Category: होम

 रश्मी शुक्लांविरोधातील याचिकेवर तातडीच्या सुनावणीस नकार

 पोलीस महासंचालकांच्या नियुक्तीला राजकीय रंग देऊ नका, उच्च न्यायालयाची टिप्पणी   मुंबई: विरोधी पक्षाच्या आक्षेपानंतर पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांना सक्तीच्या रजेवर पाठविण्यात आले. मात्र, त्यांच्या जागी सरकारने संजय कुमार यांची नियुक्ती करताना ती केवळ निवडणूक कालावधीपुरती मर्यादित ठेवण्याचे स्पष्ट केल्याने या निर्णयाला उच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले आहे. मात्र, न्यायालयाने सोमवारी या याचिकेवर तातडीची सुनावणी घेण्यास नकार दिला. तसेच, याचिका करण्याच्या याचिककर्त्याच्या हेतुवर प्रश्न उपस्थित केला. सरकारने निवडणूक आयोगाच्या आदेशाचे पालन केले आहे. शिवाय, आयपीएस अधिकाऱ्याच्या नियुक्तीला जनहित याचिकेद्वारे आव्हान कसे काय दिले जाऊ शकते ? या नियुक्तीने जनहित धोक्यात कसे आले आहे ? अशी विचारणा मुख्य न्यायमूर्ती देवेंद्र कुमार उपाध्याय आणि न्यायमूर्ती अमित बोरकर यांच्या खंडपीठाने याचिककर्त्यांच्या वकिलाला केली. त्याचप्रमाणे, पोलीस महासंचालकपदी तात्पुरती नियुक्ती झालेल्या अधिकाऱ्याने सरकारच्या निर्णयाला आव्हान द्यायला हवे. तुम्ही का आव्हान देत आहात ? एखाद्या अधिकाऱ्याची तात्पुरती नियुक्ती केली जात असेल तर याचिककर्त्यांचे त्याने काय नुकसान होणार आहे ? असा प्रश्नही न्यायालयाने केला. त्यावर, याचिकाकर्ते हे लोकसेवक असल्याचे सांगण्यात आल्यानंतर या प्रकरणाला राजकीय रंग देण्याचा प्रयत्न करू नका, असे न्यायालयाने सुनावले. तसेच, पोलीस महासंचालकपदाच्या नियुक्तीच्या निर्णयाला जनहित याचिकेद्वारे आव्हान दिल्याबाबत नाराजी व्यक्त केली. शुक्ला यांची महासंचालकपदी फेब्रुवारीमध्ये नियुक्ती करण्यात आली होती, मग त्यावेळी त्यांच्या नियुक्तीला आव्हान का देण्यात आले नाही, असा प्रश्नही न्यायालयाने यावेळी याचिकाकर्त्यांना केला व याचिकेवर तातडीच्या सुनावणीची गरज नसल्याचे नमूद करून प्रकरण तातडीने ऐकण्यास नकार दिला. दरम्यान, पोलीस महासंचालकांना निवडणुकीच्या काळात तटस्थ आणि निष्पक्षपणे काम करण्यात अडचणींचा सामना करावा लागू शकतो म्हणून निवडणूक आयोगाने शुक्ला यांची बदली करून पोलीस महासंचालकपदी संजय कुमार वर्मा यांच्या नियुक्तीचे स्पष्ट आदेश दिले होते. परंतु, निवडणूक आयोगाच्या या आदेशांचे उल्लंघन करून राज्य सरकारने वर्मा यांची नियुक्ती आचारसंहितेपर्यंत राहील, असे स्पष्ट करणारा आदेश काढला. निवडणूक आयोगाच्या आदेशात असा फेरफार करणे हे आयोगाच्या घटनात्मक अधिकारांचे उल्लंघन आहे, असा आरोप करून त्याविरोधात उच्च न्यायालयात याचिका करण्यात आली आहे. रश्मी शुक्ला या निवृत्त झाल्या असून त्यांना पुन्हा महासंचालकपदावर नियुक्त करणे नियबाह्य आहे. त्याचप्रमाणे, तात्पुरत्या पोलीस महासंचालकांच्या नियुक्तीमुळे महासंचालकांच्या कार्यक्षमतेवरही परिणाम होईल. राज्य सरकारच्या या कृतीमुळे घटनात्मक संतुलनाला बाधा पोहचून कायदेशीर अनिश्चितता उद््भवू शकते. त्यामुळे, सरकारची ही कार्यवाही नियमबाह्य जाहीर करण्याची मागणी याचिकेत करण्यात आली आहे. ०००

