Category: होम

एसटीत इलेक्ट्रिक बस सुरू करणार – प्रताप सरनाईक

ठाणे : एसटी बस महामंडळात टप्याटप्याने इलेक्ट्रिक बस सुरू करणार आहोत. अगदी ग्रामीण भागात देखील इलेक्ट्रिक बस सुरू केल्या जातील. त्यासाठी ग्रामीण भागात सुद्धा चार्जिंग स्टेशन उभारणार असल्याची माहिती परिवहन…

उत्पादन घटल्याने अर्ली द्राक्षांना अधिक दर

 निर्यातीतील अडथळे कायम हरिभाऊ लाखे नाशिक :अवकाळी पावसाने उत्पादनात घट झाल्यामुळे हंगामपूर्व द्राक्षांना (अर्ली) प्रति किलोस १४० ते २०० रुपयांपर्यंत दर मिळत आहेत. आखाती देशांसह रशियात निर्यात सुरू झाली असताना लाल समुद्रातील तणावाने व्यापारी मार्गात अडचणी कायम आहेत. त्यामुळे युरोपीय बाजारात पोहोचण्यासाठी जहाजांना केप ऑफ गुड होपला वळसा घालावा लागत असल्याने अधिक दिवस लागत आहेत. जिल्ह्यातील कळवण, सटाणा, मालेगाव आणि देवळा या तालुक्यांमध्ये हंगामपूर्व द्राक्षांचे उत्पादन घेतले जाते. यंदा पावसाळा अधिक लांबला. त्यातच अवकाळीने नुकसान झाले. परिणामी, द्राक्ष उत्पादनात घट होणार असल्याकडे महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागाईतदार संघाचे विभागीय अध्यक्ष बाळासाहेब गडाख यांनी लक्ष वेधले. हंगामपूर्व द्राक्ष उत्पादनातून ते दिसून येत असून उत्पादन कमालीचे घटल्याने या द्राक्षांना गतवर्षीच्या तुलनेत २५ टक्के अधिक दर मिळत आहे. लाल रंगाच्या क्रिमसनला प्रतिकिलो २०० रुपये दर मिळाल्याचे बागलाण येथील उत्पादक खंडू भुयाने यांनी सांगितले. अन्य द्राक्षांना १४० ते १७५ रुपये दर आहे. या भागातील हंगामपूर्व द्राक्षे नाताळसाठी जगातील बाजारात पोहोचतात. युरोपीय देशांसह ब्रिटनमध्ये द्राक्ष निर्यातीसाठी अडचणींना तोंड द्यावे लागण्याची शक्यता आहे. लाल समुद्रातील तणावामुळे जहाजांना केप ऑफ गुड होपमार्गे जावे लागते. आधीच्या (लाल समुद्रातील) मार्गाने द्राक्षमाल सुमारे दीड हजार डॉलर (प्रति कंटेनर) भाड्यात २० दिवसांत युरोपीय बाजारात पोहोचत असे. आता दुसऱ्या मार्गाने माल पोहचण्यास ३५ ते ५० दिवस लागतात. शिवाय दुपटीहून अधिक भाडे मोजावे लागत असल्याचे मॅग्नस फार्म फ्रेशचे लक्ष्मण सावळकर यांनी सांगितले. मागील वर्षी लाल समुद्रातील मार्ग अकस्मात बंद झाला. अन्य मार्गाने माल जाण्यात बराच कालापव्यय होऊन काही माल खराब झाला. वाढीव वाहतूक खर्चाचा भुर्दंड पडला. या नुकसानीमुळे जहाज कंपन्यांशी करार करताना निर्यातदारांनी सावध पवित्रा घेतला. घटलेले उत्पादन व वाहतुकीचे प्रश्न यामुळे चालू हंगामात आतापर्यंत १०० कंटेनर द्राक्ष निर्यात झाले. गतवर्षीच्या तुलनेत हे प्रमाण बरेच कमी आहे. निर्यातीला प्रोत्साहन देणारी केंद्र सरकारची अनुदान योजना बंद आहे. या संदर्भात द्राक्ष निर्यातदार संघटना सरकारकडे पाठपुरावा करत असल्याचे निर्यातदारांचे म्हणणे आहे. कोट प्रारंभी उत्पादनात काहीशी घट असली तरी फेब्रुवारी आणि मार्चनंतर नियमित द्राक्ष हंगाम सुरळीत होईल. एकूण उत्पादनाच्या तुलनेत १० टक्के द्राक्ष निर्यात होतात. त्यामुळे भारतीय द्राक्षांच्या एकूण निर्यातीवर कुठलाही परिणाम होणार नाही. जहाज कंपन्यांनी पर्यायी मार्गाने ३० ते ३५ दिवसांत कंटेनर युरोपात पोहचविण्याची तयारी दर्शविली आहे. यामुळे गतवर्षीसारखा त्रास होणार नाही, कमी वेळेत माल जाईल. मागील वर्षी १४ हजार ६०० कंटेनरमधून द्राक्ष निर्यात झाली होती. यावेळी निर्यातीचे प्रमाण तितकेच असेल, अशी सध्याची स्थिती आहे. -विलास शिंदे (प्रमुख, सह्याद्री फार्म्स, नाशिक) 00000

 राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक पहिल्याच दिवशी ॲक्शन मोडवर

 खोपट बस स्थानकाची केली पाहणी   ठाणे : नुकतेच राज्याच्या मंत्रिमंडळाचे खाते वाटप करण्यात आले. राज्याच्या परिवहन मंत्री पदाची प्रताप सरनाईक यांना जबाबदारी देण्यात आली. लगेच रविवारी सकाळी प्रताप सरनाईक यांनी खोपट येथील बस स्थानकाचा आढावा घेतला. एकनाथ शिंदे यांनी १५ फेब्रुवारी २०२४ रोजी खोपट बस आगार येथे इलेक्ट्रिक बस सेवा उद्घाटन प्रसंगी परिवहन सेवा, बस आगार व कर्मचाऱ्यांना मिळणाऱ्या सुविधा सुधारण्याकरिता काही सूचना दिल्या होत्या. सदर सूचनांची अंमलबजावणी प्रत्यक्षात झाली की नाही हे पाहण्याकरिता परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी खोपट बस आगार भेट देऊन तेथील सेवा, व्यवस्थापन आणि कर्मचाऱ्यांच्या सुविधांबाबत आढावा घेतला.प्रवाशांसाठी अधिक चांगल्या सोयी-सुविधा पुरवण्यासाठी तसेच कर्मचाऱ्यांना कामाचे सुसज्ज वातावरण देण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांना तातडीच्या सूचना दिल्या. बस आगारात स्वच्छता गृह, प्रतीक्षालय आणि पिण्याच्या पाण्याच्या सुविधा उभारण्याचे निर्देश दिले. तसेच तेथील नागरिकांशी संवाद साधत त्यांच्या समस्या जाणून त्या सोडवण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांना निर्देश दिले.खोपट बस आगारातील अतिक्रमण तसेच गर्दुल्ले यांचा वावर त्वरित थांबवण्यात यावा अशा सूचना संबंधित अधिकाऱ्याला दिल्या. तसेच राज्यातील सर्वच बस आगारांना भेट देऊन तेथील नियोजन व समस्यांचा आढावा घेणार आहे, असे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी सांगितले. ०००००

पर्यटकांच्या स्वागतासाठी माथेरान सज्ज !

माथेरान : शाळांना सुटट्या पडायला लागल्या आहेत. त्यामुळे पर्यटक सहकुटूंब पर्यटनासाठी घराबाहेर पडण्याच्या तयारीत आहेत.मुंबई आणि पुण्याच्या पर्यटकांसाठी रायगड जिल्ह्यातील सर्वात आवडते ठिकाण म्हणजे माथेरान होय आहे.हिवाळ्यात नाताळच्या सुट्टीमध्ये येणार्‍या…

भारतातील बंदर व गोदी कामगारांच्या वेतन कराराची अंमलबजावणी जानेवारी २०२५ पासून होणार

