भाजपाचे ‘संकल्प पत्र’
लाडक्या बहिणींना दरमहा २१०० रुपये ० शेतकऱ्यांना कर्जमाफी ० वृद्धांना २१०० रुपये पेन्शन ० शेतकऱ्यांना वर्षाला १५००० रुपये ० २५ लाख रोजगारांची निर्मिती ० १० लाख विद्यार्थ्यांना वेतन स्वाती घोसाळकर मुंबई : महाराष्ट्रातील विधानसभा…
लाडक्या बहिणींना दरमहा २१०० रुपये ० शेतकऱ्यांना कर्जमाफी ० वृद्धांना २१०० रुपये पेन्शन ० शेतकऱ्यांना वर्षाला १५००० रुपये ० २५ लाख रोजगारांची निर्मिती ० १० लाख विद्यार्थ्यांना वेतन स्वाती घोसाळकर मुंबई : महाराष्ट्रातील विधानसभा…
ठाणे : विधानसभा निवडणूकीचे काम करण्यास नकार देणाऱ्या विविध शासकीय निमशासकीय आस्थापनातील अधिकारी कर्मचाऱ्यांवर कारवाई करावी असे निर्देश ठाण्याचे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी अशोक शिनगारे यांनी दिले आहेत.…
ऍड. प्रकाश बिनेदार यांचा सवाल पनवेल : काँग्रेसचे राहुल गांधी तुम्हाला संविधान म्हणजे पोरखेळ वाटला का?, असा सवाल भाजपचे रायगड जिल्हा सरचिटणीस तसेच मागासवर्गीय समाजाचे नेते ऍड. प्रकाश बिनेदार यांनी केला आहे. नागपूरमधील सभेतील संविधानाच्या पुस्तकाचा एक व्हिडीओ शेअर झाला आहे. यात हे पुस्तक कोरेच असल्याचे दिसले. त्यामुळे संविधानाच्या कोऱ्या प्रती वाटल्याची टीका त्यांच्यावर करण्यात येत आहे. ऍड. प्रकाश बिनेदार यांनी म्हंटले आहे कि, “राहुल गांधी तुम्ही लोकसभा निवडणुकीपासून हातात संविधान घेऊन संविधान वाचवा म्हणून जो काही कांगावा करत आहात, त्यातला खोटेपणा जनतेच्या कधीच लक्षात…
राज भंडारी पनवेल : विधानसभा निवडणूक अवघ्या काही दिवसांवर येवून ठेपली असताना १८८ पनवेल विधानसभा निवडणुकीत भाजपचे मागील ३ वेळा आमदार राहिलेले प्रशांत ठाकूर चौथ्यांदा या निवडणुकीत शेकापचे माजी आमदार बाळाराम पाटील यांच्यासोबत लढत आहेत. त्यातच ऐन निवडणुकीच्या तोंडावर इतर पक्षांतील पदाधिकाऱ्यांना आपल्या पक्षात घेवून आपली ताकद वाढविण्याचा प्रत्येक पक्ष तयारी करीत असतानाच पनवेल तालुक्यातील सुकापूर ग्रामपंचायत सदस्य चंद्रकांत पोपेटा यांनी भारतीय जनता पक्षात घरवापसी केली. आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रचाराचा झंजावात सुरु आहे. त्यांच्या विजयाची चिन्ह दिसत असतांना पोपेटा यांचा झालेला प्रवेश महत्वाचा आहे. मंत्री रवींद्र चव्हाण यांच्याहस्ते त्यांचा प्रवेश सोहळा पार पडला. यावेळी पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर, उरणचे भाजप आमदार महेश बालदी, जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी, तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत, जिल्हा परिषद सदस्य अमित जाधव, किशोर सुरते, राजेश पाटील, महेश पाटील, ज्ञानेश्वर पाटील यांच्यासह अनेक मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते. भाजपचेच पूर्वी असलेले चंद्रकांत पोपेटा सक्रिय कार्यकर्ते आहेत. त्यांनी शेकाप सोडून पुन्हा भाजप प्रवेश केल्याने सुकापूर विभागात प्रशांत ठाकूर यांच्या विजयाला उपयोग होऊ शकेल असे चित्र सध्यातरी दिसत आहे.
दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्राचा मुंबई : दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्राचा वर्धापनदिन संगीत महोत्सव १५ ते १७ नोव्हेंबर २०२४ या कालावधीत आयोजित करण्यात आला आहे. हा महोत्सव संस्थेच्या वा . वा . गोखले (वातानुकूलित ) सभागृहात होणार आहे. शुक्रवार दिनांक १५ नोव्हेंबर या दिवशी सायंकाळी ५.३० वाजता आग्रा , ग्वाल्हेर आणि जयपूर घराण्याच्या सुप्रसिद्ध गायिका विदुषी शुभदा पराडकर यांच्या गायनाने या महोत्सवाचा प्रारंभ होणार आहे. त्यांना तबला साथ प्रवीण करकरे यांची असून संवादिनी वर ओंकार अग्निहोत्री आणि सारंगीवर गुरुप्रसाद हेगडे साथ करणार आहेत. शनिवार दिनांक १६ नोव्हेंबर या दिवशी सायंकाळी पाच वाजता पं . पन्नालाल घोष घराण्याचे बासरीवादक पं. सुदीप चट्टोपाध्याय यांचे बासरीवादन होणार असून त्यांना तबल्यावर साथीला आहेत पं. अनुतोष देघारिया. महोत्सवाचा समारोप रविवार दिनांक १७ नोव्हेंबर या दिवशी होत असून सायंकाळी पाच वाजता बनारस घराण्याचे सुविख्यात गायक पद्मभूषण पं. साजन मिश्रा यांचे गायन होणार आहे . त्यांना स्वरसाथ स्वरांश मिश्रा करणार असून तबला साथ मंदार पुराणिक आणि संवादिनी साथ सिध्देश बिचोळकर करणार आहेत. संस्थेतर्फे सर्व रसिक प्रेक्षकांना या महोत्सवासाठी उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी संपर्क – २४३०४१५०
दादरमध्ये कार्तिक एकादशीनिमित्त दिंडी सोहळा मुंबई : संत कृष्णदास महाराज सत्संग, मुंबईच्या वतीने मंगळवार दिनांक १२ नोव्हेंबर २०२४ या दिवशी कार्तिक एकादशी दिंडी सोहळा आयोजित करण्यात आला आहे. ही दिंडी दादर येथील माँसाहेब मीनाताई ठाकरे फूल बाजार येथून सकाळी साडे आठ वाजता सुरू होईल व त्याची सांगता श्री. विठ्ठल मंदिर, रानडे रोड, दादर येथे होईल. भवसागरामध्ये अडकलेल्या सर्वच भक्त भाविकांना पंढरपूर येथे श्री विठ्ठलाच्या दर्शनास जाणे शक्य होत नाही. म्हणून संत कृष्णदास महाराज सत्संग, मुंबईच्या वतीने कार्तिकी एकादशीला भक्तांना दिंडीचा आनंदघेता यावा, यासाठी हा सोहळा आयोजित करण्यात आला आहे.
