Category: होम

परदेशी भारतीय, इच्छा असुनही लोकसभेच्या मतदानापासून वंचित

परदेशातून भारतात मतदान करण्याची सुविधा नसल्याने इच्छुकांना फटका कल्याण: परदेशात विविध देशांमध्ये नोकरी, निवृत्तीनंतर आपल्या मुलांकडे परदेशात राहत असलेल्या काही कुटुंबीयांची भारतामधील आपल्या निवास स्थान असलेल्या भागात मतदार यादीत नावे आहेत. अशा परदेशस्थांनी भारतातील लोकसभा निवडणुकीसाठी मतदान करण्याची इच्छा निवडणूक अधिकाऱ्यांकडे व्यक्त केली आहे. अशा प्रकारची कोणतीही सुविधा परदेशातील भारतीय नागरिकांसाठी नसल्याचे निवडणूक विभागाकडून परदेशी भारतीय नागरिकांना कळविण्यात आले आहे. भारताच्या विविध भागातील तरूण नोकरीनिमित्त परदेशात गेले आहेत. काही कुटुंबीय आपल्या मुलाच्या सोबत किंवा काही व्यवसाय, उद्योगानिमित्त विदेशात राहत आहेत. यामधील बहुतांशी मंडळींची नावे भारतामधील मतदार यादीत आहेत. भारतात सध्या लोकसभेच्या निवडणुकांचा महौल आहे. परदेशस्थ नागरिक, भारतीय नागरिकांचे भारतामधील निवडणुकांकडे लक्ष लागले आहे. परदेशात राहत असलेले पण भारतात आपल्या गाव, शहरात राहत असलेल्या मतदार यादीत नाव असल्याने अनेक परदेशी भारतीय नागरिकांनी भारतात सुरू असलेल्या लोकसभा निवडणुकीसाठी मतदान करण्याची इच्छा तेथून संपर्क करून निवडणूक अधिकाऱ्यांकडे व्यक्त केली आहे. निवडणूक अधिकाऱ्यांनी निवडणूक आयोगाकडून माहिती घेऊन परदेशात राहत असलेल्या कोणाही भारतीय नागरिकाला टपाल किंवा अन्य कोणत्याही माध्यमातून मतदान करण्याची सुविधा उपलब्ध नसल्याचे कळविण्यात आले आहे. काही भारतीय विदेशात गेल्यानंतर लोकसभेच्या निवडणुका जाहीर झाल्या. त्यामुळे त्यांची कोंडी झाली. अगोदर हे माहित असते तर विदेशात आलो नसतो, असे परदेशस्थ भारतीय सांगतात. जगातील सर्वात मोठी लोकशाही आणि त्या देशाचे आपण नागरिक आहोत, या अभिमानाने परदेशात राहत असलेल्या काही भारतीयांना लोकसभा निवडणुकीसाठी मतदान करण्याची खूप इच्छा आहे. त्यांनी विविध प्रकारचे प्रयत्न सुरू करून लोकसभेसाठी मतदान करता येईल का याची चाचपणी सुरू केली आहे. अमेरिका, युरोप, अरब देशातील काही भारतीय नागरिकांनी काही राजकीय पक्षांशी संपर्क करून आम्हाला मतदानासाठी भारतात येण्यासाठी काही साहाय्य होऊ शकेल का, अशी विचारणा केली असल्याचे समजते. आता २० मे रोजीच्या मतदानासाठी भारतात यायचे असेल तर विमानाचे परदेशातून तात्काळ तिकीट काढावे लागेल. यासाठीचा तिकीट खर्च खूप मोठा आहे. हा खर्च निवडणूक काळात करण्यात येत असल्याने राजकीय पक्षांना त्याचा हिशेब निवडणूक आयोगाला द्यावा लागेल. चौकशीचे झंझट मागे नको म्हणून विदेश मतदारांना एक गठ्ठा भारतात मतदानाच्या दिवशी आणण्याचा काही उमेदवार, राजकीय पक्षांचा मनसुबा होता. या विचाराकडे त्यांनी पाठ फिरवली आहे. भारतात मतदार यादीत नाव असलेल्या परदेशातील भारतीय नागरिकांसाठी टपाली किंंवा अन्य साधनाने मतदान करण्याची व्यवस्था येत्या काळात भारतीय निवडणूक आयोगाने उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी परदेशी भारतीय नागरिकांकडून करण्यात येत आहे.

