पंकज अडवाणी सलग चौथ्या जेतेपदासाठी सज्ज
सीसीआय स्नूकर पंकज अडवाणी सलग चौथ्या जेतेपदासाठी सज्ज मुंबई- राष्ट्रीय विजेता आणि २७ वेळा आयबीएसएफ विश्वविजेता पंकज अडवाणी हा ६ मार्चपासून आयकॉनिक क्रिकेट क्लब ऑफ इंडियाच्या विल्सन जोन्स बिलियर्ड्स हॉलमध्ये…
सीसीआय स्नूकर पंकज अडवाणी सलग चौथ्या जेतेपदासाठी सज्ज मुंबई- राष्ट्रीय विजेता आणि २७ वेळा आयबीएसएफ विश्वविजेता पंकज अडवाणी हा ६ मार्चपासून आयकॉनिक क्रिकेट क्लब ऑफ इंडियाच्या विल्सन जोन्स बिलियर्ड्स हॉलमध्ये…
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यासाठी २० वेळा निवेदन आता बाळासाहेब मिरजे यांचा तीव्र आंदोलनाचा इशारा रमेश औताडे मुंबई: नवी मुंबई शहरात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णाकृती पुतळा बसवण्यासाठी रिपब्लिकन पार्टी…
भारत–नेपाळ खो-खो कसोटी मालिकेसाठी निवड समिती जाहीर महाराष्ट्रच्या गोविंद शर्मांची निवड समितीवर वर्णी भारतीय मातीतील अस्सल आणि वेगवान खेळ असलेल्या खो-खोचा आंतरराष्ट्रीय थरार पुन्हा एकदा रंगणार आहे. भारत–नेपाळ खो-खो कसोटी…
चवदार तळे सत्याग्रह दिनी अनुयायांसाठी योग्य निवास, वाहतूक व्यवस्था तसेच सुरक्षा व्यवस्था उपलब्ध करून द्या- अण्णा बनसोडे मुंबई- ५ मार्च चवदार तळे सत्याग्रह दिनानिमित्त २० मार्च रोजी महाड येथे येणाऱ्या…
ठाणेवैभव आंतर कार्यालयीन क्रिकेट स्पर्धा ओमकारच्या २१ धावांत ५ बळी ठाणे : ओमकार सावंतची भेदक गोलंदाजी आणि सुमेद वेवट्रेची अर्धशतकी खेळीच्या जोरावर अप्लाईड क्लाऊड कॉम्प्युटिंग संघाने विहंग इंटरप्राइजेसचा आठ गडी…
महाराष्ट्राच्या क्रीडा अर्थक्रांतीची दमदार सुरुवात! शतक महोत्सवी वर्षात ऐतिहासिक पाऊल मुंबई : महाराष्ट्राच्या क्रीडा क्षेत्रात आज ऐतिहासिक क्षणाची नोंद झाली! क्रीडा अर्थव्यवस्थेला नवे पंख देणाऱ्या निर्णयांची नांदी आज मुंबईत रुजवली! …
आंतर हॉस्पिटल गिरनार चषक क्रिकेट स्पर्धा नानावटी,नायर हॉस्पिटलचे संघ विजेते मुंबईत..आंतर हॉस्पिटल गिरनार चहा चषक क्रिकेट स्पर्धेत एलिट गटात नानावटी हॉस्पिटलने तर प्लेट विभागात नायर हॉस्पिटलने विजेतेपदाचा मान मिळवला.मुंबई क्रिकेट…
माथेरान पाणीपट्टी अभय योजना लागू करावी विरोधी पक्षनेते सिताराम कुंभार यांची मागणी मुकुंद रांजणे माथेरान : महाराष्ट्र जीवन प्राधिकरण महामंडळ यांच्या माथेरान पाणी पुरवठा योजनेला पाणी पुरवठा अभय योजना लागू…
महावितरणच्या कल्याण परिमंडळ कार्यालयामध्ये राष्ट्रीय लाईनमन दिवस साजरा कल्याण : महावितरण कंपनीच्या कल्याण परिमंडळात राष्ट्रीय लाईनमन दिन साजरा करण्यात आला. परिमंडळ कार्यालयात उपस्थित लाईनमन (जनमित्र) यांना मुख्य अभियंता चंद्रमणी मिश्रा…
