Category: होम

मतदार मॅपिंग प्रक्रियेत सिंधुदुर्ग जिल्हा राज्यात दुसरा…!

 जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांच्या मार्गदर्शनाखाली ९१ टक्के मॅपिंग पूर्ण…! सिंधुदुर्ग : भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार सुरू असलेल्या विशेष पुनरिक्षण मोहिम (एसआयआर -२०२६) अंतर्गत सिंधुदुर्ग जिल्ह्यात मतदारांच्या डिजिटल मॅपिंग प्रक्रियेला मोठी गती मिळाली असून, जिल्ह्याने ९१ टक्के मॅपिंग पूर्ण करण्याचा उल्लेखनीय टप्पा गाठला आहे. जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांच्या मार्गदर्शनामुळे आणि निवडणूक यंत्रणेच्या समन्वयाने सद्यस्थितीत सिंधुदुर्ग जिल्हा राज्यात दुसऱ्या स्थानी आहे. विशेष पुनःरीक्षण  मोहिमेच्या तिसऱ्या टप्प्यासाठी सिंधुदुर्ग  प्रशासन सुसज्ज असल्याचे जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी  धोडमिसे यांनी सांगितले. जिल्ह्यातील मतदार मॅपिंगची सुरुवातीची टक्केवारी अपेक्षेपेक्षा कमी असल्याचे लक्षात आल्यानंतर जिल्हाधिकारी धोडमिसे यांनी स्वतः या मोहिमेचा आढावा घेत विशेष लक्ष केंद्रीत केले. त्यांनी जिल्ह्यातील प्रत्येक विधानसभा मतदारसंघातील बूथ पातळी अधिकारी (बीएलओ) यांच्या स्वतंत्र बैठका घेत कामाची गती वाढवण्याचे निर्देश दिले. या बैठकीत तांत्रिक अडचणींचे निराकरण, माहिती संकलनातील त्रुटी दूर करणे आणि मॅपिंग प्रक्रियेत अचूकता राखण्याबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. जिल्हाधिकाऱ्यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे आणि योग्य नियोजनामुळे अल्पावधीतच जिल्ह्याने ९१ टक्के मॅपिंग पूर्ण करून उल्लेखनीय प्रगती साधली आहे. विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रमांतर्गत प्रत्येक मतदाराचे नाव विद्यमान मतदार यादीतून सन २००२ मधील मतदार यादीशी जोडण्याचे कार्य करण्यात येत आहे. या प्रक्रियेमुळे मतदार नोंदींची खातरजमा होण्यास मदत होणार असून मतदार यादी अधिक स्वच्छ, अचूक आणि पारदर्शक बनणार आहे. निवडणूक विभागाच्या समन्वयातून संपूर्ण जिल्ह्यात ही मोहीम प्रभावीपणे राबविण्यात येत आहे. कणकवली, कुडाळ आणि सावंतवाडी विधानसभा मतदारसंघातील मतदार नोंदणी अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी आपल्या कार्यक्षेत्रात काटेकोर नियंत्रण ठेवत मोहिमेला गती दिली. तसेच सहायक मतदार नोंदणी अधिकारी तथा तहसीलदार कणकवली, वैभववाडी, देवगड, कुडाळ, मालवण, सावंतवाडी, वेंगुर्ले आणि दोडामार्ग यांनी प्रत्यक्ष क्षेत्रात उतरून बीएलओंकडून हे काम वेळेत पूर्ण करून घेण्यासाठी विशेष प्रयत्न केले.

अभय मोकाशी यांना श्रद्धांजली, शनिवारी बोरीवली येथे शोकसभा

मुंबई  : ज्येष्ठ झुंझार पत्रकार श्री अभय मोकाशी यांचे नुकतेच दुःखद निधन झाले आहे. त्यांच्याबद्दलच्या शोकसंवेदना व्यक्त करण्यासाठी शनिवार, ३० मेला सायंकाळी पाच वाजतां उत्तर मुंबई पत्रकार संघातर्फे शोकसभेचे आयोजन…

अवैधरित्या डम्प‍िंग करणाऱ्या वाहनांवर घनकचरा विभागाने केली कारवाई

ठाणे : ठाणे महानगरपालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागामार्फत कोलशेत परिसरात अवैधरित्या डेब्रीचे डम्पिंग करणाऱ्या वाहनांवर आज कारवाई करण्यात आली. या कारवाईदरम्यान संबंधित वाहन चालकांकडून नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी तब्बल ६०हजार रुपयांचा दंड…

राहुल गांधींवर बोलण्याची नितेश राणेंची ‘औकात’ नाही – सुरेशचंद्र राजहंस.

