Category: होम

मुंबईत पाणी बाणी

मुंबईत पाणी बाणी तब्बल ४४ तास पाणीपुरवठा बंद मुंबई : मुंबईकरांनो पाणी जपून वापरा. मेट्रोच्या कामामुळे मुंबईत तब्बल ४४ तास पाणीबाणी असणार आहे. मेट्रोच्या या कामामुळे  मुंबईकरांना  पुढील काही दिवस उकळलेले आणि फिल्टर केलेले पाणी प्यावे लागणार आहे. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या ‘मेट्रो 7अ’ प्रकल्पासाठी ४०० मिमी व्यासाच्या अप्पर वैतरणा जलवाहिनीचा काही भाग वळवण्यात आलाय. परिणामी वळवलेल्या जलवाहिनीला पूर्व विभागाशी जोडण्याचे काम सुरू केले जाणार आहे. यासाठी हा पाणीपुरवठ खंडीत होणार आहे. दरम्यान, मंगळवार, २० जानेवारी ते २२ जानेवारी रोजी सकाळी ५ वाजेपर्यंत दादर, प्रभादेवी, माहीम, धारावी, अंधेरी पूर्व, विक्रोळी, भांडुप, वांद्रे- कुर्ला कॉम्प्लेक्स, कांजूरमार्ग आणि विक्रोळी पश्चिमेकडील अनेक भागात हा पाणीपुरवठा बंद राहणार आहे. तर काही भागांत कमी दाबाने पाणीपुरवठा केला जाणार आहे. बीएमसीच्या जी नॉर्थ, के पूर्व, एस, एच पूर्व आणि एन विभागातील अनेक भागात पाणीपुरवठा विस्कळीत होणार काही भागात पाणीपुरवठा कमी होईल. तर नियमित पाणीपुरवठ्याच्या वेळा देखील बदलल्या जाणार आहे. महानगरपालिका प्रशासनाने बाधित भागातील रहिवाशांना पाण्याचा काटकसरीने वापर करण्याचे आणि पाणी वाचवण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलंय. तर मुंबई महानगरपालिकेकडून मिळालेल्या माहितीनुसार, पूर्व विभागात क्रॉस-कनेक्शनचे काम केले जाईल. हे काम मंगळवार ते गुरुवार एकूण ४४ तास सुरू राहील. या भागात पाणीपुरवठा प्रभावित होईल. असेही प्रशासनाकडून सांगण्यात आलंय.

जल,जंगल,जमीनसाठी आदिवासीर रस्त्यावर

जल,जंगल,जमीनसाठी आदिवासीर रस्त्यावर पालघर : जल,जंगल आणि जमीनीसाठी आदिवासी आता रस्त्यावर उतरली आहे. पालघर जिल्ह्यातील आदिवासी बांधवांच्या जमिनी संदर्भातील प्रश्न तसेच रोजगार हमी, प्रलंबित वन हक्क दावे, स्मार्ट मीटर संदर्भातील समस्या, पिण्याच्या पाण्याची उपलब्धता, रेशन, शिक्षण, आरोग्य, रोजगार व पेसा अंतर्गत नोकर भरती सारखे प्रश्न सुटले नाही तर भारतीय कम्युनिस्ट पक्षाने पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर आणलेला लॉंग मार्च रुपी आंदोलन अनिश्चित काळापर्यंत सुरू ठेवण्याची असा इशारा मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षातर्फे यांनी दिला. पालघर जिल्ह्यात राबवण्यात येणाऱ्या वाढवण व मुरबे बंदर, सागरी विमानतळ, चौथी मुंबई सारख्या प्रकल्पांमुळे अदानी व मूठभर धनाड्यांचा लाभ होणार असून हजारो शेतकरी मच्छिमार व आदिवासी कुटुंब देशोधडीला लागतील असे मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे राष्ट्रीय नेते डॉ. अशोक ढवळे यांनी पालघर येथे केले. चारोटी (डहाणू) येथून काल (सोमवारी) दुपारी सुरू झालेला लॉंग मार्च मोर्चा आज सायंकाळी उशिरा आले पालघर जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात दाखल झाला. या मोर्चामध्ये ३५ हजार पेक्षा अधिक नागरिकांचा उस्फूर्त सहभाग लाभला होता. सन २०१८ मध्ये मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने नाशिक – मुंबई दरम्यान काढलेल्या लॉंग मार्च प्रसंगी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी किसान सभा सोबत केलेल्या मागण्यांबाबत करारनामा केला होता. मात्र त्यामधील समाविष्ट बहुतांश मागण्यांची अंमलबजावण झाली नसल्याने कम्युनिस्ट पक्षाने वेळोवेळी लढे दिले, मोर्चे व आंदोलनाचे ठिकठिकाणी आयोजन केले होते. मात्र या आंदोलनाची दखल न घेतली गेल्याने पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर लॉंग मार्च चे आयोजन केल्याची माहिती देण्यात आली.