ठाण्याचा गड राखण्यासाठी मुख्यमंत्री अखेर मैदानात

बैठकसत्रापाठोपाठ आता प्रचार मिरवणूकांमध्ये सहभाग ठाणे : ठाणे लोकसभा मतदार संघातून शिंदेच्या सेनेचे उमेदवार नरेश म्हस्के तर, उबाठाचे उमेदवार राजन विचारे हे निवडणुक लढवित असले तरी, येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे विरुद्ध माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यात खरी लढत असल्याचे बोलले जात आहे. मुख्यमंत्र्यांच्या बालेकिल्ल्यात होणारी ही निवडणुक त्यांच्यासाठी प्रतिष्ठेची मानली जात असून हा गड राखण्यासाठी बैठका घेण्यापाठोपाठ आता प्रचार मिरवणुकांच्या माध्यमातून ते स्वत: मैदानात उतरल्याचे दिसून येत आहे. ठाणे जिल्ह्यात शिवसेनेचे आजवर वर्चस्व राहिले आहे. शिवसेनेचे दिवंगत ठाणे जिल्हाप्रमुख आनंद दिघे यांनी जिल्ह्यातील घराघरात शिवसेना पोहचविली. म्हणूनच ‘आनंद दिघेंचा ठाणे जिल्हा शिवसेनेचा बालेकिल्ला’ अशी घोषणा दिली जाते. त्यांच्या निधनानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जिल्ह्याचे नेतृत्व केले. शिवसेनेतील बंडानंतर मुख्यमंत्र्यांना जिल्ह्यातून मोठे समर्थन मिळाले. असे असले तरी शिवसेेनेतील बंडानंतर जिल्ह्यात पहिलीच निवडणुक होत आहे. महायुतीच्या जागा वाटपात ही जागा आपल्याकडेच ठेवण्यास मुख्यमंत्र्यांना यश आले असून याठिकाणी त्यांनी पक्षाचे जिल्हाप्रमुख नरेश म्हस्के यांना उमेदवारी दिली आहे. जागा वाटपावरून भाजप आणि सेनेत नाराजी नाट्य रंगले होते. ते शमल्यानंतर आता महायुतीचे नेते प्रचारात उतरल्याचे दिसून येत आहे. मतदार संघातून शिंदेच्या सेनेचे उमेदवार नरेश म्हस्के तर, उबाठाचे उमेदवार राजन विचारे हे निवडणुक लढवित असले तरी, येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे विरुद्ध माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यात खरी लढत असल्याचे बोलले जात आहे. दोन्ही सेनेकडून ही जागा जिंकण्यासाठी जोरदार प्रयत्न सुरू आहेत. दोन्ही सेनेत आरोप-प्रत्यारोपाची लढाई रंगली आहे. त्याचबरोबर आनंद दिघे यांचा खरा शिष्य कोण यावरूनही वाद रंगला आहे. शिवसेनेतील बंडानंतर ठाण्याचा गड कोण राखणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. असे असले तरी ठाणे लोकसभा मतदार संघ हा मुख्यमंत्र्यांच्या बालेकिल्ल्यात येतो. यामुळे ही निवडणुक मुख्यमंत्र्यांसाठी प्रतिष्ठेची मानली जात आहे. या निवडणुकीत विजय मिळविण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी काही दिवसांपुर्वी बैठका घेतल्या होत्या. त्यानंतर किसननगर येथील प्रचार मिरवणुकीत सहभागी झाले होते. त्यापाठोपाठ गुरुवारी नवी मुंबई येथील बेलापूर भागातील प्रचार मिरवणुकीत सहभागी झाले होते. तर, सायंकाळी ते कोपरी पाचपखाडी येथील मिरवणुकीत सहभागी होणार होते. यामुळे बैठका घेण्यापाठोपाठ आता प्रचार मिरवणुकांच्या माध्यमातून ते स्वत: मैदानात उतरल्याचे दिसून येत आहे.

