Category: होम

यजमान  कुर्ला स्पोर्ट्सची विजयी सलामी

 ६६वी  बाळकृष्ण बापट ढाल क्रिकेट स्पर्धा ठाणे : यजमान कुर्ला स्पोर्ट्स क्लबने चेंबूर जिमखान्याचा ६ धावांनी पराभव करत ६६ व्या बाळकृष्ण बापट ढाल क्रिकेट स्पर्धेत विजयी सुरुवात केली.  टी २- प्रारूपात खेळल्या…

एसटीला नोव्हेंबरमध्ये ९४१ कोटी रुपये इतके विक्रमी उत्पन्न

ठाणे : दिवाळी सणाच्या निमित्ताने प्रवाशांचा चढ-उतार वाढल्यामुळे तब्बल  ९४१ कोटी रुपये इतके यंदाच्या वर्षातील सर्वाधिक उत्पन्न  नोव्हेंबर महिन्यात एसटी महामंडळाला मिळाले आहे. या महिन्यात एसटीने दररोज सरासरी ६० लाख प्रवाशांची वाहतूक…

विनय क्षीरसागर यांची  व्यवस्थापकीय संचालक पदी नियुक्ती

मुंबई: विनय क्षीरसागर यांची १ डिसेंबर २०२४ पासून आयआरक्लास सिस्टम्स अँड सोल्युशन्स प्रायव्हेट लिमिटेडच्या व्यवस्थापकीय संचालक – (मॅनेजिंग डायरेक्टर)  पदी नियुक्ती करण्यात आली आहे. सागरी उद्योग आणि चाचणी, तपासणी आणि प्रमाणता…

