Category: होम

ठाकरेंची मुंबई नगरसेविका डॉ. म्हस्के नॉट रिचेबल

ठाकरेंची मुंबई नगरसेविका डॉ. म्हस्के नॉट रिचेबल मुंबई : निवडणूकीच्या आधी उमेदवार पळपवापळवी नंतर आता थेट निवडूण आलेले नगरसेवकच पळवण्याच प्रकार मुंबईतही सुरु झाल्याची चर्चा आहे. मुंबईत उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची नगसरेविका डॉ सरिता…

रायगड-पेणमध्ये ‘ग्रोथ सेंटर’ !

रायगड–पेणमध्ये ‘ग्रोथ सेंटर’ ! दावोस : स्वित्झर्लंडमधिल दावोसच्या वर्ल्ड ईकॉनॉमिक फोरमच्या वार्षिक बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तिसऱ्या मुंबईतील पहिले शहर म्हणून रायगड-पेण ग्रोथ सेंटरची घोषणा केलीय. नवी मुंबई विमानतळापासून पंधरा ते वीस किलोमीटरवर हे ग्रोथ सेंटर निर्माण करण्यात येणार आहे. गेल्या तीनचार वर्षांपासून यासाठीच्या परवानग्या मिळविण्यात येत होत्या. त्या मिळाल्यानंतर आज या तिसऱ्या मुंबईतील पहिल्या शहराची घोषणा करण्यात येत असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले. याठिकाणी प्लग अँण्ड प्ले या धर्तीवर रेडी टू स्टार्ट पद्धतीने संबंधित घटक लगेच कामकाज सुरु शकणार आहेत. ही देशातील पहिली कंपनी, यामध्ये खासगी – सार्वजनिक भागीदारी (पीपीपी) प्रकल्प असणार आहे. यात शासन, एमएमआरडीए आणि खासगी घटक एकत्र येऊन काम करतील. याठिकाणी नवीन बिझनेस डीस्ट्रिक्ट तयार करतो आहोत. याठिकाणी चांगल्या पगाराच्या नोकऱ्या तसेच ग्लोबल कॅपिसीटी सेंटर्स, फिनटेकची इकोसिस्टम तयार होईल. बीकेसीच्या धर्तीवर याठिकाणी बिझनेस डिस्ट्रीक्ट स्थापन होईल. या शहराच्या घोषणेनंतर सुमारे एक लाख कोटींच्या गुंतवणुकीचे सामंजस्य करार देखील झाल्या आहेत. यासाठी जगातील दिग्गज अशा कंपन्यांनी उत्तम प्रतिसाद दिला आहे. त्यामध्ये रिपब्लिक ऑफ कोरीयाचा हवाना ग्रुप, स्वित्झर्लंडमधून एसएसबी ग्रुप, एन्सार, फेडेक्स हे अमेरितील समूह, फिनलंडचा रिव्हर रिसायकल समूह, दुबईचा एमजीएसए समूह, सिंगापूरचा स्पेसेस होल्डिंग मेपल ट्री, जीनव्ही आणि इंडोस्पेस पार्क समूह, अमेरिकेतून ट्रिबेका डेव्हलपर्स. या विदेशी गुंतवणूकीतून एक खूप चांगले शहर तयार होईल. याठिकाणी वॉक टू वर्क अशा पद्धतीने सुविधा निर्माण होतील. अशा रितीने तिसऱ्या मुंबईतील पहिले शहर आता प्रत्यक्षात येणार असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी जाहीर केले. दरम्यान, दावोसमध्ये साकारण्यात आलेले मॅग्नेटिक महाराष्ट्राचे पॅव्हेलियन आकर्षणाचे केंद्र राहिल्याचे चित्र होते. या पॅव्हेलियनला विविध क्षेत्रातील उद्योजक, गुंतवणूकदारांसह, भारतातील मान्यवरांनी आवर्जून भेट दिली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उद्योग मंत्री डॉ. उदय सामंत यांच्यासह महाराष्ट्राच्या प्रतिनिधी मंडळाने या सर्व मान्यवरांचे स्वागत केले. दरम्यान, दावोस दौऱ्यावर आलेल्या भारताचे रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांची इंडिया पॅव्हेलियनमध्ये मुख्यमंत्री फडणवीस यांनी सदिच्छा भेट घेऊन, त्यांना शुभेच्छा दिल्या.