शिंदेंच्या २९ नगरसेवकांचे हॉटेलमधून चेकआऊट

शिंदेंच्या २९ नगरसेवकांचे हॉटेलमधून चेकआऊट  ४ दिवसांनी घरी परतले ० हॉटेल पॉलिटिक्स संपले ० दिल्ली पॉलिटिक्स सुरु स्वाती घोसाळकर मुंबई : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे मुंबईतील २९ नगरसेवकांचा हॉटेलमधिल मुक्काम आज…

भाजपात आजापासून नबीन पर्व !

भाजपात आजापासून नबीन पर्व ! नितीन नबीन यांची राष्ट्रीय अध्यक्षपदी बिनविरोध निवड  नबीन ठरले भाजपाचे सर्वात तरुण अध्यक्ष नवी दिल्ली – भारतीय जनता पार्टीत आजपासून नबीन पर्व सुरु झाले आहे. भाजपाचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून नितीन नबीन यांची बिनविरोध निवड झाली आहे. दिल्लीतील भाजपा मुख्यालयात झालेल्या कार्यक्रमात अधिकृतपणे ही घोषणा करण्यात आली. त्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, मंत्री नितीन गडकरी, जे.पी.नड्डा यांनी त्यांचे अभिनंदन केले. भाजपाचे निवडणूक अधिकारी के लक्ष्मण यांनी अध्यक्षपदासाठी घेतलेल्या निवडणुकीची माहिती सगळ्यांना दिली. त्यानंतर राष्ट्रीय अध्यक्षपदी नितीन नबीन यांचा एकमेव अर्ज आल्याचं सांगत त्यांनी नबीन यांच्या नावाची घोषणा करत त्यांना निवडीचं प्रमाणपत्र सोपवले. नितीन नबीन हे मूळ कार्यकर्ते आहे. अगदी लहान वयात ते ५ वेळा विधानसभेचे सदस्य राहिलेत. बिहार सरकारमध्ये अनेकदा ते मंत्री होते. राष्ट्रीय युवा मोर्चाचे महासचिव म्हणून त्यांनी देशभरात काम केले. सिक्कीम, छत्तीसगड येथे प्रभारी म्हणून काम केले. संघटनेतील अनुभवासोबत त्यांच्याकडे प्रशासकीय अनुभव आहे त्यामुळे त्यांच्या नेतृत्वात पक्ष आणखी पुढे जाईल असा विश्वासमावळते अध्यक्ष जे.पी.नड्डा यांनी व्यक्त केला. भाजपाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदासाठीच्या निवडणुकीचे रिटनिंग ऑफिसर म्हणून के. लक्ष्मण यांच्याकडे नितीन नबीन यांनी सोमवारी अर्ज दाखल केला. एकूण नामांकनाचे ३७ संच सादर करण्यात आले ते सर्व अर्ज वैध ठरले. नामांकन अर्ज सादर करण्याची प्रक्रिया २ ते ४ या वेळेत पूर्ण झाली. नामांकन अर्जाच्या ३७ संचांपैकी ३६ संच विविध राज्यातून आले. उरलेला एक संच भाजपा संसदीय मंडळाच्या सदस्यांकडून सादर करण्यात आला. त्यात पंतप्रधान आणि ३७ खासदारांचा समावेश होता. अर्ज परत घेण्याच्या कालावधीनंतर केवळ एकमेव अर्ज नितीन नबीन यांचा राहिला. आतापर्यंतचे भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष कोण? ६ एप्रिल १९८० साली भारतीय जनता पार्टीची स्थापना झाली. १९८० ते १९८६ या काळात अटल बिहारी वाजपेयी हे वयाच्या ५५ व्या वर्षी भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष बनले. त्यानंतर १९८६ ते १९९१ या काळात लालकृष्ण अडवाणी यांच्याकडे पक्षाचे नेतृत्व होते. तेव्हा त्यांचे वय ५८ वर्ष होते. त्यानंतर १९९३ ते १९९८, २००४ ते २००५ असे तीन वेळा अडवाणी भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष होते. १९९१ ते ११९३ या काळात वयाच्या ५७ व्या वर्षी मुरली मनोहर जोशी यांनी पक्षाचे नेतृत्व स्वीकारले. १९९८ ते २००० या काळात कुशाभाऊ ठाकरे, २०००-२००१  बंगारू लक्ष्मण, २००१-२००२ जना कृष्णमूर्ती, २००२-२००४ या काळात व्यंकय्या नायडू, २००५ ते २००९ आणि २०१३-२०१४ या काळात राजनाथ सिंह, २००९ ते २०१३ मध्ये नितीन गडकरी, २०१४ ते २०२० वयाच्या ४९ व्या वर्षी अमित शाह यांनी पक्षाची सूत्रे हाती घेतली. २०२० ते २०२४ या काळात जे.पी. नड्डा हे पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष राहिले आणि आता नितीन नबीन भाजपाचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष बनले आहेत. नबीन माझे…