ठाणे : भारतातील बंदर व गोदी कामगारांचा वेतन करार २७ सप्टेंबर २०२४  रोजी झाला असून,  या वेतन कराराची अंमलबजावणी जानेवारी २०२५ पासून होणार आहे.  असे ज्येष्ठ कामगार नेते ॲड. एस. के. शेट्ये यांनी…

 ठाण्यात सुमधूर गीतांसह `अटल संध्या’

 अटलबिहारी वाजपेयी जयंतीदिनी भाजपाचे जिल्हाध्यक्ष संजय वाघुले व विश्वास सामाजिक संस्थेतर्फे आयोजन   ठाणे :  माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्ताने भाजपा ठाणे शहर जिल्हा अध्यक्ष व माजी ज्येष्ठ नगरसेवक संजय वाघुले व भाजपा महिला मोर्चाच्या नौपाडा मंडल अध्यक्षा वृषाली वाघुले यांच्या वतीने ठाण्यात २५ डिसेंबर रोजी बुधवारी अटल संध्या कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. नौपाड्यातील भगवती शाळेच्या मैदानावर सायंकाळी ६ वाजता सुमधूर गीतांच्या माध्यमातून अटलबिहारी वाजपेयी यांना आदरांजली अर्पण केली जाईल. या कार्यक्रमात गायिका मधुरा देशपांडे, गायक सर्वेश मिश्रा, प्रीती निमकर-जोशी आणि अनिल वाजपेयी यांची मराठी-हिंदी गीतांची मैफल रसिकांना अनुभवता येईल. समीरा गुजर-जोशी यांच्याकडून निवेदन केले जाईल. या कार्यक्रमासाठी नागरिकांना मोफत प्रवेश दिला जाणार आहे. संपर्क : ९३२११९३७७५ रेल्वे स्टेशनबाहेर रक्तदान शिबीर स्वर्गीय अटल बिहारी वाजपेयी यांच्या जयंतीनिमित्ताने दरवर्षी विश्वास सामाजिक संस्थेचे अध्यक्ष व माजी ज्येष्ठ नगरसेवक संजय वाघुले व भाजपा नौपाडा मंडल महिला मोर्चा अध्यक्षा वृषाली वाघुले यांच्याकडून ठाणे रेल्वे स्टेशनजवळ भव्य रक्तदान शिबीर भरविण्यात येते. यंदा १९ व्या वर्षीही शिबिराची परंपरा कायम सुरू राहणार आहे. यंदा अटलबिहारी वाजपेयी यांच्या जन्मशताब्दीवर्षानिमित्त सॅटीस प्रकल्पालगत २५ डिसेंबर रोजी बुधवारी सकाळी ९ ते दुपारी दोनपर्यंत शिबीर भरविण्यात येणार आहे. या शिबिरात रक्तदान करून नागरिकांनी पवित्र राष्ट्रीय कर्तव्य बजावावे, असे आवाहन संजय वाघुले यांनी केले आहे. 000000

‘स्वच्छ नवी मुंबई हाफ मॅरेथॉन’ यशस्वी

– सहा हजारहून अधिक नागरिकांच्या उत्साही सहभागातून नवी मुंबई : स्वच्छतेमधील नवी मुंबईचे मानांकन उंचाविण्याचा निर्धार करीत 6 हजाराहून अधिक नागरिकांनी उत्साहाने सहभागी होत पामबीच मार्गावर आयोजित स्वच्छ नवी मुंबई…

गीता व ज्ञानेश्वरीवर आधारित व्याख्यान

डॉ. रवींद्र थत्ते यांचे २५ डिसेंबरला मुंबई : दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्राच्या वतीने गीता व ज्ञानेश्वरीवर आधारित डॉ. रवींद्र थत्ते यांचे `तत्वज्ञान सोपे आहे’  हे व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे. कै.…

श्री उद्यानगणेश मंदिर चषक शालेय कबड्डी स्पर्धा १० जानेवारीपासून

मुंबई : श्री उद्यानगणेश मंदिर सेवा समितीतर्फे मुंबई-ठाणे परिसरातील १७ वर्षाखालील इयत्ता १० वी पर्यंत मुले व मुलींच्या शालेय कबड्डी संघांची श्री उद्यानगणेश मंदिर चषक कबड्डी स्पर्धा १० व ११…