Category: होम

पहिल्याच पावसात राम मंदिराला गळती

अयोध्या : करोडो भारतीयांचे श्रद्धास्थान असणाऱ्या अयोध्येतील राममंदीराच्या गाभाऱ्यात पहिल्याच पावसाने गळती लागली आहे. श्री रामजन्मभूमी मंदिराचे मुख्य पुजारी आचार्य सत्येंद्र दास यांनी राम मंदिराच्या बांधकामाबाबत तक्रार केली आहे. त्यांनी राम मंदिराबाबतही…

अमोल मिटकरींचा पुन्हा भाजपावर हल्लाबोल

पुण्यात हफ्ते वसुली, पब्ज संस्कृतीला चंद्रकांत दादाच जबाबदार अकोला  : पुण्यात हफ्ते वसुली, पब्ज संस्कृतीला चंद्रकांत दादाच जबाबदार असल्याचा खळबळजनक आरोप राष्ट्रवादी अजित पवार गटाचे अमोल मिटकरींनी केला आहे. भाजपावर त्यांनी पुन्हा हल्ला केल्याने…

‘पिपाणी’विरोधात शरद पवारांची निवडणूक आयोगात धाव

मुंबई :  लोकसभा निवडणूकीत शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला तुतारी वाजवणारा माणूस हे चिन्ह दिले होते तर जाणीवपुर्वक नुसती तुतारीही अपक्ष उमेदवाराला दिल्यामुळे साताराची जागा गमवावी लागली होती. लोकसभेतील चिन्हाचा हा घोळ…

दोन दिवसात रोहीत पवारांचा मोठा धमाका

मुंबई: विधानसभेचे पडघम राज्यात वाजू लागलेत. आरोप प्रत्यारोपांना सुरवात झाली आहे. राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते रोहीत पवार यांनी येत्या दोन दिवसात मोठा धमाका करणार असल्याचे सुतोवाच केल्याने राजकीय वर्तुळात त्याची…

आषाढी वारीनिमित्त पंढरपुरात महाआरोग्य शिबीर

सोलापूर : यंदाच्या आषाढी सोहळ्यात भाविकाच्या आरोग्यासाठी चार ठिकाणी होणार महाआरोग्य शिबिराचं आयोजन करण्यात आलं आहे. पालखी सोहळे निघाल्यापासून यात्रा संपेपर्यंत आरोग्य विभाग वारकऱ्यांच्या आरोग्याची काळजी घेणार असल्याचं राज्याचे आरोग्यमंत्री डॉ. तानाजी सावंत यांनी…

पुण्यात ऑलिम्पिकवीर खाशाबा जाधवांच्या तैलचित्राचे अनावरण

पुणे : भारताचे पहिले वैयक्तिक ऑलिम्पिक पदक विजेते खाशाबा जाधव यांच्या तैलचित्रांचे अनावरण पुण्यातील श्री शिवछत्रपती क्रीडा संकुलात करण्यात आले आहे. म्हाळुंगे-बालेवाडी मधील महाराष्ट्र शासनाच्या श्री शिवछत्रपती क्रीडा संकुलातील मुख्य…

 01 जुलै 2024 रोजी 18 वर्षे पूर्ण करणाऱ्या युवकांनी मतदार यादीत नाव नोंदविण्याचे आवाहन

ठाणे  : भारत निवडणूक आयोगाच्या मतदार याद्यांच्या दुसऱ्या विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रमाअंतर्गत दि.01 जुलै 2024 रोजी 18 वर्षे पूर्ण करणाऱ्या युवकांनी मतदार यादीत नाव दाखल करण्यासाठी अर्ज करावे. तसेच सर्व…

जितेश कदमची अपयशी झुंज

एमसीएफ राज्य कॅरम स्पर्धा मुंबई : रोटरी क्लब ऑफ बोरिवलीच्या सहकार्याने एम सी एफ स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स, बोरिवली ( पश्चिम ) येथे सुरु एम सी एफ ९ व्या राज्य मानांकन कॅरम…

डोंबिवलीतील पदवीधरांचा कोकण पदवीधर मतदानावर बहिष्कार

डोंबिवली :  येथील के.व्ही. पेंढरकर हे कॉलेज विनाअनुदानित करण्याचा घाट प्रशासनाने घातला आहे. याविरोधात कॉलेजमधील शिक्षक व माजी विद्यार्थी गेल्या आठवड्याभरापासून साखळी उपोषणास बसले आहेत. याकडे शासन लक्ष देत नसल्याने येत्या…

‘पेंढरकर कॉलेज बंद होऊ देणार नाही’

मनसेचा सरकारला इशारा डोंबिवली : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने डोंबिवली शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष प्रभाकर देसाई यांना पत्र पाठविले होते. या पत्राला देसाई यांनी समाधानकारक उत्तर दिलेली नाही. कॉलेजला स्वायत्तता मिळाली असली तरी व्यवस्थापन अनुदानित कॉलेज बंद करु शकत नाही. व्यवस्थापनाची ही कृती शिक्षक, विद्यार्थी यांच्यावर अन्याय करणारी आहे. तसेच विद्यापीठ कायदा आणि सरकारी नियमांचे उल्लंघन करणारी आहे. या प्रकरणी शिक्षण मंत्र्याकडे दाद मागणार अन्यता मनसे स्टाईलने आंदोलन करणार असल्याचा इशारा गांगुर्डे यांनी देसाई यांना दिला आहे. डोंबिवलीतील के.व्ही.पेंढरकर कॉलेज अनुदानित असताना ते ते विनाअनुदानित करण्याचा घाट व्यवस्थापनाने घातला आहे. त्याविरोधात 14 जून पासून कॉलेज समोर शिक्षक आणि माजी विद्यार्थ्यांचे साखळी उपाेषण सुरु आहे. या आंदोलनाची गंभीर दखल घेत मनसे विद्यार्थी सेनेचे प्रदेश संघटक संतोष गांगुर्डे यांनी सोमवारी डोंबिवली शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष प्रभाकर देसाई यांची भेट घेतली. यावेळी जिल्हा अध्यक्ष धनंजय गुरव, डोंबिवली शहर अध्यक्ष मिलिंद म्हात्रे यांसह शिष्टमंडळ उपस्थित होते. एक तासांच्या प्रदीर्घ चर्चेअंती देसाई यांनी हे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे. त्याची सुनावणी 7 जुलै रोजी होणार आहे. त्यानंतर काय ते बाेलू असे सांगितले. गांगुर्डे यांनी मराठी विभाग का बंद केला आहे. कॉलेजमध्ये बाऊन्सर ची गरज काय ? प्राध्यापकासह शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना एका खोलीत काम ने देता बसवून का ठेवले जात आहे. या प्रकरणी जाब विचारला. चर्चेअंती संस्थाचालकांकडून मनविसे शिष्टमंडळाला कोणत्याही प्रकारचे समाधानकारक उत्तर न मिळाल्यामुळे शासन दरबारी जाब विचारुन मनसे स्टाईल आंदोलन करण्याचा ईशारा मनविसेने दिला. याबाबत शिष्ठमंडळाने शिक्षक व शिक्षकेतर कर्मचार्यांची भेट घेऊन त्यांच्याही समस्या जाणून मनविसे पूर्णपणे त्यांच्यासोबत आहोत असे आश्वासन दिले.