दिव्यांग चेतन पाशिलकरला दिल्लीमधील राष्ट्रीय अबीलिम्पिक स्पर्धेत सुवर्ण पदक

2027 ला फिनलँडमधील 11 व्या आलिम्पिक चित्रकला स्पर्धेतही निवड ठाणे ः ठाण्यातील आंतरराष्ट्रीय सुवर्ण पदक विजेता दिव्यांग चित्रकार चेतन पाशिलकरने दिल्लीमधील राष्ट्रीय Abylimpic स्पर्धेत सुवर्णपदक पटकावले आहे. चेतन पाशिलकर यांची फिनलँड येथे  2027 साली होणार्‍या आंतरराष्ट्रीय Abylimpic स्पर्धेसाठी पुन्हा निवड झाली आहे. (चेतन पाशिलकर यांनी मार्च 2023 साली फ्रान्स, मध्ये झालेल्या दहाव्या आंतरराष्ट्रीय Abylimpic स्पर्धेत पेंटिंग मध्ये सुवर्णपदक मिळविले होते.) दिव्यांग चेतन पाशिलकर हे शालेय जीवनापासूनच चित्रकला या विषयात पारंगत असून 2018 सालीही त्यांनी राष्ट्रीय Abylimpic स्पर्धेत सुवर्ण पदक मिळवले होते.. वेगवेगळ्या संस्थेमार्फत घेण्यात आलेल्या विविध प्रादेशिक चित्रकला स्पर्धेतही सुवर्णपदके मिळविली होते.चेतन पाशिलकर हे आपल्या पत्नी आणि लहान मुलगा सह ठाणे शहरातील हायल्यांड रेसिडेन्सी मध्ये वास्तव्यास असून ते दिव्यांग तसेच सामान्य विद्यार्थ्यांसाठी चित्रकला प्रशिक्षण व मार्गदर्शन शिबिरेही घेतात. नुकतेच त्यांनी दिल्ली येथे झालेल्या नॅशनल Abilimpic स्पर्धेतही सुवर्णपदक मिळविले आहे त्यांच्या यशामुळेच 2027 या वर्षात फिनलॅण्ंडमध्ये होणार्‍या अकराव्या आंतरराष्ट्रीय Abylimpic स्पर्धेत त्यांची पुन्हा निवड झाली आहे. दिव्यांगांसाठी असलेल्या स्पर्धेमध्ये दिव्यांगाच्या पुनर्वसनावर आधारित 33 वेगवेगळ्या प्रकारची कौशल्य आहेत यात क्राफ्ट, आयसीटी व सर्विसेस अशा तीन विभागात प्रादेशिक, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय अशा क्रमाने स्पर्धा होत असतात. 2024 यावर्षी जानेवारी महिन्यात गोवा येथे झालेल्या विभागीय स्पर्धेत निवड झाल्यानंतर चेतन पाशीलकर यांनी नुकत्याच ( डिसेंबर महिन्यात) दिल्ली येथे झालेल्या राष्ट्रीय abylimpic स्पर्धेतही सुवर्णपदक मिळविले आहे. चेतन पाशीलकर हे मुख आणि कर्णबधिर असून देखील ते स्वतः लहान मुलांना पेंटिंगचे ज्ञान देत आहेत. 2023 मध्ये आंतरराष्ट्रीय स्तरावर भारतासाठी सुवर्णपदक प्राप्त करूनही शासनाकडून त्यांच्या कार्याची दखल घेतली न गेल्याची खंत ते व्यक्त करतात. क्रीडा क्षेत्रात प्रविण्या मिळणाऱ्या स्पर्धकाला अनेक बक्षिसे आणि मानधन मिळतात, मात्र चेतन पाशिलकर सारख्या दिव्यांग सुवर्ण पदक विजेत्या चित्रकाराचा सामाजिक संस्था व राजकीय मानकऱ्यांना त्याचा विसर पडतो. भारत देशाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या दिव्यांग सुवर्ण पदक विजेता चित्रकार म्हणून सन्मानित करण्यात येत नाही हे त्या गरीब चित्रकारांचे दुर्दैवच म्हणावं लागेल. आंतरराष्ट्रीय स्तरावर स्पर्धा  करताना त्यांना अनेक आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागते. अशावेळी त्यांचे पालक आणि आपत्येष्ठ चेतन पाशिलकर यांच्या कलेसाठी मेहनत घेत आहेत. चेतन पाशीलकरांसारखे असंख्य दिव्यांग कलाकार आर्थिक कणा मोडल्यामुळे राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावरील अनेक स्पर्धांना मुकतात अशावेळी त्यांना मदतीचा हात देणे आवश्यक असते. दिव्यांग कलाकारांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी उद्योजक, सामाजिक, शैक्षणिक संस्थांनी पुढे येण्याची गरज आहे. सुधागड तालुक्यातील पाली जवळील तळई या डोंगर वस्तीत वसलेल्या गावातील चेतन पाशिलकर या मूकबधिर आंतरराष्ट्रीय सुवर्णं पदक विजेत्या चित्रकाराला मदतीचा हात दिल्यास आंतरराष्ट्रीय स्तरावरील abylimpic दर्जाच्या चित्रकला स्पर्धांमध्ये पुन्हा एकदा सुवर्ण कामगिरी करून देशाचे नाव इतिहासात कोरण्याची किमया त्यांच्याकडून होऊ शकते. कारण दिव्यांगांच्या या स्पर्धेमध्ये भारताला सुवर्णपदक मिळवून देण्याची कामगिरी चेतन पाशिलकर यांच्याच नावावर आहे. ००००

