Category: होम

‘भाजपमध्ये भीती आणि जनतेमध्ये आक्रोश’

 नाशिक दौऱ्यात आदित्य ठाकरे यांचा घणाघात हरिभाऊ लाखे नाशिक – शिवसेना (एकनाथ शिंदे) नेते डॉ. श्रीकांत शिंदे यांनी नाशिकमध्ये मागील आठवड्यात शिवसंवाद मेळावा घेत पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांशी संवाद साधल्यानंतर आता शिवसेना (उध्दव ठाकरे) नेते आमदार आदित्य ठाकरे यांनीही नाशिकचा दौरा करुन कार्यकर्त्यांचा मेळावा घेतला. कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांना कोणकोणत्या समस्यांना हात घातला पाहिजे, प्रश्नांचा पाठपुरावा कसा केला पाहिजे, याविषयी मार्गदर्शन करतानाच पत्रकारांशी संवाद साधताना आदित्य ठाकरे यांनी केंद्र आणि राज्य सरकारच्या अपयशावर टीका केली. कुंभमेळ्यास कोणाचाही विरोध असण्याचे कारण नाही. परंतु, कुंभमेळ्यातील कामांचे कंत्राट कोणाला देण्यात येत आहे, त्याचा नाशिकला काही फायदा आहे काय, याचा विचार करण्याची गरज आहे. नाशिकमध्ये सर्वत्र खोदकाम करुन ठेवल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. पावसाळा सुरु झाल्यानंतर ही कामे यशस्वी होतील का, याची खात्री सरकार देणार आहे काय, असा प्रश्न आदित्य ठाकरे यांनी उपस्थित केला. जागतिक परिस्थिती वेगळी असली तरी या सरकारने मागील काही वर्षात आर्थिक परिस्थितीवर असे काही करुन ठेवले आहे की, त्याचा परिणाम सर्वाना भोगावा लागत आहे. पैसे नाही दिले तरी कंत्राटदार खोदकाम सोडून देणार नाही, याची हमी सरकार देऊ शकणार आहे काय, असा प्रश्न उपस्थित करुन सार्वजनिक बांधकाम विभागाकडून अनेक कंत्राटदारांना त्यांच्या कामाचे पैसे मिळाले नसल्याकडे लक्ष वेधले. कुंभमेळ्यासाठी नाशिकमध्ये होणाऱ्या रिंगरोडकरिता होणाऱ्या भूसंपादनाविरोधात आवाज उठविणाऱ्या शेतकऱ्यांना अधिकाऱ्यांकडून मारहाण करण्यात आली. संजय राऊत यांनी नाशिक जिल्हाधिकाऱ्यांकडे हा मुद्दा मांडला होता. शेतकरी कधीही चांगल्या कामाला विरोध करीत नाही. परंतु, त्याच्या मागण्यांचाही विचार करणे आवश्यक असल्याचे ठाकरे यांनी सांगितले. शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी कोण होता शिवाजी ? हे पुस्तक वाचले असते तर शिवाजी महाराजांनी गद्दारांना काय शिक्षा दिली होती, याचा या गद्दारांना पळताना चारदा विचार करावा लागला असता. त्यांनी डोकं ठिकाणावर ठेवून देशात आणि राज्यात कोणते प्रश्न महत्वाचे आहेत, रोजगार किती आहेत, सरकारमुळे रुपयाची काय परिस्थिती झाली, या सरकारमुळे शहरांची काय अवस्था झाली, या प्रश्नांचा विचार करावयास हवा. असे प्रश्न अधिवेशनात मांडावयास हवेत. विधान परिषद निवडणुकीसंदर्भात उद्धव ठाकरे हेच पक्षाची अधिकृत भूमिका मांडतील. नाशिकमध्ये ठाकरे गटाचे नगरसेवक आक्रमकपणे जनतेचे प्रश्न मांडत आहेत. त्यांनी अजून कशाप्रकारे प्रश्नांची मांडणी करावयास हवी, यासंदर्भात नगरसेवकांसह इतर पदाधिकारी, कार्यकर्त्यांशी चर्चा करण्यात आल्याचे आदित्य ठाकरे यांनी सांगितले. इतर पक्षांमागे लागतात, तसे भाजप हे काॅक्रोच जनता पार्टीमागे लागले आहेत. काॅक्रोच जनता पार्टीला समाज माध्यमात बंदी घालावीशी भाजप सरकारला वाटले. यावरुन विचार करा त्यांच्यात किती भीती आहे. भाजपमध्ये भीती असल्याचे आणि जनतेमध्ये आक्रोश असल्याचे दिसून आले आहे. भाजपविरोधात कोणी बोलले की लगेच त्याचा पाकिस्तानशी संबंध जोडण्यात येतो, अशी टीका आदित्य ठाकरे यांनी केली. त्यांनी काॅक्रोच जनता पार्टीशी संबंधित विषयावरुन लोकांमध्ये किती आक्रोश आहे, हे लक्षात येत असल्याचे सांगितले. सरकारमधील मंत्री सर्वत्र पुरेसा इंधन साठा असल्याचा दावा करतात. परंतु, अनेक ठिकाणी पेट्रोल पंप बंद झाले आहेत. इंधन मिळविण्यासाठी कुठे भांडणे होत आहेत. कुठे मारामाऱ्या होत आहेत. रांगा लागल्या आहेत. राज्यातील ही परिस्थिती सरकारमध्ये असूनही जर मंत्र्यांना माहीत नसेल तर काय उपयोग, असा प्रश्न आदित्य ठाकरे यांनी केला. कोट “भाजपमध्ये सध्या भीतीचे वातावरण असून जनतेमध्ये प्रचंड आक्रोश दिसून येत आहे. भाजपविरोधात कोणी आवाज उठवला किंवा सरकारच्या धोरणांवर प्रश्न उपस्थित केले की, लगेच त्याचा पाकिस्तानशी संबंध जोडण्याचा प्रयत्न केला जातो. ही लोकशाहीसाठी अत्यंत धोकादायक प्रवृत्ती आहे.” – आदित्य ठाकरे ०००००००

