे घरोघरी जाऊन कचरा गोळा करत असताना देखील खत निर्मितीसाठी लागणारी सर्व प्रक्रिया यात सुरूच असते. टोगो मधून निर्माण होणारे खत शहरातील उद्याने , रस्त्याच्या दुतर्फ़ा असलेली झाडे तसेच मोठ्या हौसिंग सोसायट्यांमधील उद्याने यांच्यासाठी उपयुक्त ठरणार आहे. तसेच महिला बचत गटांच्या माध्यमातूनही हे खत आपण नागरिकांना उपलब्ध करून देऊ शकतो असेही ते म्हणाले. या एका टोगो वाहनाची क्षमता दीड टन ओल्या कचऱ्यावर दररोज प्रक्रिया करण्याची आहे. सात दिवसात यात ओल्या कचऱ्यापासून कंपोस्ट खत होणार असले तरी दररोज दीड टन कचरा या वाहनात प्रक्रियेसाठी टाकू शकणार आहे. याचबरोबर शहरात ४ ठिकाणी खत बनविण्याचे स्वतंत्र प्रकल्पही प्रस्तावित करण्यात आले आहेत , अशी माहिती आमदारांनी दिली. ओला व सुका कचरा वर्गीकरण व सखोल स्वछता मोहिमेची सवय प्रत्येक सोसायटीला , प्रत्येक नागरिकाला लागली पाहिजे. यासाठी प्रत्येक बिल्डिंगला चांगल्या दर्जाचे डस्टबिन्स आम्ही वाटप करत आहोत. आपले शहर कायम स्वच्छ – सुंदर , आरोग्यदायी आणि प्रदूषणमुक्त , पर्यावरणस्नेही निरोगी वातावरण राहण्यासाठी , ‘सूक्ष्म कचरा व्यवस्थापन’ करणे आवश्यक आहे. ‘शून्य कचरा’ मोहीम ३६५ दिवस सुरु रहावी असे आम्हाला वाटत असले तरी शहरातील प्रत्येक नागरिकाने स्वच्छतेचे दूत बनून यात सहभाग घेतला पाहिजे. जे डबे आम्ही वाटप करणार आहोत त्याची देखभाल निगा सोसायटीने ठेवायची आहे. तर सार्वजनिक ठिकाणे , फुटपाथ , जिथे लोकांची गर्दी असते अशा ठिकाणीही कचरा टाकण्यासाठी डस्टबिन्स ठेवले जाणार आहेत , अशी माहिती आमदार सरनाईक यांनी दिली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली ‘स्वच्छ शहर आपले ठाणे – मीरा भाईंदर’ ही मोहीम आम्ही सुरु केली आहे. २ ऑक्टोबर पासून ही मोहीम पूर्णपणे प्रत्येक प्रभागात सुरु होणार आहे. ओला व सुका कचरा वर्गीकरण करण्याबाबत शिवसेनेचे पदाधिकारी , कार्यकर्तेही प्रत्येक प्रभागात जाऊन जनजागृती करणार आहेत. आपले शहर स्वच्छ ठेवण्यासाठी आम्ही लोकप्रतिनिधी म्हणून पूर्ण प्रयत्न करीत आहोत. आता प्रत्येक नागरिकाने स्वच्छ शहरासाठी शपथबद्ध होऊन या मोहिमेला अधिक मजबुतीने साथ दिली पाहिजे. म्हणजे देशातील पहिल्या १० स्वच्छ-सुंदर शहरात आपल्या ठाणे , मीरा भाईंदरचे नाव घेतले जाईल त्याचवेळी ही मोहीम पूर्णपणे यशस्वी झाले असे आम्हास वाटेल असेही आमदार प्रताप सरनाईक यांनी सांगितले. ०००००