महायुतीच्या उमेदवार यामिनी जाधव यांच्या प्रचार फेरीला नागरिकांचा प्रतिसाद

मुंबई : मुंबई दक्षिण मतदारसंघातून महायुतीच्या उमेदवार यामिनी जाधव यांच्या प्रचार फेऱ्यांना मतदार संघातील नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. शिवडी आणि भायखळा विभागातून काढण्यात आलेल्या प्रचार फेरीला नागरिकांनी प्रचंड गर्दी केली, तसेच ठिकठिकाणी महिलांनी पुढे येऊन त्यांचे औक्षण केले तर सार्वजनिक मंडळांनी फटाके वाजवून आमदारांचे स्वागत केले. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदारसंघातील महायुती शिवसेनेच्या अधिकृत उमेदवार यामिनी यशवंत जाधव यांचा मतदार संघात जोरदार प्रचार सुरू आहे. शिवडी विभागात सकाळी काढण्यात आलेल्या प्रचार फेरीला नागरिकांनी प्रचंड गर्दी केली होती. यावेळी ठीकठिकाणी आमदार यामिनी जाधव यांचे महिलांनी औक्षण केले. अनेक इमारती व उत्सव मंडळांनी फटाके वाजवून त्यांचे जोरदार स्वागत केले. यामिनी जाधव यांच्यासोबत या रॅलीत महायुतीतील नाना आंबोले व इतर नेते उपस्थित होते. त्याचप्रमाणे भायखळा विभागात काढण्यात आलेल्या भव्य रॅलीमध्ये महायुतीतील नेते मिलिंद देवरा, रोहिदास लोखंडे, मनसेचे संजय नाईक आणि शलाका हरयान आदी महायुतीमधील पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. या प्रसंगी त्यांनी परिसरातील मंदिरात दर्शन घेतले. अफाट गर्दी , लोकांच्या उत्साहात झालेल्या या रॅलीतही नागरिकांनी मोठ्या उत्साहात यामिनी जाधव यांचे स्वागत केले. आमदार यामिनी जाधव आल्यानंतर इमारतीमधील नागरिकांनी खाली उतरून त्यांची भेट घेतली. ज्येष्ठ नागरिकांनी यामिनी जाधव यांना आशीर्वाद देत भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या. उत्सव मंडळांनी फटाके वाजवून जल्लोषात स्वागत केले. प्रत्येक व्यक्तीचा आशावादी चेहेरा आणखी ताकदीने लढायला संघर्ष करायला ऊर्जा देत आहे, बळ देत असल्याचे यावेळी यामिनी जाधव यांनी सांगितले.

कल्याण लोकसभा मतदारसंघातील उमेदवारांच्या

दैनंदिन खर्चाचा हिशोब तपासण्याच्या तारखा जाहीर – सुषमा सातपुते ठाणे : कल्याण लोकसभा मतदारसंघातील सार्वत्रिक निवडणूक 2024 मतदारसंघातील उमेदवारांचा खर्च भारत निवडणूक आयोगाच्या निवडणूक खर्च संनियत्रण नियमावलीतील भाग बी १ व भारत निवडणूक आयोगाच्या १८ फेब्रुवारी २०१९ च्या पत्रानुसार खर्च निरीक्षकांनी दैनंदिन खर्चाचा हिशोब ३ वेळा तपासावयाचा आहे. या तपासण्यांच्या तारखा जाहीर करण्यात आल्या असून उमेदवार प्रतिनिधींनी वरील तारखांना उपस्थित राहण्याचे आवाहन २४- कल्याण लोकसभा मतदारसंघ निवडणूक निर्णय अधिकारी सुषमा सातपुते यांनी केले आहे. खर्च निरीक्षकांनी खर्च तपासण्याच्या तारखा खालीलप्रमाणे आहेत – तपासणीचे ठिकाण : खर्च निरीक्षक यांचे कार्यालय, २४ कल्याण लोकसभा मतदार संघ, क.डों.म.न.पा.जलतरण तलाव कार्यालय, वै.ह.भ.प.सावळाराम महाराज म्हात्रे क्रीडा संकुल, पेंढारकर कॉलेज जवळ, घारडा सर्कल, डोंबिवली पूर्व, ता.कल्याण, जि. ठाणे -४२१ २०३ खर्च तपासणीच्या तारखा :- ९ मे २०२४, १३ मे २०२४ व .१७ मे २०२४. तपासणीची वेळ :- सकाळी १०.०० वाजेपासून ते सायंकाळी ५.०० वाजेपर्यंत. उमेदवार/प्रतिनिधींनी सर्व प्रकारच्या नोंदवह्या जसे की, दैनंदिन खर्च नोंदवही, रोख नोंदवही, बँक नोंदवही, संबंधित प्रमाणके/देयके (खर्चाच्या पावत्या), बँक पासबुक व इतर सर्व मूळ कागदपत्रांसह वरील नमूद ठिकाणी व दिनांकास विहीत वेळेत उपस्थित राहण्याबाबत जाहीर आवाहन करण्यात येत आहे. वरीलप्रमाणे नमूद दिनांकास उपस्थित राहण्याबाबत उमेदवारांना  ई-मेलव्दारेही लेखी सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच या वेळापत्रकात काही अपरिहार्य कारणांमुळे बदल झाल्यास तसे दूरध्वनी/ई-मेलने कळविण्यात येईल, असे २४- कल्याण लोकसभा मतदारसंघ निवडणूक निर्णय अधिकारी सुषमा सातपुते यांनी केले आहे.