ठाणे : विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 करिता दि.20 नोव्हेंबर 2024 रोजी मतदानाची प्रक्रिया पार पडणार आहे. तर दि.23 नोव्हेंबर 2024 रोजी मतमोजणी प्रक्रिया पार पडेल.ठाणे जिल्ह्यात 134-भिवंडी ग्रामीण (अ.ज.), 135-शहापूर (अ.ज.), 136-भिवंडी पश्चिम, 137-भिवंडी पूर्व, 138-कल्याण पश्चिम, 139-मुरबाड, 140-अंबरनाथ (अ.जा.), 141-उल्हासनगर, 142-कल्याण पूर्व, 143 डोंबिवली, 144-कल्याण ग्रामीण, 145-मिरा भाईंदर, 146-ओवळा माजिवाडा, 147-कोपरी पाचपाखाडी, 148-ठाणे,…
राघव, अहान, नील, आद्विक विजेते मुंबई : आयडियल स्पोर्ट्स अकॅडमी-ग्रुपतर्फे बालदिनानिमित्त लाईफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया पुरस्कृत एलआयसी-आयडियल कप शतक महोत्सवी बुध्दिबळ स्पर्धेचे विविध वयोगटातील विजेतेपद मुलांमध्ये राघव संचेती, अहान जॉली, नील भंडारी, आद्विक अगरवाल यांनी तर मुलींमध्ये आध्या पाठक, आराध्या पुरो, अक्षा मंगलापल्ली, आर्या नाईक यांनी जिंकले. ७ वर्षाखालील गटात पाचव्या निर्णायक साखळी फेरीमध्ये राघव संचेतीने अपराजित शंतनू जोशीची (४ गुण) विजयी दौड रोखली आणि सर्वाधिक साखळी ४.५ गुणासह प्रथम स्थानावर झेप घेतली. परिणामी शंतनू जोशीला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. शर्विल मामळूस्करने (४ गुण) तृतीय, डेत्यन लोबोने (३.५ गुण) चौथा, तत्त्वा शेजवळने (३.५ गुण) पाचवा आणि मुलींमध्ये आध्या पाठकने (४ गुण) प्रथम व निकिता संदीपने (३ गुण) द्वितीय क्रमांक मिळविला. ९ वर्षाखालील मुलांमध्ये अहान जॉलीने (४ गुण) प्रथम, कृषिव गालाने (३.५ गुण) द्वितीय, अगस्त्य गुरवने (३ गुण) तृतीय, कबीर पिंगेने (३ गुण) चौथा, मार्तंड गजणेने (३ गुण) पाचवा तर मुलींमध्ये आराध्या पुरोने (४.५ गुण) प्रथम, आराध्या कामतने (२.५ गुण) द्वितीय; ११ वर्षाखालील मुलांमध्ये नील भंडारीने (५ गुण) प्रथम, कविर मोदीने (४ गुण) द्वितीय, अनय भांगरेने (३ गुण) तृतीय, आर्यन झाने (३ गुण) चौथा, संकीत संघवीने (३ गुण) पाचवा तर मुलींमध्ये अक्षा मंगलापल्लीने (३ गुण) प्रथम, सिम्रिता बुबनाने (२ गुण) द्वितीय आणि १३ वर्षाखालील मुलांमध्ये आद्विक अगरवालने (५ गुण) प्रथम, देवांश राठोडने (३ गुण) द्वितीय, फेरद्यन लोबोने (३ गुण) तृतीय, समर्थ साळगावकरने (३ गुण) चौथा, स्मित रेवस्करने (२.५ गुण) पाचवा तर मुलींमध्ये आर्या नाईकने (४ गुण) प्रथम, शहाना कृष्णनने (३ गुण) द्वितीय पुरस्कार पटकाविला. स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ आयडियल स्पोर्ट्स अकॅडमीचे सेक्रेटरी राजन राणे, क्रीडाप्रेमी विलास डांगे व चंद्रकांत करंगुटकर, मुंबई शहर बुध्दिबळ संघटनेचे सेक्रेटरी राजाबाबू गजेंगी, शिवछत्रपती पुरस्कार विजेते लीलाधर चव्हाण आदींच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला.