आंबिवलीत पाण्यासाठी अ प्रभाग कार्यालयात महिलांचे ठिय्या आंदोलन

‘बेकायदेशीर नळ जोडण्या तोडा, नियमित पाणी द्या’ची जोरदार मागणी कल्याण : कल्याण-डोंबिवली महापालिका क्षेत्रातील आंबिवली परिसरात गेल्या चार महिन्यांपासून सुरू असलेल्या तीव्र पाणीटंचाईमुळे नागरिकांचा संताप अखेर रस्त्यावर उतरला. वारंवार तक्रारी करूनही प्रशासनाकडून ठोस दखल घेतली जात नसल्याच्या निषेधार्थ संतप्त महिला आणि नागरिकांनी अ प्रभाग कार्यालयात धडक देत ठिय्या आंदोलन केले. यावेळी “पाणी आमचा हक्क आहे”, “बेकायदेशीर नळ जोडण्या बंद करा” अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला. आंबिवलीतील अटाळी परिसरातील शंभू पाटील चाळ, साईकृपा चाळ, धर्मात्मा नगर, ज्योतिर्लिंग चाळ आदी भागांमध्ये अनेक दिवसांपासून नियमित पाणीपुरवठा होत नसल्याने नागरिकांना मोठ्या हालअपेष्टा सहन कराव्या लागत आहेत. विशेषतः महिलांना पाण्यासाठी दररोज भटकंती करावी लागत असून घरातील लहान मुले, ज्येष्ठ नागरिक आणि आजारी व्यक्तींना याचा मोठा फटका बसत आहे. सकाळपासून पाण्याच्या प्रतीक्षेत राहूनही नळ कोरडेच राहत असल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. आंदोलनकर्त्यांनी महापालिका प्रशासनावर गंभीर आरोप करत परिसरात मोठ्या प्रमाणावर बेकायदेशीर नळ जोडण्या झाल्याचे सांगितले. काही अनधिकृत बांधकामांना चोरून पाणीपुरवठा केला जात असल्यामुळे नियमित कर भरणाऱ्या नागरिकांवर अन्याय होत असल्याचा आरोप महिलांनी केला. “आम्ही नियमित घरपट्टी आणि पाणीपट्टी भरतो, तरीही आम्हाला पुरेसे पाणी मिळत नाही. मात्र बेकायदेशीर जोडण्यांमुळे पाण्याचा दाब कमी होत असून आमच्या भागात पाणीच पोहोचत नाही,” असे रेशमा बोत्रे आणि जयश्री ढेकळे यांनी संतप्त प्रतिक्रिया देताना सांगितले. दरम्यान, आंदोलनाची तीव्रता वाढत असल्याचे पाहून पालिकेचे सहाय्यक आयुक्त जयवंत चौधरी यांनी आंदोलनस्थळी भेट देत नागरिकांशी चर्चा केली. त्यांनी पाणीपुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांना तातडीने पाहणी करण्याचे आदेश देत लवकरात लवकर पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील, असे आश्वासन दिले. ००००००

अंमली पदार्थांच्या व्यापाराला विरोध केल्यामुळे कुटुंबावर हल्ला

कल्याण : कल्याण पश्चिम येथील फिश मार्केट कॉम्प्लेक्समध्ये अंमली पदार्थांच्या व्यापाराला विरोध करणाऱ्या एका कुटुंबावर हल्ला झाल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. या हल्ल्यात कुटुंबातील अनेक सदस्य जखमी झाले असून…

– राष्ट्रवादीच्या आंदोलनाकडे खासदार सुरेश म्हात्रे यांनी फिरवली पाठ ?

