लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांचे पोलादी व्यक्तीमत्व
गुजरात मधील नडियाद येथे ३१ ऑक्टोबर १८७५ ला सरदार वल्लभभाई पटेल नावाचा लोहपुरुष जन्माला आला आणि भारतीय राजकारणात एक पोलादी व्यक्तीमत्व उदयास आले. कारण त्यांनी देशांच्या स्वतंत्र लढ्यासाठी व स्वातंत्र्य…
लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल
भारताचे पहिले उपपंतप्रधान, पहिले गृहमंत्री, लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांची आज स्मृतिदिन. सरदार वल्लभभाई पटेल यांचा जन्म ३१ ऑक्टोबर १८७५ रोजी आणंद या छोट्याशा गावात झाला. त्यांचे वडील झव्हेरिभाई यांनी…
हवामान परिषदेत तोंडाला पुन्हा पाने
बाकू येथे झालेल्या जागतिक हवामान परिषदेत (कोप 29) विकसनशील देशाचे नुकसान टाळण्यासाठी देण्यात येणाऱ्या मदतीवर वाद झाला. परिषदेवर बहिष्कार टाकण्याची भाषा झाली. परिषदेचा कालावधी दोन दिवस वाढवण्यात आला. त्यातून जाहीर…
सेवाभावाने मंत्रिपदाची दुसरी इनिंग सुरू- मंगल प्रभात लोढा
मुंबई : मलबार हिल मतदारसंघाचे आमदार मंगल प्रभात लोढा यांनी आज पुन्हा एकदा कॅबिनेट मंत्री पदाची शपथ घेतली. आपल्या संस्कृतीच्या रक्षणार्थ आणि सन्मानार्थ लोढा यांनी संस्कृत भाषेतून शपथ घेतली. पुन्हा एकदा मंत्री पदी निवड करून महाराष्ट्राची सेवा करण्याची संधी दिल्याबद्दल पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदी जी, केंद्रीय गृहमंत्री मा अमित शाह जी व भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष मा जे पी नड्डा जी यांच्यासह महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मा देवेंद्र फडणवीसजी यांचे, मंगल प्रभात लोढा यांनी याप्रसंगी आभार मानले आहेत.…
उत्तर मुंबईत पत्रकार भवन उभारण्यासाठी सर्वतोपरी सहकार्य
आमदार संजय उपाध्याय यांची ग्वाही मुंबई : उत्तर मुंबईत पत्रकार भवन उभारण्यासाठी सर्वतोपरी सहकार्य करीन आणि गुरुजींनी सांगितल्याप्रमाणे या भव्य पत्रकार भवनाचे भूमिपूजन आणि उद्घाटन आपणच करु, अशी निःसंदिग्ध ग्वाही बोरीवली चे आमदार संजय उपाध्याय यांनी दिली. महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुका पार पडल्या आणि बोरीवली मतदारसंघातून विक्रमी मताधिक्याने संजय उपाध्याय हे निवडून आले. संजय उपाध्याय यांची भारतीय जनता पक्षाच्या प्रदेश कार्यालयात राज्य अधिस्वीकृती समितीच्या सदस्या आणि बोरीवली येथील पत्रकार नेहा पुरव यांनी भेट घेतली त्यावेळी बोरीवली येथे आमदारांनी पत्रकारांशी संवाद साधावा अशी सूचना केली होती. त्याप्रमाणे मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर संघाचे कोषाध्यक्ष आणि दैनिक भास्कर चे विशेष राजकीय प्रतिनिधी विनोदकुमार यादव यांना आमदार संजय उपाध्याय आणि पत्रकार यांच्या मध्ये समन्वय साधण्याची जबाबदारी देण्यात आली. बोरीवली पश्चिम येथील एका हॉटेलमध्ये पत्रकारांसमवेत संवादाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. यावेळी उत्तर मुंबई पत्रकार संघाचे सरचिटणीस आणि ज्येष्ठ राजकीय विश्लेषक श्री योगेश वसंत त्रिवेदी यांनी परखडपणे भूमिका मांडतांना सांगितले की, लोकप्रतिनिधींनी दिलेल्या वेळेत येण्याची गरज आहे. पत्रकारांना गृहीत