वाल्मिकी आणि बुध्द समाजाचा मतदानावर बहिष्कार !

ठाणे : विधानसभा  निवडणुकीच्या  दरम्यान बौद्ध आणि वाल्मिकी समाजाचे प्रश्न मर्गिस लावू असे आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलं असल तरी समाजाच्या प्रश्नांकडे कानाडोळा केला आहे. मग तो घराचा प्रश्न असो किंवा…

फ्लॅश मॉब, पथनाट्य, मॅस्कॉट, सायकलवरील फलक अशा विविध माध्यमांतून मतदान करण्याचा संदेश प्रसारण

नवी मुंबई : विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर स्वीप कार्यक्रमांतर्गत विविध माध्यमांचा प्रभावी वापर करून महापालिका आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली मतदार जनजागृती करण्यात आली आहे. सुट्टीच्या दिवशी नागरिक मोठ्या प्रमाणात कुटुंबियांसमवेत फिरायला बाहेर पडतात किंवा मॉलमध्ये खरेदीसाठी जातात हे लक्षात घेत वर्दळीच्या ठिकाणी पथनाट्यांसोबतच मॉल्समध्ये फ्लॅश मॉब सारख्या आधुनिक नृत्य प्रकारचाही प्रभावीपणे उपयोग करण्यात आला. यामध्ये सीवूड येथील नेक्सस मॉल तसेच वाशी येथील इनॉर्बिट मॉल याठिकाणी फ्लॅश मॉबचे आयोजन करण्यात आले होते. उपस्थितांना आकर्षित करून घेणारी गाणी अचानक सुरू होऊन त्या तालावर मॉलच्या मध्यभागी युवक-युवतींचा समूह नृत्य सुरू करतो. मग आपसूकच त्यांच्याकडे सगळे लोक खेचले जातात आणि नृत्य पाहण्यासाठी भोवताली गर्दी जमू लागते. विविध लोकप्रिय गाण्यांच्या माध्यमातून 20 नोव्हेंबरला विधानसभा निवडणूकीत मतदानाचा हक्क बजावावा असे आवाहन नृत्य समुहाव्दारे नागरिकांना करण्यात आले, त्याला नागरिकांचा उत्साही प्रतिसाद मिळाला. अशाच प्रकारे पथनाट्यासारख्या पारंपारिक प्रचार माध्यमांतूनही महापालिका क्षेत्रात बस डेपो, रेल्वे स्टेशन, मार्केट, वाणिज्य क्षेत्रे, मोठे चौक, नाके अशा वर्दळीच्या ठिकाणी सर्व आठही विभागांमध्ये मागील आठवडाभरात 60 हून अधिक ठिकाणी मतदान जनजागृतीपर पथनाट्ये करण्यात आली. त्यालाही नागरिकांनी उत्तम प्रतिसाद दिला. याशिवाय मतदान यंत्राचे मॅस्कॉट (शुभंकर) तयार करण्यात आले होते. या मतदान यंत्ररूपी 2 मॅस्कॉटनेही नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रात ठिकठिकाणी फिरून मतदान करा असा संदेश प्रसारित केला. या मॅस्कॉटसोबत अनेकांनी हौसेने सेल्फी छायाचित्रे काढली. मतदानाचा संदेश जनमानसात प्रसारित करण्यासाठी सायकलवर मतदानाचे आवाहन करणारे फलक लावून त्या सायकलीही नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील अंतर्गत छोट्या रस्त्यांवर फिरविण्यात आल्या व गल्लोगल्लीतील मतदारांपर्यंत पोहचण्याचा प्रयत्न करण्यात आला. अशा विविध माध्यमांतून नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने कलात्मक रितीने विधानसभा निवडणूकीत मतदान करण्याचे आवाहन करण्यात आले असून नागरिकांनी 20 नोव्हेंबर रोजी सकाळी 7 ते सायं. 6 या वेळेत मतदान करून आपला मतदानाचा हक्क बजावावा असे आवाहन नमुंमपा आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्या वतीने करण्यात आले आहे. ००००