शिवसेना पक्ष अन् चिन्हाबाबात आज सुप्रीम सुनावणी

शिवसेना पक्ष अन् चिन्हाबाबात आज सुप्रीम सुनावणी नवी दिल्ली : अवघ्या देशाचे लक्ष लागलेल्या शिवसेना पक्ष आणि चिन्ह कुणाचे याबाबतची अंतिम सुनावणी आजपासून सुप्रीम कोर्टात सुरु होणार आहे. शिवसेनेसोबतच राष्ट्रवादी काँग्रेसच्या पक्ष आणि चिन्हाची सुनावणीही यावेळी होणार आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या फुटीनंतर पक्ष आणि चिन्हाचा वाद सर्वोच्च न्यायालयात पोहोचला आहे. गेल्या तीन वर्षांपासून सर्वोच्च न्यायालयात याबाबत सुनावणी सुरु आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण…

ठाण्यात महायुतीच्या विजयासाठी ‘निरहुआ’ चा संगीतमय प्रचार

अनिल ठाणेकर ठाणे : ठाणे महापालिका सार्वत्रिक निवडणुकीत भाजप – शिवसेना – रिपाई महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी सोमवारी प्रसिद्ध भोजपुरी स्टार अभिनेता व खासदार दिनेशलाल यादव उर्फ निरहुआ आणि प्रसिद्ध अभिनेत्री आम्रपाली दुबे ठाण्यात आले होते. या दोन्ही कलाकारांनी ठाण्यातील विविध भागांना भेटी देऊन महायुतीच्या उमेदवारांचा संगीतमय प्रचार केला. निरहुआ याने तर देशभक्ती जागावत भोजपुरी गीतातून ‘कमळ’ आणि ‘धनुष्य बाण’ या चिन्हाला मत देण्याचे आवाहन करीत धमाल उडवून दिली. यावेळी मोठया संख्येने उपस्थित जनसमुदायानेही “भारत माता की जय” च्या घोषणा देत निरहुआला साथ दिली. ठाणे महापालिका सार्वत्रिक निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहचला असून प्रचाराचे नवनवे फंडे राजकीय पक्ष तसेच उमेदवार अजमावत आहेत. सोमवारी तर ठाण्यात भोजपुरी स्टार निरहुआ आणि अभिनेत्री आम्रपाली दुबे यांनी संगीतमय प्रचाराची धुम उडवुन दिल्याने सर्वत्र “ठाणे” शहर चर्चेत आहे. भोजपुरी अभिनेता व मा खासदार दिनेशलाल यादव (निरहुआ) व अभिनेत्री आम्रपाली दुबे यांनी वागळे इस्टेट प्रभाग क्र. १५ मधील इंदिरा नगर नाका, कळवा प्रभाग क्रं. २५ आतकोनेश्वर नगर,  मफतलाल मैदान आणि प्रभाग क्रमांक ४ मधील गांधीनगर, नळपाडा, खेवरा सर्कल परिसरात भाजप महायुतीचा साग्रसंगीत प्रचार केला. निरहुआ याने अनेक भोजपुरी गीतांचा नजराणा पेश करून  मतदारांशी संवाद साधला. उपस्थितांनी, भारतमाता की जय च्या जयघोषात फेर धरला होता. यावेळी प्रभाग क्रं १५ मधील भाजप महायुतीचे उमेदवार सुरेश चंदू कांबळे, अनिता दयाशंकर यादव, अमित सरैया, प्रभाग क्रमांक ४ मधील भाजपच्या स्नेहा आंब्रे, मुकेश मोकाशी, सेनेच्या आशादेवी सिंह, सिद्धार्थ संजय पांडे तर प्रभाग क्रमांक २५ ड चे उमेदवार ॲड. दीनानाथ पांडे आदी महायुतीच्या उमेदवारांच्या पारडयात भरभरून मतांचे दान टाकण्याचे आवाहन निरहुआ यांनी केले.

उद्यान गणेश शालेय कॅरम स्पर्धेत प्रसन्न गोळे विजेता     

उद्यान गणेश शालेय कॅरम स्पर्धेत प्रसन्न गोळे विजेता मुंबई:  श्री उद्यानगणेश मंदिर चषक राज्य स्तरीय विनाशुल्क शालेय कॅरम स्पर्धेत राष्ट्रीय ख्यातीचा सबज्युनियर कॅरमपटू प्रसन्न गोळे विजेता ठरला. श्री उद्यानगणेश मंदिर…