राज भंडारी पनवेल :सिडकोच्या माध्यमातून उरण वेगाने विकसित होत असताना योग्य प्रशिक्षणाअभावी तरूणाच्या हाताला काम मिळत नसल्याने भयावह परिस्थिती निर्माण झाली आहे. या तरूणाचे भविष्य उद्थ्वस्त होवू नये यासाठी प्रितम म्हाञे यानी जे एम म्हाञे ट्रस्टच्या माध्यमातून युवकाना प्रशिक्षीत करण्याचे काम हाती घेतले आहे. गेल्या काही महिन्याच्या परिश्रमानंतर येथून प्रशिक्षण घेतलेल्या 44 तरूण तरूणीना विमानतळात नोकऱ्या मिळाल्याने तरूणाईत आशादायी वातावरण निर्माण होवून सारी तरूणाई त्यांच्या मागे एकवटली असल्याचे चिञ पहायला मिळत आहे. उरण विधानसभा निवडणूक प्रचारासाठी प्रितम म्हात्रे यांनी उरण तालुक्याचा दौरा केला. त्याप्रसंगी तरूणाईने एकच जल्तोष करून त्याच्या या अभूतपुर्व कार्याची पोच पावती दिली. यावेळी पक्षाचे जेष्ठ नेते जे एम म्हाञे, नारायणशेठ घरत, पांडूमामा घरत, अनिल ढवळे, रमाकांत घरत, जितेंद्र घरत, सचीन ताडफळे, माधव पाटील आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी तरूणाईला मार्गदर्शन करताना सचीन ताडफळे म्हणाले की आज युवकाना दिशा देण्यासाठी तरूणाईला रोजगार उपलब्ध करून देणाऱ्या युवा नेतृत्वाची गरज आहे. आपले दोन्ही प्रतिस्पर्धी उमेदवार रिटायरमेटला आले असून त्याना मतदारानी पेन्शनवर पाठवून प्रितम म्हाञे याना आपले प्रतिनिधीत्व करण्यासाठी विधानसभेत पाठवावे. अनिल ढवळे यानी निष्क्रीय विरोधकाचा समाचार घेताना स्थानिक आगरी, कोळी, कराडी याना अस्मिता दाखविण्याचे आवाहन केले. तसेच भुमी पुञाचा अवमान करण्याचे काम येथील आमदारानी केले असून त्याचा त्याना जबाब त्याना द्यावा लागेल.असे सागितले.
राज भंडारी पनवेल : पनवेल तालुक्यातील पोसरी, गिरवले, नारपोली सावळा या भागात आ. विवेक पाटील यानी भरीव विकासाची कामे केली असून त्यानंतर माञ आलेल्या लोकप्रतिनीधीचे या भागाकडे दुर्लक्ष झाले. हा विकासाचा गॅप आपल्याला भरून काढून तालुक्याचा रोजगाराचा प्रश्न सोडवायचा आहे त्यासाठी शिट्टीच्या चिन्हासमोरील बटण दाबून आपल्याला संधी द्यावी असे प्रतिपादन उरण विधानसभेचे उमेदवार प्रितम म्हाञे यानी केले. शेकाप उमेदवार प्रितम म्हात्रे यानी कष्टकरीनगर पोसरी, नारपोली, गिरवले, सावळा, देवळोली, कसळखंड, भाताण गावात निवडणूक दौरा केला. त्यावेळी गावागावातून त्यांचे भव्य स्वागत करण्यात आले. दौऱ्यात त्यांच्यासोबत नारायणशेठ घरत, मनोहर पाटील, जगदिश पवार, सचीन ताडफळे आदी अनेक मान्यवर उपस्थित होते. यावेळी बोलताना प्रितम म्हात्रे म्हणाले की युवकाच्या रोजगाराचा प्रश्न आज गंभीर आहे तो सोडविण्यासाठी आपण प्रशिक्षण सुरू केले असून विमानतळात 44 जणाना नोकऱ्या मिळवून दिल्या आहेत. भविष्यात ही संख्या मोठी असेल हे काम मोठ्या प्रमाणावर करण्यासाठी आपण मला संधी द्यावी. असे आवाहन प्रितम म्हात्रे यांनी केले. यावेळी आपच्या संघटन मंञी डा.शेख यानी प्रितम म्हाञे याना पक्षाचा जाहीर पाठिंबा असल्याचे पञ दिले.