धरण्यात येऊ नये. ज्येष्ठ राजकीय विश्लेषक सामाजिक कार्यकर्ते श्री. विजय वैद्य यांच्या नेतृत्वाखाली २०११ साली दहिसर, बोरीवली, कांदिवली, चारकोप, मालाड आणि मागाठाणे या सहा विधानसभा मतदारसंघ म्हणजे उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघ या क्षेत्रातील सर्व भाषिक पत्रकारांसाठी उत्तर मुंबई पत्रकार संघ स्थापन करण्यात आला. हा संघ नोंदणीकृत सुद्धा आहे. सुमारे दीडशे दोनशे पत्रकार या क्षेत्रात कार्यरत आहेत. या पत्रकारांसाठी एक पत्रकार भवन उभारण्यात यावे. ही भव्य वास्तू सभागृह, समिती कक्ष, उपहारगृह, कानाकोपऱ्यातून येणाऱ्या पत्रकारांसाठी वास्तव्य करण्याची व्यवस्था, बॅंक आदी सुविधांनी सुसज्ज असावी, अशी आमची मागणी आहे. डॉ. मनोहर जोशी हे मुख्यमंत्री आणि गोपीनाथ मुंडे हे उपमुख्यमंत्री असतांना राज्य सरकारने सर्व जिल्ह्यात पत्रकार भवन उभारण्यात येणार असल्याचा निर्णय घेतला होता. मुंबई शहर जिल्ह्यात मुंबई महानगरपालिका मुख्यालयासमोर भव्य पत्रकार भवन आहे. मात्र मुंबई उपनगरात असे भवन नाही. उत्तर मुंबई पत्रकार संघाने तत्कालीन खासदार गोपाळ शेट्टी यांना या मागणीचे निवेदन दिले. त्यांनी मुंबई महानगरपालिकेच्या आयुक्तांकडे पत्र लिहून आमची मागणी पुढे रेटली. जागाही आहे. आता आपण पाठपुरावा करा. आपणच भूमिपूजन करा आणि उद्घाटन आपणच करा. याचा उपयोग लोकप्रतिनिधींनाच जास्त होऊ शकतो. आमदार संजय उपाध्याय यांनी या मागणीला सकारात्मक प्रतिसाद दिला आणि उत्तर मुंबईत पत्रकार भवन उभारण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करीन म्हणजे हॉटेल घेण्याचीही गरज भासणार नाही. त्या पत्रकार भवनातच आपण भेटून संवाद साधू शकतो, असे स्पष्ट केले. उपस्थित सर्व पत्रकारांनी या भूमिकेचे स्वागत केले. आमदार संजय उपाध्याय यांच्या धर्मपत्नी सौ. नीलम संजय उपाध्याय, प्रदेश प्रवक्ते अवधूत वाघ, निरंजन शेट्टी, उत्तर मुंबई पत्रकार संघाचे सरचिटणीस प्रवीण वराडकर, कुनेश दवे, दीपक भातुसे, मनोहर कुंभेजकर, मयुर परीख, अभय मिश्रा, राजकुमार सिंह, दत्ताराम घुगे, नीलाबेन सोनी, श्याम कदम आदी मान्यवर यावेळी आवर्जून उपस्थित होते. 0000
श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदिरात दत्त जयंती उत्सव श्रद्धेय भक्तीभावाने संपन्न
अक्कलकोट- ‘अवधूतचिंतन श्री गुरुदेव दत्त सद्गुरू श्री.स्वामी समर्थ महाराज की जय’ च्या जय घोषात आज येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदिरात हजारो भाविकांच्या उपस्थितीत श्री दत्त जयंती उत्सव अपार श्रद्धेने…
वटवृक्ष देवस्थान मनोभावे स्वामी दर्शन घेण्याचे स्थान – गोपीचंद पडळकर
मंत्रिमंडळातील विस्तारीकरणात पडळकर यांना मंत्री पदासाठी महेश इंगळेंनी दिल्या शुभेच्छा अक्कलकोट-एखाद्या धार्मिक स्थळी गेल्यानंतर जेवढ्या शांततेने देवाचे दर्शन होईल तितके मन प्रसन्न होते. आज सर्व धार्मिक स्थळांवर भविकांची मोठ्या संख्येने गर्दी होत असताना दिसून येत आहे. मंदिर समितीचे चेअरमन महेश इंगळे यांच्या नियोजनातून श्री स्वामी समर्थांचे मूळ स्थान असलेल्या येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदिरात श्री स्वामी समर्थांचे शांतचित्ताने मनोभावे दर्शन घेण्याचे भाग्य भाविकांना