डोंबिवलीत गावठी मद्य विक्रेत्यांवर पोलिसांच्या धाडी

डोंबिवली : विधानसभा निवडणुकीतील मतदानाच्या पूर्वसंध्येला सर्व प्रकारच्या मद्य विक्रीला शासनाने बंदी घातली आहे. त्यामुळे अधिकृत परवानाधारी मद्य विक्रीची दुकाने बंद आहेत. अनेक मद्यपींनी गावठी मद्याच्या अड्ड्यांवर धाव घेतली आहे.…

निवडणूकीच्या दिवशी जिल्ह्यातील आठवडा बाजार- जत्रा बंद ठेवा – संदीप माने

अनिल ठाणेकर ठाणे जिल्ह्यातील विधानसभा मतदारसंघांमध्ये बुधवारी,.२० नोव्हेंबर रोजी मतदान प्रक्रिया पार पाडली जाणार आहे. या विधानसभा मतदारसंघांच्या मतदारयादीत समाविष्ट असलेल्या प्रत्येक मतदाराला मतदार करता यावे, मतदाराला आपला मतदानाचा हक्क बजावता यावा याकरीता मतदान सुरळीतपणे पार पडणे आवश्यक आहे. त्यानुषंगाने बाजार व जत्रा अधिनियम, १८६२ चे नियम ५ ग अन्वये प्रदान करण्यात आलेल्या अधिकाराचा वापर करुन विधानसभा सार्वत्रिक निवडणूकीच्या कार्यक्रमाच्या अनुषंगाने बुधवारी, २० नोव्हेंबर रोजी, मतदानाचा दिवस असून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, याकरिता ठाणे जिल्ह्यातील, ठाणे: करावे गाव, गावदेवी मैदान, से.36, नवी मुंबई आणि मुंब्रा बाजारपेठ व कौसा बाजारपेठ, कल्याण: मांडा, भिवंडी: दुगाड, खारबाव, कोपर, वडवली तर्फे राहूर, राहणाळ, घोलगाव, शहापूर: पिवळी, शेणवे, मळेगाव, टेंभूर्ली (खराडे, चांग्याचा पाडा) या ठिकाणांवर भरणारा आठवडा बाजार किंवा जत्रा बंद ठेवण्याचे आदेश ठाणे जिल्हादंडाधिकारी अशोक शिनगारे यांनी दिले आहेत, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी तथा अपर जिल्हादंडाधिकारी डॉ.संदीप माने दृकश्राव्य माध्यमांनी (टेलिव्हिजन, केबल नेटवर्क, रेडिओ, सोशल मीडिया) अशा बातम्या प्रदर्शित करु नयेत. तसेच राजकीय जाहिराती, कार्यक्रम, सार्वजनिक सभा, मिरवणुका आयोजित करण्यास बंदी घालण्यात आली असल्याची माहिती मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयामार्फत देण्यात आली ठाणे जिल्ह्यातील सर्व विधानसभा मतदारसंघात निर्भयपणे, मुक्त वातावरणात मतदानाची प्रक्रिया पार पाडण्यासाठी जिल्हा प्रशासन, स्थानिक पोलीस यंत्रणा व केंद्रीय सुरक्षा दलाचे जवान सज्ज आहेत. मतदानादिवशी मतदान केंद्रांवर कोणतीही गर्दी होणार नाही व सर्व मतदारांना सुलभपणे मतदान करता यावे, यासाठी