– राष्ट्रवादी कार्यकर्त्यांमध्ये नाराजी कल्याण : कल्याणमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटाच्या वतीने वाढत्या महागाई विरोधात आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात राष्ट्रवादीचे पदाधिकारी कार्यकर्ते सहभागी झाले होते. मात्र भिवंडी लोकसभेचे राष्ट्रवादी शरद पवार गटाचे खासदार सुरेश म्हात्रे हे आज दिवसभर कल्याणच्या शासकीय विश्रामगृहात उपलब्ध असतांना देखील त्यांनी या आंदोलनात उपस्थित न राहिल्याने राष्ट्रवादी कार्यकर्त्यांमध्ये नाराजी पसरली असून कार्यकर्त्यांकडून खासदारांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण करण्यात आले आहेत. तर खासदार सुरेश म्हात्रे यांनी नुकतेच भाजपा सरपंचांचे आणि शिवसेना खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या कामाचे कौतुक केल्याने सर्वांच्याच भुवया उंचावल्या होत्या. त्यातच त्यांनी राष्ट्रवादीच्या आंदोलनाकडे पाठ फिरवल्याने कार्यकर्ते नाराज असल्याची चर्चा सुरू आहे.

नगराध्यक्षांच्या प्रयत्नातून माथेरानचा पाणीप्रश्न मार्गी

मुकुंद रांजाणे माथेरान :एखादे काम हाती घेतल्यावर त्याचा संपूर्ण निपटारा होईपर्यंत प्रयत्न करून गावाला अभिप्रेत असणाऱ्या महत्वपूर्ण कामाला तडीस नेण्यासाठी नेहमीच प्रयत्नशील असणाऱ्या कार्यक्षम नगराध्यक्ष चंद्रकांत चौधरींनी अनेक दिवसांपासून पायाला भिंगरी बांधल्याप्रमाणे पाणी प्रश्नांची उकल करण्यासाठी सातत्याने पाठपुरावा करून ऐन सुट्टयांच्या हंगामात पाण्याची समस्या उद्भवली होती ती अखेरीस मार्गी लावण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केल्यामुळे सहज शक्य झाले आहे. त्यांच्यासोबत उप नगराध्यक्ष संतोष शेलार सुध्दा वेळोवेळी हजर राहून जातीने लक्ष देत होते.आजवर नेरळ माथेरानला पाणी पुरवठा करणाऱ्या या योजनेच्या अधिकारी वर्गाने पाण्याच्या जुन्या पंपांकडे दुर्लक्ष केल्यामुळे याठिकाणी अनियमित पाणी पुरवठा होत असे.तर या पाण्याच्या पाईप मधून सर्रासपणे पाण्याची चोरी करणाऱ्या लोकांकडे देखील दुर्लक्ष करीत असल्याने माथेरानला अनियमित पाणी पुरवठा व्हायचा. मागील चार महिने तर हा पाणी पुरवठा बंद करण्यात आला होता.त्यामुळे शारलोट तलावातून पाण्याचा उपसा केला जात होता. उल्हास नदीतून होणारा पाणी पुरवठा बंद करण्यात आला होता याची माहिती सूत्रांकडून प्राप्त झाली होती परंतु सदर बाब स्थानिकांनी गांभीर्याने घेतली नाही. त्याचवेळी माथेरान करांनी लक्ष दिले असते तर एवढा खटाटोप करण्याची वेळ आली नसती असेही बोलले जात आहे. दरम्यान  महाराष्ट्र सोमवारी जीवन प्राधिकरणाच्या पनवेल येथील कार्यालयात नगराध्यक्ष चौधरी आणि शेलार यांनी अधिकाऱ्यांची भेट घेऊन पिंपरी चिंचवड येथून नवीन पंप खरेदी करून संबंधित ठेका असलेल्या कल्पतरू या कंपनीच्या माध्यमातून नवीन पंप माथेरान नियोजित पाणीपुरवठ्यासाठी वॉटरपाईप पंपिंग हाऊस येथे उपलब्ध करून देण्यात आला आहे. सदर पंप रात्री ११वाजता स्वतः नगराध्यक्ष व उपनगराध्यक्ष यांच्या देखरेखी खाली वॉटर पाईप येथील पंपिंग हाऊस येथे युद्ध पातळीवर बसवण्यात आला आहे.त्यामुळे मंगळवार पासून माथेरानकरांना पाणीपुरवठा सुरळीत चालू झाला आहे. मागील काही दिवसांपासून गेले दोन-तीन आठवडे पाण्यासंदर्भात चाललेल्या समाजमाध्यमांवरील  चर्चांना आता पूर्णविराम मिळाला असून नागरिकांनी कार्यक्षम नगराध्यक्ष चंद्रकांत चौधरी, उप नगराध्यक्ष संतोष शेलार यांचे अभिनंदन केले आहे.