यजमान  कुर्ला स्पोर्ट्सची विजयी सलामी

 ६६वी  बाळकृष्ण बापट ढाल क्रिकेट स्पर्धा ठाणे : यजमान कुर्ला स्पोर्ट्स क्लबने चेंबूर जिमखान्याचा ६ धावांनी पराभव करत ६६ व्या बाळकृष्ण बापट ढाल क्रिकेट स्पर्धेत विजयी सुरुवात केली.  टी २- प्रारूपात खेळल्या जात असलेल्या स्पर्धेच्या शुभारंभी लढतीत १४७ धावांचा पाठलाग करणाऱ्या चेंबूर जिमखान्याला १४१ धावांवर रोखत कुर्ला स्पोर्ट्स क्लबने दुसऱ्या फेरीतले स्थान निश्चित केले. प्रथम फलंदाजी करणाऱ्या  कुर्ला स्पोर्ट्स क्लबला आर्यन मिश्राने ३७, मैत्रीक ठाकूरने ३१ धावांमुळे २० षटकात ८ बाद १४७ धावा करता आल्या. हितेश प्रजापतीने चार बळी मिळवत गोलंदाजीत छाप पाडली. उत्तरादाखल गौरव कुरकुरेने ५८ धावांची अर्धशतकी खेळी करत संघाला विजयाची आस दाखवली. पण इतर फलंदाजाकडून अपेक्षित साथ न मिळाल्याने चेंबूर जिमखान्याला विजयाने हुलकावणी दिली.यश पांडेने तीन फलंदाज बाद केले. आर्यन मिश्राला सामन्यातील सर्वोत्तम खेळाडूचा पुरस्कार देण्यात आला. प्रारंभी मुंबई क्रिकेट संघटनेचे कार्यकारिणी सदस्य मंगेश साटम यांनी स्पर्धेचे रीतसर उदघाटन केले. संक्षिप्त धावफलक : कुर्ला स्पोर्ट्स क्लब : २० षटकात ८ बाद १४७,( आर्यन मिश्रा ३७, मैत्रीक ठक्कर ३१, हितेश प्रजापती २१ धावात ४ बळी) विजयी विरुद्ध चेंबूर जिमखाना : २० षटकात ८बाद  १४१ (गौरव कुरकुरे ५८, यश पांडे २७ धावांत ३ बळी). युनियन क्रिकेट क्लब : २० षटकात ६ बाद १४५ ( विश्वास गनिया ४२,उद्धव मोरे ६४) विजयी विरुद्ध  खंडाळा क्रिकेट क्लब  : २० षटकात ९ बाद १४४ (जे. मंदिया ५६). 00000