सर्व केंद्रीय सुरक्षा यंत्रणा तसेच स्थानिक पोलीस यंत्रणांनी दक्ष राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच मतदानासाठी येणाऱ्या नागरिकांना मतदान केंद्रात मार्गदर्शन करून त्यांचे मतदान जलदगतीने होईल, याकडे लक्ष द्यावे, असे निर्देश जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी अशोक शिनगारे यांनी दिले.विधानसभा सार्वत्रिक निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर ठाणे जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था तसेच मतदान केंद्र व मतमोजणी केंद्राच्या ठिकाणावरील विषयाबाबतची आढावा बैठक जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी अशोक शिनगारे यांच्या अध्यक्षतेखाली आज जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समिती सभागृहात पार पडली. या बैठकीस संबंधित सर्व केंद्रीय निवडणूक निरीक्षक, पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे, मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे, पोलीस अधीक्षक डॉ.डी. स्वामी, आचारसंहिता कक्षाचे नोडल अधिकारी विजयसिंह देशमुख, कायदा व सुव्यवस्था नोडल अधिकारी दीपक क्षीरसागर यांच्यासह सशस्त्र पोलीस दल, केंद्रीय राखीव पोलीस दल, केंद्रीय औद्योगिक सुरक्षा बल, गुजरात पोलीस, गोवा पोलीस, छत्तीसगड पोलीस दलाचे अधिकारी उपस्थित होते.स्थानिक पोलीस दलाबरोबरच मतमोजणी केंद्रांवर तसेच मतदान केंद्रांवर केंद्रीय सुरक्षा दलाचे जवान तैनात करण्यात आले आहेत. या जवानांनी मतदान केंद्रावर गर्दी होऊ नये, यासाठी काळजी घ्यावी. सर्व नागरिकांना तसेच मतदान केंद्रावरील अधिकाऱ्यांच्या मदतीने मतदान खोलीमधील व्यवस्थापन सुरळीत होईल, याकडे लक्ष देण्याच्या सूचना संबंधित यंत्रणांना देण्यात आल्या आहेत. मतदानासाठी रांगेचे व्यवस्थापन तसेच गर्दीचे व्यवस्थापन करताना स्थानिक पोलीस यंत्रणांबरोबरच केंद्रीय सुरक्षा यंत्रणाची मदत होईल. तसेच संवेदनशील व गर्दी होणाऱ्या मतदान केंद्रांवर विशेष लक्ष ठेवण्याच्या सूचनाही देण्यात आले असल्याचे श्री. शिनगारे यांनी यावेळी सांगितले.ईव्हीएमची वाहतूक तसेच स्ट्रॉंगरुमची सुरक्षा व्यवस्थाही चोखपणे ठेवण्यात आली असून केंद्रीय सुरक्षा यंत्रणांना अर्लट मोडवर राहण्याचे निर्देश यावेळी देण्यात आले आहेत.