ठाण्यात “जय श्रीराम” वाला महापौर बसवा नाहीतर, हिरवे गुलाल उधळतील – नितेश राणे

ठाणे: एकीकडे संविधानाच्या गोष्टी करायच्या आणि दुसरीकडे धर्माच्या नावाने मतदानाचे फतवे काढायचे, ह्या व्होट जिहादचा पर्दाफाश आम्ही केला आहे. तेव्हा, राष्ट्रभक्त हिंदु समाजाने १५ तारखेला जागरूक राहुन मतदान करावे, आणि ठाण्यात “जय श्रीराम” वाला महापौर बसवावा, नाही तर हे हिरवे गुलाल उधळतील. असा सावधानतेचा इशारा राज्याचे मत्स्योद्योग व बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांनी दिला आहे. ठाणे महापालिकेच्या प्रभाग क्रमांक ५ चे भाजप – शिवसेना – रिपाई महायुतीचे उमेदवार सीताराम राणे, परिषा सरनाईक आणि जयश्री डेव्हीड यांच्या प्रचारार्थ मंगळवारी काढण्यात आलेल्या भव्य रॅलीत मंत्री नितेश राणे सहभागी झाले होते. त्यावेळी त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. शिवाईनगर येथील श्री संकटमोचक हनुमान मंदिर येथून ओपन जीपमध्ये सवार होऊन प्रारंभ झालेल्या ह्या रॅलीमध्ये महायुतीच्या तिन्ही उमेदवारांसह आमदार संजय केळकर, भाजप ठाणे जिल्हाध्यक्ष संदीप लेले सहभागी झाले होते. छत्रपती शिवाजी महाराजांचा जयजयकार करीत देवाभाऊ गीताने गुंजलेली ही रॅली तब्बल दोन तास चालली. रॅली दरम्यान माध्यमांशी बोलताना मंत्री नितेश राणे यांनी, व्होट जिहाद वर प्रखर भाष्य केले. आम्ही मुंबई – ठाणे या शहरांच्या विकासावर निवडणुका लढवतोय तर, दुसऱ्या बाजुला अजान बंद करणाऱ्याच्या विरोधात, मशिदी विरोधात बोलणाऱ्याच्या विरोधात मतदान द्या. असे धर्माच्या नावाने मतदान मागितलं जात आहे. याप्रकारे भारतीय जनता पक्षाच्या विरोधात मतदान करण्याची मागणी करणे, हा एक प्रकारे व्होट जिहाद असुन हेच मी जनतेसमोर आणण्याचा