उथळसर प्रभाग समिती परिसरात पहिल्याच पावसात पूर परिस्थिती?

भाजपचे नगरसेवक नारायण पवार यांची भीती ठाणे : उथळसर प्रभाग समितीच्या परिसरात पहिल्याच पावसात पूरपरिस्थिती निर्माण होण्याची भीती भाजपचे ज्येष्ठ नगरसेवक नारायण पवार यांनी व्यक्त केली आहे. नालेसफाईचे काम समाधानकारक झाले नसून, अनेक नाल्यांमधील गाळ व कचरा नाल्यालगत ठेवण्यात आला आहे. पहिल्या पावसात कचरा पुन्हा नाल्यात गेल्यामुळे पूराचा फटका नागरिकांना बसेल, अशी शक्यता नारायण पवार यांनी व्यक्त केली. प्रभाग समितीच्या हद्दीत अनेक ठिकाणी नाल्यांमधील कचरा उचलून नाल्यालगत ठेवण्यात आला आहे. तर अनेक नाल्यांमध्ये अजूनही प्लॅस्टिक कचरा व गाळ साचलेला आहे. या संदर्भात भाजपचे नगरसेवक नारायण पवार यांनी महापालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसह घनकचरा विभागाकडे सातत्याने तक्रारी केल्या. मात्र, त्याची दखल घेण्यात आलेली नाही. संबंधित कंत्राटदार अधिकाऱ्यांनाही जुमानत नसून, त्याला काळ्या यादीत टाकण्यासाठी नोटीस बजाविण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. पावसाळा सुरू होण्यास काही दिवसांचा अवधी राहिलेला आहे. येत्या आठवड्यात कोणत्याही दिवशी वळवाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यावेळी नाल्यालगत ठेवलेला कचरा पुन्हा नाल्यात गेल्यामुळे पहिल्याच पावसात उथळसर प्रभाग समितीच्या परिसरात पूर येण्याची भीती आहे. त्यामुळे नालेसफाई करण्याबरोबरच नाल्यालगत ठेवलेला गाळ उचलावा, अशी मागणी नगरसेवक नारायण पवार यांनी महापालिका आयुक्त सौरभ राव यांच्याकडे केली आहे.

ग्राहक तक्रार निवारण व स्मार्ट मीटरिंगवर विशेष प्रशिक्षण

मुंबई : महावितरणच्या ग्राहकांना अधिक सक्षम व पारदर्शक सेवा देण्यासाठी तसेच अधिकारी- कर्मचाऱ्यांची कार्यक्षमता वाढवण्यासाठी भांडुप परिमंडलात ‘ग्राहक तक्रार निवारण मंच’ व स्मार्ट मीटरिंग या विषयांवर प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात…

जी/उत्तर विभागातील गैरकारभारावर चौकशीची मागणी

मुंबई : जी/उत्तर विभागातील घनकचरा व्यवस्थापन खात्यातील कनिष्ठ पर्यवेक्षकांकडून कथित गैरप्रकार होत असल्याच्या तक्रारींमुळे महापालिका प्रशासनाची नाहक बदनामी होत असल्याचा आरोप म्युनिसिपल कामगार कर्मचारी सेनेने केला आहे. याबाबत तातडीने चौकशी…

प्रभादेवी येथील पुनर्विकासात घर न मिळाल्याने रहिवाश्यांचा रस्ता रोको आंदोलन

मुंबई : प्रभादेवी येथील सिद्धिविनायक मंदिरालगत असलेल्या जनार्दन अपार्टमेंट्स (पुरुषोत्तम वाडी) येथील जवळपास १४० मराठी कुटुंबांना जून २०२२ मध्ये इमारत धोकादायक घोषित करून एका रात्रीत घराबाहेर काढण्यात आले.या अन्यायकारक कारवाई…

रोजंदारीवर काम करणाऱ्या सफाई कर्मचाऱ्यांची चक्क नाल्यात बसून नालेसफाई 

उल्हासनगर  : पावसाळा सुरू व्हायला मोजकेच दिवस उरले असून उल्हासनगर महानगरपालिकेने मोठ्या नाल्यांची सफाई जेसीबी मशीन द्वारे सुरू केली आहे. शहरात अनेक छोट्या नाल्या देखील आहेत. दरवर्षी काही प्रभागातील नाल्यातील…