मतदान केंद्राच्या परिसरात अपुरी जागा असेल तेथे विशेष काळजी घेण्याचे निर्देश यावेळी केंद्रीय निरीक्षकांनी दिले. तसेच गर्दी होणाऱ्या ठिकाणी, जेथे मतदारांची जास्त रांगा लागतात अशा परिसरात ड्रोन कॅमेऱ्याच्या सहाय्याने लक्ष ठेवण्यात यावेत. मतदान प्रक्रियेसंदर्भात अथवा मतदानास उशीर होत असल्यासंदर्भात कोणतीही अफवा पसरवू नये, यासाठी सोशल माध्यमांवर लक्ष ठेवण्याचे निर्देशही केंद्रीय निरीक्षकांनी यावेळी दिले. प्रत्येक मतदान केंद्रांवर पुढील तास महत्त्वाचे असून अवैध मद्य वाहतूक, अवैध रोकड वाहतूक आदींवर भरारी पथकाने लक्ष ठेवावे, अशा सूचनाही केंद्रीय निरीक्षकांनी यावेळी दिल्या. ठाणे शहर व जिल्ह्यातील सर्व मतदान केंद्रांवर पुरेशा प्रमाणात सुरक्षा यंत्रणांची तैनात करण्यात आली आहे. तसेच संवेदनशील तसेच गर्दीच्या ठिकाणीही योग्य तो बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. मतदान केंद्रांवर तसेच मतदानाच्या रांगेत गर्दी होऊ नये, मतदारांना लवकरात लवकर मत देता यावे, यासाठी मतदान केंद्रातील अधिकाऱ्यांबरोबरच पोलीस यंत्रणाही सर्वतोपरी मदत करणार आहे. संवेदनशील ठिकाणे, गर्दीची ठिकाणे तसेच अरुंद रस्ते असलेल्या ठिकाणी ड्रोन, सीसीटीव्ही, विशेष पथकाद्वारे लक्ष ठेवण्यात येत असल्याचे पोलीस आयुक्त डुंबरे यांनी यावेळी सांगितले. चौकट ठाणे जिल्ह्यात २८ कोटी ७ लाख १३ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त विधानसभा सार्वत्रिक निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण राज्यात व ठाणे जिल्ह्यात भारत निवडणूक आयोगामार्फत आचारसंहिता लागू करण्यात आली आहे. या आचारसंहिता काळात नियमांचे पालन न करणाऱ्यांविरोधात प्रशासनामार्फत कठोर कारवाई करण्यात येते. या अंतर्गत ठाणे जिल्ह्यातील १८ विधानसभा मतदारसंघांमधून एकूण २८ कोटी ७ लाख १३ हजार रुपयांचा मुद्देमाल प्रशासनाकडून जप्त करण्यात आला आहे. यामध्ये १६ कोटी ५९ लाख ४ हजार रोख रक्कम, ३ कोटी ३२ लाख ३४ हजार रुपये किंमतीचा मद्यसाठा,१ कोटी ८० लाख ३२ हजार रुपये किंमतीचे अंमली पदार्थ, २३ लाख २६ हजार रुपये किंमतीच्या मौल्यवान वस्तू – दागिने आणि ७ कोटी १२ लाख १७ हजार रुपये किंमतीचे मोफत वाटपाचे / इतर साहित्य ठाणे जिल्ह्यातील १८ विधानसभा मतदारसंघांमधून प्रशासनाकडून जप्त करण्यात आले आहे.