लाभत आहे याचा विशेष आनंद आहे. त्यामुळे येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थान म्हणजे श्री स्वामी समर्थांचे मनोभावे दर्शन घेण्याचे महत्वाचे मुळस्थान असल्याचे मनोगत भारतीय जनता पार्टीचे जत विधानसभा मतदारसंघाचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी व्यक्त केले. ते नुकतेच येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदिरास भेट देऊन श्री स्वामी समर्थांचे दर्शन घेतले. याप्रसंगी मंदिर समितीच्या वतीने समितीचे चेअरमन नगरसेवक महेश इंगळे यांनी आमदार गोपीचंद पडळकर यांचा श्री स्वामी समर्थांचे कृपावस्त्र, प्रसाद, प्रतिमा देऊन यथोचित सन्मान केला व राज्य मंत्रिमंडळ विस्तारीकरणात मंत्रीपद मिळणे बाबत शुभेच्छा व्यक्त केले. यावेळी मंदिर समितीचे सचिव आत्माराम घाटगे, विश्वस्त महेश गोगी, श्रीशैल गवंडी, संजय पवार, विपुल जाधव, गिरीश पवार, अविनाश क्षीरसागर, श्रीकांत मलवे, सागर गोंडाळ इत्यादी उपस्थित होते. 0000
दिलीप वेंगसरकर फाऊंडेशनला विजेतेपद
ठाणे : खुशी गिरीची भेदक गोलंदाजी, पूनम राऊत आणि श्वेता कलपथी या सलामीच्या जोडीने केलेल्या नाबाद शतकी भागीदारीमुळे दिलीप वेंगसरकर फाऊंडेशनने एमआयजी क्रिकेट क्लबचा १० फलंदाज राखून दणदणीत पराभव करत…
ठाण्याने महिला क्रिकेटला चालना दिली
मुंबई क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष अजिंक्य नाईक यांचे प्रतिपादन ठाणे : मुंबईच्या मैदान क्रिकेटमध्ये शिवाजीपार्कचे मैदान मुलांच्या क्रिकेटसाठी महत्वपूर्ण आहे. त्याच धर्तीवर डॉ राजेश मढवी स्पोर्ट्स असोसिएशन आणि दैवेज्ञ क्रिकेट क्लब आयोजित अर्जुन मढवी स्मृती क्रिकेट स्पर्धा महिलांच्या क्रिकेटला चालना देण्यात महत्वाची भूमिका पार पाडत असल्याचे प्रतिपादन मुंबई क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष अजिंक्य नाईक यांनी केले. सेंट्रल मैदानावर खेळवण्यात आलेल्या दिलीप वेंगसरकर फाऊंडेशन आणि एमआयजी क्रिकेट क्लब यांच्यातील अंतिम सामन्याची शुभारंभी घंटा अजिंक्य नाईक वाजवण्यात आली त्यावेळी महिला क्रिकेटपटूंना सदिच्छा देताना नाईक म्हणाले. महिला क्रिकेटला प्रोत्साहन देण्यासाठी पाच वर्षांपूर्वी डॉ राजेश मढवी यांनी अर्जुन मढवी स्मृती महिला क्रिकेट स्पर्धेची मुहूर्तमेढ रोवली. पहीली चार वर्षे ही स्पर्धा टी-२० प्रारूपात खेळवण्यात आली. पण यंदा मुंबई क्रिकेट संघटनेने स्पर्धेला १९ वर्षे वयोगट आणि वरीष्ठ संघाच्या निवड चाचणीचा दर्जा दिल्याने मूळ प्रारूपात बदल करून ती ४० षटकांची एकदिवसीय प्रारूपात खेळवण्यात आली. यावर्षी स्पर्धेत गतविजेत्या राजावाडी क्रिकेट क्लब आणि उपविजेटी रिगल क्रिकेट क्लबसह अ श्रेणीतील चौदा संघांना प्रवेश देण्यात आला होता. त्यात गतविजेत्यांचे स्पर्धेतील आव्हान उपांत्य फेरीत संपुष्टात आले. तर उपविजेता संघ दुसऱ्या फेरीतच बाद झाला होता. अंतिम सामन्याची सुरुवात करुन देण्यासाठी अजिंक्य नाईक यांच्यासह मुंबई क्रिकेट संघटनेचे सचिव अभय हडप, सहसचिव दिपक पाटील, मुंबई क्रिकेट संघटनेच्या खेळ सुधारणा समितीच्या प्रिती डिमरी, निवड समिती सदस्या लिया फ्रान्सिस, विणा परळकर, स्पर्धेचे प्रमुख संयोजक डॉ. राजेश मढवी, सहसंयोजिका सुषमा मढवी, 0000