प्रयत्न केल्याचे ना. राणे यांनी सांगितले. एका बाजुला हिंदु समाजाला डिवचायचे आणि दुसऱ्या बाजुला मशिद आणि अजानच्या नावाने मते मागायची, एकीकडे संविधानाच्या गोष्टी करायच्या दुसरीकडे धर्माच्या नावाने मतदानाचे फतवे काढायचे,असे यांचे कारनामे सुरू आहेत. तेव्हा, राष्ट्रभक्त हिंदु समाजाने जागरूक राहुन १५ तारखेला मतदान करावे. ठाण्यात “जय श्रीराम” वाला महापौर बसला नाही तर १६ तारखेला हिरवे गुलाल उधळतील. असा सावधानतेचा इशारा मंत्री राणे यांनी दिला. चौकट बोगस मतदारांना मारणार म्हणणाऱ्या मनसेला प्रत्युत्तर देताना मंत्री नितेश राणे यांनी, हिंमत असेल तर बेहरामपाडा, नळबाजार येथील मोहल्यामध्ये बुरखे घालुन मतदान करतात. तिथे जाऊन त्यांचे हातपाय तोडा. तेव्हा कळेल बाळासाहेबांच्या विचारांचे कोण? असे आव्हान दिले. तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना जनतेने २०१४, २०१९ आणि २०२४ मध्ये कौल दिला आहे, मनसेसारखा शून्य मिळालेला नाही. अशी खिल्लीही त्यांनी मनसेची उडवली.

ठाण्यात प्रथमच ‘शरद पवार शिल्ड’ क्रिकेट स्पर्धेचा थाटात प्रारंभ

ठाण्यात प्रथमच ‘शरद पवार शिल्ड’ क्रिकेट स्पर्धेचा थाटात प्रारंभ अनिल ठाणेकर ठाणे: ठाण्याच्या सेन्ट्रल मैदानात पहिल्यांदाच आयोजित करण्यात आलेल्या ‘शरद पवार शिल्ड’ अंडर-१९ क्रिकेट स्पर्धेला उत्साहात सुरुवात झाली आहे. ठाणे…

दिवेकर शिवसेना–महायुतीच्या नेहमीच भक्कमपणे पाठीशी – डॉ. श्रीकांत शिंदे

दिवा–सीएसटी लोकल सुरू करण्याचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांचे दिवेकरांना आश्वासन दिवा, दि. १२ जानेवारी : “दिवेकर नागरिक शिवसेना–महायुतीच्या नेहमीच पाठीशी ठामपणे उभे आहेत. गेल्या दहा वर्षांत आम्ही जे वचन दिले, ते पूर्ण…