निवडणुकीसाठी नियुक्त कर्मचाऱ्यांसाठी टीएमटीची बसव्यवस्था

ठाणे : बुधवार, २० नोव्हेंबर रोजी होत असलेल्या विधानसभा निवडणुकीच्या मतदानाच्या पार्श्वभूमीवर निवडणुकीसाठी नेमणूक करण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांच्या सोयीसाठी ठाणे महापालिकेच्या परिवहन सेवेने (टीएमटी) बस व्यवस्था उपलब्ध करून दिली आहे. या…

प्रीतम जे एम म्हात्रे यांचा विजय निश्चित राज भंडारी

उरण :  उरण तालुक्यातील विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडी, शेतकरी कामगार पक्षाचे अधिकृत उमेदवार प्रीतम जे एम म्हात्रे हे प्रचंड मतांनी निवडून येणार असल्याचा दावा शेकापच्या जेष्ठ कार्यकर्त्यांनी केला आहे. 20 नोव्हेंबर रोजी उरण विधानसभेची मतदान प्रक्रिया पडणार आहे. त्यांच्या प्रचाराला, रॅलीला सभेला प्रचंड प्रतिसाद मिळाला. शेकापने तालुक्यातील गावागावात केलेल्या विकास कामांच्या जोरावर प्रीतम जे एम म्हात्रे हे प्रचंड मतांनी निवडून येतील याबद्दल तीळ मात्र शंका नाही. विकासाचे काम करणारे दमदार आमदार प्रीतम जे एम म्हात्रे यांच्या रूपाने पाहिले जाते. प्रीतम म्हात्रे हे सामान्य जनतेच्या मनातील उमेदवार आहेत. उरण मतदार संघात तरुणांच्या रोजगाराचा प्रश्न गंभीर बनला आहे. त्याचप्रमाणे उपजिल्हा रुग्णालय, पायाभूत सुविधा, वाहतूक कोंडीमुळे होणारे अपघात, नौदलाच्या सेफ्टी झोन, जेएनपीए विस्थापित हनुमान कोळीवाड्याचे पुनर्वसन आदी प्रश्न स्थानिक व भूमिपुत्रांच्या जिव्हाळ्याचे आहेत. त्यांना न्याय देण्यासाठी शेकापचे उमेदवार प्रीतम जे एम म्हात्रे यांना निवडून देण्याचे आवाहन करण्यात येत आहे. दोन्ही उमेदवारांपेक्षा प्रीतम जे म्हात्रे यांचे सामाजिक काम मोठे असून ते प्रचंड मतांनी निवडून येतील असे शेकापचे ज्येष्ठ नेते अनिल शिंदे यांनी सांगितले. ते उमेदवार म्हणून नव्हे तर गेली काही वर्षे या परिसरात सामाजिक काम करत असल्याने त्यांचा विजय नक्की असल्याचे गिरीश माळी यांनी सांगितले. धार्मिक कार्य ते सामाजिक, शैक्षणिक कार्यात प्रीतम जे एम म्हात्रे यांचा सिंहाचा वाटा आहे. प्रीतम म्हात्रे यांचे सामाजिक कार्य उरण, पनवेल, खालापूर, रायगड परिसरातील नागरिकांना माहिती आहे. कोरोना काळात केलेली मदत तसेच इरसाळवाडी दुर्घटनाग्रस्त जनतेला दिलेला दिलासा हे येथील जनतेने पाहिलेले आहे. प्रीतम जे एम म्हात्रे यांची तरुणांमध्ये मोठ्या प्रमाणात क्रेझ दिसून आली. त्यांनी येथील बेरोजगारीचा प्रश्न हाती घेतला आहे. उरण विधानसभा मतदारसंघात शिट्टीचा आवाज जोरदार होईल आणि प्रीतम म्हात्रे प्रचंड मतांनी निवडून येतील असे जेष्ठ कार्यकर्ते तरुण वर्ग सांगत आहे. यानिमित्ताने शेकाप आपला बालेकिल्ला राखेल असे बोलले जात आहे. शांत, शिस्तप्रिय आणि नम्र स्वभावाचा सुशिक्षित उमेदवार म्हणून प्रीतम दादा म्हात्रे यांची छबी निर्माण होत आहे. आज पर्यंत त्यांनी अनेकांना आधार दिला आहे. 20 नोव्हेंबर रोजी प्रीतम दादा म्हात्रे यांना बहुमताने निवडून द्या असे तालुका सहचिटणीस सुरेश पाटील यांनी आवाहन केले आहे.…