मुंबई : लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्याबद्दल अत्यंत शिवराळ व बदनामी करणारी विधाने करण्याची स्पर्धा भारतीय जनता पक्षात लागलेली आहे. राज्याचे मंत्री नितेश राणे हे त्यातील एक ‘पात्र’ आहे.…

नेत्यांचा पोरखेळ

केरळमध्ये काँग्रसचे सरकार स्थानापन्न होऊन कामाला लागले खरे, पण पडद्यामागच्या घडामोडींनी पक्षांतर्गत पोरखेळ दाखवून दिला. तब्बल दहा वर्षांच्या प्रतीक्षेनंतर केरळच्या जनतेने काँग्रेसच्या नेतृत्वाखालील संयुक्त लोकशाही आघाडीला (यूडीएफ) कौल दिला. हा…

लोकांतील, लोकांचा लोकनेता; विलासराव देशमुख

महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांची आज ८१ वी जयंती. आजच्याच दिवशी म्हणजे २६ मे १९४५ रोजी लातूरमधील बाभळगावमध्ये त्यांचा जन्म झाला. विलासरावांनी पुण्यात बीएससी, बीए, एलएलबी यासारखे उच्च शिक्षण…

‘नीट’घोटाळ्याने व्यवस्थेवरच प्रश्न

देशातील वैद्यकीय शिक्षणाचे प्रवेशद्वार मानली जाणारी ‘नीट’ परीक्षा पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. प्रश्नपत्रिका फुटल्याच्या आरोपांपासून ते परीक्षा रद्द करण्याच्या निर्णयापर्यंत, केंद्रीय तपास यंत्रणांच्या चौकशीपासून ते संसदीय समितीच्या हस्तक्षेपापर्यंत…

महागाई विरोधात कल्याणमध्ये राष्ट्रवादी शरद पवार गट आक्रमक

– तहसीलदार कार्यालयावर मोर्चा काढत वाढत्या महागाईचा केला निषेध कल्याण: वाढत्या महागाई विरोधात कल्याणमध्ये राष्ट्रावादी कॉंग्रेस पार्टी शरद पवार गट आक्रमक झाले असून राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष डॉ. वंडार पाटील यांच्या नेतृत्वाखाली कल्याणमध्ये तहसीलदार कार्यालयावर मोर्चा काढत वाढत्या महागाईचा निषेध व्यक्त केला. पेट्रोल डिझेल दरवाढ आणि वाढत्या महागाई वरून कल्याण मध्ये राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या वतीने केंद्रातल्या नरेंद्र मोदी सरकारच्या विरोधात निषेध आंदोलन करण्यात आलं. कल्याण पश्चिमेतील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उद्यान ते तहसीलदार कार्यालयापर्यंत मोर्चा काढत तहसीलदार यांना निवेदन देण्यात आलं. राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष वंडार पाटील यांच्या नेतृत्वात कार्यकर्त्यांनी सरकार विरोधात तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली. वाह रे मोदी तेरा खेल सस्ती दारू महंगा तेल अशा घोषणा देत केंद्र सरकारचा निषेध नोंदविला. वाढत्या महागाई मुळे आणि सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे सर्व सामान्य जानतेला महागाईचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे. वाढलेली हि महागाई त्वरित कमी न झाल्यास राष्ट्रवादी पक्षातर्फे रास्तारोको करण्याचा इशारा यावेळी पाटील यांनी दिला.  या आंदोलनात महिला जिल्हाध्यक्षा सारिका गायकवाड, युवक जिल्हाध्यक्ष राज जोशी,   डोंबिवली शहर अध्यक्ष भालचंद्र पाटील,  कल्याण पश्चिम विधानसभा कार्याध्यक्ष रुपेश थळे आदींसह इतर पदाधिकारी आणि कार्यकर्ते सहभागी झाले होते. 000000  

बकरी ईदच्या दिवशी दुर्गादेवी मंदिर बंद ठेवण्याची प्रथा तात्काळ बंद करण्याची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