दिव्यांग चेतन पाशिलकरला दिल्लीमधील राष्ट्रीय अबीलिम्पिक स्पर्धेत सुवर्ण पदक

2027 ला फिनलँडमधील 11 व्या आलिम्पिक चित्रकला स्पर्धेतही निवड   ठाणे ः ठाण्यातील आंतरराष्ट्रीय सुवर्ण पदक विजेता दिव्यांग चित्रकार चेतन पाशिलकरने दिल्लीमधील राष्ट्रीय Abylimpic स्पर्धेत सुवर्णपदक पटकावले आहे. चेतन पाशिलकर यांची फिनलँड येथे  2027 साली होणार्‍या आंतरराष्ट्रीय Abylimpic स्पर्धेसाठी पुन्हा निवड झाली आहे. (चेतन पाशिलकर यांनी मार्च 2023 साली फ्रान्स, मध्ये झालेल्या दहाव्या आंतरराष्ट्रीय Abylimpic स्पर्धेत पेंटिंग मध्ये सुवर्णपदक मिळविले होते.) दिव्यांग चेतन पाशिलकर हे शालेय जीवनापासूनच चित्रकला या विषयात पारंगत असून 2018 सालीही त्यांनी राष्ट्रीय Abylimpic स्पर्धेत सुवर्ण पदक मिळवले होते.. वेगवेगळ्या संस्थेमार्फत घेण्यात आलेल्या विविध प्रादेशिक चित्रकला स्पर्धेतही सुवर्णपदके मिळविली होते.चेतन पाशिलकर हे आपल्या पत्नी आणि लहान मुलगा सह ठाणे शहरातील हायल्यांड रेसिडेन्सी मध्ये वास्तव्यास असून ते दिव्यांग तसेच सामान्य विद्यार्थ्यांसाठी चित्रकला प्रशिक्षण व मार्गदर्शन शिबिरेही घेतात. नुकतेच त्यांनी दिल्ली येथे झालेल्या नॅशनल Abilimpic स्पर्धेतही सुवर्णपदक मिळविले आहे त्यांच्या यशामुळेच 2027 या वर्षात फिनलॅण्ंडमध्ये होणार्‍या अकराव्या आंतरराष्ट्रीय Abylimpic स्पर्धेत त्यांची पुन्हा निवड झाली आहे. दिव्यांगांसाठी असलेल्या स्पर्धेमध्ये दिव्यांगाच्या पुनर्वसनावर आधारित 33 वेगवेगळ्या प्रकारची कौशल्य आहेत यात क्राफ्ट, आयसीटी व सर्विसेस अशा तीन विभागात प्रादेशिक, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय अशा क्रमाने स्पर्धा होत असतात. 2024 यावर्षी जानेवारी महिन्यात गोवा येथे झालेल्या विभागीय स्पर्धेत निवड झाल्यानंतर चेतन पाशीलकर यांनी नुकत्याच ( डिसेंबर महिन्यात) दिल्ली येथे झालेल्या राष्ट्रीय abylimpic स्पर्धेतही सुवर्णपदक मिळविले आहे. चेतन पाशीलकर हे मुख आणि कर्णबधिर असून देखील ते स्वतः लहान मुलांना पेंटिंगचे ज्ञान देत आहेत. 2023 मध्ये आंतरराष्ट्रीय स्तरावर भारतासाठी सुवर्णपदक प्राप्त करूनही शासनाकडून त्यांच्या कार्याची दखल घेतली न गेल्याची खंत ते व्यक्त करतात. क्रीडा क्षेत्रात प्रविण्या मिळणाऱ्या स्पर्धकाला अनेक बक्षिसे आणि मानधन मिळतात, मात्र चेतन पाशिलकर सारख्या दिव्यांग सुवर्ण पदक विजेत्या चित्रकाराचा सामाजिक संस्था व राजकीय मानकऱ्यांना त्याचा विसर पडतो. भारत देशाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या दिव्यांग सुवर्ण पदक विजेता चित्रकार म्हणून सन्मानित करण्यात येत नाही हे त्या गरीब चित्रकारांचे दुर्दैवच म्हणावं लागेल. आंतरराष्ट्रीय स्तरावर स्पर्धा  करताना त्यांना अनेक आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागते. अशावेळी त्यांचे पालक आणि आपत्येष्ठ चेतन पाशिलकर यांच्या कलेसाठी मेहनत घेत आहेत. चेतन पाशीलकरांसारखे असंख्य दिव्यांग कलाकार आर्थिक कणा मोडल्यामुळे राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावरील अनेक स्पर्धांना मुकतात अशावेळी त्यांना मदतीचा हात देणे आवश्यक असते. दिव्यांग कलाकारांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी उद्योजक, सामाजिक, शैक्षणिक संस्थांनी पुढे येण्याची गरज आहे. सुधागड तालुक्यातील पाली जवळील तळई या डोंगर वस्तीत वसलेल्या गावातील चेतन पाशिलकर या मूकबधिर आंतरराष्ट्रीय सुवर्णं पदक विजेत्या चित्रकाराला मदतीचा हात दिल्यास आंतरराष्ट्रीय स्तरावरील abylimpic दर्जाच्या चित्रकला स्पर्धांमध्ये पुन्हा एकदा सुवर्ण कामगिरी करून देशाचे नाव इतिहासात कोरण्याची किमया त्यांच्याकडून होऊ शकते. कारण दिव्यांगांच्या या स्पर्धेमध्ये भारताला सुवर्णपदक मिळवून देण्याची कामगिरी चेतन पाशिलकर यांच्याच नावावर आहे. ००००

 डॉ. साद काझी आणि रवींद्र लाखे यांचा गौरव

कल्याण-भूषण व कल्याण-रत्न पुरस्कार वितरण सोहळ्यात कल्याण : कॉम्रेड दत्ता केळकर जन्मशताब्दी महोत्सवाच्या निमित्ताने, ‘कल्याण सिटीझन फोरम’ आयोजित, “कल्याण-भूषण” आणि “कल्याण-रत्न” पुरस्कार वितरण सोहळ्यात या पुरस्कार वितरण सोहळ्याचे मानकरी म्हणून, सामाजिक व शैक्षणिकक्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणारे डॉ. साद काझी आणि ज्येष्ठ नाट्य-दिग्दर्शक रवींद्र लाखे यांना गौरविण्यात आले. रविवारी, अग्रवाल कॉलेज ऑडिटोरीयम, कल्याण (प.) येथे, मोठ्या उत्साही वातावरणात संपन्न झाला. या सोहळ्याला ‘धर्मराज्य पक्षा’चे अध्यक्ष राजन राजे, ज्येष्ठ पत्रकार व विचारवंत कुमार केतकर, ज्येष्ठ पत्रकार-लेखक अनिल थत्ते, ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ विश्वास, आदि मान्यवर ‘प्रमुख पाहुणे’ या नात्याने उपस्थित होते. कार्यक्रमाचे स्वागताध्यक्ष म्हणून, डॉ. विजय पंडित; तर, समारंभाचे अध्यक्षपद मुंबई विद्यापीठाचे माजी कुलगुरु डॉ. नरेशचंद्र यांनी भूषविले. या पुरस्कार वितरण सोहळ्याचे मानकरी म्हणून, सामाजिक व शैक्षणिकक्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणारे डॉ. साद काझी आणि ज्येष्ठ नाट्य-दिग्दर्शक श्री. रवींद्र लाखे यांना गौरविण्यात आले.