कपिल पाटील यांच्या भव्य रॅलीतून मुरबाडकरांनी दाखविला महायुतीवर विश्वास

शहरासह ग्रामीण भागात प्रचार रॅलीला प्रतिसाद मुरबाड : भिवंडी लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार कपिल पाटील यांच्या प्रचारासाठी काढलेल्या भव्य रॅलीला मुरबाड शहर व तालुक्यात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या रॅलीच्या माध्यमातून मुरबाडवासियांनी महायुतीवर विश्वास दाखवत अलोट गर्दीत रॅलीचे स्वागत केले. या रॅलीमुळे मुरबाडमध्ये महायुतीचा माहौल तयार झाला आहे. अनेक वर्षांपासूनचे कल्याण-मुरबाड रेल्वेचे स्वप्न पूर्ण होणार असल्याबद्दल ठिकठिकाणी ग्रामस्थांकडून मोदी सरकारचे आभार मानले गेले. महायुतीचे उमेदवार कपिल पाटील यांच्याबरोबरच भाजपाचे आमदार किसन कथोरे यांच्या प्रमुख उपस्थितीत मुरबाड तालुक्यात बुधवारी रॅली काढण्यात आली. तालुक्याच्या सीमेवरून पोटगाव येथून निघालेली रॅली, तीन हात नाका, शिवळे, सरळगाव, टोकावडे, धसई, नारिवली, म्हसा, कान्होळ, सासणे येथे जमलेल्या गर्दीने वातावरण भारून गेले होते. या यात्रेला मिळालेला प्रतिसाद हा अभूतपूर्व होता. या रॅलीत शिवसेनेचे उपनेते प्रकाश पाटील, कुणबी सेनेचे प्रमुख विश्वनाथ पाटील, शिवसेनेचे लोकसभा सहसंपर्कप्रमुख सुभाष पवार, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती कपिल थळे, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य उल्हास बांगर, सुभाष घरत, प्राजक्ता मोहन भावार्थे, ज्येष्ठ नेते रामभाऊ दळवी, भाजपाचे जिल्हाध्यक्ष मधुकर मोहपे, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे युवा जिल्हाध्यक्ष प्रतीक हिंदुराव, भाजपाचे तालुकाध्यक्ष जयवंत सुर्यराव, आरपीआयचे जिल्हाध्यक्ष संजय गायकवाड, शिवसेनेचे शहरप्रमुख विनोद नार्वेकर, राष्ट्रवादी शहराध्यक्ष महेंद्र जाधव, आरपीआयचे शहराध्यक्ष कैलास देसले, मनसेचे शहराध्यक्ष देवेंद्र जाधव आदी उपस्थित होते. मुरबाड, टोकावडे, धसईबरोबरच विविध ठिकाणी उमेदवार कपिल पाटील व आमदार किसन कथोरे यांनी ग्रामस्थांबरोबर संवाद साधला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाची अर्थव्यवस्था जगात पाचव्या क्रमांकावर पोचविली. यापुढील काळात कल्याण-मुरबाड रस्ता आणि कल्याण-मुरबाड रेल्वेमार्गामुळे तालुक्याची प्रगती होईल. भविष्यात कल्याण-मुरबाड रेल्वेमार्गाचे नगरपर्यंत विस्तारीकरण करण्याची पंतप्रधान नरेंद्र मोदींना विनंती केली आहे. पंतप्रधान मोदींकडे केलेली मागणी निश्चितच पूर्ण होते. त्यामुळे नगरपर्यंत रेल्वे धावेल, असे आश्वासन कपिल पाटील यांनी कॉर्नर मीटिंगमध्ये दिले. केंद्र व राज्य सरकारमुळे मुरबाड तालुक्याच्या विकासाची दिशा बदलली असून, गावागावांमध्ये विकासाची नांदी पोचली आहे. मुरबाड तालुक्याने महायुतीवर विश्वास कायम ठेवून भिवंडी लोकसभा मतदारसंघात सर्वाधिक मताधिक्य मिळवून द्यावे, असे आवाहन आमदार किसन कथोरे यांनी केले. या वेळी शिवसेनेचे उपनेते प्रकाश पाटील व कुणबी सेनेचे प्रमुख विश्वनाथ पाटील यांचीही भाषणे झाली. चौकट माळशेज घाटाच्या पायथ्याशी ‘चाय पे चर्चा’ माळशेज घाटाच्या पायथ्याशी टोकावडे परिसरात प्रचार करताना भिवंडी मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार कपिल पाटील यांनी सहकाऱ्यांसमवेत टोकावडे नाक्याच्या टपरीवर चहा घेतला. तसेच प्रचाराच्या लगबगीतून वेळ काढत सहकारी नेत्यांसमवेत चाय पे चर्चा केली. या वेळी शिवसेनेचे उपनेते प्रकाश पाटील, कुणबी सेनेचे प्रमुख विश्वनाथ पाटील, शिवसेनेचे सहसंपर्कप्रमुख सुभाष पवार आदी उपस्थित होते.