म्हाडाचा कारभार लवकरच कागदविरहीत

ई -ऑफिस प्रणालीअंतर्गत सर्व सेवांचे संगणकीकरण होणार   मुंबई : म्हाडाचा संपूर्ण कारभार संगणकीय, कागदविरहित (पेपरलेस) करण्याचा निर्णय यापूर्वीच म्हाडाने घेतला होता. आता या निर्णयाच्या अंमलबजावणीला सुरुवात करण्यात येणार आहे. त्यानुसार ई ऑफिस प्रणालीअंतर्गत म्हाडातील सर्व सेवांचे लवकरच संगणकीकरण केले जाणार आहे. टप्प्याटप्प्याने हे संगणकीकरण केले जाणार असून पहिल्या टप्प्यात जुन्या उपकरप्राप्त इमारतींच्या पुनर्विकास प्रस्तावास मुदतवाढ देण्याची वा ‘ना हरकत’ प्रमाणपत्र देण्याची प्रक्रिया संगणकीय पद्धतीने राबविली जाणार आहे. तर मुंबई मंडळातील भूखंडांच्या भाडेपट्टा करारनाम्यांचे नूतनीकरण संगणकीय पद्धतीने केले जाणार आहे. पहिल्या टप्प्यातील सेवांचे संगणकीकरण करण्याच्या कामाला लवकरच म्हाडाच्या संबंधित विभागाकडून सुरुवात केली जाणार आहे. एकूणच या संगणकीकरणामुळे लवकरच म्हाडाचा कारभार कागदविरहीत होणार आहे. म्हाडाकडून गृहप्रकल्प राबविण्यासह सोडतीद्वारे सर्वसामान्यांना घरांचे वितरण केले जाते. तर जुन्या इमारतींचा, म्हाडा वसाहतींचा पुनर्विकास केला जातो. तर इतर अनेक सेवा पुरविल्या जातात. या सर्व कामांसाठी म्हाडा लाभार्थ्यांसह इतर नागरिकांना म्हाडा भवनासह राज्यभरातील विविध विभागीय मंडळामध्ये यावे लागते. काळानुरूप कारभार संगणकीय करण्याचा निर्णय यापूर्वीच म्हाडाने घेतला होता. त्यानुसार आधी सोडतपूर्व आणि सोडत प्रक्रिया संगणकीय करण्यात आली, तर दीड वर्षांपूर्वीच सोडतीनंतरची संपूर्ण प्रक्रियाही संगणकीय करण्यात आली आहे. संपूर्ण सोडत प्रक्रिया संगणकीय झाल्याने मानवी हस्तक्षेप दूर झाला असून सोडतीत पारदर्शकता आल्याचे म्हटले जात आहे. सर्वसाधारण सोडतीसह बृहतसूचीवरील घरांची सोडतही आता संगणकीय करण्यात आली आहे. आता म्हाडातील सर्व सेवांचे संगणकीकरण करण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती म्हाडातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली आहे. त्यानुसार टप्प्याटप्प्याने सेवांचे संगणकीकरण केले जाणार आहे. पहिल्या टप्प्यातील सेवांच्या संगणकीकरणाला लवकरच सुरुवात केली जाणार आहे. पहिल्या टप्प्यात मुंबई इमारत दुरूस्ती आणि पुनर्रचना मंडळाअंतर्गत जुन्या इमारतींच्या पुनर्विकास प्रस्तावांना मुदतवाढ देण्याची, तसेच प्रस्तावांना ‘ना हरकत’ प्रमाणपत्र देण्याच्या प्रक्रियेचे संगणकीकरण करण्यात येणार आहे. तर म्हाडा वसाहतीच्या पुनर्विकास प्रस्तावांनाही यापुढे संगणकीय पद्धतीनेच मान्यता दिली जाणार आहे. तसेच भूखंड भाडेपट्टा करारनामा, काररानाम्यांचे नूतनीकरणही ई ऑफिस प्रणालीद्वारे केले जाणार आहे. दुसऱ्या टप्प्यात इतर सेवांचे संगणकीकरण केले जाणार आहे. एकूण येत्या काही महिन्यात म्हाडाचा कारभार कागदविरहीत आणि संगणकीय होणार आहे. 0000 000

खरा गद्दार उद्धव ठाकरे राज ठाकरेंचा शिवडीतून हल्लाप गरजले

मुंबई : सोडून गेलेले गद्दार नाही, तर खरा गद्दार उद्धव ठाकरे आहे, असा घणाघात मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी केला. एका माणसाने सगळ्या पक्षाची वाट लावली. अनेकजण पक्ष सोडून गेले, त्यांना ते गद्दार बोलताय. खरा गद्दार तर…