कल्याण: दुर्गाडी मंदिर प्रवेशबंदीवरून कल्याणमध्ये राजकारण तापले असून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उपनेते विजय साळवी यांनी सत्ताधार्यांवर सडकून टीका केली आहे. हिंदुत्ववादी सरकार असताना हिंदूंना मंदिरात प्रवेश मिळत नाही, सत्ताधारी पक्ष संघटनांना आंदोलनाची भाषा करावी लागत हे लज्जास्पद आणि हास्यास्पद असल्याचे विजय साळवी यांनी सांगितले. तसेच बकरी ईदच्या दिवशी किल्ले दुर्गाडी येथील श्री दुर्गादेवी मंदिर दर्शनासाठी होणारे निर्बंध व मंदिर बंद ठेवण्याची प्रथा तात्काळ बंद करण्याची मागणी त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. किल्ले दुर्गाडी हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पावन पदस्पशनि पवित्र झालेले ऐतिहासिक आणि धार्मिक स्थळ आहे. किल्ले दुर्गाडीवरील थी दुगदिवी मंदिर हे ठाणे जिल्हयातील जागृत देवस्थान असुन लाखो हिंदु भाविकांच्या श्रध्देचे केंद्र आहे. दरवर्षी बकरी ईदच्या दिवशी कायदा व सुव्यवस्थेचे कारण पुढे करुन दुर्गाडी मंदिर परिसरात निर्बंध लादले जातात. मंदिराकडे जाणारे मार्ग बंद केले जातात, घंटानादावर निर्बंध आणले जातात आणि अनेक भाविकांना देवीच्या दर्शनापासून वंचित रहावे लागते. अशा प्रकारे हिंदुंच्या धार्मिक अधिकारांवर घाला घालण्याची परंपरा अनेक वर्षापासून सुरु आहे. महाराष्ट्रात भारतीय जनता पार्टीचे सरकार असुन या सरकारच्या काळातच हिंदुंना आपल्या आराध्य देवीच्या दर्शनासाठी संघर्ष करावा लागणे ही अत्यंत वेदनादायक आणि संतापजनक बाब आहे. त्यामुळे बकरी ईदच्या दिवशी श्री दुर्गादेवी मंदिर परिसरातील सर्व अनावश्यक निर्बंध तात्काळ हटवावेत. हिंदु भाविकांना कोणत्याही अडथळ्याशिवाय देवीचे दर्शन घेण्याची हमी द्यावी. घंटानाद, आरती व इतर धार्मिक परंपरांवर कोणतेही निर्बंध लागू करू नयेत. संबंधित पोलिस व प्रशासकीय यंत्रणेला हिंदु भाविकांच्या धार्मिक अधिकारांचे संरक्षण करण्याबाबत स्पष्ट आदेश देण्याची मागणी विजय साळवी यांनी केली आहे. अन्यथा हिंदु समाजाच्या भावना, श्रध्दा आणि घटनात्मक अधिकारांच्या रक्षणासाठी लोकशाही मार्गाने व्यापक जनआंदोलन उभारण्याचा इशारा त्यांनी दिला आहे. 00000000

 बकरी ईद निमित्त अवैध जनावर वाहतुकीवर कारवाईचे निर्देश

मुंबई : राज्यात “बकरी ईद” निमित्त संभाव्य गोवंश हत्या रोखण्यासाठी कठोर उपाययोजना करण्याचे निर्देश विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिले आहेत. महाराष्ट्र पोलीस महासंचालक व मुंबई पोलीस आयुक्त यांना पत्र पाठवत संभाव्य गोवंश हत्या रोखण्यासाठी कठोर उपाययोजना करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. महाराष्ट्र राज्यात संपूर्ण गोवंश हत्या बंदीचा कायदा लागू असून, २८ मेला साजऱ्या होणाऱ्या बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर काही भागांत मोठ्या प्रमाणावर गोवंश हत्या होण्याची शक्यता आहे. विशेषतः मालेगाव-नाशिक, अहिल्यानगर, छत्रपती संभाजीनगर, सातारा, धाराशिव, धुळे आणि सोलापूर या जिल्ह्यांमध्ये विशेष दक्षता घेण्याचे निर्देश पत्रात दिले आहेत. स्थानिक पोलीस प्रशासनाने संवेदनशील भागांमध्ये गस्त वाढवावी, अवैध जनावर वाहतूक रोखावी, तसेच गोवंश हत्या प्रतिबंधक कायद्याची काटेकोर अंमलबजावणी करावी, असे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर म्हणालेत. तसेच, गोसंरक्षणासाठी कार्य करणाऱ्या गोरक्षकांवर हल्ला होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली असून, कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी तसेच कोणतीही अनुचित घटना टाळण्यासाठी आवश्यक ती प्रतिबंधात्मक आणि सुरक्षात्मक कार्यवाही करण्याची मागणीही करण्यात आली आहे. दरम्यान, या पत्रामुळे राज्यातील बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासन सतर्क झाले असून संवेदनशील भागांमध्ये विशेष बंदोबस्त ठेवण्याबाबत हालचाली सुरू झाल्याची माहिती पोलिस विभागाकडून मिळत आहे. 0000000000