ठाण्यात आरक्षणाच्या सोडतीआधीच महापौरपदासाठी फिल्डींग सुरू

ठाण्यात आरक्षणाच्या सोडतीआधीच महापौरपदासाठी फिल्डींग सुरू सिद्धेश शिगवण ठाणे : ठाणे महापालिकेवर सलग ३० वर्षांपासून शिवसेनेचा भगवा फडकत असून पुढील महापौर कोण होणार, याबाबतची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. आज २२ जानेवारी रोजी…

बचेंगे तो और लढेंगे….

बचेंगे तो और लढेंगे…. कल्याण डोंबिवलीत एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेने उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे ११ पैकी चार नगरसेवक फोडले. या घटनेनंतर उरलेल्या ७ नगरसेवकांनी आज उद्धव ठाकरेंची मातोश्री निवासस्थानी भेट घेतली. बचेंगे…

मुंबईत ठाकरेंच्या शिवसेनेच्या गटनेतेपदी किशोरी पेडणेकर

मुंबईत ठाकरेंच्या शिवसेनेच्या गटनेतेपदी किशोरी पेडणेकर मुंबई: शिवसेना ठाकरे गटाच्या माजी महापौर आणि नगरसेविका किशोरी पेडणेकर यांची मुंबई महानगर पालिकेत गटनेतेपदी निवड करण्यात आली आहे. ठाकरेंच्या शिवसेनेकडून बैठकीमध्ये माजी महापौर किशोरी पेडणेकर यांना गटनेतेपदी नियुक्ती करण्यात आली आहे. मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत वॉर्ड क्रमांक १९९मधून किशोरी पेडणेकर विजयी झाल्या होत्या. त्यांनी शिवसेना शिंदे गटाच्या रुपल कुसळे यांचा पराभव केला होता. गटनेतेपदासाठी महापालिकेत विविधपदे भूषवलेल्या विशाखा राऊत, किशोरी पेडणेकर, मिलिंद वैद्य, श्रद्धा जाधव यांची नावे पुन्हा चर्चेत होती. मात्र बैठकीनंतर किशोरी पेडणेकरांची गटनेतेपदी निवड करण्यात आली. तब्बल २५ वर्षे ठाकरेंची एकहाती सत्ता असलेल्या मुंबई महानगरपालिकेत भाजप युतीनं ठाकरेंची सत्ता उलथवून लावली. ८९ जागा मिळवत मुंबईत भाजप सर्वात मोठा पक्ष ठरला. तर त्यापाठोपाठ उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला ६५ जागा मिळाल्यात. शिंदेंच्या शिवसेनेला २९, काँग्रेसला २४, मनसेला ६, एमआयएमला ८, राष्ट्रवादी अजित पवार गटाला ३, राष्ट्रवादी शरद पवार गटाला १, समाजवादी पार्टीला २ जागा जिंकल्या आहेत. दरम्यान, सर्व २९ महानगरपालिकामधील महापौरपदाच्या आरक्षणाची सोडत २२ जानेवारी रोजी सकाळी ११ वाजता सर्व महापालिकांसाठी महापौरपदाची आरक्षण सोडत काढली जाणार आहे.

बाळासाहेब ठाकरेंच्या जयंतीलाच शिवसेनेच्या मालकीची सुनावणी 

बाळासाहेब ठाकरेंच्या जयंतीलाच शिवसेनेच्या मालकीची सुनावणी सुप्रीम कोर्टाचे आस्तेकदम पक्ष आणि चिन्हावर आता शुक्रवारी २३ जानेवारीला सुनावणी नवी दिल्ली: हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी आपल्या रक्त आणि घामाने उभा केलेल्या शिवसेना…

ठाकरे बंधूंच्या युतीचे ‘कल्याण’!

