Category: होम

वनमाळी हॉल येथे राज्य मानांकन कॅरम स्पर्धेचे आयोजन

मुंबई : महाराष्ट्र कॅरम असोसिएशन व क्षत्रिय युनियन क्लब ( क्षात्रैक्य समाज, दादर, मुंबई ) यांच्या संयुक्त विद्यमाने कॅरमची पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या वनमाळी वातानुकूलित हॉल, छबिलदास मार्ग, दादर-पश्चिम येथे दिनांक ४ ते ६ मे दरम्यान राज्य मानांकन कॅरम स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. कॅरम खेळासाठी क्षात्रैक्य समाज, दादर, मुंबईचे योगदान फार मोठे असून एकेकाळी वनमाळी हॉलच्या स्पर्धेने हंगामाची सुरुवात होत असे. जवळपास महिनाभर चालणारी क्षत्रिय युनियन क्लबची स्पर्धा खेळाडू व क्रीडा रसिकांसाठी पर्वणी असे. महाराष्ट्र कॅरम असोसिएशन यंदा ७० व्या वर्षात पदार्पण करत असल्यामुळे या विशेष स्पर्धेने हंगामाची सुरुवात करण्याचा निर्णय असोसिएशनने घेतला असून क्षत्रिय युनियन क्लबनेही स्पर्धेसाठी आपला वातानुकूलित हॉल उपलब्ध करून दिला आहे. पुरुष एकेरी व महिला एकेरी अशा दोन गटांमध्ये या स्पर्धेचे आयोजन करण्यात येणार असून विजेत्या खेळाडूंना तब्बल १ लाख १० हजारांची रोख पारितोषिके देण्यात येणार आहेत. स्पर्धेचे प्रवेश अर्ज महाराष्ट्र कॅरम असोसिएशनच्या www.maharashtracarromassociation.com या संकेत स्थळावर उपलब्ध आहेत. स्पर्धेत भाग घेण्यासाठी खेळाडूंनी आपल्या क्लब मार्फत आपली नावे दिनांक २४ एप्रिल २०२४ पर्यंत जिल्हा संघटनेकडे नोंदवावीत. तर जिल्हा संघटनेने प्राप्त नावे दिनांक २५ एप्रिल २०२४ पर्यंत महाराष्ट्र कॅरम असोसिशनकडे पाठवावीत.

१६ एप्रिल१८५३ रोजी पहिली लोकल रेल्वे मुंबई बोरीबंदर ते ठाणे दरम्यान धावल. या घटनेला १७१वर्ष पूर्ण झाले असून प्रवासी संघटना आणि रेल्वे कर्मचारी यांनी केक कापून हा क्षण साजरा केला. (छाया-प्रफुल गांगुर्डे)

विकासाच्या वाटेतले अडथळे

परामर्ष हेमंत देसाई राष्ट्रीय सािं‘यकी कार्यालयाने चालू वर्षात आर्थिक विकासाचा दर ७.६ टक्के असेल, असे म्हटले असले तरी अर्थमंत्र्यांना आठ टक्क्यांच्या पुढे असेल, असे वाटते. देशाला ‘समृद्ध भारता’च्या दिशेने घेऊन…

सत्ताधारी टिकेच्या केंद्रस्थानी

पैलू भागा वरखडे लोकशाही मूल्यांचे नीट पालन न होणे, विविध शासकीय यंत्रणांमध्ये हस्तक्षेप, दंडेलशाही आकार घेणे हे टाळण्यासाठी देशात सक्षम विरोधी पक्ष असायला हवा. मात्र आज देशात तशी परिस्थिती नसून…

तुमचे पक्ष फोडण्याची संधी भाजपला तुम्हीच दिली ना…!

भारतीय जनता पक्षाने शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे दोन्ही पक्ष फोडले असा आरोप उद्धव ठाकरे आणि शरद पवार नेहमीच करत असतात. काल भंडारा येथे झालेल्या भाजपच्या प्रचारसभेत केंद्रीय मंत्री अमित…

राज्यात यावर्षी १०६ टक्के पाऊस !

मुंबई : एल-निनाेचा प्रभाव ओसरून ‘ला-निना’च्या प्रभावाने देशात यंदा सरासरीपेक्षा अधिक पाऊस हाेण्याचा अंदाज ‘स्कायमेट’ने वर्तविला आहे. भारतीय हवामान विभागानेही साेमवारी चांगल्या मान्सूनचा अंदाज व्यक्त केला आहे. वेधशाळेच्या अंदाजानुसार महाराष्ट्रातही सरासरीपेक्षा अधिक म्हणजे १०६ टक्के पाऊस हाेण्याची शक्यता आहे. ही…

राहुल गांधींच्या हेलिकॉप्टरची निवडणूक अधिकाऱ्यांकडून तपासणी

नवी दिल्ली : काँग्रेस नेते राहुल गांधी तमिळनाडूच्या निलगिरी येथून उड्डाण घेत असताना निवडणूक अधिकाऱ्यांनी त्यांच्या हेलिकॉप्टरची तपासणी केली, अशी बातमी पीटीआयने दिली आहे. तमिळनाडू पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भरारी पथकाच्या अधिकाऱ्यांनी निलगिरी येथे…

काँग्रेससाठी जाहीरनामा म्हणजे कागद- फडणवीस

नागपूर:  भाजपचं संकल्प पत्र नाही तर मोदीजींची गॅरंटी आहे. नरेंद्र मोदी यांचं सरकार आल्यानंतर काय  करायचं  ते संकल्पपत्रात मांडण्यात आले आहे, अशी माहिती  पत्रकार परिषदेत देवेंद्र फडणवीसांनी दिली  आहे. तसेच काँग्रेसचा  जाहीरनामा फेल आहे. ते कधीच आश्वासन पूर्ण करत…

नाशिक,साताऱ्यावर राष्ट्रवादीचा दावा

मुंबई : महायुतीमध्ये रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातील जागा वाटपाचा तिढा सुटता सुटत नसल्याचे चित्र असतानाच राष्ट्रवादी काँग्रेसने नाशिक आणि साताऱ्यातील जागेवर आपला दावा कायम ठेवला आहे. साताऱ्यात अजित पवारांनाही मानणारा मोठा वर्ग आहे. त्यामुळे साताऱ्याची जागा…