मतदानाच्या जागृतीसाठी ठाण्यात शनिवारी मिनी मॅरेथॉन

ठाणे महापालिका, जिल्हाधिकारी कार्यालय, ठाणे जिल्हा अॅथलेटिक असोसिएशन आणि ठाणे सिटीझन्स फाऊंडेशन यांचा संयुक्त उपक्रम ठाणे  : येत्या २० मे रोजी होऊ घातलेल्या लोकसभा निवडणुकीत जास्तीत जास्त मतदारांनी मतदान करावे याबद्दल जागृती करण्यासाठी ठाण्यात, शनिवार, ११ मे ला सकाळी मिनी मॅरेथॉनचे आयोजन करण्यात आले…

मतदाराला कुठल्याही प्रकारचा त्रास न व्हावा यासाठी मतदान केंद्रांबाहेर योग्य त्या सुविधा द्या–सुरेश म्हात्रे

राजीव चंदने मुरबाड : लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू असतानाच तापमानात प्रचंड वाढ झाली आहे. वाढत्या तापमानामुळे उष्माघाताचा त्रास होण्याची शक्यता असल्याने व मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी मतदान केंद्राबाहेर मंडप व पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करा अशी मागणी भिवंडी लोकसभा मतदार संघातील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार सुरेश म्हात्रे उर्फ बाळ्या मामा यांनी भिवंडी लोकसभा निवडणूक निर्णय अधिकारी संजय जाधव यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे  केली आहे. सध्या तापमानात प्रचंड वाढ झाली असून तापमान ४० ते ४२ अंशापर्यंत पोहोचले आहे.२० मे रोजी भिवंडी लोकसभेसाठी मतदान होणार असून या काळातही तापमानात वाढ असणार असल्याने मतदारांना मतदान केंद्राबाहेर उष्माघाताचा त्रास होऊ नये यासाठी व वाढत्या तापमानामुळे मतदानावर परिणाम होऊ नये यासाठी मतदान केंद्रानबाहेर मंडप, पिण्याचे पाणी, पंखे, खुर्च्या व खेळती हवा राहील अशी व्यवस्था करण्यात यावी अशी मागणी सुरेश म्हात्रे यांनी निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे  केली आहे.

संघर्षपूर्ण राजकारणाची शक्यता

लोकसभा निवडणुकीला सुरूवात होऊन जवळपास निम्मा काळ लोटला आहे. सुरुवातीच्या टप्प्यांमध्ये २०१९ च्या निवडणुकीच्या तुलनेत मतदान दोन ते तीन टक्क्यांनी कमी झाले आहे. यामागील महत्त्वाचे कारण म्हणजे या वर्षी उन्हाळा…

महाग आरोग्यविमा आणि बरंच काही…

अर्थनगरीतून महेश देशपांडे अर्थविश्वात सरत्या आठवड्यात लक्षवेधी बातम्यांची रेलचेल होती. यापैकी सामान्यांच्या दृष्टीने महत्वाची बातमी म्हणजे आरोग्य विम्याचा हप्ता महागणार आहे. याखेरीज विमानप्रवासात जादा सामान नेल्यास खिशावर अतिरिक्त भार पडणार…

‘बीएसएनएल’चा अस्तित्वासाठी लढा

‘बीएसएनएल’ही सरकारी दूरसंचार कंपनी सध्या संकटात आली असून आपले अस्तित्त्व टिकवण्यासाठी झगडत आहे. तसा दावा ‘बीएसएनएल एम्प्लॉईज युनियन’ने केला आहे. या युनियनने केंद्र सरकारला थेट पत्र लिहून या समस्येकडे सरकारचे…