– डॉ. साद काझी आणि रवींद्र लाखे यांचा गौरव

– कल्याण-भूषण व कल्याण-रत्न पुरस्कार वितरण सोहळ्यात कल्याण : कॉम्रेड दत्ता केळकर जन्मशताब्दी महोत्सवाच्या निमित्ताने, ‘कल्याण सिटीझन फोरम’ आयोजित, “कल्याण-भूषण” आणि “कल्याण-रत्न” पुरस्कार वितरण सोहळ्यात या पुरस्कार वितरण सोहळ्याचे मानकरी…

‘ईव्हीएम हटाव-देश बचाव, बॅलेट-पेपर लाव’ बैठकीत मरकडवाडी गावचे सरपंच रणजित मरकड यांची उपस्थिती

अनिल ठाणेकर ठाणे : भविष्यात ‘ईव्हीएम’ऐवजी मतपत्रिकेद्वारे निवडणुका घेण्यात याव्यात यासाठी, ‘ईव्हीएम हटाव-देश बचाव, बॅलेट-पेपर लाव’ या घोषणेखाली, मतपत्रिकेद्वारे निवडणुकांसाठीची लोकचळवळ सुरु करण्यात आली असून, दि. १४ डिसेंबर-२०२४ रोजी, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनससमोरील,  मुंबई मराठी पत्रकार संघ येथे, एका बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीत मरकडवाडी गावचे सरपंच रणजित मरकड यांची विशेष उपस्थिती होती. यावेळी मतपत्रिकेवरील मतदानाचा हक्क पुन्हा मिळवण्यासाठी, ‘प्रजासत्ताक दिना’चे औचित्य साधून, २६ जानेवारी-२०२४ रोजी, रात्रौ ठीक ९ वाजता, फक्त ५ मिनिटांसाठी आपल्या घरातील, कार्यालयातील व जिथे जिथे शक्य असेल त्या ठिकाणचे, लाईट्स बंद ठेवून, ‘ईव्हीएम’वरील मतदानाचा तीव्र निषेध नोंदविण्याचे विनम्र आवाहन राजन राजे यांनी केले. या बैठकीला निवृत्त न्यायमूर्ती बी.जी. कोळसे-पाटील, ‘धर्मराज्य पक्षाया’चे अध्यक्ष राजन राजे, डाव्या चळवळीतील नेते फिरोज मियठीबोरवाला, आम आदमी पक्षाचे महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष धनंजय शिंदे, मेहमूद प्राचा, प्रा. अमित उपाध्याय आणि विधानसभा निवडणूक निकालाच्या पार्श्वभूमीवर, अवघ्या देशाचे लक्ष वेधून घेतलेल्या मरकडवाडी गावचे सरपंच रणजित मरकड आदी मान्यवर उपस्थित होते. या बैठकीत सर्व समविचारी पक्ष आणि सामाजिक संस्था/संघटनांच्या प्रमुख नेत्यांनी, ‘ईव्हीएम’विरोधी लोकचळवळ, यापुढे आक्रमकपणे सुरु ठेवत, मतपत्रिकेद्वारे निवडणुका पार पाडण्यासाठी, मोठे जनआंदोलन उभारण्याचा निर्णय घेतला. या बैठकीचे आयोजन अमीन सोलकर, शरद कदम, संतोष आंबेकर, एम.ए. खालिद यांनी केले होते.