भारतीय राज्यघटनेच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त नवी मुंबईत आंतरराष्ट्रीय परिसंवाद संपन्न नवी मुंबई : (अशोक गायकवाड )—भारतीय राज्यघटनेच्या अमृतमहोत्सवी ७५ वर्षानिमित्त नवी मुंबई महानगरपालिकेच्या भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक, ऐरोली आणि मुंबई विद्यापीठाच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय संशोधन केंद्र व आंबेडकर चेअर (सामाजिक न्याय व अधिकारिता मंत्रालय, भारत सरकार) यांच्या संयुक्त विद्यमाने ‘भारतीय राज्यघटनेची ७५ वर्षे आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची विकासदृष्टी’ या विषयावर आंतरराष्ट्रीय परिसंवाद यशस्वी रितीने संपन्न झाला. कार्यक्रमाचा शुभारंभ नवी मुंबईच्या महापौर सुजाता सुरज पाटील यांच्या हस्ते झाला. स्वागतपर भाषण प्रा. मनीषा कर्णे यांनी तर प्रास्ताविक डॉ. कैलास गायकवाड यांनी केले. प्रमुख पाहुणे म्हणून निवृत्त आयएएस अधिकारी जे. एस. सहारिया यांनी भारतीय राज्यघटनेतील मूल्ये व त्यांचे सामाजिक महत्त्व यावर मार्गदर्शन केले. नवी मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त डॉ. कैलास शिंदे तसेच मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. रवींद्र कुलकर्णी यांनी परिषदेस शुभेच्छा दिल्या. नवी मुंबई महानगरपालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच समाजविकास विभागाचे उपायुक्त संजय शिंदे यांच्या पुढाकारातून आयोजित करण्यात आलेल्या या परिषदेत विविध तांत्रिक सत्रांमध्ये १६ संशोधनपर निबंध सादर करण्यात आले. महाराष्ट्र, दिल्ली, गुजरात, हैदराबाद आदी राज्यांतील संशोधकांनी यामध्ये सहभाग घेतला. साऊथॅम्प्टन युनिव्हर्सिटी, लंडन येथील संशोधकानेही आपला संशोधन निबंध या परिषदेत सादर केला. समारोप सत्रात थायलंड येथील डॉ. श्रीरंजन आवटे यांनी संविधानिक मूल्ये समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत पोहोचविण्याचे महत्त्व अधोरेखित करत सामाजिक न्यायाच्या दिशेने वाटचाल करण्याचे आवाहन केले. अधिवेशनाच्या विशेष सत्रात दीपक करंजीकर यांनी “डॉ. बाबासाहेब आंबेडकर : दूरदर्शी अर्थतज्ज्ञ” या विषयावर व्याख्यान दिले. परिषदेत संविधानिक मूल्ये, सामाजिक न्याय, स्त्री-पुरुष समानता, आरक्षण धोरण, लोकशाही व विकास या विषयांवर सखोल चर्चा झाली. सत्रांचे मॉडरेशन मुंबई विद्यापीठाच्या डॉ. प्रिया वैद्य व डॉ. सोनाली वाखर्डे यांनी केले. कार्यक्रमाचा तपशीलवार आढावा सादर करण्यात आला तसेच सहभागी अभ्यासकांना प्रमाणपत्रे व समिती सदस्यांना स्मृतिचिन्हे प्रदान करण्यात आली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. राशी बग्गा यांनी केले. तसेच आभार प्रदर्शन संध्या आंबाडे व दशरथ गंभीरे यांनी केले. हा आंतरराष्ट्रीय परिसंवाद भारतीय राज्यघटनेच्या ७५ वर्षांच्या प्रवासाचा आढावा घेणारा आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विकासदृष्टीचा पुनर्विचार करणारा ठरला.