ठाकरे बंधूंच्या युतीचे ‘कल्याण’! मनसेचा कल्याण डोंबिवलीत शिंदेंच्या सेनेला पाठींबा ठाकरेंचे ४ नगरसेवकही फुटले शिंदेंच्या शिवसेनेचा महापौर होणार स्वाती घोसाळकर कल्याण : तब्बल २० वर्षानंतर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेशी युती करून कल्याण डोंबिवलीत ५…

पाच वर्षांत संपूर्ण मुंब्रा हिरवा करणार – सहर शेख

पाच वर्षांत संपूर्ण मुंब्रा हिरवा करणार – सहर शेख एमआयएमच्या नगरसेविकेचे आव्हाडांना आव्हान ठाणे : पुढील पाच वर्षत संपूर्ण मुंब्रा हिरवा करायचाय, पाच वर्षांनी इथला प्रत्येक विजयी उमेदवार एमआयएमचा असेल. असे थेट आव्हान मुंब्य्रातील…

संभाजीनगरमध्ये शिवसेनेसोबतची युती तोडा

संभाजीनगरमध्ये शिवसेनेसोबतची युती तोडा भाजपा कार्यकर्त्यांनी मंत्र्यांची गाडी अडवली संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगरमध्ये जिल्हा परिषद निवडणुकांसाठी भाजप आणि शिंदेंच्या शिवसेनेची  अखेर युती झाली आहे. शिवसेना २५ तर भाजप २७ जागा लढवणार असल्याची घोषणा शिवसेनेकडून पालकमंत्री संजय शिरसाट तर भाजपकडून बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे यांनी घोषणा केली. मात्र, युतीच्या घोषणेनंतर संभाजीनगरमध्ये  राडा झाला. भाजप कार्यकर्त्यांनी मंत्री अतुल सावे यांच्यासमोर हात जोडले, तसेच त्यांच्या गाड्याही अडवल्या. साहेब, युती तोडा असे म्हणत भाजपा कार्यकर्ते आक्रमक झाले. संभाजीनगरमधील शिवसेना-भाजपची ही युती जिल्ह्यातील केवळ सात तालुक्यात असणार आहे. मात्र, सोयगाव आणि सिल्लोड या दोन तालुक्यातील ११ ठिकाणी युती न करता शिवसेना आणि भाजप हे एकमेकांच्या विरोधात निवडणूक लढवणार आहेत. महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये इच्छुकांचा जसा राडा झाला होता तसाच राडा आज जिल्हा परिषद निवडणुकीच्या युतीच्या घोषणेनंतर त्याच ठिकाणी झाला. वैजापूर तालुक्यातील भाजपचे भाजपचे काही पदाधिकारी आणि कार्यकर्ते हे थेट मंत्री अतुल सावे आणि भाजपचे आमदार खासदार यांना घेराव घालण्याचा प्रयत्न केला. त्यासोबतच त्यांची गाडीही अडवली. त्यामुळे काही काळ राडा आणि गोंधळ पाहायला मिळाला. अखेर, पोलिसांच्या बंदोबस्तात मंत्री अतुल सावे निघून गेले. वैजापूर तालुक्यातील आठ जागांपैकी केवळ तीन जागा भाजपला मिळाले आहेत. त्यामुळे, भाजप कार्यकर्त्यांनी रोष व्यक्त केला, अनेक वर्षे आम्ही निवडणुकीची तयारी करीत होतो. मात्र, ती जागा शिवसेनेला गेली आणि तिथं भाजप नेत्यांना शिव्या देणारा व्यक्ती उमेदवार असणार आहे. त्यामुळं आता आम्ही त्यांच्यासाठी काम करायचं का? असा प्रश्न भाजप कार्यकर्त्यांनी उपस्थित केला आहे.